Thursday 24 January 2013

संघातील ब्राह्मणांना भाजपातील ब्राह्मणेतरांचा झटका!


-राजा मइंद

ब्राह्मणी अजेंड राबविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपामधील ब्राह्मणेतर पुढा-यांनी अखेर घरी पाठविले. भाजपाच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग यांनी निवड करण्यात आली आहे. राजनाथ सिंग हे राजपूत आहेत. राजनाथ सिंग यांची निवड म्हणजे भाजपातील ब्राह्मणेतर पुढा-यांनी संघाच्या ब्राह्मणी नेतृत्वावर मिळविलेला निर्णायक विजय आहे. गडकरींना घालविण्याच्या मुद्यावर भाजपात उजेडात आणि अंधारात असा दुहेरी संघर्ष झडला. हा संघर्ष म्हणजे भाजपातील ब्राह्मण विरुद्ध बहुजन या वादाचा क्लायमॅक्स होता. भाजपातील संघर्ष आजचा नाही. भाजपाच्या जन्मापासून तो अस्तित्वात आहे. पण आजच्या सारखा तो कधी उघडपणे समोर आला नव्हता. ‘हिंदुत्वा'च्या झुलीआडून हा संघर्ष पूर्वी चालायचा. संघाने नितीन गडकरी यांना भाजपाचे अध्यक्ष केल्यानंतर हा संघर्ष ‘‘हिंदुत्वा'ची झूल फाडून बाहेर डोकावला. संघाला या देशात ब्राह्मणांचे राज्य आणायचे आहे. आपल्या या ब्राह्मणवादी अजेंड्याला संघाने 'हिंदुत्व' असे गोंडस नाव दिले आहे. हिंदू म्हटले की, बहुजन समाज फशी पडतो आणि मतदान करतो. बहुजनांचे मतदान घ्यायचे, पण नेतृत्व देण्याची वेळ आली की, ब्राह्मणांना पुढे कराचे, अशा आट्यापाट्या भाजपात खेळल्या जात होत्या. या खेळासाठी संघाने ‘बहुजनांच्या मतांवर ब्राह्मणांची सत्ताङ्क असे खास सूत्र विकसित केले आहे. भाजपातील बहुजन पुढा-यांनी संघाच्या या ब्राह्मणी सूत्राचे तीन तेरा आणि नऊ अठरा केले. त्यातून राजनाथ सिंग यांची भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करणे संघाला भाग पडले.

गडकरींना घालविण्याच्या मोहिमेत लालकृष्ण अडवाणी, जेठमलानी पिता-पुत्र, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, अरुण जेटली ही मंडळी सहभागी झालेली होती. जेठमलानी आणि सिन्हा यांच्या सारखे काही फटकळ नेते उघडपणे मैदानात होते. इतर त्यांना रसद पुरवीत होते. यातील बहुतांश गडकरी विरोधक ब्राह्मणेतर आहेत, तसेच निवडण्यात आलेला नवा अध्यक्षही ब्राह्मणतेरच आहे. हा निव्वळ योगायोग नाही. भाजपातील ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांनी दिलेला हा मोठा झटका आहे. 

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांकडून ब्राह्मण हितासाठी चालविली जाणारी संघटना आहे', असे आदरणीय अनिता ताई यांनी या ब्लॉगवर अनेक वेळा सिद्ध करून दाखविलेले आहे. संघाला भाजपावर संपूर्ण पकड हवी आहे. त्यासाठी नितीन गडकरी यांची भाजपाध्यक्षपदी नेमणूक केली गेली होती. २०१४ साली एनडीएची सत्ता आलीच तर गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याची भाजपाची योजना होती. या योजनेच्या फूलप्रुफ यशस्वीतेसाठी गडकरी भाजपाध्यक्षपदी राहणे संघाच्या दृष्टीने अति आवश्यक होते. त्यामुळे संघाचा सारा आटापिटा चालला होता. गडकरींना सलग दुस-या टर्मचे अध्यक्ष होता यावे, यासाठी भाजपाची घटनाही बदलली गेली होती. पण शेवटी सारेच मुसळ केरात गेले. 

