Saturday, 19 November 2011

मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावेब्राह्मणी धर्मातील जातीय विखारामुळे व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात धर्मांतर केले. हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझ्या मते हिंदूनावाचा धर्मच अस्तित्वात नाही. हिंदू ही एक राजकीय व्याख्या आहे. दिल्ली मस्लिम राज्यकत्र्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्व एतद्देशीयांसाठी हिंदू ही संज्ञा वापरली गेली. वस्तुत: सर्व एतद्दीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतीरिवाज यात खूप फरक होते, आजही आहेत. या विषयी एक लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. तो याच ब्लॉगवर उपलब्ध आहे. मी हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म (या पुढे या लेखात हिंदू धर्माचा उल्लेख ब्राह्मणी धर्म असाच येईल.) म्हणते. आणि तेच अधिक योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म सोडला.  

डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर : २० व्या शतकातील सर्वांत मोठी घटना
असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही २० व्या शतकातली या देशातील सर्वांत मोठी घटना होती. त्याचे सामाजिक आणि धार्मिक परीमाण तर झालेच, परंतु राजकीय परीणामही झाले. उत्तर प्रदेशातील आज अस्तित्वात असलेले मायावती यांचे सरकार हे  बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या क्रांतीचे फलित होय.  बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भूमीत क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याची परीपक्व राजकीय फळे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मायावती यांच्या नेतृत्वाचा वाटा या फळात नक्कीच आहे. तथापि,  बाबासाहेबांच्या धर्मांतराचे सर्वंकश परीणाम अजून फलित व्हावयाचे आहेत. बाबासाहेबांचे धर्मांतर होऊन ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याचे सर्वंकश परीणाम का दिसून येत नाहीत, याची कारणे अनेक आहेत. ब्राह्मणी धर्म हा एक घुय्या (रंग बदलणारा सरडा इंग्रजीत घुय्याला शॅमिलिऑन म्हणतात.) आहे. तो वातावरणाचा परीवेश पाहून रंग बदलतो. हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे. वैदिक धर्माच्या चिकित्सेत मी ब्राह्मणी धर्माच्या रंगबदलूपणाचा हिशेब मांडला आहे. तो वाचकांनी जरूर पाहावा. ब्राह्मणी धर्म आपल्या छद्मावरणासह टिकवून ठेवण्यात सर्वांत मोठा वाटा ब्राह्मणी धर्माच्या छायेखाली वावरणा जातीसमूहांचा आहे. वस्तूत: हे जातीसमूह ब्राह्मणी जातीसमूहापासून अगदी भिन्न आहेत. त्यांच्या चालीरीती, देवदेवस्की, रोटी-बेटी व्यवहार सगळे काही भिन्न आहे. उदा. जाट, खत्री हे जातीसमूह स्वत:ला हिंदू मानण्यास फार पूर्वीपासून कां कू करीत आले आहेत. महान धर्मसंस्थापक गुरुनानकांच्या नेतृत्वाखाली जाट-खत्री समाज एकवटला. उत्तरेतील इतर काही जातीसमूहांची साथ घेऊन गुरुनानकांनी नवीन धर्माचा प्रकाश जगाला दिला. 

वारकरी चळवळ 
गुरुनानकांनी उत्तरेत धर्मचळवळ सुरू केली, त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल नामक लोकदैवताला मानणारया लोकांची  मोठी लोकचळवळ सुरू होती. त्या काळातील सर्व बिगर ब्राह्मणी धार्मिक चळवळींपेक्षा ही चळवळ जास्त शिस्तबद्ध आणि संघटित होती. परंतु या चळवळीतून शीखांसारखा नवा धर्म अस्तित्वात येऊ शकला नाही. याची कारणेही अनेक आहेत. या लोकचळवळीला आद्य शंकराचार्यासारख्या धूर्त ब्राह्मणाने वेदांशी जोडले. पांडुरंगाष्टकम लिहून चळवळीचे सांस्कृतिकरण केले. त्यातून या चळवळीचे लोकपण संपले. त्याबरोबरच नवा धर्म अस्तित्वात येण्याची शक्यताही संपली. 

महानुभाव चळवळ 
महात्मा चक्रधर स्वामी प्रणित महानुभव धर्माने वेदांचे प्रामाण्य उघडपणे नाकारले. आपली स्वतंत्र अवतार व्यवस्था निर्माण केली. पूजापद्धती, संस्कार पद्धती, दीक्षापद्धती आदी सर्व ब्राह्मणी धर्मापासून वेगळे केले. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना संन्यास घेण्याची मुभा नव्हती. चक्रधरांनी ती दिली. श्रीचक्रधरांचा प्रभाव एवढा होता की, देवगिरीच्या यादवराजाची महाराणीही श्रीचक्रधरांची शिष्या बनली. श्रीचक्रधरांचे  नवे धर्ममत अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजवाड्यात, राणीवशात पोहोचले. तरीही नवा धर्म अस्तित्वात आलाच नाही. ब्राह्मणी धर्माचा एक पंथ अशी महानुभवांची ओळख निर्माण झाली. 

