Wednesday 26 December 2012

पु. ल. देशपांडे यांनी पिळलेली ब्राह्मणांची शेंडी आणि ब्राह्मणवाद्यांची फसगत


ब्राह्मणवादी ब्लॉगरांच्या विनोदाने महाराष्ट्र लोटपोट

--राजा मइंद

ब्राह्मण हे ब्राह्मणांशिवाय कोणाचाही उदो उदो करीत नाहीत. यालाच ब्राह्मणवाद म्हणतात. ब्राह्मणी जातीयवादामुळे अनेकदा मोठे विनोद घडून येतात. पु. ल. देशपांडे यांच्या +धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही+ या लेखाच्या संदर्भाने ब्राह्मणी जातीयवादाने असाच एक महाविनोद सध्या निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या +एक शून्य मी+ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणी जातीयवादावर कोरडे ओढले आहेत. ब्राह्मण कसे मुर्ख आहेत, कसे समाजाला लुबाडून खातात, याचे विश्लेषण पु. ल. यांनी या लेखात आहे. +पु. ल. प्रेम+ या ब्लॉगवर हा लेख गेल्या महिन्यात टाकण्यात आला. +पु. ल. प्रेम+ हा ब्लॉग ब्राह्मणांकडून चालविण्यात येत आहे, हे ओघाने आलेच. इतरही अनेक ब्राह्मणवाद्यांनी तो आपल्या ब्लॉगवर शेअर केला. पण हा लेख ना +पु. ल. प्रेम+वाल्यांनी वाचला होता, ना तो शेअर करणाèया इतर ब्राह्मणी ब्लॉगरांनी. हा लेख जेव्हा ब्राह्मण वाचकांनी वाचला तेव्हा सर्वांना दे माय धरणी ठाय झाले. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणांनाच 'दे मार' झोडपून काढले आहे. आता ब्राह्मण वाचक ब्लॉगवाल्यांना शिव्या घालीत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने कधी कोणाला हसू आले नाही. पण, या लेखाच्या निमित्ताने ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलेल्या विनोदाला मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या खो खो हसत आहे. आधीच हास्यास्पद असलेले पु. ल. महाराज त्यामुळे आणखी केविलवाणे झाले आहे. पु. ल. देशपांडे हे स्वत:चा उल्लेख कधी-कधी पी. एल. देशपांडे असा करीत असत. त्याचा संदर्भ घेऊन ब्राह्मणवादी वाचक एकच प्रश्न विचारीत आहेत - अरे, हे पीएल देशपांडे आहेत की पीयेल (पिलेले) देशपांडे? 


ब्राह्मणांचा भोंदूपणा उघड करणारी
‘पीएल' देशपांडे यांची काही वाक्ये अशी : 

१. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! 

२. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

३. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. 

४. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. 

५. एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. 

६. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु' ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतुङ्क म्हणताना +दूर हो. विटाळ होईल.+ म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. 

७. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

८. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. 

९. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. 

१० उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा', ‘बलुतं', ‘आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. 

(‘एक शुन्य मी' या पुस्तकातून)

Thursday 13 December 2012

अनिता पाटील यांचे पहिले पुस्तक वाचकांना उपलब्ध


आपल्या विचारांनी जगभरातील मराठी भाषिकांत जागृतीची ज्योत पेटविणा-या अनिता पाटील यांचे

मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे

हे पहिले पुस्तक औरंगाबादच्या पंचफुला प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात अनिता पाटील यांचे गाजलेले १५ लेख आहेत. पंचफुला प्रकाशनाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे त्याची किंमत अवघी ५० रुपये ठेवण्यात आली आहे.
पुस्तक घेण्यासाठी पंचफुला प्रकाशनाचे संचालक डॉ. बालाजी जाधव यांच्याशी ९४२२५२८२९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
...........................................................................
पुस्तकाचे नाव : मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे
लेखिका : अनिता पाटील
प्रकाशक : पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद.
पाने : ६४
किम्मत : ५० रूपये फक्त