गडकरींना भाजपाचे अध्यक्षपद सोडावे लागले, म्हणजे संघाने आपला अजेंडा बदलला असे मात्र नव्हे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात एनडीएची सत्ता आलीच तर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरी यांचेच नाव पुढे रेटले जाणार यात शंका नाही. ब्राह्मणेतर पुढा-यांची खरी कसोटी तेव्हाच लागणार आहे. अर्थात हे सारे ‘सत्ता आली तर' या गृहितकावर आधारित आहे. राजकारणात अशा गृहितकांना काहीही अर्थ नसतो.


संबंधित लेख 

Wednesday 23 January 2013

नव्या प्रश्न पत्रिका

‘भारताचा धार्मिक इतिहास' या नावाचा नवीन अभ्यासक्रम
विद्यापीठांत सुरू झाल्यास त्याच्या प्रश्न पत्रिका अशा असतील.
(आदर्श उत्तरे प्रश्न पत्रिकेसोबतच दिली आहेत. )


पेपर पहिला- धार्मिक संघर्ष : प्राचीन काळ
(संदर्भ ग्रंथ - रामायण/महाभारत/श्रीमद्भागवत/मत्स्यपुराण/ब्रह्मपुराण इ.)

प्रश्न १ - विश्वासामित्राला यज्ञपूजेचा अधिकार कोणी नाकारला?
उत्तर - वशिष्ठ नावाच्या ब्राह्मणाने.

प्रश्न २ - बहुजनांचा महाप्रतापी बळी राजाला कपटाने पाताळात कोणी दाबले?
उत्तर - वामन नावाच्या ब्राह्मणाने.

प्रश्न ३ - भगवान श्रीरामाची पत्नी सीता हिचे अपहरण करणारा कोण होता?
उत्तर - रावण नावाचा दशग्रंथी ब्राह्मण.

प्रश्न ४ - स्वत:च्या आईचा खून करणारा भरतखंडातील पहिला महापापी कोण?
उत्तर - परशुराम नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ५ - परशुरामाला अर्धा ब्राह्मण का म्हटले जाते?
उत्तर - कारण त्याचा पिता ब्राह्मण तर आई क्षत्रिय होती.

प्रश्न ६ - रात्रीच्या अंधारात पांडव सेनेची कपटाने कत्तल करणारा कोण होता?
उत्तर - अश्वत्थामा नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ७ - झोपलेल्या पांडव सेनेची कत्तल करण्याच्या कामी अश्वत्थामा यास मदत करणारा कोण होता?
उत्तर - कृपाचार्य नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ८ - पत्नीचा कोणताही दोष नसताना तिला शिळा करणारा कोण होता?
उत्तर - गौतम नावाचा ब्राह्मण.

प्रश्न ९ - गरीब ब्राह्मण मित्राला मदत करणा-या महाभारतातील महापुरुषाचे नाव सांगा.
उत्तर - श्रीकृष्ण.

प्रश्न १० - श्रीकृष्ण कोण होता?
उत्तर - यादवकुळातील क्षत्रिय.



 मालेतील इतर लेख
पेपर पहिला - ब्रह्मदेवाचा इतिहास
पेपर दुसरा - धार्मिक संघर्ष : प्राचीन काळ

Tuesday 22 January 2013

संभाजी ब्रिगेड आणि मी

-महावीर सांगलीकर
(हा लेख महावीर सांगलीकर यांच्या महाविचार या ब्लॉगवरून घेतला आहे.)

संभाजी ब्रिगेडशी माझा संबंध २००४ या वर्षाच्या आसपास आला. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराजांबद्दल आपल्या पुस्तकात जो बदनामीकारक मजकूर लिहिला, तो उघडकीला आल्यावर पुण्यात ज्या निषेध सभा व्हायला लागल्या त्या काळात संभाजी ब्रिगेडच्या अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची शाखा, त्यामुळे सेवा संघाच्या नेत्यांचीही ओळख झाली. 

