Showing posts with label वाजपेयी. Show all posts
Showing posts with label वाजपेयी. Show all posts

Tuesday, 3 January 2012

असा ढोंगी माणूस १० हजार वर्षांत झाला नाही



जगातला आजपर्यंतचा सर्वांत ढोंगी आणि दांभिक राजकारणी कोण?  या प्रश्नाचे उत्तर नि:संशय अटलबिहारी वाजपेयी असे द्यावे लागेल. या पूर्वीच्या लेखांत मी वाजपेयी यांच्या ढोंगीपणाचे काही नमुने वाचकांच्या निदर्शनास आणून दिले होते. जसे. बहुमत नसताना राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तेचा दावा दाखल करणे. पंतप्रधान म्हणून शपथ घेणे. बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेचे अधिवेशन बोलावणे आणि बहुमताचा ठराव मतदानाला टाकण्याआधी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणे इ. इ. या 
नाटकीपणा हायलाईट
घटनेतील आणखी मर्म सांगते. आपल्याकडे बहुमत नाही, हे वाजपेयींनी शेवटच्या क्षणापर्यंत देशाला आणि लोकसभेला सांगितले नाही. हा संसदेचा घोर अवमान नव्हे का?  वाजपेयींनी लोकशाहीची थट्टा करण्याचे घोर पाप केले. वाजपेयींनी उभा केलेला हा तमाशा त्यावेळी टिव्ही वरून साèया देशाने पाहिला.  तथापि, त्यावेळच्या कोणत्याच प्रसार माध्यमाने यासाठी वाजपेयी यांना दोष दिला नाही. की त्यांच्या विरुद्ध एक ओळ लिहिली नाही. असाच प्रकार काँग्रेसने केला असता तर मीडियाने किती गहजब केला असता. बहुमताच्या ठरावाला उत्तर देताना वाजपेयींनी पॉज घेत घेत जे भाषण केले, त्याचे कौतुक करणारे मथळे दुसèया दिवशीच्या वृत्तपत्रांत झळकले. +कहॉ से शुरूवात करू? आरंभ से या अंत से? क्यूँ की समय की सुई फिर वही आके रूक गयी है...+ अशा प्रकारे नाटकी सुरूवात करून वाजपेयींनी लोकसभेत वेळ मारून नेली. मीडियाने या नाटकीपणाला हायलाईट करून वाजपेयींचे ढोंग लपवून ठेवले. आपल्या देशातील मीडिया नि:पक्ष नाही. ब्राह्मणी हीत जोपासणारा आहे, हे सिद्ध करायला यापेक्षा आणखी दुसरा कोणता पुरावा हवा?
वाईट पक्षात ढोंगी माणूस
वाजपेयींचे वर्णन करताना मीडिया +वाईट पक्षात चांगला माणूस+ असे विशेषण वापरतो. पण ते बिलकूल खरे नाही. अगदी साफ खोटे आहे. वाजपेयी यांचे योग्य वर्णन करायचे झाल्यास +वाईट पक्षात ढोंगी माणूस+ असे करावे लागेल. त्यांच्या ढोंगीपणाचे आणखी काही नमुने मी आज पेश करणार आहे.
अयोध्या प्रकरण
भाजपाचा कथिल पुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यासाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा वाजपेयी या आंदोलनापासून दूर राहिले. या आंदोलनाला वाजपेयींचा विरोध आहे, असा संदेश देशात जावा यासाठी हे नाटक करण्यात आले. या आंदालनाची परीणती अयोध्येतील मशिद पडण्यात झाली. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी यांनी अडवाणी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. बाबरी मशीदविराधी आंदोलनाला वाजपेयींचा खरेच विरोध होता, तर वाजपेयींनी या आंदोलनाला जाहीर विरोध करायला हवा होता. तसेच अडवाणींनासुद्धा जाहीर समज द्यायला हवी होती. पण तसे काहीही झाले नाही. उलट वाजपेयी हे अडवाणींच्या रथावर स्वार झाले. अयोध्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे वाजपेयी या देशाचे पंतप्रधानही बनले. 
लालू इज रिअल हिरो!
टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन
 वार्ताहर कृष्णकुमार सिंग 
अयोध्येकडे निघालेली लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविण्याचे धाडस तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दाखविले. अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये आली तोपर्यंत संपूर्ण देशातील वातावरण तापलेले होते. बिहारातही तीच स्थिती होती. अडवाणी समस्तीपूर येथील सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. संघोटे (संघोटे म्हणजे संघवाले. माझे स्नेही  रविन्द्र तहकिक यांनी या शब्दाची निर्मिती केली आहे. लंगोटे तसे संघोटे.) रस्त्यावर उतरून धिन्गाणा घालित होते. जळते टायर फेकत होते. अल्पसंख्याक समाजही विरोध करीत होता. वातावरण अत्यंत प्रक्षोभक बनले होते.  