Wednesday 26 December 2012

पु. ल. देशपांडे यांनी पिळलेली ब्राह्मणांची शेंडी आणि ब्राह्मणवाद्यांची फसगत


ब्राह्मणवादी ब्लॉगरांच्या विनोदाने महाराष्ट्र लोटपोट

--राजा मइंद

ब्राह्मण हे ब्राह्मणांशिवाय कोणाचाही उदो उदो करीत नाहीत. यालाच ब्राह्मणवाद म्हणतात. ब्राह्मणी जातीयवादामुळे अनेकदा मोठे विनोद घडून येतात. पु. ल. देशपांडे यांच्या +धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही+ या लेखाच्या संदर्भाने ब्राह्मणी जातीयवादाने असाच एक महाविनोद सध्या निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या +एक शून्य मी+ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणी जातीयवादावर कोरडे ओढले आहेत. ब्राह्मण कसे मुर्ख आहेत, कसे समाजाला लुबाडून खातात, याचे विश्लेषण पु. ल. यांनी या लेखात आहे. +पु. ल. प्रेम+ या ब्लॉगवर हा लेख गेल्या महिन्यात टाकण्यात आला. +पु. ल. प्रेम+ हा ब्लॉग ब्राह्मणांकडून चालविण्यात येत आहे, हे ओघाने आलेच. इतरही अनेक ब्राह्मणवाद्यांनी तो आपल्या ब्लॉगवर शेअर केला. पण हा लेख ना +पु. ल. प्रेम+वाल्यांनी वाचला होता, ना तो शेअर करणाèया इतर ब्राह्मणी ब्लॉगरांनी. हा लेख जेव्हा ब्राह्मण वाचकांनी वाचला तेव्हा सर्वांना दे माय धरणी ठाय झाले. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणांनाच 'दे मार' झोडपून काढले आहे. आता ब्राह्मण वाचक ब्लॉगवाल्यांना शिव्या घालीत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने कधी कोणाला हसू आले नाही. पण, या लेखाच्या निमित्ताने ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलेल्या विनोदाला मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या खो खो हसत आहे. आधीच हास्यास्पद असलेले पु. ल. महाराज त्यामुळे आणखी केविलवाणे झाले आहे. पु. ल. देशपांडे हे स्वत:चा उल्लेख कधी-कधी पी. एल. देशपांडे असा करीत असत. त्याचा संदर्भ घेऊन ब्राह्मणवादी वाचक एकच प्रश्न विचारीत आहेत - अरे, हे पीएल देशपांडे आहेत की पीयेल (पिलेले) देशपांडे? 


ब्राह्मणांचा भोंदूपणा उघड करणारी
‘पीएल' देशपांडे यांची काही वाक्ये अशी : 

१. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! 

२. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

३. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. 

४. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. 

५. एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. 

६. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु' ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतुङ्क म्हणताना +दूर हो. विटाळ होईल.+ म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. 

७. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

८. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. 

९. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. 

१० उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा', ‘बलुतं', ‘आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. 

(‘एक शुन्य मी' या पुस्तकातून)

Thursday 13 December 2012

अनिता पाटील यांचे पहिले पुस्तक वाचकांना उपलब्ध


आपल्या विचारांनी जगभरातील मराठी भाषिकांत जागृतीची ज्योत पेटविणा-या अनिता पाटील यांचे

मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे

हे पहिले पुस्तक औरंगाबादच्या पंचफुला प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात अनिता पाटील यांचे गाजलेले १५ लेख आहेत. पंचफुला प्रकाशनाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे त्याची किंमत अवघी ५० रुपये ठेवण्यात आली आहे.
पुस्तक घेण्यासाठी पंचफुला प्रकाशनाचे संचालक डॉ. बालाजी जाधव यांच्याशी ९४२२५२८२९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
...........................................................................
पुस्तकाचे नाव : मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे
लेखिका : अनिता पाटील
प्रकाशक : पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद.
पाने : ६४
किम्मत : ५० रूपये फक्त

Sunday 25 November 2012

ब्राह्मणवादी इतिहासकारांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी बक्षिस लावले नाही!

जातीयवाद्यांनो बहुजन समाजाच्या सुसंस्कृतपणाला सलाम करा

बहुजन समाज अजूनही सुसंस्कृत आहे, म्हणून हा देश टिकलेला आहे. ज्या दिवशी बहुजन समाज सुसंस्कृतपणा सोडील त्या दिवशी हा देश कोलमडून पडेल. खासदार राम जेठमलानी यांनी रामाला ‘वाईट पतीङ्क म्हटल्यावर ब्राह्मणवादी गुरू आणि महंतांनी जो थयथयाट केला. त्याच्या बातम्या इंटरनेटवर वाचल्या तेव्हा माझ्या मनात बहुजन समाजाबद्दल अभिमान दाटून आला. जातीयदवादी ब्राह्मण दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून बहुजन समाजाची बदनामी करीत आहेत. पण असा थयथयाट बहुजन समाजातील कोणी अजून केला नाही.

सीतेचा कोणताही दोष नसताना रामाने सीतेचा त्याग केला. तिला सगळे आयुष्यच वनवासात काढावे लागले. आधी रामासोबतचा वनवास आणि नंतर रामानेच दिलेला वनवास. हा संदर्भ देऊन राम जेठमलानी यांनी रामाला वाईट पती म्हटले होते. आपल्या सिंधूताई सपकाळ यांनी सुद्धा रामाला देव मानण्यास नकार दिला आहे. अनेक भाषणांतून सिंधूताई आपली ही भावना व्यक्त करतात. जेठमलानी यांनी हीच भावना व्यक्त केली होती. पण ती ब्राह्मणवादी बाबांना पटली नाही. मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील एका आश्रमाचा महंत महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज याने जेठमलानी यांच्या तोंडावर  थुंकणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. त्या आधी एका ब्राह्मणवादी गटाने जेठमलानी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

ब्राह्मणवाद्यांची वरील बक्षिसे वाचून माझी खूप करमणूक झाली. माझ्या मनात प्रश्न आला, ब्राह्मणवाद्यांप्रमाणे बहुजन समाजानेही आपल्या महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात अशीच बक्षिसे ठेवली तर काय होईल? मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी महाराष्ट्रात शे-दोनशे वर्षांपासून सुरू आहे. ही बदनामी करणारे झाडून सारे इतिहासकार ब्राह्मण आहेत. पण त्यांची जीभ कापण्यासाठी किंवा  त्यांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी असे बक्षिस अजून ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराजांचे बदनामी केली. अरुण शौरी यांनी ‘वर्शिपिंग फाल्स गॉड' या पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी केली. पण बहुजन समाजातील कोणाही पैसेवाल्या व्यकतीने पुरंदरे किंवा शौरी यांची जिभ कापण्यासाठी किंवा तोंडावर थुंकण्यासाठी पाच-दहा लाखांचे बक्षिस ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे हे तर आजही महाराष्ट्रात शिवरायांचा बदनामीकारक इतिहास घेऊन सुखाने फिरत आहेत. शिवचरित्राचा वापर करून कोटीने पैसे कमावित आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की, बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य इतिहासकारांच्या विरोधात बक्षिसे जाहीर करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांकडे पैसे नाहीत. पैसे आहेत. पण बहुजन समाजातील लोकांकडे  पैशाबरोबर सुसंस्कृतपणाही आहे. त्यामुळे तोंडावर थुंकण्यासाठी किंवा जीभ कापण्यासाठी कोणी बक्षिसे जाहीर करीत नाहीत. हा सुसंस्कृतपणा संस्कारातून आला आहे. तो असाच कायम राहील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

पण जाता जाता एकच सांगावेसे वाटते की, बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी आता ब्राह्मणवादी इतिहासकारांनी थांबवावी. कारण सुसंस्कृतपणा, सभ्यपणा आणि सोशिकता यालाही शेवटी अंत असतोच. ही बदनामी पाहून एखाद्या, बहुजनाच्या संयमाचा कडेलोट झालाच आणि त्यातून कोणी असे बक्षिस जाहीर केलेच तर त्याचा दोष बदनामीचा इतिहास लिहिणा-या पुरंदरेंसारख्या इतिहासकारांकडेच जाईल.

--अनिता पाटील 
..........................................................
जेठमलानी यांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाची बातमी वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा : राम जेठमलानी यांच्यावर थुंकण्यासाठी ५ लाखांचे बक्षिस

Thursday 22 November 2012

...तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

कोहिनूर मिलमध्ये उभारा ठाकरेंचे स्मारक

नव्या पिढीतील प्रसिद्ध विचारवंत, लेखक श्री. डॉ. बालाजी जाधव यांचा
हा लेख ‘अनिता पाटील विचार मंच'च्या वाचकांसाठी देत आहोत. 

जो जन्माला येतो तो मरतो हा निसर्ग नियमच आहे . परंतु बर्याच जणांना काही व्यक्तींपुरता तरी हा नियम अपवाद ठरावा असे मनोमन वाटत असते. बाळ ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा कित्येकांना असेच वाटले. बाळासाहेब आपल्याला सोडून गेले ही खबरच नव्हे तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे असे सांगणार्या वृत्त वाहिनीची ओ बी व्ह्यान फोडण्यापर्यंत बाल ठाकरेंच्या चाहत्यांची मजल गेली. मरण हे देवालाही चुकत नाही असे कितीही म्हटले तरी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी देवापेक्षाही मोठी वाटायला लागते तेव्हा मात्र त्या व्यक्तीने निसर्गाचे सारे नियम झुगारून केवळ आपल्यासाठी जगतच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा ठाकरेंची प्रकृती चिंताजनक म्हणण्या एवढी गंभीर झाली तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकूनही प्रत्येकाने बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालून ठेवले. पण म्हणतात ना की "वास्तव हे विस्तव पेक्षा जास्त तापदायक असते " या नियमाप्रमाणे बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. या वास्तवाची जाणीव ही निश्चितच विस्तवाच्या चटक्यांपेक्षा पेक्षाही जास्त चटका लावणारी आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनतेचा महासागर लोटला. वैचारिक मतभेद हे जिवंत माणसांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबात कितीही मतभेद झाले तरी आपण आपला संसार नेटाने शेवटास नेतो . बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्यांना जन्मताच सत्यशोधक विचारांचा वारसा लाभला आणि याच वारशाच्या जोरावर बाळासाहेबांनी  'शिवसेना' नावाची प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय संघटना उभा केली. असे असले तरीही बाळासाहेबांनी आज जे लाखो चाहते निर्माण केले त्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. 