याच काळात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष खेडेकर साहेबांच्या एका भाषणात अस उल्लेख आला की चक्रवर्ती सुभौमाने परशुरामाला युद्धात मारून टाकले होते आणि त्याचा उल्लेख जैन साहित्यात आहे. पण तो उल्लेख नेमका कोठे आहे याची कोणालाच माहिती नव्हती. खूप प्रयत्न करून मी ती माहिती शोधून काढली. त्यावर एक लेख लिहिला आणि खेडेकर साहेबांना दाखवला. त्यांनी तो लेख मराठा मार्ग या मासिकाकडे पाठवण्यास सांगितला. पुढे तो लेख त्या मासिकात छापुनही आला. कांही दिवसांनी या विषयावर मी 'परशुरामाचा वध' हे संशोधनात्मक छोटे पुस्तकही लिहिले. (हे पुस्तक माझे मित्र नरेश जाधव यांनी प्रकाशित केले). या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. हे पुस्तक मी डॉ. आ.ह. साळुंखे यांना अर्पण केले होते. पुढे डॉ. आ.ह. साळुंखे यांनी 'परशुराम: जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे' या आपल्या पुस्तकात परशुरामाच्या जैन साहित्यातील कथेवर विस्ताराने लिहिले. 

पुढे बराच काळ मी संभाजी ब्रिगेडमध्ये गुंतत गेलो. दादोजी कोंडदेव यांचा लाल महालातील पुतळा काढून टाकण्याच्या चळवळीत भाग घेतला. मी ब्राम्हण विरोधी कधीच नव्हतो, पण ब्राम्हणांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात नेहमीच राहिलो आहे. त्या काळात माझा हा विरोध उफाळून आला. अनेक नवीन तरुणांना संभाजी ब्रिगेडशी जोडले. एका कट्टर शिवसैनिक स्थानिक नेत्याला ब्रिगेडशी जोडण्यात मला यश आले. त्यानेही दादोजी कोंडदेव पुतळा हटवण्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली. अखेर एके रात्री पुतळा हटवण्यात आला, पण त्याची चाहूल मला आधीच लागली होती. ती रात्र चक्क जागून काढली. अपेक्षेप्रमाणे पुतळा हटवला गेला आणि कांही मिनिटातच मला तसा फोन एका कार्यकर्त्याकडून आला. 

चिंचवड येथे एका व्याख्यान मालेचे ब्राम्हणी नाव बदलण्यासाठी मी यशस्वी प्रबोधन केले. पुढे त्या व्याख्यान मालेत शिवश्री प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान ठेवण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. दुस-या दिवशीच्या एका व्याख्यानात एका ब्राम्हणवाद्याने स्टेजवर येवून कालच्या व्याख्यानावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला. कालच्या भाषणात सोळुंके यांनी 'शिवधर्मात भटांना प्रवेश नाही' असे उदगार काढले होते. त्यावर या ब्राम्हणवाद्याने 'म्हणजे तुम्ही डोक्याला प्रवेश देणार नाही' असे उदगार काढले. व्याख्यान मालेच्या आयोजकाचे या विषयावर आधीच प्रबोधन झालेले असल्याने त्याने त्या ब्राम्हणवाद्याच्या हातातील माइक काढून घेतला, स्टेजवरून खाली जाण्याचा हुकूम दिला आणि तब्बल अर्धा तास ब्राम्हणवाद्यांच्या स्वत:ला समाजाचे डोके समजण्याच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले. खाली आलेला त्या ब्राम्हनवाद्याचे मीही थोडे बौद्धिक घेतले. 