बिगर ब्राह्मणी चळवलींच्या खांद्यावर ब्राह्मणी धर्माचा झेंडा  
वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी समतेच्या पायाभवर उभ्या आहेत. श्रीचक्रधरांनी तर गावकुसाबाहेरील वस्तीत भिक्षा मागण्याचे आदेश आपल्या भिक्षूंना दिले, तर नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखा मेळा यांना छातीशी कवटाळले. या दोन्ही चवळवळी उत्तरेत पंजाबपर्यंत पोहोचल्या. नामदेवांच्या वचनांना शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात आदराने जागा मिळाली. महानुभाव पंथाचे मठ आजही पंजाबात आहेत. एवढा प्रभाव असतानाही या चळवळी +ब्राह्मणी जोखड झुगारण्याच्या+ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्या. वारकरी चळवळीचे तर मातेरे झाले. ज्यांना वेद वाचण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा जाती वारकरी चळवळीच्या रूपाने आपल्या खांद्यावर वेदप्रणित ब्राह्मणी धर्माचा भार वाहताना पुढे दिसू लागल्या. 


चळवळी अपयशी का ठरल्या?
या दोन्ही चळवळी संपूर्ण क्रांती आणण्यात अपयशी का ठरल्या, याची काही ठळक कारणे आहेत. या चळवळीच्या आधी किमान ३०० ते ४०० वर्षे महाराष्ट्रात मजबूत राज्यव्यवस्था होत्या. यादवकाळात या दोन्ही चळवळी ऐनबहरात आल्या. काही तरी नवे घडेल, असे वाटत असतानाच परचक्राचा फेरा आला. अल्लाऊद्दीन खिलजीच्या रूपाने नवे संकट महाराष्ट्रावर आले. त्यामुळे या चळवळींच्या विकासाला पायबंद बसला. नवा विचार मांडण्याचे दिवस संपले. आपले जे काही अर्धे-कच्चे आहे, ते टिकविण्यातच महाराष्ट्राची सर्व शक्ती खर्ची पडली. शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत ब्राह्मणी धर्म सावरला होता. वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी ब्राह्मणी धर्माने नेस्तनाबूत केल्या होत्या. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध फळी निर्माण करून जन्माला आलेल्या या चळवळींच्या खांद्यावरच ब्राह्मणी धर्माची पताका आली होती. महाराजांना दीर्घायुष्य लाभते तर कदाचित खरया महाराष्ट्र धर्माचा उदय होऊही शकला असता. कारण आपला राज्याभिषेक महाराजांनी ब्राह्मणी वैदिक पद्धतीने करवून घेतल्यानंतर निश्चलपुरी या गोसावी समाजातील एका संन्याशाच्या हातून पुन्हा एकदा करवून घेतला होता. यावरून महाराजांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येतो. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना घातपात झाला, असे मत नवीन संशोधक मांडित आहेत. महाराजांकडून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला धक्का बसू शकतो, असा संशय तत्कालीन ब्राह्मणांना आला होता का? त्यातून त्यांनी महाराजांना घातपात केला का? यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. 

ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्याची संधी पुन्हा आली आहे! 
असो. अशा प्रकारे वारकरी आणि महानुभाव या दोन धर्मचळवळींच्या रूपाने नवधर्मस्थापनेची संधी महाराष्ट्राने अकारव्या-बाराव्या शतकात गमावली. या पैकी कोणतीही एक चळवळ यशस्वी झाली असती, तरी महाराष्ट्र धर्माच्या खांद्यावरील ब्राह्मणी जोखड उतरले गेले असते. पण तसे व्हायचे नव्हते. जे तेव्हा होऊ शकले नाही, ते आता एक हजार वर्षांनी २१ व्या शतकात तरी होईल का? महाराष्ट्रावरील ब्राह्मणी धर्माचे जोखड उतरेल का?... मला असे वाटते की, अकराव्या-बाराव्या शतकात हुकलेली संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय स्थिरता आहे. महाराष्ट्राच्या मातीत परीवर्तनाचे वारेही वाहत आहे. आता योग्य वेळ आली आहे. विषमतेचा विखार प्रसवणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था पूर्णत: उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. 

धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही   
विषमतेचा विखार निर्माण करणारी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे. धर्मांतर. होय धर्मांतरच. या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. माझे असे मत आहे की, महाराष्ट्राने या अधिकाराचा वापर करून धर्मांतर करायला हवे. विशेषत: संपूर्ण मराठा समाजाने धर्मांतर करायला हवे. मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे. मराठा समाजाने घाऊक पातळीवर धर्मांतर केल्यास महाराष्ट्रात मोठे धर्मचक्रप्रवर्तन होईल. इतर जातींनाही प्रेरणा मिळेल आणि एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिलेले समानतेचे स्वप्न साकार होईल.

या मालिकेतील पुढच्या लेखात वाचा
 "मराठा समाजासमोरील धर्मांतराचे पर्याय!"


अनिता पाटील, औरंगाबाद. 

8 comments:

 1. वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.
  मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.
  ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.
  मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.
  संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.
  त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.
  महानुभाव संप्रदायाला हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.
  प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.
  चक्रधर स्वामींचे विचार –
  रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.
  गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .
  मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.
  स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.
  कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.
  शेवटी—
  देव धातूचा नव्हे
  देव पाषाणाचा नव्हे
  देव काष्ठाचा नव्हे
  देव मातीचा नव्हे
  देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे
  देव चित्रीचा नव्हे
  धातूचा तो झिजेल
  पाषाणाचा तो फुटेल
  काष्ठाचा तो मोडेल
  मातीचा तो विरेल
  पटीचा तो फाटेल
  चित्रीचा तो पुसेल
  देव तो अच्छेदू अभेदू की.

  इति चक्रधर .

  ReplyDelete
  Replies
  1. लतादिदी, मोदी, शरद पवार आणि विलासराव...


   आता हा सगळा विषय मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित आहे. आता त्या गोष्टीला वीस वर्षे झालेली आहेत. जेव्हा दिदींना हे जाणवले की आपल्या पिताश्रींना अखेरच्या दिवसात योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यात एक चांगले रुग्णालय बांधावे आणि त्यातून उत्तम उपचार व्हावेत, ही भावना अतिशय मोठी होती. शिवाय दिदींनी व्यक्त केलेली. त्यामुळे अनंत हस्ते दिदींना लोकांनीच आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्यक्रमाला भरूभरून प्रतिसाद दिला. आणि मोठी रक्कम उभी राहिली. दिदींना आर्थिक तोशिश न लागता रुग्णालय उभे राहिले. पण ही जागा मिळवण्याकरिता त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिदींसाठी खूप खटाटोप केला. शहर नागरी कमाल मर्यादेमध्ये (लॅण्ड सिलिंग) ही जमीन होती. ती मोकळी करून एका खासगी ट्रस्टसाठी मंगेशकर कुटंबियांना द्यायची होती. पण दिदींचा पुढाकार असल्यामुळे श्री.शरद पवारांनी उलट-पलट करून48तासात ती जागा दिदींच्या ताब्यात दिली. शरद पवारांच्या कामाचा झपाटा ज्यांना माहिती आहे, त्यांना याची कल्पना येऊ शकेल. जागा ताब्यात मिळाल्यावर मंगेशकर रुग्णालयाचे काम सुरू झाले. तिथपर्यंत युतीचेसरकार आलेले होते. पवारसाहेबांनी जागा दिली तो काळ होता 1993 चा. केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेलेले श्री. शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत आले होते. आणि त्यांनी ही जमीन दिली. रुग्णालयाचे काम सुरू झाली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांच्याकडे आले. रुग्णालयाचा पाया घातला गेला. कॉलम उभे राहायला सुरूवात झाली. आणि मग शासकीय अधिकार्यांच्या लक्षात आले की, सरकारने जागा दिली असली तरी महसूल खात्याशी जे लीज-डीड कायदेशीररित्या करावे लागते ते केलेलेच नाही. आणि त्यापूर्वी बांधकाम सुरू झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मग हृदयनाथ मंगेशकर यांची धावपळ झाली. त्यांनी मनोहर जोशींना भेटून कल्पना दिली. पण ते काम काही मार्गी लागले नाही. पुढे युतीचे सरकार गेले. आणि 1999 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तिथपर्यंत अधिकार्यांनी या बांधकामावर हरकत घेतली होती. आणि छोटा दिसणारा विषय अडचणीचा होऊ लागला होता. रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाच्या श्रीमती वेलणकर आणि डॉ. धनंजय केळकर त्यावेळचे आमदार उल्हास पवार यांना वारंवार भेटले आणि विलासरावांच्या मार्फत त्यांनी हा विषय मार्गी लावायची त्यांनी विनंती केली. या रुग्णालयाशी दिदींचे नाव जोडले गेले असल्यामुळे, ऐरवी सर्वांनाच मदत करायला नेहमीआघाडीवर असणारे उल्हास पवार नाही कसे म्हणणार? हृदयनाथ मंगेशकर, डॉ. केळकर यांनाघेऊन उल्हास पवार यांनीवर्षा बंगला गाठला. आणि विलासरावांना सगळा विषय समजावून सांगितला. विलासरावांनी संबंधित खात्याचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जॉनी जोसेफ यांना बोलावून घेतले आणि त्यांना एका वाक्यात सांगितले. ‘दिदींचे काम आहे;मार्गी लावून द्या. अडचण करू नका...’ हळूवार पणे विलासराव कामे करीत होते. आणि ती अडचण लगेच दूर झाली. नंतर शानदार रुग्णालय उभे राहिले. त्या रुग्णालयाचे उद्घाटन करायला त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिदींनी आणले. वाजपेयी आनंदाने आले. त्यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख कार्यक्रमाला होतेच. नामफलकावरचा पडदा दूर झाला. अटलबिहारींनी पाहिलं, त्याच्यावर लिहिले होते की, देश के प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयींजींके करकमलोद्वारा... वगैरे पण त्या फलकावर राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नावच नव्हते. त्याची चर्चा झाली. तेव्हा हृदयनाथ उल्हास पवारांना म्हणाले की, ‘आम्हाला असे सांगण्यात आले की प्रोटोकॉलमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव टाकणे बसत नाही.’ विलासराव म्हणाले, ‘काही हरकत नाही. तुमचे काम झाले याचा आनंद आहे.’
   या रुग्णालयात पुणे आणि आसपासच्या परिसरातील गरीब रुग्णाला सवलतीच्या दराने उपचार होतील अशी लोकांची अपेक्षा होती. पण, तसे काही घडले नाही आणि आता हे रुग्णालय पुण्यातल्या रुबीच्या तोडीचे महागडे रुग्णालय ठरले आहे.अशी भिती वाटते की काही वर्षानंतर मंगेशकर रुग्णालयाच्या रस्त्याने जाणार्या गाड्यांना टोल द्यावा लागतो की काय! शासनाच्या मदतीने मिळालेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या दीनानाथजींच्या स्मारकरुपाने उपचार करणार्या या रुग्णालयाचा आज गरीब रुग्णांना फायदा किती हा वेगळा प्रश्न आहे. पण, लतादिदींनी याविस्तार कक्षाचे उद्घाटन करायला मोदींना जेव्हा बोलावले त्यावेळी शरद पवारांचीही आठवण त्यांना झाली नाही. पवार साहेबांनी जागा दिली होती म्हणून भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले होते. आता वाजपेंयींच्या हस्ते मुख्य इमारतीचे उद्घाटन केल्यावर विस्तारीत कक्षाचे उद्घाटन भाजपने पंतप्रधानपदासाठी घोषित केलेल्या उमेदवाराच्या हस्ते झाले आहे. दिदींची इच्छा पुरी होते की नाही यासाठी आता सर्वांना सात महिने थांबावे लागणार आहे.