 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या
अंत्ययात्रेशी तुलना होऊच  शकत नाही 
असो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो महापूर जमला या मुळे विरोधकांना सुधा बाळासाहेबांच्या नावाची ताकत लक्षात आली. परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीने बेभान झालेल्या दीड शहाण्या ब्राहमणी मेडिया ने जे अवास्तव कवित्व सुरु केले आहे ते पाहून दस्तूर खुद्द बाळ ठाकरेंनी सुधा या दीड शहान्यांना आपल्या 'मार्मिक' शब्दात फटकारले असते आणि या नालायक लोकांना सुधा निमुटपणे बाळासाहेबांच्या फटकार्यांचा "सामना" करावा लागला असता. काही वाहिन्यांनी दिवाळीचा दिपोस्ताव संपल्या संपल्या बाळ ठाकरेंच्या अंत्ययात्रेबद्दल आपल्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजळत या अंत्ययात्रेची तुलना 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अंत्ययात्रेशी करायला सुरुवात केली. मुळात कोनत्याही व्यक्तीची तुलना दुसर्या व्यक्तीशी करणे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात महामानवांची एक दुसर्याशी तुलना करणे तर अजिबात योग्य नाही. या पेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या तुलनेद्वारे आपण नकळत (की जाणीवपूर्वक ?) बाबासाहेबांना कमी लेखत आहोत हे या ब्राह्मणांच्या लक्षात येत नसेल काय ? बर प्रदीप इंगोले म्हणतात तसे -"अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या केवळ संख्येवरून त्या व्यक्तीचे मोठेपण ठरवले तर मग त्या व्यक्तीच्या विचार आणि कार्याचे काय? आणि जर संख्येवरूनच मोठेपना ठरवायचा असेल तर मग कार्ल मार्क्स ह्या महामानवाच्या अंत्ययात्रेला त्याला खांदा देणारे ४ जनच उपस्थित होते. मग कार्ल मार्क्सचे मोठेपण काय हवेत मिळाले का ? आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथे कार्ल मार्क्सचे विचार पोहोचले नाहीत." आणखी उदाहरणच द्यावयाचे झाल्यास अन्ना भाऊ साठेंचेही देता येईल. त्यांच्या अंत्ययात्रेला तर केवळ १७ जनच हजर होते. मग अन्नाभाऊंचे मोठेपण नाकारायचे काय? हेही जाऊद्या खुद्द शिवरायांच्या अंत्ययात्रेलाही मोजकीच मानसे हजर होती. मग उद्या बाल ठाकरेंना शिवरायांपेक्षा मोठे ठरवायचे काय? बाळासाहेबांना जरूर मोठे करा पण त्यासाठी आमच्या महामानवांचा अवमान कशासाठी ?

ठाकरे यांना शिवरायांच्या जागेवर बसवणार का?
बाळासाहेबांच्या पित्याने शिवरायांचे नाव घेऊन समाजप्रबोधन केले तर बाळ ठाकरेंनी शिवरायांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. गर्दीचा महापूर पाहून बेभान झालेले काही उपटसुंभ तर बाळ ठाकरेंची तुलना छ. शिवाजी महाराजांशी करत आहेत.याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास बाळासाहेबांना स्वरांजली अर्पण करताना फेणाणी या गायिकेने रामदासाने लाळघोटेपणे शिवरायान्बद्दल जो "निश्चयाचा महामेरू..." हा श्लोक लिहिला तोच श्लोक बाळ ठाकरे बद्दल वापरला.एका न्यूज च्यानेल ने तर बाळ ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख करत याच वाक्याच्या खाली "शिवाजीच्या पुतळ्या शेजारीच स्मारक (बाळासाहेबांचे ) व्हावे " असे वाक्य टाकून शिवरायांना अरे- तुरे करून शिवरायांची बदनामी केली. पण बाळासाहेबांच्या जाण्याने सक्ख्खा बाप गमावल्याप्रमाणे आकंठ दुखत बुडालेल्या शिवसैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे दिसत नाहीये. स्वत बाळ ठाकरेही शिवरायांचे विरोधकच होते.आता काही जणांना ही बाळासाहेबंवरील अनाहूत टीका वाटेल परंतु वास्तव काय सांगते? काही वर्ष झाले शिवसेनेच्या ब्याणर वरून शिवराय हद्दपार झाले आहेत आणि तेही बाल ठाकरे जिवंत असताना हे घडले आहे. मग शिवप्रेमी बाळासाहेबांनी आपल्या पदाधिकार्यांना या गैर प्रकार बद्दल कानपिचक्या का बरे दिल्या नाहीत? शिवसेनेत तर बाळासाहेबांच्या आदेशा शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. मग याचा अर्थ शिवरायांना ब्याणर वरून हटविण्याचे आदेशाही बाळ ठाकरेंनीच दिले असल्याचे सिद्ध होते. बर जेव्हा शिवरायांच्या पितृत्व विषयी घाणेरडा विनोद बनवून जीजाऊच्या मातृत्वालाही कलंकीत केले गेले तेव्हा बाळ ठाकरेंनी या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. उलट उपलब्ध पुराव्यानुसार बाळासाहेबांनी या गैर प्रकाराचे समर्थनच केले होते.(अधिक माहितीसाठी वाचा डॉ बालाजी जाधव लिखित जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस हा ग्रंथ.) 

शिवस्मारकास विरोध करणारे ठाकरे
परवा परवा राज्यातील सत्ता रूढ पक्षाने शिवरायांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा त्यालाही बाळ ठाकरेंनी विरोधच केला. असे असताना बाळ ठाकरेंची तुलना शिवरायांशी करण्याची खाज का? ज्या भावनेतून बाळ ठाकरेंनी शिवरायांच्या अरबी समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध केला त्याच भावनेचा आदर करत महागाईने त्रस्त असणार्या राज्यातील जनतेने आणि शिवसैनिकांनी सुधा शिवाजी पार्क वरील बाळ ठाकरेंच्या पुतळ्याला विरोध केला पाहिजे आणि तोही प्राणपणाने.

मनोहर जोशींनी ठाकरेंच्या स्मारकाला जागा द्यावी
जे बाळासाहेब स्वताचे आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही असे छाती ठोकपने जाहीर सभातून सांगायचे त्याच बाळासाहेबांचे पुतळे उभे करणे बाळासाहेबांना सुधा खचितच आवडले नसते. असे असतानाही बाळासाहेबांच्या मुळ विचारांना छेद देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? वरून काही लोक खवचटपने इंदू मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायला मरेपर्यंत विरोध केला त्यांचेच स्मारक इंदू मिलच्या जागेत करा असे म्हणणे समस्त भिमसैनिकांच्या आणि बाबासाहेबप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. उलट बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क आणि इंदू मिलपेक्षाही योग्य जागा "कोहिनूर मिल" आहे. जे जोशी वारावर शिकत होते त्यांना चक्क मुख्यमंत्री पदापर्यंत बाळ ठाकरेंनी पोचवले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोशी काकांनीच बाळासाहेबांच्या जागेचा वाद मिटवत कोहिनूर मिल येथे साहेबांचे भव्य स्मारक बांधून घ्यावे अशी राज्यातील समस्त शिव सैनिकांची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांच्या या भावनेचा मान राखावा. 

या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ?
सरतेशेवटी थोडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल बोलूया. बाल ठाकरेंच्या मृत्यू नंतर मुंबईतच नव्हे तर राज्यभर बंद पाळला गेला. हा बंद काही ठिकाणी उत्स्फूर्त पने पाळला गेला तर काही ठिकाणी शिवसैनिकांनीआपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन करत बंद पाळण्यास भाग पाडले.या बंदमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे 'शाहीन धाडा ' या युवतीने फेसबुकवर बंदच्या निषेधार्थ काही मजकूर लिहिला आणि रेणू श्रीनिवासन हिने त्याला लायिक केले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी त्या तरुणीच्या काकांच, श्रीयुत अब्दुल धाडा यांचे रुग्णालय फोडून टाकले.माथेफिरू शिवसैनिकांच्या भावना समजून घेता येऊ शकतात परंतु याप्रकारामुळे पोलिसांनी त्या दोन तरुणींना तत्काळ अटक केली आणि ''चोर सोडून संन्यासाला फाशी" या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खरे तर अशा प्रकारची जलद कारवाई दरोडा, खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यात होत असते. काहीवेळा आरोपी बेपत्ता होण्याची शक्यता गृहीत धरून किंवा वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांनाही अश्या प्रकारे अटक केल्या जाऊ शकते. परंतु सदर तरुणींनी असा किंवा अशाप्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना अटक झालीच कशी? कुठे गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे स्वातंत्र्यवीर? की या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या अटकेमुळे पोलिसांनी घटनेचे कलम १९ चे उल्लंघन केले.

पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? 
बाळ ठाकरेंच्या मृत्यू मुळे पाळण्यात आलेल्या बंदचा निषेध करणाऱ्या तरुण्णींना जर एवढ्या लवकर अटक होत असेल तर मग जीजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? फेसबुक चेच उदाहरण द्यायचे झाल्यास शेकडो ब्राह्मण खोट्या नावाने राजरोसपणे बहुजन महामानवांची निंदा नालस्ती करत असतात त्यांचे काय करायचे? की शाहीन धाडा ही मुस्लीम होती म्हणून आधी शिवसेनेच्या गुंडांनी आणि नंतर पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली? अरे बाळ ठाकरे जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दोन डॉक्टर हे मुस्लीम समाजातील होते. मग हा मुस्लीम द्वेष कशासाठी? हे सगळे जर असेच चालत राहिले आणि बाळ ठाकरेंच्या विचारांविरोधात जाऊन त्यांचे देशात एकही स्मारक उभारले तर नक्कीच बाळ ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

बाल ठाकरेंचे स्मारक होईल तेव्हा होओ. आता सर्व मराठ्यांनी अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या संदर्भात आंदोलन केले पाहिजे.

(डॉ. बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशन या ब्लॉगवरून साभार)

Tuesday 20 November 2012

ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप नव्हे!

जमदग्नी ब्राह्मण म्हणतो : लाखांचा पोशिंदा 
असलेल्या राजाला मारणे हेच सर्वांत मोठे पाप!!
ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप कसे ठरले आणि कोणी ठरविले?  ब्राह्मणाला ठार मारणे हे सर्वांत मोठे पाप आहे हे कोणत्या ग्रंथात लिहिले आहे? मी अनेक धर्मग्रंथ धुंडाळले मात्र मला तरी असा कोणताही उल्लेख कोणत्याही मान्यता प्राप्त ग्रंथात आढळून येत नाही. उलट राजाला ठार मारणे, हे सर्वांत मोठे पाप आहे, असे उल्लेख अनेक ग्रंथात आढळून येतात. ब्राह्मणहत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, हा प्रचार खोटा आहे. 

या संदर्भाने भागवत पुराणात काय उल्लेख आहेत, याची चर्चा मी येथे करणार आहे. भागवत पुराणाची निवड दोन कारणांसाठी केली आहे. एक म्हणजे, आज हिंदू म्हणविला जाणार धर्म भागवत पुराणातील संकल्पनांवर आधारित आहे. अवतार कल्पना भागवत पुराणानेच आणली असून, ती हिंदू म्हणविल्या जाणाऱ्या  धर्माचा मुख्य आधार ठरली आहे. दुसरे कारण असे की, ज्या परशुरामाला आजचे ब्राह्मण आपला आदर्श ठरवित आहेत, त्याच्याच कथेत ब्राह्मण हत्या हे सर्वांत मोठे पाप नसल्याचा उल्लेख आलेला आहे. 

जमदग्नी ब्राह्मणाने काय म्हटले?
क्षत्रियांच्या हैहय कुळातील राजा सहस्त्रार्जुन आणि परशुराम यांचे भयंकर शत्रुत्व होते. एक दिवस परशुराम सहस्त्रार्जुनाला ठार मारतो. ही गोष्ट जेव्हा परशुरामाचा पिता जमदग्नी याला कळते, तेव्हा तो दु:खी होतो. तो परशुरामाचा धिक्कार करतो. 'भवान् पापमकारषीत्' म्हणजेच तू सर्वांत मोठे पाप केले आहे, असे जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. इतकेच नव्हे तर, 'राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु:' म्हणजेच ‘राजाची हत्या करणे हे ब्राह्मणाची हत्या करण्यापेक्षाही मोठे पाप आहे', असे शास्त्रवचन जमदग्नी ब्राह्मण परशुरामाला सांगतो. 