पुढे संभाजी ब्रिगेडमुळेच बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांशी संबंध आला. त्यांचे अतिरेकी विचार मला कधीच पटले नाहीत. संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांच्या नादी लागून वहावत चालली आहे हे स्पष्ट दिसून आले. कदाचित संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांचा वापर करून घेत असावी अशी शंका आली. कांही बाबतीत ही संघटना बोटचेपी भूमिका घेते हे स्पष्ट पणे दिसून आले. उदाहरण म्हणजे डॉ. विनोद अनाव्रत या लेखकाने लिहिलेले 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' हे पुस्तक. हे पुस्तक जेम्स लेनलाही लाजवेल असे आहे. पण संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर मौन बाळगले. (या पुस्तकाचे परीक्षण पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव येथे वाचा) तसेच कांही नवबौद्ध वक्ते आणि लेखक 'जिजाऊ महार होती' अशी थेअरी मांडतात, त्यालाही ब्रिगेडचे वक्ते-नेते आक्षेप घेत नाहीत, उलट माना डोलावतात, ही गोष्ट मला अनाकलनीय वाटली. 

संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी तरुणांमध्ये हिंदू धर्माबद्दल द्वेष आणि बौद्ध धर्माबद्दल अतिप्रेम तयार केले आहे. मला या दोन्ही गोष्टी चुकीच्या वाटतात. हिंदू धर्मातील वैदिक पंथ काढून टाकला की जो उरतो तो शैव धर्म आहे. तो मराठ्यांचा खरा धर्म आहे. तसेच मध्ययुगीन काळापर्यंत मराठ्यांमध्ये जैन धर्म मोठ्या प्रमाणावर होता याचे अनेक पुरावे देता येतील. पण पूर्वी मराठे बौद्ध होते अशा बामसेफी प्रचाराला ब्रिगेडचे लेखक, वक्ते आणि अनुयायी बळी पडत आहेत. खरे म्हणजे मराठे पूर्वी बौद्ध होते याला कसलाही पुरावा नाही. (कृपया वाचा:वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे? ). बामसेफला खूष करण्यासाठी शिवाला नाकारणे, गांधीजींवर टीका करणे ही फारच विचित्र गोष्ट आहे. 

ओ.बी.सींच्या तथाकथित बौद्ध धर्मांतराला मराठा सेवा संघाने पाठींबा दिला आहे. त्यांच्या या धोरणाचीही मला गम्मत वाटते. बौद्ध धर्माचे गुणगान गायचे, पण स्वत: बौद्ध धर्म स्वीकारण्याऐवजी वेगळा शिवधर्म काढायचा, ओ.बी.सी. जाती बौद्ध धर्म स्वीकारत असतील तर त्याचे स्वागत करायचे पण त्यांना शिवधर्माची दारे बंद ठेवायची ही गोष्ट खटकते. आमचे अंतिम ध्येय बौद्ध धर्म हेच आहे, शिवधर्म हा एक थांबा आहे असे स्पष्टीकरण दिले जाते, पण मग ओ.बी.सी. जाती थांबा न घेता बौद्ध होणार आहेत म्हणे, तीच गोष्ट मराठा सेवा संघ का करू शकत नाही? असा प्रश्न तयार होतो. असो. 

वाघ्या कुत्र्याच्या बाबतीतील संभाजी ब्रिगेडची भूमिकाही मला चुकीची वाटते. अशा प्रकारांमुळे आपण बहुजनांतीलच घटकांना आपले शत्रू बनवतो याचे भान यायला पाहिजे.  

एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे. त्यांच्या विरोधकांना हे पटणार नाही, पण जे त्यांना जवळून ओळखतात, त्यांचे विचार जाणतात त्यांना ही गोष्ट पटते. खेडेकर साहेबांनी मराठा समाजातील अनेक अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती बंद होण्यासाठी अनेक यशस्वी प्रयत्न केले आहेत. तसेच मराठा आणि मुस्लिम समाजातील दरी कमी करण्यासाठी योग्य पाउले उचलली आहेत, त्यामुळे मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहात आले आहेत. खेडेकर साहेबांनी जे बीज रोवले आहे, त्याची चांगली फळे पुढील कांही दशकातच दिसू लागतील. पण खेडेकर साहेबांच्याकडे जी दूर दृष्टी आहे, ती दुस-या फळीतील नेत्यांकडे नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. 

