Showing posts with label वारकरी धर्म. Show all posts
Showing posts with label वारकरी धर्म. Show all posts

Wednesday, 22 January 2014

संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हतेच! पतितसावित्रिक होते!!

पतितसावित्रिक म्हणजे वेदाचा अधिकार गमावलेली व्यक्ती म्हणजेच शुद्र

कामाच्या व्यापातून थोडीशी फुरसत झाली आहे. फुरसतीचा हा वेळ राहून गेलेल्या विषयांवरील लेखन पूर्ण करण्यासाठी खर्ची घालण्याचे मी ठरविले आहे. त्यातील पहिला लेख आज ब्लॉगच्या वाचकांना भेट देत आहे.  - अनिता पाटील 

वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञानेश्वर हे आमचेच असे म्हणून आजचा ब्राह्मण समाज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, ब्राह्मणी शास्त्रानुसार ज्ञानेश्वर हे ब्राह्मण नाहीत. केवळ ब्राह्मण स्त्री आणि पुरूषापासून जन्म झाला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते. ज्ञानेश्वरच नव्हे तर त्यांची इतर भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यापैकी कोणाचीही मुंज झालेली नव्हती. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले. त्यांना वाळीत टाकले. त्यामुळे ते ब्राह्मण नाहीत, हे सिद्ध होते. 

ज्ञानेश्वरादी भावंडे ब्राह्मण नसतील तर ते कोण आहेत? ब्राह्मणी शास्त्रानुसार ते पतितसावित्रिक आहेत. पतितसावित्रिक म्हणजे अशी व्यक्ती जिने वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार गमावला आहे. ब्राह्मणी शास्त्रानुसार, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांना वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार आहे. शुद्रांना असा अधिकार नाही. याचाच दुसरा अर्थ पतितसावित्रिकाचा दर्जा हा शुद्राएवढाच आहे. 

पतितसावित्रिक कोणाला म्हणायचे याविषयीचे नियम अनेक स्मृती ग्रंथात आले आहेत. ॠगवेदी ब्राह्मणांच्या ऐहिक जीवनाचे सर्व नीतनियम सांगणाèया आश्वलायन गृह्य सूत्रात ते अधिक स्पष्टपणे आले आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर त्याकाळच्या ब्राह्मण समाजाने बहिष्काराची जी कारवाई केली होती, तिचा आधारही हाच ग्रंथ होता. आश्वलायन गृह्य सूत्रात म्हटले आहे की, ब्राह्मणाची आठव्या वर्षी मुंज करायला हवी. ब्राह्मणाची मुंज जास्तीत जास्त १६ व्या वर्षांपर्यंत करता येते. कोणत्याही कारणांनी १६ व्या वर्षांपर्यंत मुंज न झाल्यास ब्राह्मण पतितसावित्रिक होतो. म्हणजेच तो ब्राह्मण राहत नाही, तो शुद्र होतो. 

आश्वलायन गृह्य सूत्रातील या नियमानुसार ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे शुद्र ठरतात. त्या काळातील ब्राह्मण समाजाने त्यांना शुद्राचीच वागणूक दिली होती. त्यामुळे आता ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना ब्राह्मण ठरविण्याचा खटाटोप करू नये. 

ब्राह्मणी शास्त्रातील पतिसावित्रिकाविषयीचे नियम केवळ ब्राह्मणांनाच लागू आहेत असे नव्हे, वेदाधिकार असलेल्या तिन्ही वर्णांना ते लागू आहेत. आश्वलायन गृह्य सूत्राच्या १९ व्या खंडात सुरूवातीलाच हे सारे नियम आहेत. आमच्या वाचकांसाठी हे नियम खाली देत आहे. 

अष्टमे वर्षे ब्राह्मणमउपनयेत ।।१।।
गर्भाऽष्टमे वा ।।२।।
एकादशे क्षत्रियम ।।३।।
द्वादशे वैश्यम ।।४।।

अर्थ : जन्मझाल्यापासून अथवा गर्भधारणेपासून आठव्या वर्षी ब्राह्मणाची मुंज करावी. अकराव्या वर्षी क्षत्रियाची आणि बाराव्या वर्षी वैश्याची मुंज करावी.