जमदग्नी ब्राह्मणाने परशुरामाला उद्देशून केलेला हा उपदेश भागवत पुराणाच्या ९ व्या स्कंधातील १५ अध्यायात जमदग्नी ब्राह्मणाचा हा उपदेश आलेला आहे. जमदग्नीच्या तोंडचे मूळ श्लोक असे :

राम राम महाबाहो भवान् पापमकारषीत्
अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं वृथा ।।३८।।
अर्थ : हाय हाय परशुरामा! तू घोर पाप केले आहे. राम राम! तू मोठा वीर आहेस; पण ज्याला सर्वदेवमय आणि नरदेव असे म्हटले जाते, त्या राजाचा तू व्यर्थ वध केला आहे. 

वयं हि ब्राह्मणास्ताम क्षमयार्हणतां गता ।
यया लोकगुरुर्देव: पारमेष्ठ्यमंगात् पदम ।।३९।।
अर्थ : बेटा, आपण ब्राह्मण आहोत. आपण क्षमा धारण केली आहे, म्हणून आपण या लोकी गुरू या पदाला पात्र झालो आहोत. आपले परम पिता ब्रह्मदेव हे केवळ क्षमा धारण केल्यामुळेच ब्रह्मपदाला पोहोचले आहेत. 

राज्ञो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरु: ।
तीर्थसंसेवया चांहो जद्यङ्गच्युतचेतन: ।।४।।
अर्थ : बेटा, सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे.  तुझ्या हातून असे सर्वांत मोठे पाप घडले आहे. आता भगवंताचे स्मरण करीत करीत तीर्थयात्रा कर आणि केलेले पाप धुवून काढ.

सारांश, ब्राह्मणाची हत्या करणे हे सर्वांत मोठे पाप आहे, असा जो प्रचार कित्येक शतके केला जात होता, तो खोटा आहे. धर्मग्रंथांनी ब्राह्मण हत्येपेक्षा राजहत्या हे सर्वांत मोठे पाप ठरविले आहे. मधल्या कालखंडात ब्राह्मणांशिवाय इतर कोणी धर्मग्रंथ वाचितच नव्हते. त्यामुळे ब्राह्मण काहीही खोट्या गोष्टी प्रसृत करीत असत. ब्राह्मण हत्येविषयीच्या कल्पना अशाच प्रसृत केल्या गेल्या. ग्रंथांतील सत्य बाहेर येऊ नये, म्हणून ब्राह्मणांनी इतरांना ग्रंथ वाचनाचा अधिकारच नाकारला. 

-अनिता पाटील

Tuesday 13 November 2012

मा. गो. वैद्य अस्वस्थ का झाले?

मा. गो. वैद्य
दिवाळीसाठी सुटी घेतली आहे. थोडासा निवांत वेळ आहे. म्हणून नेटवर भारतीय राजकारणाच्या बातम्या चाळत बसलीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या शरसंधानांनी लक्ष वेधून घेतले. वैद्यबुवा नागपूर तरुण भारतमध्ये +भाष्य+ नावाचा कॉलम लिहित असत. काही वर्षांपूर्वी त्यांचे तरुण भारतशी वाजले. अलीकडे वैद्यबुवांनी नेटावर ब्लॉग लेखन सुरू केले आहे. वैद्यबुवांनी मोदी आणि जेठमलानी यांच्यावर जे काही नथीतून तीर सोडले आहेत, ते याच ब्लॉगवरून. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांत वैद्यबुवांच्या एकाच लेखाचा उल्लेख आला आहे. वस्तुत: वैद्यांच्या ब्लॉगवर याच विषयावरचे तीन लेख आहेत. तिन्ही लेखांचा सूर आणि ताल एकच आहे. भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे संघातील ब्राह्मण लॉबी विद्ध झाली आहे. या जखमांचे हुंकार म्हणजेच वैद्यबुवांचे हे लेख होत.
वैद्यबुवांच्या ब्लॉगवरील लेख कोणते ते आधी पाहू -
१. नीतीन गडकरी, रॉबर्ट वढेरा आणि भारत सरकार (२८ ऑक्टोबर २०१२),
२. माहितीचा अधिकार आणि सरकारची लटपट (४ नोव्हेंबर २०१२)
३. भाजपाची अ-स्वस्थता (११ नोव्हेंबर २०१२) 

+भाजपाची अस्वस्थता+ हे सर्वांत ताज्या लेखाचे शीर्षक चुकीचे आहे. ते +रा. स्व. संघाची अस्वस्थता+ असे असायला हवे होते. किंबहुना हे तिन्ही लेख याच एका शीर्षकाखाली टाकले असते, तरी चालले असते. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे रा. स्व. संघ अस्वस्थ आहे. संघाची ही अस्वस्थता वैद्यबुवांच्या तिन्ही लेखांतून व्यक्त झालेली दिसून येते. नितीन गडकरी यांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडवताना वैद्यबुवांची भयंकर त्रेधातिरपीट झालेली आहे. त्यासाठी ‘संघोट्यां'चे सर्व हातखंडे वैद्यबुवांनी वापरले आहेत. पण अडचण अशी आहे की, कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी गडकरींचा भ्रष्टाचार झाकलाच जात नाहीय. मग त्यातून कमालीची अस्वस्थता येते. तगमग होते. काही अंशी जळफळाटही होतो. शेवटी होते असे की, आपण काय युक्तिवाद करीत आहोत, याचे भानही वैद्यबुवांना राहत नाही. काँग्रेसच्या नेत्यांवर जे काही आरोप झाले ते म्हणजे भ्रष्टाचार, पण गडकरींवरील आरोप म्हणजे भ्रष्टाचार नव्हेत, असा विचित्र निष्कर्ष वैद्यबुवा काढून मोकळे होतात. हा युक्तिवाद संघोट्यांना साजेसाच आहे. गडकरींचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी वैद्यबुवा रॉबर्ट वधेरा यांच्यावरील आरोप पुढे करतात. वैद्यबुवांचे सर्वांत गमतीशीर वाक्य पाहा : + वढेरांचा मामला, तसे म्हटले तर कॉंग्रेसचाही मामला नाही. एका खाजगी व्यक्तीचा मामला आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी व राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरणे देण्याचे कारण काय? गडकरींचा पूर्ती उद्योग काय सरकारी उद्योग आहे? की भाजपाचा तो उद्योग आहे? की त्या उद्योगांचे जे भागधारक आहेत, त्यांनी सरकारकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे? +

गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का?
रॉबर्ट वधेरांच्या कथित गैरव्यवहारांबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी स्पष्टिकरण देण्याचे कारण काय, असा प्रश्न वैद्यबुवा येथे उपस्थित करीत आहेत. माझ्याही मनात असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन गडकरी यांच्या भ्रष्टाचाराबाबत मा. गो वैद्य यांनी स्पष्टिकरणे देण्याचे कारण काय? वैद्यबुवांचा पुढचे प्रश्न पूर्ती उद्योगाच्या चौकशीला विरोध दर्शविणारे आहेत. गडकरींचा पूर्ती उद्योग हा सरकारी उद्योग नाही, त्यामुळे त्याची चौकशी करता येणार नाही, अशी अजब भूमिका वैद्यबुवांनी घेतली आहे. कोळसा घोटाळ्यातल्या सर्व कंपन्या खाजगीच होत्या. त्यांचीही चौकशी केली जात आहे. मग नितीन गडकरी यांच्या कंपनीची चौकशी का नको? हॉलीवूडच्या जेम्स बॉन्डला सात खून माफ आहेत, तसे गडकरी यांना सात भ्रष्टाचार माफ आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नितीन गडकरी देऊ शकणार नाहीतच, पण त्यांचे वकीलपत्र घेऊन लढणारे मा. गो. वैद्यही देऊ शकणार नाहीत. 

भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत!
नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे मा. गो. वैद्य आणि रा. स्व. संघ यांना अस्वस्थ होण्याचे कारण काय? कारण असे की, गडकरी यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट रेशिम बागेपर्यंत रुतलेली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. संघाचे मुख्यालय बांधायला गडकरी यांनी पैसा पुरविला आहे, असे माणिकरावांनी जाहीररित्या सांगितले आहे. त्यातून ही अस्वस्थता आली असणार, हे उघडच दिसते. 

संघाचा गेम प्लॅन फसला म्हणून तडफडात 
रा. स्व. संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांमार्फत ब्राह्मणांसाठी चालविली जाणारी संघटना आहे. तिचे भाजपावर नियंत्रण असते, हे सर्वश्रूत आहेच. भाजपावर ब्राह्मणांचे पूर्ण नियंत्रण कसे राहील, याबाबत संघ नेहमीच दक्ष असतो. त्यासाठी संघाने नितीन गडकरी यांना राजकारणात डेप्युटेशनवर पाठविलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आलेच तर पंतप्रधान ब्राह्मणच असावा, असा संघाचा मूळ गेमप्लन आहे. नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याचा संघाचा अंतस्थ हेतू आहे. पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्लॅनला सुरुंग लावला आहे. मोदींना स्वत:च पंतप्रधान व्हायचे आहे. मोदी हे संघाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कधीच नव्हते. कारण मोदी ब्राह्मण नाहीत. मोदी यांना संघ कधीही पंतप्रधान करणार नाही, असे विश्लेषण मी या आधी एका लेखात केले होते. ते आता जवळपास खरे ठरले आहे. संघाच्या लेखी मोदींचे महत्त्व बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्याएवढेच आहे. गुजरातेत मुस्लिमविरोधी दंगल घडवून मोदींचा संघाकडून वापर करून घेण्यात आला आहे. पण मोदी हे चलाख आहेत. संघाचा गेमप्लॅन हाणून पाडण्यासाठी त्यांनी संघाच्या माणसांचा गेम सुरू केला. आधी त्यांनी संजय जोशी यांना खड्यासारखे दूर सारले. आता गडकरींना आणि त्यांच्या बरोबर संघाला भ्रष्टाचाराच्या गाळात रुतवले आहे. एका बदमाशाने दुसऱ्या बदमाशावर केलेली ही कडी आहे. मोदीविरुद्ध संघ या झगड्याबाबत मा. गो. वैद्य यांनी काही गोष्टी उघडपणे लेखात लिहिल्या आहेत. वैद्यबुवा लिहितात : +नरेंद्र मोदींना हे वाटत असावे की गडकरी पक्षाध्यक्ष असतील, तर आपली प्रधान मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांना हेही दाखवायचे असू शकते की, संजय जोशी प्रकरणात जसे आपण गडकरींना वाकवू शकलो, त्याचप्रमाणे याही बाबतीत आपण त्यांना हतप्रभ करू शकतो. त्यासाठीच ते जेठमलानींचा उपयोग करून घेत असतील.+ 

असो. नरेंद्र मोदी यांनी संघाच्या तंगड्या सध्या संघाच्याच गळ्यात घातल्या आहेत. मोदी हे संघाला छळणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

-अनिता पाटील


दिवाळीनंतर वाचा -    भाजपात ब्राह्मणविरुद्ध बहुजन संघर्ष

Monday 12 November 2012

भारतातील ब्राह्मण हे ठोंबे बैल आहेत का?

दिवाळी धमाका : गुगलवर brahman या नावाने 
सर्च दिल्यास येतात ''ठोंब्या बैलां''चे फोटो !


गुगल इमेजेसवर इमेजेससाठी दिलेल्या सर्चनंतर माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला. दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ७.१५ वा. मी गुगलवर इमेजेसमध्ये जाऊन इंग्रजीत brahman हे शब्द टाकून सर्च दिला. ०.३२ सेकंदात १८ लाख ४० हजार फोटो गुगलने हजर केले. मात्र हे फोटो बैलांचे होते.

दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ७.१५ वा. गुगलवर इमेजेसमध्ये
 brahman हे शब्द टाकून सर्च दिला असता अशा बैलांच्या लाखो प्रतिमा मिळाल्या. 

गुगलच्या सर्चमध्ये समोर येणारे बैलाचे फोटो शेतात काम करणा-या बैलांचे नाहीत. देवाला सोडलेल्या ठोंब्या बैलांचे आहेत. हे बैल नुसतेच हिंडून-फिरून खात असतात. भारतातील ब्राह्मण आणि ठोंबे बैल हे दोघेही ऐतखाऊ आहेत, हे साम्य बहुधा गुगलच्या संचालकांना कळले असावे! त्यामुळेच ब्राह्मणांच्या जागी ठोंब्या बैलाची छायाचित्रे सर्चमध्ये येत असावीत.!!

गुगलचे संचालन भारतातून होत नाही. सातासमुद्रा पार असलेल्या अमेरिकेतून ही संस्था काम करते. याचाच अर्थ ब्राह्मणांच्या निरूपयोगीपणाची कीर्ती जगभर पसरलेली आहे, असे दिसते. तसे नसते तर गुगलच्या सर्चमध्ये ब्राह्मणांऐवजी बैलांची छायाचित्रे येती ना. 

असो. भारतातील ब्राह्मणांची अचूक पारख केल्याबद्दल गुगलचे अभिनंदन करायला हवे.

विशेष सूचना :    तुम्हीही brahman या नावाने सर्च देऊन खात्री करून घ्या. हे फोटो फार दिवस दिसणार नाहीत. माझ्या ब्लॉगवर हे सत्य जगजाहीर झाल्यानंतर ब्राह्मण = ठोंब्या बैल हे सेटिंग रद्द करून घेण्यासाठी जगभरातील ब्राह्मण गुगलकडे तक्रारी नोंदवतील. हे सेटिंग काढले जाईल. त्यामुळे  गुगल इमेजेसवर आताच्या आता सर्च द्या  


-अनिता पाटील







Saturday 3 November 2012

हम्मो... हम्मो... हम्मो.. हम्मो... हम्मो! एका भटाची फटफजिती!!

 -प्रा. रवींद्र तहकिक

चिपळूणला होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे निकाल लागले आणि मराठी साहित्यातील एक जाणकार लेखक-समीक्षक, त्या पेक्षाही मराठीचे एक उत्तम आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक श्री. नागनाथ कोत्तापल्ले हे चिपळूण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. याचा आम्हाला फक्त ह. मो .मराठे हरला आणि कोत्तापल्ले जिंकले म्हणूनच आनंद आहे असे नव्हे. प्रा. डॉ. कोत्तापल्ले यांचे साहित्य आणि मराठी भाषेला दिलेले योगदान ह. मो. मराठेच्या तुलनेत कितीतरी पटीने दर्जेदार, उल्लेखनीय, सकारात्मक, दिशादर्शक, उर्ध्वगमनशाली आणि सर्वव्यापी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षणाचे महत्व समजलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि शिकून "आम्हाला डोकं आहे ते केवळ फेटे गुंडाळण्या साठी नाही'' हे स्वतःला सरस्वतीचे पुत्र मानणाऱ्या ब्राम्हणांना दाखवून देणाऱ्या बहुजनाच्या पहिल्या पिढीतील तरुणाचे कोत्तापल्ले हे आघाडीचे शिलेदार आहेत. म्हणूनच त्यांचे संमेलनाध्यक्ष होणे आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायक घटना आहे .
     
आता थोडे ह. मो. बद्दल. मागे एका लेखात आम्ही हमोबद्दल लिहिताना हा जातीयवादी लुत भरलेला कुत्रा साहित्य संमेलनाचा अध्यक्षच काय तिथे लेखकांनी खाऊन टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्या चाटण्याच्या सुध्धा लायकीचा नाही, असे म्हटले होते. आमचे विचार योग्यच होते हे आता मतदारांनीही दाखवून दिले आहे. मुळात हा ' भिकम भट ' साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभाच का राहिला याचे आम्हाला सखेद आश्चर्य आहे. कदाचित त्याला असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे की बरेच मराठी लेखक, पत्रकार आणि साहित्य वर्तुळाशी संबधित लोक ( जे मतदार आहेत ) जातीने ब्राम्हण आहेत. वरतून पुन्हा साहित्य संमेलन चिपळूणला म्हणजे निमंत्रक मतदारातही भरपूर ब्राम्हण असणार. म्हणजे या वेळी आपण हळूच जानव्यात अंगठा घालून जरा कॉलरच्या वर काढून दाखवले आणि पुन्हा बेमालूमपणे आत सारले तर....आपली ही लबाडी कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि ब्राम्हणाची एकगठ्ठा मते मिळून आपण चक्क साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ!! गम्मत म्हणजे या मूर्ख ब्राम्हणाने आपली हे ''टॉयलेट थॉट'' आमलातही आणले. त्याने चक्क ब्राम्हणांना आवाहन करणारे एक पत्रकच काढले. त्यात आपण कसे अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू घेऊन सातत्याने साहित्य सेवा करीत आहोत, ब्राम्हणांनी आता कसे एक होणे गरजेचे आहे, याचा पाढा वाचला. पण कसचे काय अन कसचे काय! ह.मो.चे पत्रक त्याच्या स्वतःचा पराभवाची स्वतःच गायलेली नांदी ठरले. पुढच्या तीन अंकातही त्याचे चांगलेच तीन तेरा वाजले. वर्तमानपत्रातून, साहित्य वर्तुळातून, इतकेच काय एरव्ही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वसामान्य वाचक आणि समाजातूनही ह.मो. ची चांगलीच हजामत झाली. सर्वच स्तरातून छी-थू व्हायला लागल्या नंतर ह. मो. ताळ्यावर आला. त्याने जाहीर माफी मागितली; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्याची घाणीने भरलेली ''खुरे'' सगळ्यांना दिसली होती. त्यामुळे त्यावर कितीही रेशमी झुली घातल्या तरी ती झाकणार नव्हतीच! अखेर व्हायचे ते झालेच. ह .मो .ला फक्त १६४ भटांनी थारा दिला आणि कोत्तापल्ले सर ५८४ इतक्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. जानव्याने दुसऱ्याचा गळा कापायला निघालेल्या या ''भिकम भटा''ला त्याच जानव्याची फाशी बसली.

Saturday 27 October 2012

वाघोबा वाघोबा किती वाजले ?

रक्त सांडायला बहुजन अन पदे भूषवायला ब्राह्मण !
 प्रा. रवींद्र तहकिक

 
त्यादिवशी अवघा महाराष्ट्र हळहळला.......प्रत्येक शिवसैनिक रडला....अगदी बाळासाहेबांनी ज्यांच्यावर कुठलेही विधिनिषेध न बाळगता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ( ठाकरी भाषा ) जहरी टीका केली, त्या विरोधकांच्या काळजातही बाळासाहेबांची असहायता पाहून चर्र sss झाले ..... बाळासाहेबांची साथ सोडून गेलेले भुजबळ -राणे -गणेश नाईक सारख्या एकेकाळच्या निष्ठावंत शिवसैनिकांनाही साहेबाची ती अवस्था पाहून रडू कोसळले असेल... जिथे निखील वागळे सारखा शिवसेना आणि बाळासाहेबांचा कट्टर द्वेषी ( मी विरोधी हा शब्द कटाक्षाने टाळलाय ) पत्रकार( ज्याला औरंगाबाद मध्ये १९९३ साली जिवंत जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता, त्याचे आदेश मातोश्री वरून निघाले होते असे म्हणतात ) तो देखील दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांची ध्वनीचित्र फीत आणि त्यातील त्यांचेअसहाय वक्तव्य ऐकून '' गलबलला तिथे इतरांची अवस्था मी म्हणतो तशी नक्कीच झाली असणार .

ज्याला खरे रूप कळले ते सोडून गेले
'वाघ कितीही म्हातारा झाला, गलितगात्र झाला तरी एकवेळ उपाशी मरेल परंतु गवत खाणार नाही ' ''शंभर वर्ष शेळी सारखे जगण्या पेक्षा एक दिवस वाघ सारखे जगा' असे स्वत; बाळासाहेबच म्हणत असत. मग आता असे काय झाले की हा स्वतःला ढाण्या वाघ समजणारा स्वयंघोषित '' हिंदुहृदय सम्राट '' एखाद्या मंदिरा समोरील भिकाऱ्या सारखा गयावया करीत याचना करू लागला ? कुणी म्हणेल बाळासाहेब शरीराने थकले ...मनाने खचले...आजारांनी खंगले म्हणून असे बोलले. परंतु हे साफ खोटे आहे . सत्य असे आहे कि बाळासाहेब ठाकरे यांना आता हे स्पष्ट कळून चुकले आहे कि आपल्या नंतर शिवसेना एकतर संपणार किंवा राज ठाकरे ती हायजैक करणार. कुठल्याही परीस्थित उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा वाहण्यास सक्षम नाही. बाळासाहेबांचे नेमके दु;ख्ख हेच आहे कि आंधळ्या पुत्र प्रेमापोटी आपण आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि केवळ आपल्या शब्दखातर तमाम शिवसैनिक उद्धवच्या मागे राहील असा गैरसमज करून घेतला . परंतु असे घडले नाही. अनेक जण बाळासाहेबांच्या भावनेचा विचार न करता सोडून गेले, जे शिल्लक आहेत ते केवळ बाळासाहेब जिवंत आहेत तोवर केवळ शरीराने शिवसेनेत आहेत .

गारदयांशी कसली गद्दारी ?
सत्य कटू असले तरी सांगावे लागेल, कट्टर शिवसैनिकांना ते पटणार नाही किंवा माझ्या म्हणण्याचा त्यांना राग देखील येयील, परंतु अगदी पहिल्या दिवसा पासून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे प्रा. ली. कंपनी होती. फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यांचा विचार करणारी. त्यातही पुन्ह्या खास ब्राम्हणी वृत्ति अशी कि शिवसेना वाढण्यासाठी बहुजनातील भोळ्या भाबड्या तरुणांना भावनिक आवाहने करायची ...त्यांची माथी भडकवायची त्यांच्या शक्तीचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या आधारे खंडण्या, मांडवल्या करीत सत्ता देखील मिळवायची. रक्त बहुजनांना सांडायला लावायचे .... मुगुट स्वतः मिरवायचे आणि संधी द्याचीच झाली तर ती ब्राम्हणाला द्यायची हे बाळासाहेबांचे धोरण होते आणि आहे . हे ज्यांना ज्यांना कळले ते शिवसेना सोडून गेले . बाळासाहेब त्यांना उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणत या बंडखोरीला गद्दार असे संबोधतात ...परंतु आमचे स्पष्ट म्हणणे आहे कि गारदयांशी कसली आली आली गद्दारी?

Wednesday 24 October 2012

निर्लज्जम सदा सुखी

निलाजरे हसू : अंगात संघाने शिकविलेला निलाजरेपणा मुरलेला
असेल तर पापे करूनही असे दिलखुलास हसता येते!