बाकी कांहीही असले तरी संभाजी ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्राची एक गरज आहे. माझ्या या मतावर मी ठाम आहे. कारण ब्राम्हणवादी संघटनांना, ब्राम्हणी वर्चस्ववादाला फक्त हीच संघटना आळा घालू शकते. या संघटनेने ते अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. येथे हे लक्षात घ्यावे की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवाद्यांच्या संदर्भात बोलत आहे. असो. 

संभाजी ब्रिगेडने अधिक व्यापक भूमिका घेवून या संघटनेचा 'मराठा युवकांची संघटना' हा चेहरा बदलला पाहिजे, आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन तरुणांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे.

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे युगपुरुषच

-महावीर सांगलीकर 
(प्रसिद्ध ब्लॉगर महावीर सांगलीकर यांच्या लेखाचा संपादित अंश. हा लेख श्री. सांगलीकर यांच्या महाविचार या ब्लॉगवरून घेतला आहे.)

मी नुकत्याच लिहिलेल्या संभाजी ब्रिगेड आणि मी या लेखाचे अनेकांनी प्रचंड स्वागत केले. पण त्याच वेळी हा लेख संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांचे विरोधक असणा-या लोकांना अजिबात आवडलेला नाही. विशेष करून मी खेडेकर साहेबांचा 'युगपुरुष' असा केलेला उल्लेख या विरोधकांना खटकला आहे. 

टोपण नावाने लिहिणा-या एका लेखकाने माझ्या लेखाचा आणि संभाजी ब्रिगेड व खेडेकर साहेब यांच्याविषयी माझ्या मतांचा समाचार घेण्यासाठी आपल्या ब्लॉगवर एक ओपन लेटर लिहिले आहे. त्यातील मते ही संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर साहेब यांच्याविषयी राग असणा-यांची प्रातिनिधिक मते सौम्य भाषेत दिली गेली आहेत हे स्पष्ट दिसते. हे ओपन लेटर असल्यामुळे त्याचे ओपन उत्तर देणे मी आवश्यक समजतो. 

पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे युगपुरुषच 
लेखकाचा मुख्य आक्षेप मी(ही) खेडेकर साहेबांना युगपुरुष समजतो या गोष्टीला आहे. लेखक म्हणतो, "मला सगळ्यात खटकला मुद्दा म्हणजे "एक मात्र खरे की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे अतिशय दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत. त्यांना युगपुरुष म्हंटले जाते ते योग्यच आहे." - हा उल्लेख. एक ब्राम्हण म्हणून मी ह्या विधानाने का अस्वस्थ झालो असेन ते आपल्या लक्ष्यात आले असेल अशी अपेक्षा करतो. शिवरायांच्या बदनामीची केंद्रे ह्या पुस्तकातून खेडेकरांनी ब्राम्हण समाज, ब्राम्हण पुरुष आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्या विषयीचे विकृत लेखन ह्या आपल्या युगपुरुषोत्तमाने केले आहे. आपल्या सारखा विद्वान आणि गांधीवादी अहिंसाप्रिय व्यक्ती, संभाजी बी-ग्रेडने ब्राम्हणांच्या हत्या सुरु केल्यावर त्यांच्या तलवारींना धार लावून देणार, की तलवार चालवणार की, संभाजी बी-ग्रेडचे गोबेल्स होऊन ह्या हत्या कश्या योग्य होत्या त्याचे दाखले देणार? " 

खेडेकर साहेबांच्या विरोधकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, खेडेकर साहेबांचे मुल्यमापन केवळ 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावरून करणे पूर्णपणे चुकीचे आहे. विरोधकांना खेडेकर साहेबांनी इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत हे माहीत आहे का? शिवाय पुस्तकांपेक्षा त्यांनी प्रत्यक्षात केलेले काम, संघटना बांधणी, समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरीती यांना फाटा देण्यासाठी केले प्रबोधन, त्या प्रबोधनामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर झालेली जागृती, नव्या विचारांची समाजाने केलेली अंमलबजावणी अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत. 