अशा स्थितीत लालूंनी अडवाणींच्या अटकेचे आदेश दिले. २३ ऑक्टोबर १९९० रोजी पहाटे कथिल पुरुषास अटक करण्यात आली तसेच ताबडतोब हेलिकॉप्टरद्वारे मासन जोरे येथे हलविण्यात आले. मासन जोरे शहर आता झारखंडमध्ये आहे. तेव्हा झारखंड राज्याची निर्मिती झालेली नव्हती. हा भाग बिहारातच होता. विशेष म्हणजे अडवाणी यांची रथयात्रा अडविण्यासाठी आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मोठी भूमिका बजावली होती. अडवाणी यांना अटक करण्यासाठी नितीशकुमार हे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिन्ग यांच्यावर सतत दबाव टाकीत होते. अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर चांगला प्रकाश टाकला आहे. (निवृत्त झालेले सिन्ग हे आता ब्लॉग लिहितात. त्याची लिंक अशी आहे :  http://kksingh1.blogspot.com/)
गुजरात दंगल
वाजपेयींचे मोठेपण सांगण्यासाठी मीडियावाले दुसरे उदाहरण गुजरात दंगलीचे देतात. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत ३ हजारांपेक्षाही जास्त मुस्लिमांना ठार मारण्यात आले. ही दंगल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच पुरस्कृत केली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी! जनाच्या लाजं काजं वाजपेयी यांनी गुजरातच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. ४ एप्रिल २००० रोजी त्यांनी अहमदाबादेतील शाह आलम भागातील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. या छावणीत दंगलीमुळे घरदार सोडावे लागलेल्या मुस्लिमांना ठेवण्यात आलेले होते. या छावणीला भेट दिली तेव्हा वाजपेयी म्हणाले : +माझी मान शरमेने खाली झुकली आहे. हजारो लोकांना आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले आहे. मी लवकरच काही मुस्लिम देशांचा दौरा करणार आहे. तेथे गेल्यानंतर मला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे मला माहीत नाही.+ 
वाजपेयींनी राजधर्माचे पालन केले का? 
याच दौèयात वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, +राजधर्म का पालन करो. राजा के लिए प्रजा-प्रजा मे कोई भेदभाव नही होना चाहीए.+ वाजपेयींचे हे वाक्य फारच गाजले. वाजपेयी कसे चांगले आहेत, हे सांगण्याची मीडियामध्ये जोरदार स्पर्धा लागली. पण प्रश्न असा आहे की, स्वत: वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन केले का? गुजरातमधील दंगलग्रस्त मुस्लिमांना न्याय दिला का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ठार मारण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल वाजपेयींना खरेच कळवळा होता, तर वाजपेयी यांनी सर्वप्रथम मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हाकलायला पाहिजे होते. इतकेच नव्हे, तर गुजरातेत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. पण यातले काहीही त्यांनी केले नाही. गुजराती मुस्लिमांना आजही न्याय मिळाला नाही. वाजपेयींनी ठरविले असते, तर मुस्लिमांना न्याय नक्की मिळाला असता. पण वाजपेयी नेहमीप्रमाणे ढोंगीपणाने वागले. नुसतेच बोलले. केले काही नाही. 
वाजपेयींना भाजपा का सोडला नाही?
वाजपेयींचा बाबरी मशीद पाडण्यास विरोध होता. वाजपेयींचा गुजरात दंगलीला विरोध होता, हे एक वेळ खरे मानून चालू या! हे खरे मानले, तर मग प्रश्न असा पडतो की, वाजपेयी आयुष्यभर भाजपात का राहिले? बाबरी मशीद पाडल्यामुळे देशाची मानसिक फाळणी झाली. दंगलींचा आगडोंब उसळला. दहशतवादाला वाढावा मिळाला. गुजरात दंगलींनी देशाच्या कपाळावर अमानुषतेचा कलंक लागला. या घटनांनी कोणताही सुहृदय माणूस हेलावून गेला असता. वाजपेयी हेलावले असते, तर त्यांनी त्याचक्षणी भाजपाला राम राम ठोकला असता. पण वाजपेयी बुडाला डिन्क लावल्याप्रमाणे खुर्चीला घट्ट चिकटून राहिले. 
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आपल्या परखडपणासाठी फारच प्रसिद्ध होते. वाजपेयी यांचा हा सर्व दांभिकपणा सुरू असताना अत्रे असते तर काय झाले असते? अत्रे म्हणाले असते : अरे हा कसला अटल बिहारी हा तर अट्टल ढोंगी आहे. याच्यासारखा ढोंगी माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील १० हजार वर्षांत होणार नाही.

