Wednesday, 23 November 2011

पोरं बहुजनांची-मराठ्यांची, दगड ठाक-यांचे आणि बदनामी शिवरायांचीमहाराष्ट्र गुंडा-पुंडांचा प्रदेश आहे का?
बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तीन नावांनी महाराष्ट्राच्या पवित्र आणि सोज्वळ मातीला कलंक लावला आहे. उत्तर भारतात पूर्वी महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जायचे. संत नामदेवांनी महाराष्ट्रातील भक्तीपंथाची पताका पार पंजाबपर्यंत नेली. नामदेवांच्या अभंगांना शीखांच्या गुरुग्रंथसाहेबांत आदराने स्थान मिळाले. खरी भक्ती महाराष्ट्राच्याच मातीत आहे, हे ओळखून संत कबिरांनी आपला मुलगा लतिफ याला पंढरपूरला पाठविले होते. संत लतिफ हे परत उत्तर भारतात जाऊ शनले नाहीत. गेले नाहीत, असेही म्हणता येईल. पंढरपुरातच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी पंढरपुरातच आहे. संत कबिराचा एक अंश अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेला आहे. महाराष्ट्राची ही भक्तीरूपी ओळख पुसून टाकण्याचे महापाप ठाकरयांनी केले. मुजोरांचा आणि गुंडांचा प्रदेश असा बदनामीचा शिक्का ठाकतरयांनी महाराष्ट्राच्या कपाळावर बसवला. महाराष्ट्र खरेच गुंडा-पुंडांचा प्रदेश आहे का?

बाळ ठाकरे      उद्धव ठाकरे        राज ठाकरे     आदित्य ठाकरे  

इंदुरीकर ठाकरयांनी भक्तीरूपी
महाराष्ट्राचा "तमाशा" केला !
महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज वारकरी सांप्रदायाशी बांधलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीत किमान एक तरी वारकरी संत आढळून येतो. महाराष्ट्राला मुजोरांचा आणि गुंडांचा प्रदेश अशी ओळख देताना ठाकरयांनी याच बहुजन समाजाची दिशाभूल केली. ही यातील सगळ्यांत वाईट गोष्ट होय. ठाकरे हे तसे महाराष्ट्राला उपरे आहेत. या त्रिकुटाचे घराणे मूळचे इंदूरचे आहेत. ठाकरयांचा मूळ पुरुष प्रबोधनकार केशव सीताराम  ठाकरे यांनीच आम्ही मूळचे इंदूरचे असल्याचे आपल्या आत्मवृत्तात लिहून ठेवले आहे. प्रबोधनकारांनी महाराष्ट्रात केलेले प्रबोधनाचे कार्यही ठाकरे विसरले.  महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज  नावाचे एक  किर्तनकार सध्या फार प्रसिद्ध आहेत. ठाकरे हे इंदुरीकरच पण किर्तनकार नव्हे तमासगीर! त्यांनी अख्ख्या  महाराष्ट्राचा तमाशा केला!!एकेकाळी शिवसेनेत असलेले महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे एक गणमान्य नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरे यांना मागे एकदा तमाशा काढण्याचा सल्ला दिला होता. आपल्या फडाचे नाव ‘टी बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ' ठाव असेही भुजबळ म्हणाले होते. ठाकरे यांनी भुजबळांना "लखोबा लोखंडे" ही पदवी दिली होती, तेव्हाचा हा किस्सा आहे. भुजबळांनी ज्या संतापाच्या भरात ठाकरयांना तमाशा काढण्याचा सल्ला दिला होता, तो संताप महाराष्ट्रातील तमाम जाणकारांच्या मनात गेली कित्येक वर्षे खदखदत आहे.
महाराष्ट्र लढत होता तेव्हा ठाकरयांचे 
पूर्वज मोगलाईत मौजा करीत होते
ठाकरयांची ही मुजोरी बहुजन समाजाच्या जोरावरच सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत. महाराजांचे नाव घेतले की, महाराष्ट्रातील तरुणांचे बाहू फुरफुरू लागतात. याचाच गैरफायदा ठाकरयांनी घेतला. +जय भवानी जय शिवाजी+ हा नारा ठाकरयांनी दिला. त्याबरोबर महाराष्ट्रातील तमाम बहुजन तरुण ठाकरयांचा बटिक झाला. महाराष्ट्रातील एकही बहुजन जात त्यातून सुटली नाही. मराठा समाजही त्यात आला. मराठा समाजाची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे साहजिकच मराठा तरुण शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला. महाराष्ट्रातील सर्व बहुजन जाती मुळातच लढवय्या आहेत. या जातींतील लढवय्ये तरुण आयतेच ठाकरयांच्या हाती सापडले. ठाकरयांनी या तरुणांना पोटापाण्याला लावले असते, तर महाराष्ट्राने ठाकरयांना दुवाच दिला असता. पण तसे झाले नाही. ठाकरयांनी बहुजन तरुणांच्या हातात दगड दिले. या तरुणांना एकत्र करून दंगलखोरांची एक फौज तयार केली. या फौजेच्या बळावर ठाकरयांनी महाराष्ट्रात पाच वर्षांची सत्ता उपभोगली. याच तरुणांच्या बळावर ठाकरे गेली ४० वर्षे महाराष्ट्रात दादागिरी करीत आहेत. शिवरायांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट मोगलांविरुद्ध लढत होता, तेव्हा ठाकरयांचे पूर्वज कोठे होते? ते होते इंदुरात. इंदुरचा प्रदेश तेव्हा मोगली सत्तेखाली होता. याचाच अर्थ महाराष्ट्रातील तरुण शिवरायांच्या फौजेत रक्त सांडीत असताना ठाकरयांचे पूर्वज मोगलाईमध्ये सुखैनैव आयुष्य जगत होते. 
प्रबोधनकारांचे नाव घेऊन काय दगड मारायचे ते मार
अशा प्रकारे ठाकरे आणि शिवरायांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे ठाकरयांना जी काही  मुजोरी आणि मस्ती दाखवायची असेल ती आपला मूळ पुरुष प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या नाव घेऊन दाखवावी. त्यावर  कोणीही आक्षेप घेनार नाही. पण ही सगळी मस्ती ठाकरे महाराष्ट्राचा मूळ पुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने करीत आहेत . ही आक्षेपार्ह बाब आहे. ठाकरयांनी छत्रपतींचे नाव घेऊन उत्तर भारतीयांवर हल्ले केले. त्यात बदनामी केशव बळीराम ठाकरे यांची झाली नाही. बदनामी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची. महराजांचे नाव घेतल्यावर उत्तर भारतीयांना महाराजांचा कोणता इतिहास आठवेल? त्यांना कोणताही इतिहास आठवणार नाही. आठवेल फक्त +जय भवानी जय शिवाजी+चा नारा आणि या नारयाच्या गोंगाटात येणारे दगड!
चौथा ठाकरेही रिंगणात
थोडक्यात सांगायचे तर पोरे बहुजन आणि मराठ्यांची, दगड ठाकरयांचे आणि बदनामी शिवरायांची असे समीकरण ठाकरे त्रिकुटाने महाराष्ट्रात गेली ४० वर्षे राबविले आहे. हेच समीकरण राबविण्यासाठी आदित्य नावाचा नवा चौथा ठाकरेही आता मैदानात उतरविला आहे. 
बहुजन तरुणांनो महाराष्ट्रातील बहिणींची विनंती ऐका
बहुजनांनो, आता तरी ठाकरे त्रिकुटाचे राजकारण समजून घ्या. महाराष्ट्र आणि शिवरायांची बदनामी टाळा. ठाकर्यांचा नाद सोडा. ही महाराष्ट्राच्या तमाम बहिणींची आपल्या भावांना हात जोडून विनंती आहे.

