Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-२. Show all posts
Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-२. Show all posts

Thursday, 12 December 2013

शिवाजी-व्यंकोजी यांच्यामध्ये भांडणे लावणारा हनुमंते

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


रघुनाथपंत हनुमंते हा एक भ्रष्टाचारी व चहाडखोर अधिकारी तंजावरला व्यंकोजीराजांच्या पदरी
होता. त्याने प्रशासनात केलेल्या गंभीर चुकांमुळे व्यंकोजीराजांनी त्याला बडतर्फ केले होते. तो
तामिळनाडुतून थेट रायगडावर आला. आणि व्यंकोजी राजाबाबत अनेक चहाड्या सांगू लागला. पण
राजे दूरदृष्टीचे आणि चाणाक्ष होते. राजांनी हनुमंतेचा डाव ओळखला. हनुमंतेला वाटले
व्यंकोजीराजे राजांचे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे राजे व्यंकोजीच्या विरोधात भूमिका घेतील. पण
राजांनी या सर्व ब्राह्मणांचे सर्व कावे ओळखलेले होते. राजांनी दक्षिण मोहिम काढली. ती व्यंकोजीवर
हल्ला करण्यासाठी नव्हे, तर दक्षिणात्य राज्यकर्त्यांची युती करावी आणि दिल्लीचे सिंहासन  जिंकणे  या
विशाल दृष्टीकोनातून काढली होती. रघुनाथ हनुमंते यांनी राजांचे व्यंकोजीशी भांडण लावून पोळी
भाजण्याचा प्रयत्न केला होता. पण राजांच्या दूरदृष्टीमुळे हनुमंतेला त्यात यश आले नाही.


ब्राह्मणांननी संभाजीराजांचची बदनामी सुरु केली
शिवाजीराजे दक्षिणेत गेल्यानंतर शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण
करण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक कटकारस्थाने रचली. या प्रसंगी संभाजीराजे शृंगारपुर येथे सासरवाडीला
होते. शिवरायांच्या खूनानंतरच संभाजीराजे रायगडावर गेले. पण मोरोपंत, अण्णाजी दत्तो यांनी
शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये फुट पडावी, यासाठी संभाजीराजे रयतेला करात सवलत
देतात, संभाजीराजे व्यसनी आहेत, ते व्यभिचारी आहेत अशा अफवा उठवायला सुरुवात केली.
संभाजीराजांची बदनामी करण्यासाठी उमाजी पंडित प्रचारकासारखा संपुर्ण महाराष्ट्रात फिरला.
शिवरायांच्या कानावर हा वृतांत जावा अशी व्यवस्था राजांच्या ब्राह्मण मंत्र्यांनी केली. संभाजी-शिवाजी
यांचा बेबनाव झाला की, या संघर्षाचा फायदा घ्यावा हा ब्राह्मणांचा डाव होता. ब्राह्मण थेट कधीच
लढत नाहीत ने नेहमी बहुजनात जीवघेणी भांडणे लावतात. तसा प्रयत्न त्यांनी राजांच्या घरातच सुरु
केला पण राजांनी ब्राह्मणांचा डाव ओळखला होता. कारण राजांचा संभाजीराजांच्या चांगुलपणावर
विश्वास होता. संभाजीराजांनी संपुर्ण आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. त्यांना सुपारीचे सुद्धा व्यसन नव्हते.
त्यांनी बुद्धभुषण, सातसतक, नायिकाभेद, नखशिख हे चार ग्रंथ लिहिले. ते कर्तव्यदक्ष होते म्हणूनच ते
लोकप्रिय होते. त्यांनी एकाही ब्राह्मणाला कधीही मुजरा केला नाही. म्हणूनच ब्राह्मण त्यांच्यावर
चिडलेले होते. ते संस्कृत शिकले, त्यांनी ग्रंथ लिहिले हा प्रस्थापित ब्राह्मणांवर त्या काळात मोठा हल्ला
होता. म्हणूनच ब्राह्मणांनी संभाजीराजांसारख्या धवल चरित्राच्या राजपुत्राची बदनामी करण्यास सुरुवात
केली. सोयराबाईला हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. राजारामला गादीवर बसविण्याचे आमिष
सोयराबाईला दाखविले. तिचे सावत्र मातृत्व जागे केले. पण सोयराबाईचे संभाजीराजांवर
राजारामाप्रमाणेच प्रेम होते. सईबाईच्या अकाली निधनानंतर सोयराबाइंनी संभाजीराजांना जीवापाड
जपले. जिजाऊमाँसाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संपुर्ण कुटुंब स्वराज्यप्राप्तीसाठी ध्येयवेडे झाले होते.
ध्येयवादी कुटुंबात क्षणभंगुर सुखासाठी कधीही गृहकलह नसतो. त्यामुळे सोयराबाई या निष्कलंक व
स्वराज्यनिष्ठ होत्या. म्हणूनच त्या शेवटपर्यंत ब्राह्मणांच्या सत्तांतराच्या कटात सहभागी झाल्या नाहीत.
त्या कटात सहभागी झाल्या असत्या तर सोयराबाइंचे सख्खे भाऊ हंबीरराव मोहिते यांनी
सोयराबाईची बाजू घेतली असती. पण हंबीरराव मोहिते मरेपर्यंत संभाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे होते.