ऋगवेद, मनुस्मृती, पुराणे यांतील विकृत लेखनाचे काय?
शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेबांनी ब्राम्हण समाज व ब्राम्हण स्त्री-पुरुष यांच्याविषयी जे कांही लिहिलेले आहे तो वादाचा विषय आहे.  लेखकाने  या लिखाणास विकृत लेखन म्हंटले आहे. इथे प्रश्न असा आहे की अशाच प्रकारचे लेखन वैदिक परंपरेतील धार्मिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मग तो ऋग्वेद असू दे, मनुस्मृती असू दे की पुराणे असू द्यात. परशुराम ही व्यक्ति क्षत्रियांची सरसकट कत्तल करते, आणि त्याचे चेले आजही या गोष्टीचे समर्थन करतात. महात्मा गांधी यांची हत्या करतात आणि त्या हत्येचे समर्थन करतात. मुस्लिमांना (आणि त्यानंतर ख्रिस्त्यांना) संपवण्याची भाषा करतात, त्यासाठी दंगली घडवून आणतात, दहशतवाद करतात, त्याचे काय करायचे? खेडेकर साहेबांनी नुसते लिहिले आहे, परशुरामीय समाज तर अशा गोष्टी प्रत्यक्षात करत असतो. त्यामुळे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकात खेडेकर साहेब यांनी मांडलेल्या मतांना विरोध करायचा नैतिक अधिकार परशुरामीय समाजास अजिबात नाही आहे.

ज्योतिबा फुले यांच्यावर मारेकरी पाठवणारे कोण होते?
लेखकाने पुढे म्हंटले आहे, "आपण खेडेकरांना युगपुरुष म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील युगपुरुषांची यादी बघुयात, मी ब्राम्हण युगपुरुष (आपल्या ब्राम्हणप्रेमामुळे) यादीत समाविष्ट पण करत नाहीये - ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले ह्या यादीत आपण सरळ चेहऱ्याने आम्हाला सांगता आहात की, पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या इसमाचा समावेश करावा......." आता या यादीत लेखकाने जी नावे दिली आहेत त्यांना परशुरामीय लोक त्या-त्या काळात कुठे महापुरुष मानत होते, आणि आता तरी कोठे मानतात? ज्योतिबा फुले यांच्यावर मारेकरी पाठवणारे, सावित्रीबाई फुले यांना दगडे मानणारे, शाहू महाराजांचा अपमान करणारे, बाबासाहेब आंबेडकरांना मंदिर प्रवेश नाकारणारे नेमके कोण होते? अगदी अलीकडे महात्मा फुले यांना 'फुले नव्हे, ही तर दुर्गंधी' म्हणणारे कोण होते? 

त्यामुळे या यादीत खेडेकर साहेबांचा समावेश करायचा की नाही याचा सल्ला परशुरामीय इसमाने  देवू नये, तो त्यांचा अधिकार नाही. मीही खेडेकर साहेबांची तुलना या महापुरुषांशी केलेली नाही आहे. किंबहुना कोणत्याच महापुरुषाची तुलना दुस-या महापुरुषाशी करणे चुकीचे असते. प्रत्येक महापुरुषाचे कार्य Unique, वेगळ्या प्रकारचे असते, त्यांच्या-त्यांच्या काळानुरूप असते. खेडेकर साहेब जे कार्य करत आहेत तेही Unique आहे, तसे कार्य आजवर दुस-या कोणी केलेले नाही आहे. जर पळपुटे माफीवीर तुमच्यासाठी स्वातंत्र्यवीर ठरतात, तर ज्यांनी मराठा आणि इतर बहुजन समाजाला योग्य दिशा दिली आहे, त्यांच्या विचारसरणीत क्रांती केली आहे, ते आमच्यासाठी युगपुरूषच आहेत.