गडकरी : पैसे खाण्याचा नवा पॅटर्न 
निर्माण करणारा महाभष्टाचारी!
प्रा. रवींद्र तहकिक 

निर्लज्जम सदा सुखी असे का म्हणतात हे ज्यांना समजून घ्यायचे असेल त्यांनी सध्या विविध वाहिन्यावर नितीन गडकरी यांनी जो स्वतःचा बचाव चालवला आहे तो पहावा ! एखाद्या छीनाल रांडेने आपल्या व्याभिचाराचे आणि अनैतिक धंद्याचे जसे जाहीर आणि निर्लज्ज पणे समर्थन करावे. आणि पुन्हा वरतून पानाची पिंक टाकत हा धंदा मी खूप आनंदाने करतेय असे नाही तर मजबुरी आहे, हि पण एक एक जन जनसेवाच आहे. असे म्हवावे अगदी त्याच प्रकारे गडकरी त्यांच्यावरील आरोपाना साळसुद उत्तरे देत आहेत. त्यांचा हा साळसूदपणा त्यांना संघाने दिलेली देणगी आहे कारण संघातला माणूस बाकी काही नाही तरी निदान खोटे अतिशय बेमालूम पणे आणि दडपून बोलू शकतो. खोट्या अफवा पसरवण्यात आणि कंड्या पिकवण्यात तर संघोट्याच्या तोंडाला कोणी हात लाऊ शकत नाही. गडकरी हे अस्सल नागपुरी संघोटे आहेत. भरा -भरा भाराभर खाणे , सकाळी ढरा-ढरा ढीगभर xxx करणे आणि बका-बका बोगस बाता मारण्यात गडकरी सर्वात '' अग्रेसर'' असल्यामुळेच त्यांना भा ज प चे अध्यक्ष पद मिळाले.   

संघाचा कलेक्शन एजंट   
आर्थात गडकरीचे कॉलीफिकेशन एवढेच नाही . प्रमोद महाजनानंतर संघ-भाजपचा कलेक्शन एजंट कोण असेल तर तो गडकरी आहे. सगळ्या प्रकारच्या मांडव्ल्या करण्यातही गडकरी पटाईत आहेत. या शिवाय पैसा कसा आडवावा , कसा वळवावा आणि कसा जिरवावा यातही ते माष्टर माईड आहेत. या बकासुराने सेनाभाजाप मान्रीमंडळात मंत्री असताना भ्रष्टाचाराचा एक नवा फार्मुला शोधून काढला. पूर्वी मंत्री आपल्या खात्य अंतर्गत असणारे काम ज्या कुणा ठेकेदाराला द्यायाचे त्याच्या कडून काही रक्कम घ्यायचे. गडकारिने मात्र आपल्याच खात्याचे काम बोगस नावाने आपण ठेकेदार म्हणून घेण्याचा आणि त्या साठी अमाप रकमा मंजूर करण्याचा नवाच फंडा आणला. इतरांना काम दिलेच तर त्यात चक्क मंजूर रकमीवर टक्केवारी पद्धतीने कमिशन घेण्याचा प्रकार आणून भ्रष्टाचार जणूकाही लीगल प्रोसेजर असल्या सारखेच केले. गडकरीचा हा फंडा आता महाराष्ट्रातच नाही तर केंद्र सह संपूर्ण देशातील सर्व राज्यात सर्रास चालू आहे ( गडकरी त्यातही रॉयल्टी मागत असेल ) 

हा माणूस बलात्काराचे  समर्थन करील 
मागे कोळसा प्रकरणात काळे तोंड झाले असताना हि हा बकासुर सगळ्याशी उद्दामपणे आणि मग्रुरीत बोलत होता. आताही ती जमीन पडीक होती, नाहीतरी शेतकर्यांना त्याचा काही उपयोगच नव्हता. मी तिथे उद्योग उभे केले त्याचा लोकांना फायदाच झाला अशी भाषा करत आहे. म्हणजे एखाद्या नराधमाने घरात एकटी असलेली बाई पाहून आत घुसावे. तिच्यावर बलात्कार करावा आनि वरतून पुन्हा म्हणावे की,  ''नाही तरी ती एकटीच होती, तिचा नवरा घरी येणार नव्हताच. आणि या बलात्कारात तिचे असे काय नुकसान झाले. शेवटी तिलाही त्या रात्री शरीर सुखाचा आनद मिळण्याची शक्यता नसताना माझ्या मुळे तो आनद मिळाला. यात तुम्ही अनैतिकता शोधात असाल तर खुशाल बोम्बलत बसा मी असल्या '' चिल्लर'' आरोपाना भिक घालत नाही...........''

वरील उदाहरणात जो निलाजरेपणाचा कळस आहे ...गडकरींचा निलाजरेपण त्या कळसावर बसलेल्या कावळ्याच्या उंचीचा आहे ! 

Sunday 7 October 2012

भुईमुगाच्या शेंगा आणि रात्रभर सोडवलेल्या गणिताची खोटी गोष्ट

 - प्रा. रवींद्र तहकिक
--------------------------------------------------------------------------------------
 टिळक किती स्वाभिमानी होते आणि हा स्वाभिमान त्यांच्यात लहानपणा पासूनच
कसा रुजलेला होता हें पटवून देण्यासाठी कोणीतरी टिळकभक्ताने रचलेली भुईमुगाच्या
शेंगाची गोष्ट आपण थोडीजरी अक्कल आणि तर्क बुद्धी जागी ठेवून वाचली तरी ती
एक निव्वळ लोणकढी थाप आहे हें आपल्या लक्षात येयील.
  मुळात टिळकांच्या काळात आजच्या प्रमाणे शाळेत टिफिन घेऊन जाण्याची पद्धत
नव्हती. किंवा शाळेच्या बाहेर आजच्या प्रमाणे चणे-फुटाणे, पेरू, भुईमुगाच्या शेंगा ,
पाणीपुरी-चाट , इत्यादीच्या गाड्याही लागत नसायच्या . बरे काही मुलांनी दप्तराच्या
पिशवीत शेंगा लपवून आणल्या असे मानले तरी , त्या काळात इतकी कडक शिस्त
असे की पोरे वर्गात शेंगा खावूच शकत नाहीत .
   असे असताना समजा मुलांनी शेंगा खावून वर्गात टरफले  टाकली असतील आणि
मास्तरांनी त्याची शिक्षा म्हणून सर्वाना वर्ग साफ करायला सांगितला असेल तर
टिळकांनी ते काम करायला हवे होते ' ' मी शेंगा खाल्या नाहीत ,मी टरफले वेचणार नाही ' '
असे मास्तरला म्हणणे म्हणजे स्वाभिमान नव्हे तर उद्दाम पणा झाला. असे म्हणून
त्यांनी वर्गातल्या इतर मुलांना देखील गुरूंची आज्ञा भंग करण्यासाठी उधुक्त केले ,
दुसर्यांचा असा जाहीर पाणउतारा किंवा उपमर्द करण्यात टिळकांना मोठा आनंद
वाटत असे, हें त्यांच्या पुढील जीवनात देखील अनेकदा दिसून आले.

 रात्रभर सोडवलेले गणित

    टिळकांनी लहान पनी एकदा वडिलांनी सुपार्या विकायला पाठवले असताना
    २ आण्याचा हिशोब लागत नव्हता म्हणून रात्र भर जागून जेव्हा २ आण्याची
 खोट सापडली तेव्हाच अंथूरनाला पाठ टेकवली असा एक किस्सा सांगितला जातो
 हाच किस्सा थोडेफार तपशिलाचे फेरफार करून तेनालीरामा/ सावरकर /आर्या चाणक्य
रामदास / एकनाथ इत्यादी बाबतीत सांगितला जातो. मी तर एका पुस्तकात असा
किस्सा गोळवलकर गुरुजी संदर्भात देखील वाचला आहे
मुळात असे लहानपणीचे म्हणून सांगितले जाणारे मोठ्या माणसांचे किस्से
सत्यातेच्या बाबतीत विश्वासाहार्य नसतात .

Friday 5 October 2012

टिळकांची दलित विरोधी पत्रकारिता

 प्रा.रवींद्र  तहकिक

केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक....या माणसाला नेमकी काय उपमा द्यावी ? सावरकराना प्र के अत्रे यांनी एकदा " काचेच्या कपाटातील सिंह " असे म्हटले होते स्वतः हस्तिदंती मनोर्यात सुरक्षित राहून समजा मध्ये असंतोष निर्माण होयील विशेषतः तरुणाची डोकी भडकतील अशी विधाने करणे, लिखाण करणे आणि त्यांना
भरीस पाडून त्यांच्या हातून विध्वंसक घटना घडवून आणणे ही एक विशेष पद्धत असते. टिळक , सावरकर आणि त्या नंतर बाळ ठाकरे ही या अशा समाजात असंतोषाचे विष पसरवणाऱ्या प्रवृत्तीची ठळक उदाहरणे.  हें स्वतः पुढे होऊन कधीच काही करत नाहीत. यांचा जो काही दम असतो तो सगळा तोंडात. त्या जोरावर हें आपल्या मनातील विध्वंसक प्रवृत्तीला वाट देतात. आपल्या या समाजविघातक विचारला राष्ट्रवादाचे/ धर्माभिमानाचे/ संस्कृती रक्षणाचे गोंडस नाव देतात आणि यावर घाला होत आहे अशी ओरड करीत आपल्या अतिरंजित व भडकाऊ भाषणे आणि लिखाणातून तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांच्या हातून हत्या / जाळपोळ /दंगली इत्यादी विध्वंसक कृत्य घडवून आणतात भारताच्या राजकीय इतिहासातील या प्रवृत्तीचा जनक कोण असेल तर ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक !

रँडची हत्यापुण्यात प्लेग ची साथ थेमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती.
प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा

प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ?
रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की
     ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी
    फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत
    आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर
    सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी  आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा
    संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे
   बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची
   छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ?
   इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?

उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी
रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला
     आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे
     धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात
     हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या
     विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे

वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ?
प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना
आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या एवजी टिळकांनी
आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला
यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून
घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात  टिळकांचा
हातखंडा होता

     

वाचा पुढील लेख :
१ )  भुईमुग शेंगाच्या आणि  रात्र भर जागून सोडवलेल्या गणिताच्या खोट्या गोष्टी 
२ ) शिवजयंती सुरुवात निव्वळ थाप
३ ) आगरकराना वापरले आणि कोपर्यात फेकले
४ ) शाहू महाराजांच्या सुधारणा कामात खोडा

Wednesday 3 October 2012

टिळकांच्या आवाजाचे 'भाग भांडवल'!

पोथ्या पुराणे पुरेनात आता इतिहासाची तोतयेगिरी !!

- प्रा.रवींद्र तहकिक
संपादक, अनिता पाटील विचार मंच

जवळपास पंधरवडा उलटला असेल.  महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु होण्यास थोडा अवकाश होता अशा वातावरणात अचानक एके दिवशी एका दूरदर्शन चॅनलवर '' ऐका बाळ गंगाधर टिळकांचा अस्सल आवाज'' अशी जाहिरात सुरु झाली. आम्हीहि उस्तुकतेपोटी संबधित चॅनलने प्रसारित केलेला तो भाग पहिला. त्यात टिळकांचा म्हणून ऐकविण्यात आलेला तो आवाज , त्यातील टिळकांचे वक्तव्य आणि २२ सप्टेंबर १९१५ रोजी झालेल्या संगीत मैफिलीचा संदर्भ हे सर्वच संशयास्पद होते. दुसरया दिवशी काही वर्तमानपत्रातूनही या संबंधात बातम्या छापून आल्या. मायबोली नावाच्या एका वेबसाईटवरही यासंबंधी माहिती आणि पुरावे सादर करण्यात आले (या लेखाची लिन्क अशी आहे : http://www.maayboli.com/node/38013) हे सर्व पहिल्या वाचल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

१) टिळकांचे म्हणून जे ७२ सेकंदांचे वक्तव्य ऐकविण्यात आले तो आवाज टिळकांचाच आहे याला पुरावा  काय?