आषोडशात ब्राह्मणस्यानतीत: काल: ।।५।।
आद्वाविंशात् क्षत्रियस्य आचतुर्विंशात वैश्यस्य ।
अत ऊध्र्वं पतितसावित्रिका भवन्ति ।।६।।

अर्थ : सोळा वर्षांपर्यंत ब्राह्मणाची २२ व्या वर्षापर्यंत क्षत्रियाची व २४ व्या वर्षापर्यंत वैश्याची मुंज करण्याचा काल आहे. हा काल संपल्यानंतर (मुंज न झालेली मुले) पतितसावित्रिक होतात. (पतित सावित्रिक म्हणजे वेद म्हणण्याचा अधिकार नसलेले.)

नैनानुपनयेन्नाध्यापयेन्न याजयेन्नैभिव्र्यवहरेयु: ।।७।।

पतित सावित्रिकाची मुंज करू नये. त्यांना पढवू नये वेद आणि शास्त्रांचे म्हणजे शिक्षण देऊ नये. त्यांचे उपाद्धिक करू नये. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. (व्यवहार करू नये याचा अर्थ त्यांना वाळीत टाकावे. त्यांना जातीबाहेर टाकावे.)

- अनिता पाटील 


या लेखमालेतील इतर लेख लवकरच वाचा

Sunday, 14 July 2013

वारी सोहळ्यावर आरएसएसचा ताबा

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

महाराष्ट्रातील वारकरी चळवळ आरएसएस आणि आरएसएसच्या ब्राह्मणांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळेच वारकèयांच्या दिन्डी सोहळ्याच्या व्यासपीठावरून विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दलाच्या  तोंडून ऐकू येणाèया मागण्या परवा ऐकू आल्या. गेल्या गुरुवारी (दि. ११ जुलै २०१३) पंढरपूरच्या मार्गावर फलटणच्या पालखी तळावर या मागण्या करण्यात आल्या. पालखी सोहळ्याच्या व्यासपीठावरून करण्यात आलेल्या मागण्यांपैकी प्रमुख ३ मागण्या पाहा : 
  1. गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात यावा.
  2. महाराष्ट्र विधानसभेच्या विचाराधानी असलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास करू नये.
  3. संतांनीच जातींचा उल्लेख केला असल्यामुळे जातींचा उल्लेख करण्याची मुभा देण्यात यावी. जातीचा उल्लेख केला म्हणून अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत.
रामदेव बाबा : सध्याच्या काळातील
आरएसएसचे मुख्य एजंट.
...............................................................
या तिन्ही मागण्या आणि त्या मागचा अजेंडा वारक-यांचा कधीच नव्हता. हा अजेंडा आरएसएसचा आहे. ११ जुलै रोजी अचानक तो वारक-यांच्या पालखी सोहळ्यात प्रकटला. त्या आधी मंगळवारी ९ जुलै राजी रामदेव बाबा पालखी सोहळ्यात येऊन गेले होते.  पुण्याच्या बारामती तालुक्यातील बेलवाडी येथील रिंगण सोहळ्यात रामदेव बाबांनी सहभाग घेतला होता. रामदेव बाबा हे संघाचे सर्वांत मोठे एजंट आहेत. रामदेव बाबा पालखी सोहळ्यात आले, तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. बाबा येऊन गेले आणि तिस-याच दिवशी वारक-यांच्या व्यासपीठावरून आरएसएसचा अजेंडा जाहीर झाला. 

आरएसएसने वापरला 'जॉईन देम'चा फॉरम्युला
‘इफ यू कान्ट बीट देम जॉईन देम', अशी इंग्रजीत एक म्हण आहे. तुम्ही त्यांना पराभूत करू शकत नसाल, तर त्यांच्यात सहभागी व्हा, असा या म्हणीचा अर्थ. शत्रूच्या सोबत राहून त्याला नेस्तनाबूत करणे सोपे असते. नेमका हाच कावा वापरून वारकरी चळवळीला पराभूत करण्याचा डाव आरएसएस आणि जात्यंध ब्राह्मणवाद्यांनी रचला आहे. हा फॉरम्युला इतका यशस्वी झाला आहे की, पंढरपूरला जाणारा संपूर्ण दिन्डी सोहळा आज आरएसएसच्या ब्राह्मणांनी ताब्यात घेतली आहे. त्याचा हा परिणाम आहे. 