अनिता पाटील, औरंगाबाद. 

10 comments:

 1. घाबरू नका ही सत्ता कधी ना कधी तरी संपुष्टात येईल. आणि नविन मानवतावादी पक्ष झळकेल.

  ReplyDelete
 2. घाबरू नका ही सत्ता कधी ना कधी तरी संपुष्टात येईल. आणि नविन मानवतावादी पक्ष झळकेल.

  ReplyDelete
 3. घाबरू नका ताई आता मराठी माणूस जागा झाला आहे आता नाही करणार ते ठाकऱ्यांची गुलामी....

  ReplyDelete
 4. चांगली माहिती !

  ReplyDelete
 5. घाबरू नका ताई आता मराठी माणूस जागा झाला आहे आता नाही करणार ते ठाकऱ्यांची गुलामी....

  ReplyDelete
 6. कोणीही ठाकरे आजपर्यंत निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत. एकमेव कारण म्हणजे संपत्ती डिक्लेअर करावी लागते. ठाकरे पोटापाण्याचा व्यवसाय कोणता करतात व घर कसे चालवतात हा प्रश्न आजपर्यंत कोणालाच कसा पडलेला नाही?

  ReplyDelete
 7. चुकीच आहे ते

  ReplyDelete
 8. ठाकरेंच्या नावाने ओरडणे सोपे आहे. त्यांनी कधीही जात-पात मानली नाही. तुमच्या भुजबळचे कोरडो रुपयांचे इंगित बाहेर आले त्यामुळेच उठलेला हा पोटशूळ आहे. सध्या तुरुंगाची हवा ही खरच कोणाची मेहेरबानी जरा शोध घेतला तर बरे होईल. बाळासाहेबांनी याच भुजबळाला मुंबईचा महापौर केला, आमदार केला, मंञी केला, पण यानेच घात केला. आज जी संपत्ती जमवली आहे ती जगजाहीर झाली आहे. कशी कमावली हे सत्यही बाहेर येत आहे. जरा अभ्यास आणि विचार करुन लिहील्यास जास्त प्रसिध्दी मिळेल. ठाकरेंच्या शिवसेनेत भुजबळ वाघ होते, आणि आता काय परिस्थिती ओढावली आहे हे आपण विविध वृत्त वाहिन्यावरुन पहातच आहोत. मलाही भुजबळांबद्दल अभिमान होता...आता काय त्यांनी बेहिशोबी संपत्ती जमविल्याबद्दल अभिमान बाळगायचा. किमान आपण कशाला पाठींबा देत आहोत यांचे तारतम्य बाळगावे हीच प्रामाणिक प्रार्थना.

  ReplyDelete
  Replies
  1. thakarenchi property kiti ahe ? ti tyani kashi milawali? tyancha vyavasay konta?

   Delete