   Delete
  2. हरिहर सारंगजी आपण अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.

   Delete
 2. हे काय होते दिदिचा गोडवा क़ि दिदिला टोमणा.. ज्या दिदिने बाबासाहेबाचे एकही गाणे गायले नाही त्याचा पुळका म्हणावा कि चमचेगिरी!

  ReplyDelete
 3. हे काय होते लतादिदिची चमचेगिरी का अजुन दुसरं काही?

  ReplyDelete
 4. नरेंद्र वडगावकरजी, ही लताबाईची चमचेगिरीच आहे. शब्द या नावाने हा जो कोणी लिहितो आहे, तो ब्राह्मणवादीच असला पाहिजे.

  ReplyDelete
 5. महाराष्ट्रातून त्यांच्या संस्कृतींना हद्दपार करू शकतो. आणि ब्राह्मणी धर्मालासुद्धा. त्यासाठी महाराष्ट्रात मानवतावादी राजकीय पक्ष स्थापन झाला पाहिजे. तोच पुढे हिंदुस्थानात आला पाहिजे तर मग होईल हे सर्व.

  ReplyDelete
 6. मराठ्यानी नविन बिगर बामणी हिंदू धर्म निर्माण करावा . दुसऱ्या धर्मात जाणत्या आगोदर धर्मवीर संभाजीराजे ना आठवा .मनातुन व जन्मदाखल्यावरुन जाती नष्ट कराव्याच लागतील.तरच धर्म टिकेल . त्याचप्रमाणे नवनवीन साधु,स्वामी,स्वारी,महाराज, यांच्यावर, बंदी घालावी , नविन हिंदू धर्म निर्माण करून त्यात देव फारच तीनच १)छत्रपती शिवाजी २) धर्मवीर संभाजीराजे ३)संत तुकाराम

  ReplyDelete