अनिता  पाटील,  औरंगाबाद. 


.........................................................................................................
वाजपेयी यांनी आपली वक्तव्ये कशी फिरवली याचा तेहाकाने घेतलेला आढावा वाचा पुढील लिंकवर  :
http://www.tehelka.com/story_main4.asp?filename=op071004the_unbearable.asp

अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर टाकलेला प्रकाश वाचा खालील लिन्कवर :
http://kksingh1.blogspot.com/2011/10/down-memory-lane-advanis-rathyatra-o-f.html



Monday, 26 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-१
आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. ओजस्वी वक्ता, महान मुत्सद्दी, अजात शत्रू अशी बिरुदे वाजपेयी यांना मीडिया लावत असतो. पण खरोखरच तशी स्थिती आहे का? वाजपेयींनी तीन वेळा या देशाचे पंतप्रधानपद भूषविले. या तिन्ही कार्यकाळांचा हिशेब काढल्यानंतर हाती काय येते? अटलबिहारी वाजपेयी आगामी इतिहासात कशासाठी ओळखले जातील? पंतप्रधान म्हणून त्यांचे सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे योगदान कोणते? असे प्रश्न वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्ताने उभे राहतात. त्यांच्या कारकिर्दीचा शोध घेतल्यानंतर काही ठळक घटना हाती आल्या.

१. पोखरण-२.
२. कंदहार विमान अपहरण.
३. संसदेवरील अतिरेकी हल्ला.
४. कारगिल युद्ध.
५. शवपेटी घोटाळा
६. लाहोर बसयात्रा
७. आग्रा समीट इ. इ.