स्फटिकासारख्या निर्मळ मनाची माता
सोयराबाइंचे संभाजीवर सुपूत्रांप्रमाणेच नितांत प्रेम होते. तर संभाजीराजांनी देखील
राजारामला सख्या भावाप्रमाणे व सोयराबाईला आईप्रमाणे सांभाळले होते. राजारामाचे तीन विवाह
संभाजीराजांनी करुन दिले. संभाजीराजे सोयराबाइंना "स्फटिकासारख्या निर्मळ मनाची माता" असे म्हणत.
याचा अर्थ संभाजीराजे आणि सोयराबाई यांचा कसलाही अंगर्तत कलह नव्हता. याउलट सोयराबाई,
राजाराम, शिवाजीराजे यांना त्रास देणा-या ब्राह्मणांनाच राजांनी ठार मारले. राजे निष्कलंक आणि
स्वराज्यनिष्ठ असतानादेखील राजांची सातत्याने बदनामी का करण्यात आली? कारण राजे व्यवस्थेच्या
बंधनात राहणारे नव्हते. ते स्वतंत्र विचारसरणीचे होते. परंपरेने गुलामगिरी सारखे सिंहासनावर आरुढ
होण्याची स्वार्थी वृत्ती राजांची नव्हती. त्यामुळे संभाजीराजांची उमेद नष्ट करण्यासाठी त्यांची बदनामी
करुन त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. ते चारित्र्यसंपन्न आणि स्वराज्यनिष्ट होते याबाबत दुमत
नाही. तरीदेखील संभाजीराजांची मोरोपंत, अण्णाजी दत्तो, प्रल्हादपंत, उमाजी पंडित इ. ब्राह्मणांनी
बदनामी का केली? कारण संभाजीराजांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला होता. त्यांनी
संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले होते, ४ ग्रंथ  लिहिले होते. म्हणजे संभाजीराजांनी साहित्य क्षेत्रातील
मक्तेदारीवर प्रहार केला. ब्राह्मण मंत्र्यांचे संभाजीराजांनी कधीही वर्चस्व स्विकारले नव्हते. गोर-गरीब
बहुजन जनतेला अनेक सवलती दिल्या. त्यांनी. ब्राह्मणांची अरेरावी नष्ट केली. त्यामुळेच
शिवाजीराजांच्या आश्रयाला असणा-या सर्व ब्राह्मणांनी संभाजीराजांची बदनामीला सुरुवात केली.
कर्तृत्वसंपन्न धाडसी, पराक्रमी, विव्दान बहुजनांना संपविण्यासाठी त्यांनी सर्व बाजूंनी बदनामी
करणे हे ब्राह्मणांचे विषारी हत्यार आहे. एखाद्या निष्कलंक विव्दान बहुजनांची बदनामी सुरु केली तर तो
वैफल्यग्रस्त होते. चिंताग्रस्त होतो. आपण चांगले असताना आपली बदनामी कशी? या विचाराने कर्ता
पुरुष वैफल्यग्रस्त होतो व त्याची हळूहळू उमेद संपते. राजांना नाउमेद करण्यासाठीच सर्व मंत्र्यांनी
त्यांची बदनामी सुरु केली होती. संभाजीराजांनी सोयराबाईला आदराने वागविले. तरीदेखील अशी
अफवा उठविली की, रायगडावर संभाजी आल्यावर त्यांनी सोयराबाईला चिणून मारले. पण सोयराबाई
त्यावेळेस जिवंत होत्या. त्यानंतर सव्वा वर्षाने म्हणजे २७ ऑक्टो.१६८१ला सोयराबार्इंचे निधन
रायगडावर झाले. त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते.

गोदावरी, कमळा, या स्त्रिया तर इतिहासात झाल्याच नाहीत
संभाजीराजांची ज्या स्त्रियांशी नावे जोडली जातात, त्या गोदावरी, कमळा, या स्त्रिया तर इतिहासात झाल्याच नाहीत. बखर, नाटक व कादंबरीकारांनी या स्त्रियांना जन्म दिला. राजांची अशाप्रकारे बदनामी करणारे हे शत्रू मोगलांपेक्षा कू्र आहेत.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Wednesday, 11 December 2013

शिवाजी राजे हिंदू धर्माचे की शिव धर्माचे?

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


शिवजीराजांनी अथक परिश्रमाने स्वराज्य निर्माण केले. जगातील कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला
किंवा राजाला त्याच्या धर्माचे विधी करण्यास विरोध केला जात नाही. समता हे धर्माचे महत्त्वाचे मूल्य
आहे. एकाच धर्मातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ व्यक्तीला धर्माचे आचार, विचार, अध्ययन करण्याची
परवानगी असते. शिवरायांनी तर आपले कर्तृत्व अविरत कष्टाने, चारित्र्याने, निष्कलंक वृत्तीने सिद्ध
केलेले होते. तरी देखील त्याच धर्मातील ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?
यावरुन एक बाब सिद्ध होते की शिवरायांचा व ब्राह्मणांचा धर्म एक नाही. धर्म एक असता तर
ब्राह्मणांनी आनंदाने आणि फुकट राज्याभिषेक केला असता. याऊलट त्यांनी राजांना खूप छळले. तेच
हिंदूत्ववादी (ब्राह्मण) आज शिवरायांचे भांडवल करुन जगतात.
शिवाजीराजे महान पराक्रमी, बुद्धीमान, चारित्र्यसंपन्न, प्रजाहितदक्ष आणि न्यायी असताना
देखील कोणत्या धर्माने राजांना शूद्र ठरविले? त्यांना शूद्र ठरवून त्यांचे कर्तृत्व नाकारणारा व परदेशातून
आलेल्या आर्यब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविणारा हिंदू धर्म राजांचा धर्म असू शकतो का?
हिंदू  धर्माने भारतीयांच्या सृजनशिलतेवर कडक निर्बंध घातले. समुद्र ओलांडणे, शस्त्र धारण
करणे, स्त्रियांना स्वातंत्र्य देणे, शिक्षण देणे, समता पाळणे यावर हिंदूनी (ब्राह्मणांनी) कडक बंधने
घातली. शिवरायांनी ही बंधन तोडली. शिवरायांनी समुद्र ओलांडला, आरमारदल उभारले,
बहुजनांच्या हातात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे दिली, स्त्रियांना स्वातंत्र्य दिले, स्वत: आईकडून
शिक्षण घेतले, संभाजीराजांना शिक्षण दिले. हिंदुंचे ग्रंथ प्रामाण्य नाकारले व समतेवर आधारलेले
स्वराज्य निर्माण केले. मग सांगा शिवाजीराजे कसे हिंदू  ठरतात?

हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्त्व आहे हे ओळखणारे जैन, बौद्ध, शिख ही आपली भावंड आहेत.
त्यांनी वैदिकांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कु्ररपणा ओळखला व जैन, बौद्ध आणि शीख हे ब्राह्मणी
धर्मापासून स्वतंत्र झाले. जैन, बौद्ध, शीख धर्मात ब्राह्मणांना नाक खुपसण्याची संधी नाही. म्हणूनच
या देशात जैन, बौद्ध आणि शिखांची प्रगती झाली. शिवाजीराजांनी देखील स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न
सुरु केले होते. राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. शिवशक सुरु केला, स्वतंत्र शिवराई होन ही चलन
पद्धती सुरु केली. स्वतंत्र राज्यकारभार, न्यायपालिका सुरु केली, शिवपूत्र संभाजीराजांनी धर्मचिकित्सा
सुरु केली. भटांची सर्व कटकारस्थाने लक्षात आल्याबरोबर राजांनी स्वतंत्र व्यवस्थानिर्मिती सुरु केली.
शिवाजीराजे जगले असते तर त्याचवेळी शिवरायांनी शिवधर्माची स्थापना केली असती. त्यामुळेच ३
एप्रिल १६८० रोजी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांनी राजांचा खून केला.


संत तुकाराम महाराज यांचा ब्राह्मणांनी खून केला
शिवाजीराजांना राज्याभिषेक करणे अत्यावश्यक होते. पण स्वत:ची धर्मसंहिता नसल्यामुळे
राजांना ब्राह्मणांच्या म्हणजेच हिंदू धर्मावर अवलंबून रहावे लागले. शिवरायांना स्वत:चा धर्म असता
तर ब्राह्मणांनी राज्याभिषेक प्रसंगी छळ केला नसता. राजांच्या कारभारात नाक खुपसले नसते.
शिवरायांची धार्मिक बाजू सांभाळणारे संत तुकाराम महाराज यांचाच ब्राह्मणांनी शिवरायांच्या बालपणी
खून केला. अन्यथा संत तुकुकारामांनी राज्याभिषेकेकापर्यंत स्वतत्रंत्रधर्म स्थापणे केलेला असता. आणि
ब्राह्मणांनी म्हणजेच हिंदू  धर्माने शिवरायांचा केलेला छळ, केलेला विरोध, शूद्र म्हणून केलेली अवहेलना
याचा बदला घेतला असता ही गरज ओळखून देशातील अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी,
विचारवंतांनी, देशभक्त समाज सुधारकांनी शिवरायांच्या विचार प्रेरणेचा शिवधर्म स्थापन केलेला आहे.
शिवधर्म हा शिवरायांचा धर्म आहे. शिव म्हणजे शिवाजी! शिव म्हणजे सत्य, मंगलमय आणि
उदात्त! शिवधर्मात असत्य काहीही नाही. संत तुकाराम महाराज, शहाजीराजे, संभाजीराजे, ताराराणी
यांच्या कर्तृत्वाचा व विचारांचा अमूल्य ठेवा म्हणजे शिवधर्म! स्वातंत्र्याची आद्यजनक राजमाता
जिजाऊमाँसाहेब यांना प्रेरणा स्त्रोत मानून एकमेव आणि पहिलाचा धर्म आहे. ज्यांनी आपल्यासाठी
संपुर्ण आयुष्य घालविले. तेच शिवधर्माचे देव आहेत. ब्राह्मणनिर्मित खोटे, काल्पनिक देव आणि गं्रथ
याला शिवधर्मात अजिबात स्थान नाही. शिवरायांना छळणा-या ब्राह्मणांना शिवधर्मात अजिबात प्रवेश
नाही.

ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पहातो?
आता वाचकांनी ठरवावे ही शिवरायांना शूद्र ठरविणारा, राज्याभिषेक नाकारणारा, अमाप पैसा
घेऊन राज्याभिषेक प्रसंगी छळणारा हिंदू धर्म शिवरायांचा का शिवरायांच्या विचार प्रेरणेतून निर्माण
झालेला शिवधर्म शिवरायांचा?
शिवाजीराजे धर्मनिष्ठ हिंदू  असते तर राजांनी राज्याभिषेक केला नसता, कारण ब्राह्मणेत्तरांना
राज्याभिषेक करण्यास बंदी होती. राजे धर्मनिष्ठ हिंदू म्हणजेच ब्राह्मणनिष्ठ असते तर राजांनी समुद्र
ओलांडला नसता, कृष्णा कुलकर्णीला ठार मारले नसते, शूद्रातिशूद्रांना अधिकार पदावर नेमले नसते,
राजे धर्मनिष्ठ हिंदू असते तर सत्यनारायण, यज्ञ, अभिषेक केला असता. मुहूर्त पाहिला असता, रोज भट
निर्मित ग्रंथांची पारायणे केली असती. या उलट राजांनी भटनिर्मित सर्व हिंदू ग्रंथांना लाथ मारली. राजे
धर्मनिष्ठ हिंदू  असते तर त्यांनी रोज ब्राह्मणांचा सल्ला घेतला असता, याउलट राजांनी अनेक ब्राह्मण
कापले व म्हणाले "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पहातो?" यावरुन सिद्ध होते की शिवाजीराजे
शिवधर्माचे आहेत.

हिंदू धर्माच्या छळामुळे जिजाऊ माँसाहेबांचे दु:खद निधन

शिवाजीराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला. धर्म-संस्कृतीच्या नावाखाली गागाभट्टाने
विरोध केला. या अपमानामुळेच जिजाऊ माँसाहेबांसारखा स्वराज्याचा आधारवड १७ जून १६७४
रोजी कोसळला. राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच १० दिवसांनी जिजाऊंचे नैसर्गिक निधन होणे शक्य
नाही. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेने माँसाहेबांचा देखील बळी घेतला. पराक्रमी, विव्दान, प्रजावत्सल
असणा-या माँसाहेबांचा बळी घेणारा धर्म माँसाहेबांचा धर्म होऊच शकत नाही. यासाठीच मराठ्यांना
शिवधर्माची गरज आहे.

