२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रचार प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा काल गोव्यात करण्यात आली. गोव्यातील बैठकीला लालकृष्ण अडवाणी अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत भाजपाने मोदींना प्रचार प्रमुख केले. त्यामुळे दुखावलेल्या अडवाणी यांनी आज १० जून २०१३ रोजी पक्षाच्या सर्व घटनात्मक पदांचा राजीनामा दिला. अडवाणी यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ qसग यांना खरमरीत राजीनामा पत्र लिहिले.
अडवाणी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्राचा मजकूर जसाच्या तसा-
प्रिय श्री राजनाथसिंहजी,
मला माझ्या संपूर्ण आयुष्यात जन संघ आणि भारतीय जनता पक्षासाठी काम केल्याचा सदैव अभिमान व असीम वैयक्तिक समाधान वाटते.
पक्षाच्या सध्याची कार्यपद्धती तथा पक्ष ज्या दिशेने जात आहे त्याच्याशी जुळवून घेणे मला काही काळापासून कठीण जात आहे. डॉ. मुखर्जी, दीन दयालजी, नानाजी आणि वाजपेयीजी यांनी निर्माण केलेला हाच तो आदर्शवादी पक्ष आहे असे आता मला वाटत नाही. हीच चिंता देशाला व देशातील जनतेला पडली आहे. आपले अनेक नेते सध्या केवळ वैयक्तिक ध्येयाच्या मागे आहेत.
म्हणून मी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती या तीन प्रमुख पदांचा राजीनामा द्यायचे ठरविले आहे. हे पत्र म्हणजे माझा राजीनामा म्हणून ग्राह्य धरावे.
आपला स्नेहांकित
एल. के. अडवाणी
लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याची फोटो प्रत. |