सत्तेचे लालची वाजपेयी !
लोकसभेतील एका चर्चेत वाजपेयी म्हणाले होते, +लोकतंत्र संख्या का खेल है.+ त्यांचे हे भाषण आज मीडियावाले दिवसभर वाजवित होते. वाजपेयी मे १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना आपल्या या वक्तव्याचा विसर पडला. ९६ च्या निवडणुकीत कोणताही पक्ष qकवा आघाडीला मतदारांनी बहुमत दिले नव्हते. वाजपेयींना सत्तेचा मोह आवरला नाही. स्वत:कडे बहुमताची संख्या नसताना वाजपेयींनी पंतप्रधानपदासाठी दावा दाखल केला. पंतप्रधानपदाची शपथही घेतली. पंतप्रधानपदाची शपथ घेतली की, बहुमतासाठी खासदार खरेदी करता येतील, असा भाजपाचा अंदाज होता. पण तो खोटा ठरला. एकही खासदार भाजपाच्या पैशांना हुंगायला तयार झाला नाही. त्यामुळे वाजपेयींची पंतप्रधानपदाची ही कारकीर्द १३ दिवसांत आटोपली. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या लोकसभा अधिवेशनात वाजपेयींनी कोलांटउडी मारली. बहुमतावरील चर्चेला उत्तर देत असतानाच वाजपेयींनी घोषणा केली : +अध्यक्ष महोदय मै इस्तिफा देने जा रहा हू.+ लोकशाहीचा एवढा तमाशा यापूर्वी कधीही झाला नव्हता. बहुमत नसताना लोकसभेला सामोरे जाणारा आणि ठराव अर्धवट सोडून राजीनामा देणारा पहिला पंतप्रधान होण्याचा अनोखा मान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाला.
मीडियाने तरीही केले कौतुक !
बहुमत नव्हते, तर सरकार स्थापन करण्याचा दावा केलाच कसा? हा प्रश्न तेव्हाच्या मीडियाने वाजपेयी आणि भाजपाला विचारायला हवा होता. परंतु ब्राह्मणांचे हीत जोपासणाèया मीडियाने उलट वाजपेयींचे कौतुकच केले. पहिला जुगार हरल्यानंतर वाजपेयी हे १९९८ ते ९९ आणि १९९९ ते २००४ असे दोन वेळा पंतप्रधान झाले. १९९८ मध्ये भाजपाने अनेक पक्षांना एकत्र करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची स्थापना केली होती. या आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनले. परंतु हे कडबोळे फार काळ टिकले नाही. ९८ हे वर्ष संपत असताना अद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सरकारचा पाqठबा काढला. लोकसभेत केवळ एका मताने सरकारचा पराभव झाला. वाजपेयींची ही कारकीर्द १३ महिन्यांत खतम झाली.
तीनदा संधी देऊन मतदारांनी नाकारले
१९१९ साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी भाजपाने लोकांच्या भावनेला हात घातला. वाजपेयी सरकार केवळ एका मताने पडले. या एका मतासाठी भाजपाला मतदान करा, असे भावनिक आवाहन भाजपाने केले. ही निवडणूक मुद्यांच्या आधारे झालीच नाही. भावनेच्या लाटेवर स्वार झालेल्या वाजपेयींच्या नावे लोकांनी एनडीएला बहुमत दिले. लोकसभेच्या ५४३ पैकी ३०३ जागा एनडीएने qजकल्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी एनडीएचे पूर्ण बहुमत घेऊन वाजपेयी तिसèयांदा पंतप्रधान झाले.  तिसèया टर्ममध्ये वाजपेयी सरकारने पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी सरकार ठरले. तथापि, या काळात वाजपेयी यांनी देशाची इतकी हानी करून ठेवली होती की, २००४ च्या निवडणुकीत मतदारांनी एनडीए सरकारला साफ नाकारले आणि पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली.

अनिता पाटील, औरंगाबाद. 

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !

भाग-२ 
पोखरण-२ : आयत्या बोगद्यावर
डोलला वाजपेयींचा नागोबा!
मे १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी वाजपेयींना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता. लोकशाहीचा हा संकेत आहे. तथापि, एक अत्यंत प्रामाणिक नेता म्हणून गौरविल्या गेलेल्या या नेत्याने लोकशाहीची फसवणूक केली. बहुमत सिद्ध करण्याआधीच धोरणात्मक निर्णय घेऊन पोखणमध्ये अणुबॉम्बचे चाचणी स्फोट केले. ११ मे रोजी वाजपेयी सरकारने ३ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. त्यानंतर तिसèयाच दिवशी १३ मे रोजी आणखी २ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. शक्ती या नावाने या चाचण्या ओळखल्या जातात. या अणुस्फोट चाचण्यांची शक्ती निर्माण करण्यात भाजपा आणि वाजपेयी यांचा काडीचाही वाटा नव्हता, हे येथे सर्वांत आधी लक्षात घेतले पाहिजे. १८ मे १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचा पहिली अणुस्फोट चाचणी घेऊन भारताला अण्वस्त्र सज्ज केले होते. या अणुस्फोट चाचण्यांचे कोडनाव होते +स्माईqलग बुद्धा+ इंदिरा गांधींनी भारताच्या अणुशक्तीचा बुद्ध हसवला. नंतर तो संशोधनाच्या रूपाने हसतच होता. नरqसह रावांच्या काळात दुसèया अणुस्फोट चाचण्यांची तयारी भारताने करून ठेवली होती. अगदी चाचण्यांचे बोगदे सुद्धा तयार होते. हे सगळे तयार साहित्य वाजपेयींनी वापरले आणि पोखरण-२ घडवून आणले. नवे बोगदे खोदण्याची तसदीही वाजपेयींना घ्यावी लागली नाही. मराठीत आयत्या बिळावरचे नागोबा अशी म्हण आहे. त्यानुषंगाने वाजपेयींना +आयत्या बोगद्यावरचे नागोबा+ म्हणायला हरकत नसावी. या चाचण्यांतून काहीही साध्य झाले नाही. उलट पाकिस्तानने तोडीस तोड उत्तर देऊन छगाई टेकड्यांच्या परीसरात अणुबाँम्ब फोडले. भारतावर आर्थिक निर्बंध लादले ते वेगळेच.
कारगिल युद्ध : वाजपेयी
झोपल्याचा पुरावा 
पोखरण-२ चा वापर करून वाजपेयी कसे निडर आहेत, असा प्रचार भाजपाने केला. त्यामुळे मतदारांनी एनडीएला पुन्हा संधी देऊन वाजपेयींना पंतप्रधान केले. वाजपेयींच्या निडरपणाचा फुगा मात्र कागगिल युद्धाने फोडला. वाजपेयी दुसèयांदा पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानने काश्मिरातील द्रास आणि कागगिल भागातील मोठ्या भूभागावर अतिक्रमण केले. कित्येक दिवस या अतिक्रमणाची कल्पनाच वाजपेयी सरकारला नव्हती. बटालिक आखनूरचा भाग पाकिस्तानने बळकावला. इतकेच नव्हे, तर सियाचेन ग्लॅसियरवर तोफमारा सुरू केला. एवढी मोठी कारवाई पाक लष्कराने केली. या काळात मुत्सद्दी वाजपेयी यांचे सरकार ढाराढूर झोपलेले होते. या संपूर्ण भूभागावर पाकिस्तानचे ४ हजार पेक्षाही जास्त सैनिक आणि निमलषकरी जवान घुसले होते. अतिरेकयांची संख्याही मोठी होती. पाकिस्तानने केलेले हे अतिक्रमण काढण्यासाठी भारतीय लष्कराला जून १९९९ मध्ये पाकसोबत युद्ध छेडावे लागले. त्यात ८०० जवान शहीद झाले. भारताच्या बहादूर जवानांनी पाक लष्कराला हुसकावून ७० टक्के भूभाग पुन्हा ताब्यात मिळविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना खरेदी करण्यात आलेल्या बोफोर्स तोफांच्या बळावर कारगिलमधील ७० टक्के भूभाग भारतीय लष्कराने मोकळा करून घेतला. बोफोर्स तोफा खरेदी केल्या तेव्हा याच वाजपेयींनी आणि त्यांच्यासोबतच्या विरोधकांनी ८० च्या दशकात काँग्रेसवर आरोपांची राळ उडवून दिली होती. या आरोपांच्या बळावरच व्हिपी qसगांचे सरकार पुढे आले. या सरकारात भाजपा सहभागी होता.
क्लिंटन मदतीला धावले 
म्हणून वाजपेयींचे धोतर वाचले
कारगिल युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे तत्कालिन पंतप्रधान बिल क्लिंटन यांना हस्तक्षेप करावा लागला. क्लिंटन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून घेऊन समज दिली. तेव्हा उरलेल्या भूभागावरून पाकिस्तानने माघार घेतली.  आणि वाजपेयी यांची उरली सुरली इज्जत वाचली. अन्यथा त्यांचे धोतर फिटायची वेळ आली होती.