संभाजी ब्रिगेड 
अनेक परशुरामीय लोक, जे स्वत: तथाकथित हिंदू दहशतवादाचे (प्रत्यक्षात वैदिक दहशतवादाचे ) समर्थन करतात, संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना मानतात.संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असली तरी या संघटनेने दंगली पेटवल्याचे किंवा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे आर.एस.एस., सनातन संघटना यांचे समर्थन करणा-यांनी संभाजी ब्रिगेडला दहशतवादी संघटना संबोधने चुकीचे आहे. संभाजी ब्रिगेडचा आक्रमकपणा परशुरामियांचा सामाजिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी आहे. पण संभाजी ब्रिगेड तेवढे एकच काम करत नाही. ही संघटना शिक्षण, समाज सुधारणा, उद्योजकता विकास अशा अनेक क्षेत्रात भरीव काम करत आहे.

जैन धर्म, गांधीवाद आणि अहिंसा 
लेखकाने आपल्या लेखात मला गांधीवादी म्हंटले आहे. माझ्यावर गांधीवादाचा थोडा प्रभाव असला तरी मी गांधीवादी नाही आहे. मी अनेकांतवादी आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, तसेच कोणताही धर्म, समाज, व्यक्ती १००% चांगली किंवा १००% वाईट असते असे मी कधीच मानत नाही. कांही लोक नाण्याची एकच बाजू बघतात, अनेक विचारी लोक नाण्याची दुसरी बाजूही बघतात. मी त्याच्याही पुढे जावून नाण्याची तिसरी बाजू म्हणजे कड, तिचाही विचार करतो. त्यामुळे जैन धर्म आणि गांधी यांच्या अहिंसेचे हिंसक लोकांकडून होणा-या एकांगी चित्रणाचा मी निषेध करतो.

भेकडांना हिंसेचे आकर्षण असते
अहिंसक गांधीजी हे हिंसक सावरकरांसारखे भेकड नव्हते. गांधीजींच्या चळवळींमध्ये कुठेही पळपुटेपणा दिसत नाही. याउलट सतत हिंसक गप्पा मारणारे परशुरामीय लोक किती पळपुटे असतात ही मी अनेकदा पाहिले आहे. भेकड वृत्तीमुळे ते सतत दुस-यांना भडकावून हिंसा करायला प्रवृत्त करतात, आणि स्वत: मात्र कातडीबचावू बनून हिंसेचा विकृत आनंद लुटत असतात. भेकडांना हिंसेचे टोकाचे आकर्षण असते, आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे परशुरामीय विचारसरणीचे लोक. परशुरामीय विचारसरणीच्या लोकांच्या भेकडपणाचे एक उदाहरण खेडेकर साहेबांच्या शिवरायांच्या बदनामीची केंद्रे या पुस्तकाच्या संदर्भातीलच आहे. परशुरामियांना या पुस्तकाचा राग तर आला, पण त्यांच्यातील एकाही माणसाला या पुस्तकावर केस करण्याची हिम्मत झाली नाही. यावरूनच कळते की स्वत:ला परशुरामाचे अनुयायी समजणारे क्षत्रियांपुढे कशी नांगी टाकतात. 

जैन धर्मात अहिंसेला महत्व असले तरी ती एकांगी अहिंसा नव्हे. मुळात 'अहिंसा परमो धर्म' हे वाक्य कोणत्याही जैन ग्रंथातले नसून महाभारतातील शांतीपर्वातील आहे. जैन धर्म प्रतिकारासाठी हिंसेला परवानगी देतो. गरज म्हणून जैनांनीही अनेकदा हिंसा केली आहे. अगदी परशुरामाची देखील. ते उठसुठ आणि विनाकारण हिंसक बनत नाहीत एवढेच. आता हे जैन म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून भारतातले वर्णव्यवस्थेबाहेरील अवैदिक क्षत्रिय आहेत. पण हा या लेखाचा विषय नव्हे, म्हणून त्याविषयी इथे अधिक लिहित नाही.

शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की मी ब्राम्हण विरोधी नाही. मी ब्राम्हणवादाच्या विरोधात आहे. वैदिक ब्राम्हणांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मला अजिबात मान्य नाही. पण स्वत:ला अतिबुद्धिमान समजणा-या ब्राम्हणवादी लोकांना ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यातील फरक कळत नाही याचे मला आश्चर्य वाटते.