शिवरायांचा दुसरा राज्याभिषेकेक-शिवधर्माचची पायाभरणी
शिवरायांचा ६ जून १६७४चा राज्याभिषेक म्हणजे या देशातील ब्राह्मणांनी पैसा मिळवून
राजांचा व बहुजनांचा केलेला फार मोठा छळ होता. पण आपला धर्म नसल्यामुळे ब्राह्मणांच्या
हिंदू धर्मावर शिवरायांना अवलंबून रहावे लागले. हे शल्य राजांना होतेच. म्हणूनच शिवरायांनी २४
सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने केला. यासाठी निश्चलपुरी गोसावी यांनी
पौरोहित्य केले. यासाठी अधिक प्रसिद्धी किंवा खर्च आला नाही. या राज्याभिषेकप्रसंगी एकही
अपमानास्पद घटना घडली नाही.

२४ सप्टेंबर हा शिवधर्मदिन 
शिवरायांनी केलेला दुसरा राज्याभिषेक म्हणजे त्यांनी ब्राह्मणीधर्म (हिंदू धर्म) नाकारल्याचे
सिद्ध होते. हिंदू धर्मातील ग्रंथ ब्राह्मणांच्या हिताचे व बहुजनांच्या घाताचे आहेत हे राजांनी हेरले.
हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्व आहे हे राजांनी ओळखले. म्हणूनच राजांनी दुसरा राज्याभिषेक केला.
शिवरायांच्या जीवनात दुस-या राज्याभिषेकाला फार मोठे महत्व आहे. दुसरा राज्याभिषेक आपल्याला
खरा धर्म सांगतो. म्हणून ब्राह्मण दुसरा राज्याभिषेक सांगत नाहीत. दुसरा राज्याभिषेक म्हणजे
शिवधर्माची पायाभरणी आहे. दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर हा शिवधर्मदिन (बहुजनमुक्तीदिन) आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा केलेला छळ

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


१६६८ पासून शिवाजीराजांनी रायगडावर राजधानी केली होती. रायगड हा अत्यंत कठीण व
सुरक्षित असा किल्ला आहे. कडे ताशीव व उंच आहेत. गडाची लांबी ४ कि. मी. व रुंद १ कि. मी.
आहे. गडाभोवती कठीण डोंगररांगा आहेत. कोणत्याही शत्रूला रायगड जिंकणे अशक्य आहे. असा
रायगड शिवरायांनी राजधानीसाठी निवडला. गडावरील बांधकाम शिवरायांनी स्वत: करुन घेतले.
स्वराज्यातील अनेक किल्ले शिवरायांनी स्वत: बांधले. शिवाजीराजे उत्तम स्थापत्यतज्ञ (इंजिनिअर)
होते. अशा रायगडावर राज्याभिषेक करण्याचा राजांनी निर्णय घेतला.

राज्याभिषेकदिन जसा जवळ येऊ लागला. तशी ब्राह्मणांची कटकारस्थाने सुरु झाली. पण राजमाता जिजाऊमाँसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. याप्रसंगी जिजाऊंचे वय ७६ वर्षाचे होते. या वयातही जिजाऊंचे धैर्य, करारीपणा तेजस्वी होता. राज्याभिषेकाला एकही पुरोहित मिळू द्यायचा नाही. असा चंग देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. याप्रसंगी कायस्थ प्रभू असणारे बाळाजी आवजी यांनी पुरोहिताचा शोध सुरु केला. ब्राह्मण-कायस्थांचे हाडवैर असल्यामुळे कायस्थ राजांच्या बाजुला होते. बाळाजी आवजीने महाराष्ट्रातील सर्व भटजींना पौरोहित्यासाठी विचारले, सर्वांनी शिवाजी शूद्र आहे. आम्ही येणार नाही असे
कळविले. तेंव्हा बाळाजी आवजीने गागाभट्टाला बोलाविण्यासाठी केशवभट, भालचंद्रभट आणि
सोमनाथ या तीन ब्राह्मणांना काशीला पाठविले. गागाभट्टाने या तिघांजवळ शिवाजी शूद्र असल्यामुळे
मी येणार नाही, असे स्पष्ट कळविले. (मित्रहो, ब्राह्मण आपल्या देशात येण्यापूर्वी कोणीही हलके नव्हते,
कोणीही सवर्ण नव्हते, सर्वजण समान होते. पण आपल्यावर राज्य करण्यासाठी ब्राह्मणांनी वर्ण, जाती
निर्माण केल्या व स्वत:कडे श्रेष्ठत्व घेतले. याचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मणांनी ग्रंथ लिहिले. त्यालाच
हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणतात. या ग्रंथांनीच शिवरायांना शूद्र ठरविले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे विदेशी
आर्यांचे वर्ण आहेत. मुळचे भारतीयांना आर्यांनी शूद्र घोषीत केले.)

केशवभट, भालचंद्रभट, सोमनाथभट आणि गागाभट या चार भटात गुप्त कट झाला
असल्यामुळे बाळाजी आवजीने आपल्या विश्वासातील कायस्थ असणा-या निळो येसाजीला पुन्हा
गागाभट्टाकडे पाठविले. याप्रसंगी शिवरायांचे मूळ घराणे उदयपूरचे असल्याची बनावट कागदपत्रे
बाळाजीने गागाभट्टाकडे पाठवली. शिवाजीराजांच्या भोसले घराण्याचा राजस्थानाशी कसलाही संबंध
नसून भोसले घराणे मुळचे महाराष्ट्रातील वेरुळचेच आहे. हे बाळाजीला आणि गागाभट्टाला चांगले
माहित होते. बाळाजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट सर्व ग्रंथ गुंडाळून रायगडाच्या
पायथ्याजवळील पाचाडात आला. ब्राह्मण हे ग्रंथांचे व देवांचे बाप (निर्माते) असल्यामुळे गागाभट्टाला
ग्रंथप्रामाण्यापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला.
गागाभट्ट पाचाडात आल्याबरोबर मोरोपंत पिंगळेने गागाभट्टाची भेट घेतली व
राज्याभिषेक झाला तर ब्राह्मणांचे वर्चस्व संपेल व शिवाजी श्रेष्ठ ठरेल, त्यामुळे राज्याभिषेक करु नये.
असा सल्ला गागाभट्टाला दिला. गागाभट्टाने लगेच सरड्यासारखा रंग बदलला. शिवरायांना
राज्यभिषेक करण्यास नकार दिला.