जवानांच्या शवपेट्यात
पैसे खाणारे सरकार
कागगिल युद्धात लढणाèया शहिद जवानांसाठी वाजपेयी सरकारने शवपेट्या खरेदी केल्या. या खरेदीत मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले. वाजपेयी सरकारमधील संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस या घोटाळ्यातील प्रमूख आरोपी होते. शहीद जवानांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घोर पाप वाजपेयी सरकारच्या माथ्यावर आहे. ते कशानेही धुतले जाणार नाही.
कंदाहार विमान अपहरण
कारगिलमधील पाकिस्तानी घुसखोरीबद्दल भारतीय मतदारांनी वाजपेयी आणि एनडीएला माफ केले. सत्ता पुन्हा त्यांच्याच हातात दिली. यावेळी ३०३ खासदारांचे पूर्ण बहुमत त्यांच्या हाती मतदारांनी सोपविले होते. या बहुमताची वाजपेयींनी अक्षरश: माती केली.  ऑक्टोबर १९९९ मध्ये वाजपेयी पंतप्रधान बनले आणि दोनच महिन्यांनी डिसेंबरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी इंडियन एअर लाईन्सचे आयसी ८१४ हे विमान अपहरण करून कंदाहारला नेले. काठमांडूहून राजधानी दिल्लीला आलेले हे विमान अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारच्या नाकासमोरून कंदाहारला नेले. दिल्ली विमानतळावरून सरकारने विमानाला इंधनही दिले! अवघ्या पाच अतिरेक्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. अफगाणिस्तानातील कंदाहारला विमान नेऊन अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारला आपल्या तालावर थयथया नाचायला लावले. सरकारही नाचले. कुख्यात पाकिस्तानी अतिरेकी मौलाना मसूद अजहर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांची वाजपेयी सरकारला सुटका करावी लागली. सगळ्यांत मानहानीकारक बाब अशी की, वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे एक विशेष विमान घेऊन कंदाहारला गेले. या विमानात जसवंतqसग यांच्यासोबत मसूद अजहरसह चार अतिरेकी होते. या अतिरेक्यांची कंदाहार विमानतळावर सुटका करण्यात आल्यानंतर आयसी ८१४ हे विमान अतिरेक्यांनी सोडले. जसवंतqसग यांना अतिरेक्यांसोबत का पाठविण्यात आले, याचे स्पष्टिकरण वाजपेयी यांनी आजपर्यंत दिलेले नाही. एका सार्वभौम देशाचा मंत्री चार अतिरेक्यांना विशेष विमानात बसवून दुसèया देशात नेऊन सोडतो, असे दृश्य जगाने आधुनिक इतिहासात पहिल्यांदा पाहिले.
संसदेवरील हल्ला
२००१ मध्ये वाजपेयी सरकारने या देशाच्या सार्वभौमत्वाला काळिमा लावला. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी थेट भारतीय संसदेवरच हल्ला केला. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी प्राणांची आहुती देऊन अतिरेक्यांचा खात्मा केला. सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीमुळे हा देश वाचला. नाही तर अख्खे सरकारच अतिरेक्यांनी ठार केले असते. अतिरेकी संसदेत घुसेपर्यंत वाजपेयी सरकार काय करीत होते?
फसलेली बसयात्रा अन् आग्रा समीट
पाकिस्तान भारताच्या छातीत विश्वासघाताच्या कट्यारी खुपशित असताना वाजपेयी मात्र पाकिस्तानसोबत प्रेमालाप करण्यात मग्न होते. देशाचे काहीही होवो, स्वत:ची प्रतिमा शांतीदूत अशी राहावी, यासाठी हा सारा खटाखटाटोप वाजपेयींनी केला. परंतु त्यांनी हाती घेतलेले एकही मिशन यशस्वी होऊ शकले नाही. वाजपेयी शांततेची बस घेऊन पाकिस्तानला गेले. कारगिल युद्धानंतर पाकचे सर्वेसर्वा बनलेल्या जनरल परवेज मुशर्रफ यांना त्यांनी आग्रा शिखर परिषदेसाठी भारतात बोलावले. फेब्रुवारी १९९९ साली वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली. वाजपेयींचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. वाजपेयींनी पाकचा बसदौरा केल्यानंतर कारगिल युद्ध झाले. जनरल मुशर्रफ आग्रा समीट अर्धवट सोडून निघून गेले. दोन नेत्यांची शिखर परीषद अर्धवट राहण्याचा नवा इतिहास या निमित्ताने लिहिला गेला.