२) संबधित वक्तव्य एकल्या-वाचल्यानंतर हे स्पष्ट होते कि या वक्तव्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाही .कुण्या एका गाण्याच्या मैफलीत श्रोते गडबड करतात आणि तेथील कुणी एक व्यक्ती या लोकांना शांत राहण्यासाठी समज देतो हि घटना अतिशय सामन्यातील सामान्य असताना काहीतरी मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागल्या प्रमाणे या किरकोळ ध्वनिफितीचा एवढा गवगवा कशासाठी ? 

३) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात हा आवाज टेप झाला, असा दावा ब्राह्मण करीत आहेत. ब्राह्मण यासाठी म्हणायचे की, हा दावा करणारे आणि त्याला प्रसिद्धी देऊन डमके वाजविणारे सगळे ब्राह्मणच आहेत. हा आवाज १९१५ खरोखरच असेल, तर त्याला ९७ वर्षे झाली आहेत, असे म्हणावे लागते. सोपा प्रश्न असा आहे की, या संपूर्ण ९७ वर्षांच्या काळात एकदाही कधी टिळकांच्या कथित आवाजाबाबत कोणीही काहीच बोलले नाही. मग आता अचानक हा आवाज टिळकांचा आहे, याचा साक्षात्कार कसा झाला? हा आवाज टिळकांचाच आहे, यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा?

४) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात भास्करबुवा बखले यांचे गायन झाले होते. त्यावेळी टिळकांचा हा आवाज कराचीहून आलेल्या एका माणसाने टेप केला असा दावा संबंधित लोक करीत आहेत. कराचीसारख्या इतक्या दूरवरून केवळ टिळकांचा आवाज टेप करण्यासाठी कोणी येईल हे म्हणणेच मुर्खपणाचे नाही का? बरे संबंधित टेपवर काहीही उल्लेख नाही. तरीही हा आवाज टिळकांचाच आहे, असे हे लोक म्हणतात. याला काय म्हणावे? 

५) राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक १७ जून १९१४ गायकवाड वाड्यात आले. शिक्षा झाली तेव्हा टिळक ५२ वर्षांचे होते. मंडालेला ते ६ वर्षे राहिले. मंडालेहून परत आल्यानंतर एक वर्षाने गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम झाला, असे हे लोक म्हणताहेत. म्हणजेच तेव्हा त्यांचे वय ५९ ते ६० वर्षांचे असणार. मंडालेमध्ये टिळकांची तब्येत ढासळली होती. त्यांची पत्नी वारली होती. ते आजारी होते. इंग्रज सरकारने अनके अटी घालून टिळकांची मुदतीआधी सुटका केलेली होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात जवळपास नव्हतेच. खरे म्हणजे त्यांच्यात तेवढे त्राणही नव्हते. मग त्यांनी हा कार्यक्रम कसा ठरविला?

६) सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ही ध्वनी फित २२ सप्टेंबर १९९५ चीच आहे, हे ठरवायचे कशाच्या आधारे. कशालाच काही आधार नसताना, हा टिळकांचा आवाज आहे, असे हे लोक खोटेच सांगत आहेत. हा आवाज टिळकांचा नसून एका तोतयाचा आहे. टिळकांच्या नावे फसवणूक करणा-यांवर खरे तर कारवाई करायला हवी, पण आपला मीडिया त्यांचा उदो उदो करीत आहे. 

एक डाव भटाचा 
मुळात टिळकांच्या तथाकथित आवाजाच्या ध्वनिफितीचे हे कारस्थान मुकेश नारंग ( ज्याने हि ध्वनिफीत मुद्रित केली असा दावा करण्यात आला आहे त्या तत्कालीन काराचीस्थित सेठ लाखिमचंद इसरदास नारंगचा नातू ) माधव गोरे ( पुण्यातील एक संगणकीय ध्वनिमुद्रण क्षेत्रातील सोफ्टवेअर तज्ञ ) मंदार वैद्य ( दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा विक्रेता/ व्हेंडर ) , शैला दातार ( भास्कर बुआ बखालेची नातसून ) या सर्वांनी मिळून केले आहे. 

उंदराला मांजर साक्ष 
या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे बजावत संबंधित बनावट ध्वनिमुद्रिका खरी असल्याचा आभास निर्माण केला आहे . यातील प्रत्येकाने 'उंदराला मांजर साक्ष' या न्यायाने कराचीचा व्यापारी नारंग ; त्याची श्रीमंती ; त्याचे संगीतप्रेम ; २२ सप्टेंबरची मैफिल ; टिळकांची हजेरी ; बाखालेबुआंचे गायन आणि टिळकांनी श्रोत्यांना दिलेली तंबी या सर्व गोष्टींचा बादरायण संबंध जोडत ध्वनिफितीचा खरेपणा पटविण्याचा प्रयत्न केला आहे.  ही  ध्वनिफित म्हणजे चार भटांच्या चांडाळ चोकाडीने गोपाळ विनायक भोंडे नावाच्या एका नकलाकार तोतयाच्या टिळकाच्या आवाजातील साधर्म्याचा फायदा घेत केलेली सायबर गुन्हेगारी आहे. अर्थात हा गुन्हा फक्त पायरसी किंवा सायबर गुन्हेगारी पुरताच मर्यादित नसून खोटे एतेहासिक दस्तऐवज तयार करणे, त्याला ते खरे असल्याचे भासवून प्रसिध्धी देणे आणि त्या पासून आर्थिक किंवा तत्सम लाभ मिळवणे अशी त्याची व्याप्ती आहे.  हा गुन्हा दखलपात्र आहे. 

हे सर्व कशा साठी ?
शेवटी या मंडळीनी हा सर्व उपद्व्याप का आणि कशासाठी केला, हा प्रश्न उरतोच! त्याचे सरळ उत्तर असे कि अलीकडे पुण्यात आणि अगदी देश-विदेशातही सर्वाना असे वाटू लागले आहे की,  पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली !!! नव्या पिढीतील लहान मुलांना तर गणेशोत्सवाचे उद्गाते टिळक होते हे सांगूनही आणि पुस्तकात वाचूनही खरे वाटेनासे झाले आहे. पूर्वी किमान पुण्यात का होयीना गणेश मंडळे टिळकांचे निदान नाव तरी घेत. आता कलमाडी हेच पुण्याचे टिळक असल्या सारखे वावरतात ( हा कलमाडी देखील पुण्यातल्या भटानीच मोठा केला ) हे असे चित्र पाहून पुण्यातल्या भटांची तंतरली आणि मग काहीतरी धमाकेदार करून टिळकांचे नाव आणि त्यांचा गणेशोत्सवाशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित करण्याच्या नादात या मंडळीनी हि आवाजाची तोतयेगिरी केली .

Monday 1 October 2012

आता लोकांना ठरवू द्या !!

प्रा. रवींद्र तहकिक
खरे तर आम्ही अजित दादा पवार आणि त्यांचा राजीनामा या  विषयावर 
आमचे जे मत मांडले ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची
घटना म्हणून ; अनिता पाटील विचारमंचचा  अजित पवार आणि त्यांचे राजकीय
अस्तित्व किंवा भवितव्य याच्याशी कुठलाही भूमिकात्मक अथवा धोरणात्मक
संबंध नाही.
       परंतु बऱ्याच वाचकांनी आमच्या ' असे धाडस फक्त पवारच करू शकतात "
या लेखावर फेसबुक आणि ब्लोग वर शंकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. म्हणूनच
या विषयावर आम्हाला पुन्हा एकदा लिहिणे आवश्यक आहे .
       अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पात किंवा त्या आधीच्या विविध खात्यात
मंत्री म्हणून काम करताना तसेच अर्थ आणि नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून
काम करताना अमर्याद भ्रष्टाचार केला असे आपण गृहीत धरू ! त्याची एखाद्या समिती द्वारे
सीबीआय द्वारे किंवा आणखी कुठल्या कायदेशीर प्रक्रीये द्वारे चौकशी व्हावी; श्वेतपात्रिका
काढावी; दोषी ठरल्यास वाटेल ती सजा भोगण्यास मी तयार आहे ! असे खुद्द अजित पवार म्हणत
आहेत. आणि हे काम निष्पक्षपाती पणे व्हावे म्हणूनच आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे
असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
         आम्ही फक्त त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. आम्ही असेही म्हटले की
असे धाडस खुद्द मोठे पवार ( शरद पवार देखील कधी करू शकले नाहीत ) आम्ही आमच्या
लेखात अजित पवार निष्कलंकच  आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कदाचित ते दोषी असुशकतात
किंवा असतीलही परंतु ते निश्चित करण्याची जबाबदारी आता या बाबत आरोप करणाऱ्या
मंडळींची आहे. त्यांना त्यांचे काम विना अटकाव करता यावे म्हणून अजित पवार यांनी आपला
अडथळा स्वतःहून दूर केला; त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य आहे, भ्रष्टाचाराचे आरोप
होणार्या अन्य मंत्र्या साठी अनुकरणीय आहे ; म्हणूनच स्वागतार्ह आहे. एवढेच आमचे म्हणणे आहे .या निमित्ताने त्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. आणि आम्ही त्यांच्या या धाडसी
निर्णयाचे या मुद्या पुरते स्वागत केले आहे; समर्थन नव्हे !!
        अनेक मंत्री हातात बेड्या पडे पर्यंत सत्तेच्या वळचणीला राहून आपला बचाव करण्या साठी
वाटा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि पक्षाने हकालपट्टी करे  पर्यंत खुर्चीला चिकटून
राहतात. अजित पवार यांनी मात्र थेट मैदानात उतरून दोनहात करण्याचा निर्णय घेतला आहे .
अजित पवार खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्याची आणि त्यांना रॉबीन हूड ठरू न देण्याची जबाबदारी आता अर्थातच आरोप करणाऱ्यांची आहे.
          यात कोण यशस्वी ठरतो हे आता कालच ठरवेल


Saturday 29 September 2012

असे धाडस फक्त पवारच दाखवू शकतात

                                                                                             