शिवाजीराजे शुद्र असल्यामुळे त्यांच्या ऐवजी बाळाजी आवजीला राज्याभिषेक करण्याचा
गागाभट्टाने निर्णय घेतला. म्हणजे राज्य निर्माण केले शिवरायांनी व निर्णय घेतो भटजी. कायस्थांची
राजांवर नितांत श्रद्धा असल्यामुळे शिवाजीराजे आणि कायस्थात फूट पाडण्यासाठी गागाभट्टाने हा डाव
टाकला. बहुजनांतील कर्तृत्त्वान नेतृत्त्व संपविण्यासाठी निष्क्रिय माणसाला नेते पद देणे व सूत्र हातात घेणे.
हा एक ब्राह्मणांचा नेहमीच डाव असतो. यासाठी गागाभट्टाने बाळाजी आवजीचे नांव पुढे केले. पण
मोरोपंत पिंगळेसह सर्व ब्राह्मणांचे आणि कायस्थ बाळाजी आवजीने हाडवैर असल्यामुळे बाळाजी
आवजीचेही नांव मागे पडले. राज्याभिषेकासाठी बाळाजीआवजीपेक्षा शिवाजीराजांकडूनच अधिक पैसा
मिळेल व बाळाजी आवजीला राज्याभिषेक केला तर शिवाजीराजे व सर्व प्रजा ब्राह्मणाला
कापल्याशिवाय राहणार नाहीत या भितीमुळे व पैशाच्या अभिलाषेने शिवरायांना राज्याभिषेक करण्याचे
निश्चित झाले. प्रथम बाळाजी आवजीला क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेणा-या
गागाभट्टाने कायस्थ कसे हलके आहेत हे सांगण्यासाठी गागाभट्टीय नांवाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे
मोरोपंत पिंगळेच्या तालावर नाचणारा गागाभट्ट पदोपदी पगडी फिरवून सरड्यासारखा रंग बदलत होता.
शिवरायांनी रक्ताचे पाणी करुन स्वराज्य निर्माण केले. पण राजे श्रेष्ठ का कनिष्ठ आहेत. हे
ठरविण्याचे काम ब्राह्मण करत होते. राज्याभिषेकाचा आनंददायी सोहळा पण ब्राह्मणांनी वाद उपस्थित
केल्यामुळे गडावर व स्वराज्यात अत्यंत चिंतेचे व तणावाचे वातावरण होते. ज्यांना आपण आपले
म्हणतो अशा भटांनी शिवरायांना प्रथमापासूनच विरोध केला होता. आता तर ते राजांच्या
राज्याभिषेकाच्या विरोधात एकजात सर्वजण उभे राहिले.

बाळाजी आवजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट राज्याभिषेक करण्यास तयार झाला.
आपल्याबरोबर अनेक भटांचा फायदा होईल अशी व्यवस्था गागाभट्टाने केली. राज्याभिषेकाचा दिवस
निश्चित झाला. शिवरायांचे सर्व बहुजन सहकारी राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. हिरोजी फर्जंद,
मदारी मेहत्तर, हंबिरराव मोहिते, नागोजी जेधे, येसाजी कंक इत्यादी सहकारी आलेल्या पाहुण्यांची
व्यवस्था करणे, साहित्य आणणे इ. कामे करु लागले. जिजाऊ स्वत:जातीने लक्ष देत होत्या.
शिवरायांनी जिजाऊंचे दर्शन घेतले. राज्याभिषेकासाठी सर्व ब्राह्मणांनी घातलेला घोळ व केलेला विरोध
यामुळे जिजाऊमाँसाहेब प्रचंड चिडलेला होत्या. धर्म- संस्कृतीच्या नांवाखाली भटांनी शिवरायांचा सुरु
केलेला छळ यामुळे बहुजन समाज अस्वस्थ झाला होता. स्वत:ची स्वतंत्र धर्मसंहिता नसल्यामुळे
वैदिकांच्या उर्फ ब्राह्मणांच्या म्हणजेच हिंदूच्या धर्मग्रंथावर राजांना अवलंबून रहावे लागले (म्हणूनच
आज शिवरायांच्या प्रेरणेतून शिवधर्मांची स्थापना झालेली आहे. १७व्या शतकात शिवधर्म असता तर
भटांचा विरोध करण्याचे कारणच नव्हते. (हिंदू) धर्म हा भटांचा असल्यामुळे राज्याभिषेक प्रसंगी
राजांचा छळ केला व अमाप पैसा लुटला.)

राज्याभिषेकप्रसंगी व्रात्यास्तोम करण्यासाठी गागाभट्टाने ७००० (सात हजार) होन घेतले. तर
इतर ब्राह्मण पुरोहितांसाठी १७००० होन घेतले. राजांच्या ५ जूनच्या स्नानाच्या वेळी उपस्थित
असणा-या प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन देण्यात आले. राज्याभिषेकाला ५०,००० (पन्नास हजार)
ब्राह्मण उपस्थित होते. असे सभासद लिहितो. म्हणजे फुकट अन्न व होन मिळणार म्हणून कोणतीही
प्रवासांची आधुनिक साधने नसताना देशातून पन्नास हजार ब्राह्मण रायगडासारख्या कठिण ठिकाणी
आले होते. शिवरायांची सुवर्णतुला करण्यात आली. राजांचे वजन १६० पौंड म्हणजे १७००० होन
झाले. ते होन, तूप, लोणी, साखर, फळे, सुपारी, रुपे, तांबे, लोखंड ब्राह्मणांनी घेतले. यासाठी अंदाजे
५०००० होन गेले.