अनिता पाटील, औरंगाबाद.

Sunday, 25 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-३ 


काश्मीर प्रश्न सोडविण्याची
संधी दोन वेळा गमावली
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची संधी भारताकडे चालून आली होती. या दोन्ही संधी वाजपेयी यांनी गमावल्या. पाकिस्तानने कारगिलवर चाल केली, तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून काश्मीरचा भूभाग (१९८४ साली पाकने बळकावलेला) परत मिळविण्याची संधी आली होती. मात्र, नियंत्रण रेषा ओलांडण्याची हिम्मत वाजपेयी सरकारला झाली नाही. ५०० जवानांचा बळी देऊन हे युद्ध थांबविण्यात आले. दुसèयांदा अशी संधी आली ती संसद हल्ल्याच्या वेळी. संसदेवर हल्ला होताच वाजपेयी सरकारने पाकिस्तानात सेना घुसवायला हवी होती. मात्र, यावेळीही वाजपेयी सरकारने शेपूट घातले. वाजपेयी सरकारचा ढिसाळपणाही याला कारणीभूत झाल्याचे उघडकीस आले आहे. तात्काळ हल्ला करण्याची योजनाच सरकारला बनविता आली नाही. लढावू तुकड्या सीमेवर आणण्यास सरकारला एक महिना लागला. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय सजग झाला होता. तापलेले वातावरणही बरेचसे निवळले होते. इतके हलगर्जी सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नाही. कदाचित पुढेही होणार नाही. महिनाभरानंतर प्रमुख लढावू तुकड्या पंजाब, राजस्थान, गुजरात आणि काश्मीर सीमेवर आणण्यात आल्या. ५ लाखांपेक्षाही जास्त भारतीय जवान सीमेवर तैनात करण्यात आले. पुढे वाजपेयी सरकार घरी जाईपर्यंत यापैकी बरेचसे सैन्य सीमेवरच होते. ५ लाख सैन्य सीमेवर गोळा करूनही पाकच्या हद्दीत साधे एक पाऊल टाकण्याची हिम्मत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली नाही. आयते हाती आलेले अणुबॉम्ब पोखरणमध्ये फटाक्यांससारखे फोडणे वेगळे आणि प्रत्यक्ष युद्ध करणे वेगळे हे वाजपेयींना कारगिल युद्धाने दाखवून दिले. वाजपेयींनी हिम्मत दाखवली असती, तर कदाचित १९८४ साली गमावलेला काश्मीरचा भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात येऊ शकला असता. पण वाजपेयी कचरले.
ऐतिहासिक अपयश
१३ दिवस, १३ महिने आणि ५ वर्षे असा सरासरी ६ वर्षे आणि २ महिन्यांचा काळ अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदावर होते. या संपूर्ण कालावधीत इतिहासात देदिप्यमान ठरेल, असे कोणतेही काम वाजपेयींनी केले नाही. अपयशी ठरण्याचा सर्वांत मोठा जागतिक विक्रम मात्र त्यांनी केला. यापैकी अनेक इतिहास वाजपेयी सरकारने प्रथमच निर्माण केले आहेत. उदा. बहुमत नसताना पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचे धाडस जगात कोणत्याही राजकीय नेत्याने केले नव्हते. ते वाजपेयींनी केले, तसेच बहुमताच्या ठरावाला सामोरे जात असतानाच राजीनामा देण्याचा इतिहासही निर्माण केला. अतिरेक्यांना विमानात बसवून सुरक्षितरित्या सोडून देण्याचे काम जगात कोणत्याही सरकारच्या संरक्षणमंत्र्यांने केले नाही. ते काम वाजपेयी सरकारने केले. कोणत्याही देशाच्या संसदेवर हल्ला करण्याचे धाडस अतिरेक्यांनी जगात कोठेही दाखविलेले नव्हते. वाजपेयी सरकारच्या काळात ही कामगिरीही अतिरेक्यांनी यशस्वी करून दाखविली.  जगात कोणत्याही दोन देशांच्या शिखर परीषदेमधून नेता उठून गेल्याचा इतिहास सापडत नाही. आग्रा समीटच्या निमित्ताने वाजपेयी सरकारने हा इतिहास निर्माण केला. शहिद जवानांच्या शवपेट्यांत जगात कुठेही पेसे खाल्ले गेल्याचे उदाहरण नव्हते, ते वाजपेयी सरकारने निर्माण केले.
अटलबिहारी वाजपेयींच्या अपयशांवर लिहायचे ठरविले तर अनेक खंडांचे एखादे पुस्तक तयार होईल. तूर्त येथेच थांबते. वाढदिवसाची एवढी भेट त्यांना पुरेशी ठरावी.
जय हिंद. जय भारत.

अनिता पाटील, औरंगाबाद.