प्रा. रवींद्र तहकिक
हा लेख म्हणजे राष्ट्रवादी कोन्ग्रेस किंवा पवार फैमिलीचे समर्थन अथवा शरणता नव्हे !
अनिता पाटील विचारमंच स्वतःच्या तत्वांशी आणि परिवर्तनशील पुरोगामी बहुजन प्रबोधनाशी
बांधील आहे; या बाबतीत आम्ही कशीही ,कधीही, केव्हाही ,कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही
कारणांनी तडजोड करणार नाही. उद्या एखाद्या बहुजनातील व्यक्तीने आमच्या विचार भूमिकेला
आव्हान दिले तर उदिष्टा आड येणारे आप्त स्वकीयच नव्हे तर पोटची पोरेही कापून काढावी
लागतात या न्यायाने वेळ पडल्यास आम्ही कुणाचीही गय करणार नाही हे निश्चित !!
             परंतु हा ब्लोग फक्त दोषारोपण करतो किंवा टीकेचाच सूर लावतो असे नाही तर
समाजात काही चागले घडत असेल, काही नवे चागले पायंडे पडत असतील तर त्या बद्दल
संबधितांना त्याचे श्रेय देण्याचे औदार्य दाखवणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.
           महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सिंचन घोटाळ्यासंदर्भात
झालेले आरोप आणि श्वेतपत्रिका या मुद्यावरून आपल्या मंत्रीपदाचा थेट राजीनामा दिल्या  नंतर
राजकीय वर्तुळात आणि मीडियात एकच खळबळ उडाली. या घटनेचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ
काढले. कुणी राजकीय भूकंपाचे भाकीत केले. तर कुणी पवार x पवार बिटवीन प्रफुल्ल पटेल
व्हाया सुप्रिया सुळे अशी थेअरी मांडली.
          परंतु शिंके तुटण्याची वाट पाहणाऱ्या कुणाही बोक्याचे फावणार नाही एवढी समज -उमज आणि
राजकीय कुशलता पवार कुटुंबियांना नक्कीच आहे .मुळात अजित पवार यांनी त्यांचे काका खुद्द शरद पवार
यांना कधी जे धाडस दाखवता आले नाही ते धाडस दाखवून काका पेक्षा एक पाउल पुढे टाकले
आहे .राजकारणातील लोक अगदी न्यायालयाने तुरुंगात  रवानगी करे पर्यंत खुर्चीला चिटकून
बसतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, स्वतः शरद पवार यांच्या
वर अनेकदा अनेक प्रकारचे आरोप झाले परंतु त्यांनी हि कधी सत्तापद सोडण्याचे धाडस दाखवले
नव्हते. उलट काही वर्तमान पत्रावर आणि खैरनार सारख्या अधिकार्यावर त्याने अब्रूनुकसानीचे
खटले दाखल केले होते. यथावकाश शरद पवार सर्व आरोपातून निष्कलंक ( किंवा लीलया म्हणा
हवे तर ) सुटले ; परंतु अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडून आता वाटेल तशी निष्पक्ष चौकशी करा
असे खुले आव्हान देऊन जो नवा पायंडा पाडला आहे तो सर्वच राजकारण्यासाठी आदर्श आणि
अनुकरणीय आहे .
        हे स्पष्ट आहे कि अजित पवार जनतेत जाऊन आपले सत्तास्थान आणखी बळकट करणार .
त्यांच्या एका निर्णयाने आज राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज नेत्यांना त्यांनी चार कोस पिछाडीवर
टाकले आहे . सहकारी कोन्ग्रेस पक्षावरही त्यांची जरब वाढली आहे. एवढेच नव्हे  तर स्वतःचे
काका शरद पवार यानाही त्यांनी या निम्मित्ताने योग्य तो मेसेज दिला आहे.
       राष्ट्रवादीतील होऊ घातलेली गटबाजी आता थांबेल. आणि कार्यकर्ता वर्ग अजित पवार यांच्या
मागे एकवटेल हि यातील अजित पवार यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू      

Tuesday 25 September 2012

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान

निदान घाणीवर माती तरी टाका रे !!

-प्रा. रविन्द्र तहकीक

 दै . लोकसत्ता पूर्वी एक तरतमभाव जपणारे जबाबदार दैनिक होते. मराठी पत्रकारितेत आदराने घेतली जाणारी जी नावे आहेत त्यात दै . लोकसत्ताच्या माजी संपादकांची नावे मोठ्या संखेने आहेत. परंतु गेल्या काही वर्षात लोकसत्ताने ताळ आणि तंत्र दोन्हीशी फारकत घेतली आहे; ( पुण्यातल्या  बुधवार पेठेत (चिवडा गल्लीत)  मुख्य कार्यालय असल्यावर आणखी काय होणार ?) .

लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारीय (दि.२३ सप्टें.) पुरवणीत प्रशांत  असलेकर नावाच्या ऐका भाषा संशोधकाचा (?)'' भाषा कूस बदलते आहे '' हा लेख वाचनात आला . या लेखात भाषेचे नवीन वाक्प्रचार सांगण्याच्या भरात ( हले डुले महात्मा फुले याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. ) आता हा '' हले डुले महात्मा फुले'' हा वाक्प्रचार म्हणा किंवा म्हण म्हणा या असलेकरने कुठे एकला किंवा कुठे वाचला कुणास ठाऊक ? परंतु या निम्मिताने त्याने आपली फुले द्वेषाची कूस( की खाज )  उजवून घेतली हें निश्चित !
. सगळ्याच महापुरुष बद्दल कट्ट्यावरच्या टुकार कंपूत अश्या प्रकारची शेरेबाजी चालते. ही पोरे ( आता जातीचा उल्लेख करतो ) ब्राम्हणाची असतील तर ते शिवाजी / महात्मा फुले /आंबेडकर / बुद्ध यांच्या बद्दल आणि संघोटे ( आर एस एस चे )असतील तर  पंडित नेहरू / गांधीजी / इंदिरा गांधी बद्दल अचकट विचकट शेरेबाजी करतात म्हणून ती समाजभाषा होत नाही याचे तारतम्य असलेकरला नसले तरी तो लेख छापणाऱ्या लोकसत्ताने ठेवायला हवे होते .

      असलेकरला माराठीभाषा आणि त्यात नवीन शब्दांची पडणारी भर या बद्दल लिहायचे असावे. परंतु  लेखाचा मथळाच त्याला भाषाशास्राबद्दल किती अक्कल आहे ते ढळढळीतपणे सांगतो. कूस बदलून प्रत्येकवेळी वेगळ्या पुरुषाच्या बाहुपाशात घुसायला भाषा म्हणजे कुणी भटीण किंवा बाजारबसवी नाही !! भाषा  अखंड अविरत प्रवाही नदी सारखी असते जी उगमापासून जशी जशी पुढे जाईल तशी अधिक अधिक समृद्ध संपन्न आणि उदार होत जाते तिचा प्रवाह समकालीन समाजभूमीला सुपीक करतो आणि त्या भूमीचे अवशेष -अंशही आपल्या सोबत घेऊन पुढे जात राहतो  ( परंतु भाषा कधी कूस बदलत नाही/ अपवाद संस्कृत  )  मराठी भाषेतही असे अनेक बदल झाले. अगदी ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकारामांची मराठी यातही फरक आहे. त्याच काळात शिवाजी महाराजांची दरबारी मराठी आणखी वेगळी होती. भाषेची ढब बरा कोसावर बदलते आणि प्रत्येक पिढीत तर त्यात अमुलाग्र परिवर्तन होते. हा भाषाशास्राचा सर्वसाधारण नियम आहे. भाषेत नवेशब्द सतत तयार होणे हा भाषा जिवंत असल्याचे लक्षण आहे. म्हणून नव्या शब्दांची निर्मिती म्हणजे कूस बदलणे ठरत नाही. असो !

       आमचा मुख्य आक्षेप असलेकर या महामुर्खाने नवीन म्हण म्हणून  '' हले डुले महात्मा फुले " अशी म्हण सांगितल्या बद्दल आणि त्याचा अर्थ खीळखीळीत हलती अस्थिर वस्तू असा दिल्याबद्दल आहे. मुळात अशी म्हण कुठे अस्तित्वातच नाही !! ती असलेकारच्या सडक्या मेंदूतून आलेली आहे. बरे म्हण म्हणून एखाद्या संकल्पनेचा केलेला वापर आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असावी लागते. देवदेवता किंवा महापुरुषाबद्दल भाषेत म्हणी किंवा वाक्प्रचार निर्माण होत नाहीत असे नाही; परंतु वापरलेला वाक्प्रचार-म्हण आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असते उदा. गुळाचा गणपती ( अतिस्थूल पिचपिचीत व्यक्ती ) , लंकेची पार्वती ( अंगावर सोने नसणारी स्त्री ) , भोळा सांब ( व्यवहार न कळणारा मनुष्य ) , भाऊगर्दी ( बघ्यांची गर्दी ) स्वतःला फार 'शाहू' समजतोस काय ? ( स्वतःला फारच नेकीने वागणारा समजतोस काय ) ई ई ई 
   
 या सर्व उदाहरणात प्रत्येक वाक्य आणि म्हण वाक्प्रचाराला काहीतरी संदर्भ साम्य आणि सुसंगती आहे. असलेकर ने जे उदाहरण सांगितले त्यात अशीकाही सुसंगती असती तर तो शब्द त्यांनी स्वतःचा म्हणून सांगितला असता तरी आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता , महात्मा फुले यांचे विचार -भूमिका परखड पुरोगामी आणि ठाम होत्या आणि स्वतःच्या विचार भूमिका बाबद त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही त्या साठी प्रसंगी त्यांनी वाटेल ती किंमत चुकवली , घर सोडले , समाजाने वाळीत टाकले , पुण्यातल्या भटांनी त्यांच्या आणि सावित्रीबाईच्या अंगावर चिखल-शेण -दगड फेकले , त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले परंतु तरीही ते कधीही आपल्या कार्य भूमिका पासून तुसुभारही ढळले नाहीत कचरले नाहीत डगमगले नाहीत. असे असताना 'खीळखिळीत हलती अस्थिर वस्तू ' याअर्थाची ' हले डुले महात्मा फुले '' ही म्हण कोणत्या अर्थाने सुसंगत आहे हें असलेकर तर सांगूच शकणार नाही परंतु ज्या लोकसत्ताने हा लेख छापला त्याच्या संपादकाने तरी त्यातील सुसंगती किंवा समर्पकता आम्हाला सांगावी आणि सांगता येत नसेल तर जाहीर माफी मागावी !!!

       आम्हाला मान्य आहे वर्तमानपत्राचा वापर दुसऱ्या दिवशी पोरांना संडासास बसविण्यासाठी होतो; परंतु लोकसत्ता तर आपले वर्तमानपत्र वाचकांच्या हातात देतानाच  संघाच्या शिबिरात पोटाला तडस लागोस्तवर   खिचडी-सार खाऊन बसता उठता पादनाऱ्या आणि जागा मिळेल तिथे हग्णाऱ्या असलेकर सारख्या संघोट्याला वापरायला देत आहे. पूर्वी अभिनव गुप्त नावाच्या ऐका संघोट्याने असाच प्रताप केला होता. आता असलेकरने तर महाप्रताप केला. लोकसत्ताला गाडगेबाबांच्या भाषेत एकच विनंती आहे '''' निदान घाणीवर माती तरी टाका रे !!"

लोकसत्तामधील मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिन्केवर क्लिक करा :
भाषा कूस बदलते आहे..

Tuesday 18 September 2012

एक खिडकी

या ब्लॉगवरील सर्व लेखांच्या लिन्क येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हिंदुत्ववाद नव्हे ब्राह्मणवाद
हिन्दुत्ववाद म्हणजे काय? त्याचे खरे स्वरूप कोणते? सर्व हिन्दुत्ववादी संघटनांचे प्रमुख नेते ब्राह्मण कसे? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम अनिता पाटील यांनी या लेखात केले आहे. अनिता पाटील म्हणतात की, ब्राह्मणांना बहुजनांवर राज्य करता यावे, यासाठी हिन्दुत्ववाद हा शब्द तयार करण्यात आला आहे. खरे तर हा ब्राह्मणवाद आहे.
या मालेतील लेख असे :
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा? 

साहित्यातील ब्राह्मणवाद 
बोगस साहित्यकृतींना महान ठरवून ब्राह्मणांनी मराठी साहित्य क्षेत्रावर कसा ताबा मिळविला आहे, याचे विवरण अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. श्यामची आई, ययाती, नटसम्राट, या मराठीतील सर्वांत मोठ्या समजल्या जाणा-या साहित्यकृती थोर या संज्ञेला अजिबात पात्र नाहीत, हे अनिता पाटील पुराव्यानिशी सिद्ध करतात.
या मालेतील लेख असे : 
1. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?