७ जून राज्याभिषेकाच्या दुसèया दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला २ होन व ब्राह्मणस्त्री व ब्राह्मण
मुले यांना प्रत्येकी १ होन घेतला. (एक होन म्हणजे ३ रुपये) म्हणजे ज्यांनी शिवरायांच्या
राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांनीच स्वराज्याची लूट केली. राज्याभिषेकास एकूण ४ कोटी २६ लाख
रुपये खर्च झाला. शिवरायांच्या संपुर्ण आयुष्यात स्वराज्यनिर्माण करण्यासाठी जेवढा पैसा खर्च झाला
नाही. त्यापेक्षा अधिक पैसा ब्राह्मणांनी लुटला. शिवरायांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करुन कमावलेले
होन मनुवादी कावळ्यांनी धर्माच्या नावाखाली राजरोसपणे पळविले.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी डच, फे्रंच, पोर्तुगाल, इंग्रज, मोगल,
आदीलशहा, कुतूबशहा यांचे प्रतिनिधी मौल्यवान भेटवस्तू व नजराणे घेऊन आले होते. ज्या इंग्रजांच्या
साम्राज्यावरचा सुर्य कधीही मावळत नाही असे म्हटले जाते अशा इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑqक्झडेन
राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी उंचीवस्त्रे व अमुल्य भेटवस्तू घेऊन राजांपुढे नतमस्तक होऊन
आला. भेटवस्तू दिल्या व राजांना मुजरा करुन मागल्या पावलाने दरबारातून बाहेर पडला. राजांकडे
त्याने पाठ केली नाही. पण आपले म्हणून आपल्या कळपात घुसलेल्या ब्राह्मणांनी शिवरायांचा छळ
केला. शिवरायांनी हा विरोध मोडून राज्याभिषेक पार पडला. आपल्या आईला, सर्व महाराण्यांना,
गोर-गरीबांना राजांनी दरबाराता सन्मानाने बसविले. स्वराज्यात राज्याभिषेक सर्वांना पहाता यावा
यासाठी राजांनी संकल्पित वेळेला सर्व गडावर तोफांचा आवाज केला. हा आवाज रयतेच्या
कर्णपटलावर-मनपटलावर व नंतर नेत्रपटलावर उमटवला. कू्रर विरोधातून देखील राजांनी राजांनी
राज्याभिषेक केला व हातात न्यायदंड व राजदंड घेतला. प्रजेला खूप आनंद झाला. ब्राह्मणांचे धाबे
दणाणले.

शिवशक पुढे पेशव्यांनी बंद केला 
राज्याभिषेकापासून शिवरायांनी नवा शिवशक सुरु केला. सर्व कारभार शिवशकाप्रमाणे सुरु
झाला. (हा शिवशक पुढे पेशव्यांनी बंद केला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. शिवाजीपेक्षा
पेशव्यांचे मुस्लिमसंस्कृतीवर जास्त प्रेम होते. म्हणजे मुस्लिमांचा अनुनय व त्यांच्या दाढ्या
कुरवाळण्याचे काम ब्राह्मणांनी (पेशव्यांनी) केले. अशा पेशव्यांचा शनिवारवाडा महोत्सव साजरा करणे
म्हणजे देशद्रोह आहे कारण शनिवारवाडा हा भारतीयांच्या पराभवाचे व पेशव्यांच्या व्यभिचाराचे
प्रतिक आहे.)

गागाभट्टाचा शौचकूपात पडून मृत्यू 
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर गागाभट्टाचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत एका शौचकूपात
(संडासात) सापडले. तेंव्हा देशातील सर्व ब्राह्मणांनी प्रचर सुरु केला की, शिवाजीराजे शूद्र असतांना
देखील गागाभट्टाने राज्याभिषेक केला म्हणूनच गागाभट्टाचा शौचकूपात पडून मृत्यू झाला. शिवरायांकडून
मिळालेल्या पैशामुळे गागाभट्ट मातला व त्याने खाणे व दारु पिणे सुरु केले. नशेत तो मेला. तरी
देखील शिवरायांना कमी लेखण्यासाठी ब्राह्मणांनी वरील प्रचार सुरु केला.


शिवरायांचे मूळ : राजस्थान की महाराष्ट्र 
शिवाजी महाराजांचे पुर्वज राजस्थान मधील सिसोदिया वंशातील होते. असा गैरसमज
अनेक लोकांचा आहे. ज्यावेळेस राजांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी शूद्र म्हणून विरोध केला. तेव्हा
बाळाजी आवजी यांनी नकार देणा-या गागाभट्टाला निमंत्रित करण्यासाठी चातुर्य वापरले व खोटी
वंशावळ दिली. तेव्हा गागाभट्ट पैशाच्या अभिलाषेने राज्याभिषेकासाठी आला. म्हणजे
राज्याभिषेकाच्या पुर्ततेसाठी बाळाजी आवजी यांनी दिलेली विसंगत वंशावळ याला प्रमाणभूत मानून
शिवरायांना सिसोदिया वंशातील ठरविले. हे अनैतिहासिक आहे.
शिवाजीराजांचे पूर्वज महाराष्ट्रातीलच मूल निवासी आहेत. त्यांचा उदेपूरच्या घराण्याशी
कसलाही संबंध नाही. अशी वस्तुस्थिती असताना राजांना राजस्थानमधील ठरवायचे व महाराष्ट्रातच
त्यांना उपरे ठरवायचे हे ब्राह्मणी षडयंत्र आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

बापूखानाला मदत करणारा नागोजी पंडित

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


बापूखान हा आदीलशहाचा पन्हाळ्यावरील किल्लेदार होता. पन्हाळा जिंकण्यासाठी
शिवरायांनी कोंडाजी फर्जंद यांना पाठविले. कोंडाजींनी बापूखानावर हल्ला केला त्या प्रसंगी नागोजी
पंडित नावाचा ब्राह्मण आदीलशहाच्या पदरी बापूखानाचा मदतनीस म्हणून काम करत होता.
बापूखानाचा पराभव झाल्याचे समजल्याबरोबर नागोजी पंडित पळाला. चरायला पुढे आणि मरायला
मागे त्याला पंडित म्हणतात. पैसा आणि पदासाठी ब्राह्मण कोणशीही तडजोडी करतात व देशात दंगली
घडवितात.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदूधर्माचा उर्फ ब्राह्मणधर्माचचा विरोध
मोगल, आदीलशहा, इंग्रज आणि पोर्तुगाल यांच्या जोखडातून देशबांधवांना मुक्त केल्यानंतर
शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. परकीय सत्ता राजांना शहाजीराजे या जहागीरदाराचा बंडखोर
पुत्र समजत. तर ब्राह्मण राजांना राजा मानावयास तयार नव्हते. इतर राजांशी तह-वाटाघाटी करताना
अडचणी येत. या अडचणी दूर करण्यासाठी व बहुजन देखील स्वत:चे स्वतंत्र राज्य व राजा निर्माण करु
शकतात. हा आत्मविश्वास निर्माण करुन हजारो वर्षाची गुलामगिरी संपविण्यासाठी शिवरायांनी
राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा केल्याबरोबर राजांना
हिंदू धर्माने कडाडून विरोध केला.