पालखी सोहळा : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे रंगलेले गोल रिंगण.
.............................................................................................................................
पालखी सोहळ्याचे मालक म्हणवणारे हे लोक कोण?
वारीत आरएसएसची भाषा बोलणारे लोक कोण आहेत? त्यांची नावे आणि नावामागील पदे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहिली की, सारा खेळ लक्षात येईल. दिन्डी सोहळा प्रमुख डॉ. प्रशांत सुरू, पालखीचे मालक बाळासाहेब आरफळकर, संत ज्ञानेश्वर महाराज दिन्डी संघटनेचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, समस्त वारकरी-फडकरी-दिन्डीकरी संघटनेनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळगावकर ही ती मंडळी आहेत. यापैकी काही जणांनी स्वत:ला पालखी आणि दिन्डी सोहळ्याचे मालक म्हणवून घेतले आहे. हे लोक दिन्डी सोहळ्याचे मालक कधी झाले, त्यांना मालक कोणी केले. या सोहळ्याचा मालक कोणी नाही. वारकरी हेच सोहळ्याचे मालक आहेत. ज्या संघटनांच्या नावाखाली ही मंडळी बोलत आहेत, त्या संघटना कोणी आणि कधी स्थापन केल्या. वारक-यांच्या अशा कोणत्याही संघटना नाहीत. वारकरी कोणत्याही संघटनेत नसतो. पंढरपूरचा विठ्ठल हीच वारक-यांची संघटना आहे आणि विठ्ठल हाच या संघटनेचा मालकही आहे. 

ब्राह्मणांचे राज्य आणण्याचा डाव
आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत :
 आरएसएसला या देशात ब्राह्मणांच्या
वर्चस्वाखालील राज्य आणावयाचे आहे.
......................................................
जातीय ध्रुवीकरण करून ब्राह्मणांचे राज्य या देशावर आणण्याचा डाव वरील तिन्ही मागण्यांच्या मागे आहे. गोहत्याबंदीची मागणी केली की, मुसमान बिथरतात, अ‍ॅट्रासिटी रद्द करण्याची मागणी केली की, दलित बिथरतात. हे दोन्ही वर्ग आक्रमक झाले की, उरलेल्या समाजाला भिती घालून हिन्दूत्वाच्या झेन्ड्याखाली आणणे सोपे जाते. पण हिन्दुत्व नावाची कोणतीही गोष्ट या देशात नाही. ब्राह्मणी राज्य आणण्यासाठी वापरलेला तो एक निरर्थक शब्द आहे. 

अंधश्रद्धेविरुद्ध लढणारी चळवळ अंधश्रद्धेच्या दावणीला कशी?
हे तुकोबांचे वचन आहे : नवसे कन्या पुत्र होती । तरी का करणे लागे पती ।। हे वचन वारक-यांना चांगले पाठ आहे. असे असतानाही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकाला वारक-यांकडून विरोध होत आहे, असे चित्र उभे केले जात आहे. वारक-यांचा विठ्ठल सजन कसायासोबत मांस विकायला बसलेला आहे. मांस विकू लागे । सन कसाया संगे ।।  हे संत वचन वारक-यांना माहिती आहे. तरीही गोहत्याबंदीची मागणी वारक-यांच्या तोंडी घातली जात आहे. चोखोबांना छातीशी लावणा-या संत नामदेवांनी वारक-यांची पताका चंद्रभागेच्या वाळवंटात रोवली आहे. पितरांना श्राद्ध देण्याच्या आधी दलितांना जेवण देणारे आणि त्याची शिक्षा म्हणून ब्राह्मणांचा बहिष्कार सहन करणारे संत एकनाथ यांनी वारक-यांच्या चळवळीला खांब दिला आहे. तरीही दलितांना शिव्या घालण्याचा अधिकार वारक-यांच्या तोंडून मागितला जात आहे. हे सारे उलटे खेळ नीट समजून घ्यावे लागतील. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संघवाले गोळीबार करीत आहेत. 

यातील दुर्दैवाची गोष्ट अशी की, ख-या वारक-यांना या गोष्टींशी काही देणे घेणे नाही. तो विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि घराकडे परततो. त्याचा गैरफायदा ब्राह्मणवादी मंडळी घेत आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला गेला नाही, तर वारीचा सोहळा जातीयवाद्यांचे मोठे बलस्थान बनून काम करील.

रामदेव बाबा यांनी पालखी सोहळ्याला भेट दिल्याचे वृत्त येथे वाचा


[[Google search : wari, warkari, vari, varkari, tukaram maharaj, ramdev baba, rss, dindi, palakhi, pandharpur, viththal, vatthhal, pandurang, ringan, brahman]]

या विषयाशी संबंधित इतर लेख

ब्राह्मण व्होट बँकेच्या राजकारणाला न्यायालयाचा दणका
ब्राह्मण व्होट बँक

सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर

नव्या प्रश्न पत्रिका