गायीचे मांस खाणारा वैदिक धर्म
वेदांना प्रमाण मानणारा प्राचीन भारतातील वैदिक धर्म हा गायीचे मांस खाऊन पुष्ट झाला. गायीच्या मांसाशिवाय या धर्माचा कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. इतकेच काय, शिवाशिव पाळून बहुजनांना दूर लोटणारे ब्राह्मण गायीचे मांस मिटक्या मारीत खात होते... अनिता पाटील यांनी पुराव्यानिशी हे सत्य मांडले आहे. या लेख मालेत ते वाचायला मिळेल.
या मालेतील लेख असे :
1. प्रस्तावना
2. वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव
3. गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
4. मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप
5. अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !
6. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!


रामदास आणि पांडुरंगशास्त्री आठवले
नारायण सूर्याजी ठोसर उर्फ संत रामदास यांना मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू ठरविण्याचे महापाप ब्राह्मणवाद्यांनी केले. शिवरायांचे खरे गुरू संत तुकाराम असताना हे कारस्थान केले गेले. रामदासासाठी तुकारामांना बाजूला टाकले गेले. आता त्यापेक्षा मोठे कारस्थान स्वाध्याय परिवाराच्या नावाखाली रचले गेले आहे. पंढरपूरचा पांडुरंग बाजूला सारून पांडुरंगशास्त्री आठवले यांना देव बनविले जात आहे. स्वाध्याय परीवार खेड्यापांड्यात ‘अमृतालयङ्क या नावाने नवी मंदिरे बांधित आहे. या मंदिरात पांडुरंग आठवले यांची मूर्ती बसविण्यात येते. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ही लेखमाला लिहिण्यात आली.  

वैदिक धर्म का पराभूत झाला?
वेदांना प्रमाण मानणारा वैदिक धर्म आज भारतातून नामशेष झाला आहे. असे का घडले, याची कारणमीमांसा अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. इंद्रपुजा बंद करून श्रीकृष्णाने पहिल्यांदा वैदिक धर्मावर घाव घातला. त्यानंतर बौद्ध आणि जैनांनी या धर्माला कायमची मूठमाती दिली, असे अनिता पाटील यांचे विवेचन सांगते.
या मालेतील लेख असे : 
1. श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
2. ब्रह्मदेवाची फटफजिती
3. गीतेतला वेदविरोध
4. वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान


मराठा-कुणबी
ओबीसी जातींना २७ टक्के आरक्षण मिळाले. महाराष्ट्रातील कुणबी ही जात ओबीसीमध्ये असल्यामुळे अनेकांच्या जीवाची काहिली झाली. मराठा आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत, असा कांगावा या लोकांनी सुरू केला. मराठा आणि कुणबी या दोन जाती नसून एकच जात आहे, हे अनिता पाटील यांनी या लेखमालेत पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. या लेखमालेने भल्याभल्या विद्वानांचा मुखभंग झाला आहे.
या मालेतील लेख असे : 
1. मराठा आणि कुणबी एकच
2. तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?
3. बरे झाले देवा कुणबी केलो
4. कुणबी कोण होते?
मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे
6.ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो
7. कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे


इतिहास 
इतिहासावरील अनिता पाटील यांचे लेखन नि:पक्ष आहे. इतर इतिहासकारांप्रमाणे जातीय भूमिकेतून त्या इतिहासाकडे पाहत नाहीत. हल्ली काही लोक बाजीराव पेशव्याचा जैविक बाप कोण, याबाबत वितंडवाद घालीत असतात. या वितंड्यांना अनिता पाटील आपल्या लेखात खडसावतात. बाजीराव ब्राह्मण होता, म्हणून त्याची बदनामी करावी, हे अनिता पाटील यांना पटत नाही. त्यांच्या पक्षपातविरहीत भूमिकेची साक्ष यातून मिळते.
या मालेतील लेख असे : 
2. सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?
3. पेशव्याचे गर्वहरण करणारे सुखदेव बाबा
4. धनाजी जाधव यांना बाजीरावाचा पिता म्हणण्याचे पाप करू नका
5. बदनामी हे दुधारी हत्यार

बाळ  गंगाधर  टिळक/ विनायक दामोदर सावरकर
बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर हे कसे जातीयवादी होते, याचे विवेचन अनिता पाटील यांनी येथे केले आहे. या लेखांतील प्रत्येक विधनाला त्या पुराव्याची जोड देतात.
या मालेतील लेख असे :
१. लोकमान्य नव्हे भटमान्य

परशुरामाची ब्राह्मणी भाकडकथा
गेल्या काही वर्षांत श्रीमद्भागवतातील परशुरामाला आपला मूळ पुरूष आणि आदर्श ठरविले आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता, एवढ्या एका कारणावरून आजच्या ब्राह्मणांना तो आदर्श वाटतो. तथापि, पुराणातील परशुरामाची मूळ कथाच खोटी असल्याचे अनिता पाटील यांनी या लेखमालेत सिद्ध केले आहे. परशुराम हा आईकडून क्षत्रिय होता, हे अनिता पाटील यांनी पुराणांतील पुरावे देऊन सिद्ध केले आहे. त्यामुळे आजच्या ब्राह्मणांच्या परशुराम प्रेमाचा पायाच डगमगला आहे.
या मालेतील लेख असे : 
2. अर्धा क्षत्रिय, अर्धा ब्राह्मण परशुराम
3. रेणुका, यल्लमा आणि मातंगी
4. फुल्यांनी केलेली परशुरामाची हजाम
5. तुझ्या पोटी महाभयंकर पूत्र जन्मेल
6. परशुरामाला पित्यानेच म्हटले महापापी
 

शिवसेना
शिवसेना हा एक ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपाची सत्ता आली तेव्हा शिवसेनेचे खरे रूप समोर आले. शिवसेनेने मनोहर जोशी नावाच्या एका ब्राह्मणास मुख्यमंत्री केले.  मराठा समाज व इतर सर्व बहुजन समाजाचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. तसेच शेतीचा कणा वीज आहे. हे ध्यानात घेऊन शिवसेना-भाजपाने वीज निर्मिती संपविली. एन्रॉन प्रकल्प बुडविला. शेतीला वीज मिळेना. उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करायला लागला. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी मराठा तसेच इतर बहुजन समाजातीलच होते. त्यातला एकही ब्राह्मण नव्हता. शिवसेनेची ब्राह्मणी ध्येय धोरणांचा पर्दाफाश अनिता पाटील यांनी या लेखमालेत केला आहे.
या मालेतील लेख असे : 
2. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
3. चाभरा चाटू संजय राऊत!
4. सामनाची मळमळ
5. संजय राऊत यांनी केला दिंडी सोहळ्याचा अवमान
6. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
7. गडकरींचा ‘कोळसे'वाला
8. औरंगजेब आणि ठाकरे यांच्यात काय साम्य?


बहुजनद्रोही पु. ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे यांना ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' अशी उपाधी ब्राह्मणवादी लोक लावतात. ब्राह्मणवाद्यांना पुल एवढे का आवडतात? कारण या माणसाने मराठा समाज तसेच इतर बहुजन समाजातील महापुरुषांची निष्ठेने बदनामी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांची महान पत्नी जिजाबाई यांची बदनामी करण्याचे पाप या माणसाने केले. बहुजनांना अपमानित करणारा प्रत्येक जण ब्राह्मणवाद्यांसाठी हिरो असतो. म्हणून पु. ल. देशपांडे यांना हे लोक डोक्यावर घेतात. ‘अनिता पाटील विचार मंच'चे संपादक प्रा. रविन्द्र तहकीक यांनी पुल यांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला.
या मालेतील लेख असे :
1. या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
2. संत तुकारामांचा घोर अपमान करणारा पू. ल.
3. बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!
4. पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !
5. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा का?
6. अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!


इस्लाम आणि भारत
ब्राह्मणवादी लोक मुस्लिमांचा सतत द्वेष करीत असतात. बहुजन समाजाला मुस्लिमांविरुद्ध चिथावणी देत असतात. मुसलमान आणि बहुजन भांडत राहिले तरच ब्राह्मणी नेत्यांचे नेतृत्व टिकून राहू शकते. मुसलमानांच्या विरोधात दंगली भडकावणारे यच्चयावत सर्व नेते ब्राह्मण कसे? या प्रश्नाचे उत्तर असे ब्राह्मणी नेतृत्वात आहे. याचा पर्दाफाश या लेखमालेत आहे.
या मालेतील लेख असे :

राजकारण
1. काँग्रेस पक्ष भाजपाच्या खेळीत अडकला का?
2. बायकांचे कपडे आणि तुरुंगाचा हट्ट!
3. श्रीपाद अमृत डांग्यांची 'मराठा' आई...


वर्तमानाचा लेखा-जोखा
1. रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश
2. बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात
4. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !
5. जयतु हिन्दू राष्ट्रम की जयतु ब्राह्मणराष्ट्रम?
6. शेफारलेले बाळे आणि बाळ्या
7. खेडेकर साहेबांच्या पुस्तकावर एवढा गहजब कशासाठी?
8. बामनांची 'ढ' मुले काय करतात?
9. हा घ्या ब्राह्मण जातीयवादाचा आणखी एक पुरावा
१०. ब्राह्मणवादी आणि आरएसएसवाल्यांच्या शिव्या
११. अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!
१२. हिंदु धर्मात ब्राह्मण, आरएसएसवालेच उरतील

१3. गोमांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान!

अटलबिहारी वाजपेयी : आरएसएसचा मुखवटा
1. असा ढोंगी माणूस १० हजार वर्षांत झाला नाही
2. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 1
3. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 2
4. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 3
5. अटल अटल , बोलत सुटल


वाद-संवाद
1. ९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र
2.भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !
3. शहामृगांनो, खुशाल वाळूत तोंड खुपसून घ्या !
4. प्रा. हरी नरके यांना पत्र
5. ब्राह्मणवादी शिंद्यास अखेरचे पत्र
6. एका ब्राह्मणवाद्याच्या पत्राला खरमरीत उत्तर
7. दादाहरी यांच्या पत्राला उत्तर
8. महावीर सांगलीकरांची शोकांतिका : वाल्मिकीचा झाला वाल्या कोळी!
9. संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद
१०. महावीर भाई, घेतला वसा टाकू नका!

११कनिष्ठ जातींना हीन मानणा-या जातीयवाद्यांना काय उत्तरे देणार?
१२. ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?
१३. विकास गोडसे यांचे झणझणीत अंजन


इतर लेख
2. आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण!
3. पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा
4. ब्राह्मणांनी चित्रपटसृष्टीचाही खोटा इतिहास लिहिला
5. गौरी किनगावकर हिची करुण कहाणी
6. बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांचे अद्भूत लग्न



‘दै. लोकसत्ता' सोबतचा तंटा
1. ‘दै. लोकसत्ता'चा मूळ लेख : तिरस्कारा पलीकडे..
2. अनिता पाटील यांनी लोकसत्ताची घेतली दखल
3. डॉ. बालाजी जाधव यांचे ‘लोकसत्ते'ला खणखणीत उत्तर
4. अनिता पाटील यांचे उत्तर लोकसत्तेचे खोटे आरोप
5. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट
6. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!
7. रवींद्र तहकिक उर्फ दादाहारी यांनी दिलेले उत्तर : लोकसत्तेचा अभिनव गुप्तरोगी


ANITA SAYS...
1. Why should Bahujanas fight the battle of Kashmiri Brahmins?