आता हिंदू धर्म म्हणजे काय? हे समजून घेणे महत्वाचे आहे.  हिंदू धर्माचे मुळचे नांव वैदिक धर्म आहे.
वेद हे हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहे. जे वेद ब्राह्मण सोडून इतरांना वाचण्यास बंदी होती. वैदिक धर्मालाचा
पुढे ब्राह्मणधर्म असे ही म्हटले जाऊ लागले. संपुर्ण बहुजनांचे सर्व क्षेत्रातील नेतृत्व करण्यासाठी
ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म या नावाचा त्याग केला व हिंदू हे नांव धारण केले. आज जो हिंदूधर्म. हा मुळचा
ब्राह्मणधर्म-वैदिक धर्म आहे. म्हणूनच हिंदूधर्माच्या कोणत्याही ग्रंथात हिंदू या शब्दाचा उल्लेख नाही.
पण वेद, वैदिक, ब्राह्मण हे उल्लेख सर्वत्र सापडतात. हिंदू धर्मातील प्रमाणभूत ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेले
आहेत. त्यामुळे ते ब्राह्मणांच्या फायदाचे व बहुजनांची बदनामी करणारे आहेत. हिंदूत्व म्हणजे खरे
ब्राह्मणत्व आहे. हिंदूत्वासाठी जोशी, कुलकर्णी, देशपांडे, भिडे, ठाकरे, एकबोटे कधीच मरत नसतात. पण
हिंदूत्वाच्या नावांखाली जेंव्हा सत्ता येते तेंव्हा सर्व मुख्य जागा ब्राह्मण बळकावतात. मरायला मराठे
आणि चरायला मनुवादी सराटे म्हणजेच हिंदूत्व होय. हिंदू ही परकीयांनी पराभूत भारतीयांना
दिलेली उपाधी आहे. हिंदू याचा अर्थ दास, गुलाम आणि पराभूत! म्हणून औरंगजेबाने जेंव्हा
भारतीयांना जिझिया कर सुरु केला तेव्हा ब्राह्मणांचे एक शिष्टमंडळ औरंगजेबाला जाऊन भेटले आणि
म्हणाले, आम्ही जिझिया कर भरणार नाहीत तेव्हा औरंगजेबाने विचारले, का? तेव्हा ब्राह्मण म्हणाले
आम्ही भारतीय नाही. आम्ही देखील तुमच्यासारखे परदेशातून आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही
भारतीय म्हणजेच हिंदू नाही. फार तर आम्ही तुम्हाला जिझिया कर हिंदूकडून वसूल करुन देतो! म्हणजे
पहा, ज्या ब्राह्मणांनी आपल्या पूर्वजांकडून जिझिया कर वसुल करुन मोगलांना दिला. तेच ब्राह्मण आज
हिंदूत्वाचे ठेकेदार आहेत. ते नेहमी आपल्यापुढे येऊन म्हणतात गर्व से कहो हम हिंदू है! म्हणजे गर्व से
कहो हम पराभूत है। दास है। गुलाम है। हे आपल्याला म्हणायला लावतात.
म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. हिंदू धर्म हे बिनडाचे पिचके गाडगे आहे. हिंदूधर्म हे एक भटी गौडैडबंगगाल आहे. बहुजुजनांनना फसविणारा धर्म म्हणजे हिंदूधर्म
आहे. बहुजुजनांनना लुटुटणासाठी हिंदू धर्माततील मंददीरांचचा नंबर पहिला आहे. हिंदू धर्माततील पुराणं म्हणजे शौचैचकूपूप (संडास) आहे. बहुजुजनांनना गुलुलाम करण्यासाठी हिंदू धर्मात भटांनी अनेकेक ग्रंथ लिहिले. (संदर्भ- देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे) तात्पर्य हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्व आहे. ज्यावेळेस आपण खरी सत्ता मिळवतो. तेंव्हा हिंदूत्त्ववादी म्हणजेच ब्राह्मण ती सत्ता वापरण्यास विरोध करतात.
शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा करताच सर्व ब्राह्मणांनी शिवरायांना शूद्र म्हणून विरोध
केला. "परशूराम नावाच्या ब्राह्मणांने पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय २१ वेळा ठार मारलेले आहेत. त्यामुळे
एकही क्षत्रिय शिल्लक नाही. ब्राह्मण सोडून सर्वजण शूद्र आहेत. शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही."
अशी ओरड करणाऱ्या ब्राह्मणांनी मुस्लिम राजाला विरोध केला नाही. याउलट मुस्लिमांच्या दरबारात ब्राह्मण
अधिका-यांचा भरणा होता. म्हणजे मुस्लिमांना आनंदाने राज्य करु देणारे ब्राह्मण शिवरायांच्या विरुद्ध
एकजात उठले. तेव्हा शिवरायांना वाटले, सर्व ब्राह्मणांनी विरोध केला तरी सहकारी मित्र असणारे
मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो इ. ब्राह्मण मित्र मंत्री सहकार्य करतील. पण राजांचा अपेक्षाभंग झाला.
मोरोपंत पिंगळे भर दरबारात राजांना म्हणाला, तुम्हा शूद्र मराठ्यांच्या हाताखाली आम्ही ब्राह्मणांनी
कसे काम करावे? सहकारी असणा-या ब्राह्मणांनी देखील शिवरायांना तोंडावरच विरोध केला. म्हणजे
ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो. हे सर्व पंताने दाखवून दिले. ब्राह्मण मित्र जरी असला तरी आणीबाणीचा
प्रसंग येताच ब्राह्मण पाठीत खंजीर खुपसतो. हे मोरोपंताने दाखवून दिले. सर्व ब्राह्मणांनी शिवरायांना
त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या शिवरायांनी सर्व ब्राह्मण सहका-यांना जिवापाड जपले, संकटसमयी
प्रत्येकाला मदत केली. तेच ब्राह्मण शिवरायांशी वै-यासारखे वागु लागले. स्वराज्यातील व बाहेरील
सर्व ब्राह्मण एक झाले. म्हणजे ब्राह्मण कोणत्याही गटात, पक्षात, संघटनेत, संस्थेत, पंथात असले तरी
आतून सर्व ब्राह्मण एक असतात. हे राज्याभिषेकप्रसंगी सिद्ध झाले. परदेशातून आलेल्या ब्राह्मणांनी
स्वत:च्या हितासाठी लिहिलेल्या बनावट पोथ्या-पुराणांचा आधार घेऊन शिवरायांच्या राज्याभिषेकाला
विरोध केला. शिवरायांच्या राज्याभिषेकाला धर्मसंहिता व पुरोहितच मिळू द्यायचा नाही असा चंग
देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. तरीदेखील राज्याभिषेकाचा निर्णय राजांनी ठामपणे घेतला.