महावीर सांगलीकर यांचे इतर लेख :



Saturday 12 January 2013

चिपळूनची  चम्मत गं !!
    
                                 - प्रा. रवींद्र तहकिक     


चला एकदाचे चिपळून साहित्य संमेलनाचे सूप वाजले !  या वेळी अनेक वादांनी संमेलन गाजले. पण ते काही आता नवीन नाही . वाद तसे आता साहित्य संमेलनाचा एक भागच बनले आहेत . म्हणजे ज्या प्रमाणे संमेलन म्हटले की ग्रंथ दिंडी , परिसंवाद , कवि संमेलन , प्रगट मुलाखत ,
ग्रंथप्रदर्शन ई. ई. अपरिहार्यच असते तसेच वाद हा हळू हळू संमेलानांचा अविभाज्य भाग बनू  लागला आहे . त्यात पुन्हा या वेळी हे कोलीत चिपळूणच्या चित्पावनी ब्राम्हणांच्या हातात होतं.
म्हणजे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था !

      त्याची पहिली झलक ह. मो. मराठ्यांनी दाखवली . मी ब्राम्हणाच्या बाजूने लिखाण करतो म्हणून
मला चिपळूणच्या  संमेलनाचा अध्यक्ष करा. कारण चिपळूण परशुरामाची भूमी आहे वगैरे वगैरे..
परंतु त्यांनी कानात जानवं अडकाउन कितीही कोलांट उड्या मारल्या तरी त्या मुळे कुणाचे लक्ष वेधले नाही कि कुणाचे लक्ष
विचलित झाले नाही .हम्मो तर थोबाडावर पडलाच ! वरतून प्रा नागनाथ कोत्तापल्ले सारखे पुरोगामी ( फुले वादी ) साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष झाले . आम्हाला वाटले चला हम्मोने भले शेण खाल्ले असेल परंतु  महाराष्ट्रातील साहित्य रसिक जाणकार आणि विचारी आहेत ते 'जानवटां ' च्या' 'भटचळा ' नां बधले नाहीत . परंतु  एका खेटराने तोंड काळे करतील ते भट कसले ?
भटांचा खादाडपणा  फक्त आन्नाचाच असतो असे नाही. जे जे मिळेल ते ते गरजे पेक्षा जास्त
हडपणे हा आप्पलपोटेपणा भटांच्या गुंणसूत्रातच असतो !  ब्राम्हण आपला मार्ग आणि माध्यम
बदलतात उदिष्ट कधीच बदलत नाहीत. वरील दोन्ही गोष्टींचा प्रत्यय चिपळूण मध्ये आला.

१) राजकर्ते कोणी असोत त्यांच्या समोर लोटांगणे घालत त्यांची वारेमाप स्तुती आणि
   "वाट्टेल"ती "सोय" करणे हा ब्राम्हणांचा पुरातन पिंड !
    चिपळूणात दिसलेली पुढार्यांची मांदियाळी हा त्याचाच प्रत्यय .

२) चिपळूणात साहित्याच्या चर्चे पेक्षा " मग आज नाष्ट्याला काय मासला ? , दुपारचा काय बेत ?
     रात्रीला काय मिळणार ?  याचाच " साहित्य- विचार जोरावर होता .

३) व्यासपीठाला  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देउन चित्पावनी इंगा दाखवलाच !

४) आणि निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचे चित्र टाकून जात !
 

 परंतु उत्साहाच्या भरात कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या चिपळूणी चिंतातूर चीन्तुंना
त्या मुळे आपली गांड उघडी पडल्याचे मात्र लक्षात आले नाही..................
परशुरामाच्या भूमीत आर्थात या पेक्षा वेगळे काही घडण्याची अपेक्षाही करता येत नाही.
कारण परशुरामाने देखील ज्या इंद्राने त्याच्या आईचे शीलभ्रष्ट केले त्या "इंद्राला मोकळा" सोडून
आपला सूड बाकी सगळया क्षत्रीयावर उगवला होता. चिपळूणची "चम्मत गं"या पेक्षा वेगळी नाही .