अशा प्रकारे शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणधर्माने म्हणजेच हिंदू धर्माने कडाडून विरोध
केला. आणि वरुन शिवरायांना हिंदू धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले जाते. ही शिवरायांची
कू्र चेष्टा आहे. ज्यांनी विरोध केला. त्यांचे राज्य राजांना अपेक्षित असेल का? शिवरायांचा हिंदू, हिंदवी, याचेशी अजिबात संबंध नाही. शिवचरित्रात कोठेही हिंदू  हिंदवी आणि हिंदूत्व याचा उल्लेख
नाही. शिवरायांचा वापर करण्यासाठी नंतर ते शिवचरित्रात घुसडण्यात आले. शिवरायांनी बहुजनांचे
स्वराज्य निर्माण केले. शिवाजीराजे जर हिंदूत्वासाठी लढले, तर मग हिंदुंनी राज्याभिषेकाला विरोध का
केला? राज्याभिषेकाला सर्व ब्राह्मणांनी विरोध केला तेंव्हा सर्व बहुजन समाज शिवरायांच्या पाठीशी
उभा राहिला. सर्व मराठे देखील शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एकही मराठा राजांच्या
विरोधात नव्हता. म्हणजे यापुर्वी शिवरायांना ज्या मराठ्यांनी विरोध केला तो अज्ञानामुळे केला.
रामदासाचे ऐकून केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

दिलेरखानाच्या यशासाठी कोटीचंडी यज्ञ करणारे ४०० ब्राह्मण

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी जयसिंगासह दिलेरखान लाखो सैनिक घेऊन पुरंदरला
आला. दिलेरखानाला यश मिळावे यासाठी पुणे येथे ४०० ब्राह्मण दिलेरखानाला भटले व कोटीचंडीयज्ञ
करण्याचा सल्ला दिला. राजांचे स्वराज्य संपावे आणि दिलेरखानचा विजय व्हावा यासाठी ४००
ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. यावेळी दिलेरखानाकडून २ कोटी होन (सहा कोटी रु.) या
ब्राह्मणांनी घेतले. म्हणजे विजय कोणाचा का होईना आपल्याला पैसा मिळावा व शिवाजी-दिलेरखान
यांचे युद्ध व्हावे ही वृत्ती असणारे ब्राह्मण हेच राजांचे शत्रू होते. या यज्ञामुळेच दिलेरखानाला प्रेरणा
मिळाली व राजांचा दारुण पराभव झाला. (संदर्भ-सभासद लिखित श्री.शिवप्रभुंचे चरित्र)

या ठिकाणी शिवरायांची अत्यंत महत्वाची भूमिका प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे राजांनी
कोटीचंडीयज्ञ केला नाही. पुण्यातील ब्राह्मणांना दिलेरखानापेक्षा राजांच्या राजगडाचे अंतर जवळ होते,
पण दिलेरखानाची भेट त्यांनी का घेतली? याचा अर्थ राजांनी यज्ञ करावा असा प्रयत्न ब्राह्मणांनी केला
असावा. पण राजांनी यज्ञ करण्यास साफ नकार दिला. याचा अर्थ राजांचा या खुळचट विधीवर विश्वास
नव्हता, हे स्पष्ट होते. यज्ञ, अभिषेक, सत्यनारायण, पुजा-अर्चा, ग्रंथ पठणाने समस्या सुटणार नाहीत.
याची पूर्ण जाणीव राजांना झाली होती. त्यामुळे राजांकडून पैसा उकळण्याचा पुरोहितांचा डाव यशस्वी
झाला नाही. म्हणजे ब्राह्मणांचे लक्ष पैसा, सत्ता आणि संपत्तीवर असते. त्यासाठी ते कोणाचीही बाजू
घेतात आणि भांडण लावून स्वत:चे हित साधतात. म्हणूनच शिवाजीराजांना संपविण्यासाठी पुण्यातील
ब्राह्मणांनी दिलेरखानाची बाजू घेतली. कारण त्यांना वाटले असावे की, दिलेरखान-जयसिंग यांच्या
झंझावातापुढे राजांचा निभाव लागणार नाही. म्हणून यशस्वी मोगलांनाच सहकार्य करावे. पण राजांनी
तहान्वये विजय मिळवला. आणि पुढे जेव्हा राजांचा यशाचा आलेख वाढत गेला. तेव्हा ब्राह्मणांनी
राजांची बाजू घेतली. पण या सहकार्यामागे पूर्ण ढोंगीपणा होता. हे राज्यभिषेकाच्या प्रकर्षाने जाणवले.

औरंगजेबाच्या पदरी असणा-या जयसिंगाचा सचिव उदयराज
उदयराज नावाचा ब्राह्मण राजा जयसिंगाचा सचिव होता. त्याने जयसिंगाला विष देऊन मारले.
जयसिंगाचे महत्त्वाचे दप्तर त्याने पळवले. तो पुढे औरंगजेबाकडे गेला आणि मुसलमान झाला.
उदयराजचा तालियारखान झाला. याचाच मुलगा हिदायतखान पुढे मोगलांच्या पदरी होता. खोबरे
तिकडे चांगभले ही ब्राह्मणांची संस्कृती आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे