Showing posts with label बाळ गंगाधर टिळक. Show all posts
Showing posts with label बाळ गंगाधर टिळक. Show all posts

Tuesday, 17 September 2013

विकिपीडियावर टिळकांची पोलखोल

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य नसून भटमान्य होते, याची दखल विकिपीडियाने घेतली आहे. बाळ गंगाधर टिळक या नावाचे पान विकिपीडियावर असून त्यात टिळका चरित्रातील अनेक बहुतांश वादग्रस्त बाबींचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर टिळक चरित्रात घुसडविण्यात आलेल्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाशही या पानात दिसतो. 

विकिपीडियावरील पानाचा सारांश असा : 

लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि, नव्या संशोधना नुसार त्यांची हि उपाधी वादग्रस्त ठरली आहे. अनेक संशोधक त्यांना "भटमान्य" ही उपाधी लवतात. विशेषत: बहुजनवादी लोक भटमान्य ही उपाधी टिळकांना लावतात. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवित आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत.

Thursday, 1 August 2013

टिळकांचा खरा चेहरा


बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांनी अजीर्ण होईल इतपत लेखांचा भडिमार आज केला. कोणी टिळकांना तेल्या-तांबोळ्याचे पुढारी म्हटले. कोणी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. आणखी कोणी काय काय म्हटले. टिळकांना लावलेल्या या सा-या उपाध्या तद्दन झूठ आहेत. मराठी वृत्तपत्रे खोट्या गोष्टी चढवून बढवून सांगण्यात एकापेक्षा एक वरचढ आहेत, हेच यातून सिद्ध होते. बहुजनांची मोठी वृत्तपत्रे निर्माण होत नाही, तोपर्यंत हा खोटेपणा सुरूच राहील. 

टिळक हे कधीच बहुजनांचे नेते नव्हते. टिळकांचा खरा चेहरा कट्टर ब्राह्मणवादाचाच होता. टिळकांची खरी ओळख पटविणाèया काही लेखांच्या लिन्का खाली देत आहोत. चोखंदळ वाचकांनी हे लेख वाचून आपला आपण निर्णय करावा.



Sunday, 7 October 2012

भुईमुगाच्या शेंगा आणि रात्रभर सोडवलेल्या गणिताची खोटी गोष्ट

 - प्रा. रवींद्र तहकिक
--------------------------------------------------------------------------------------
 टिळक किती स्वाभिमानी होते आणि हा स्वाभिमान त्यांच्यात लहानपणा पासूनच
कसा रुजलेला होता हें पटवून देण्यासाठी कोणीतरी टिळकभक्ताने रचलेली भुईमुगाच्या
शेंगाची गोष्ट आपण थोडीजरी अक्कल आणि तर्क बुद्धी जागी ठेवून वाचली तरी ती
एक निव्वळ लोणकढी थाप आहे हें आपल्या लक्षात येयील.
  मुळात टिळकांच्या काळात आजच्या प्रमाणे शाळेत टिफिन घेऊन जाण्याची पद्धत
नव्हती. किंवा शाळेच्या बाहेर आजच्या प्रमाणे चणे-फुटाणे, पेरू, भुईमुगाच्या शेंगा ,
पाणीपुरी-चाट , इत्यादीच्या गाड्याही लागत नसायच्या . बरे काही मुलांनी दप्तराच्या
पिशवीत शेंगा लपवून आणल्या असे मानले तरी , त्या काळात इतकी कडक शिस्त
असे की पोरे वर्गात शेंगा खावूच शकत नाहीत .
   असे असताना समजा मुलांनी शेंगा खावून वर्गात टरफले  टाकली असतील आणि
मास्तरांनी त्याची शिक्षा म्हणून सर्वाना वर्ग साफ करायला सांगितला असेल तर
टिळकांनी ते काम करायला हवे होते ' ' मी शेंगा खाल्या नाहीत ,मी टरफले वेचणार नाही ' '
असे मास्तरला म्हणणे म्हणजे स्वाभिमान नव्हे तर उद्दाम पणा झाला. असे म्हणून
त्यांनी वर्गातल्या इतर मुलांना देखील गुरूंची आज्ञा भंग करण्यासाठी उधुक्त केले ,
दुसर्यांचा असा जाहीर पाणउतारा किंवा उपमर्द करण्यात टिळकांना मोठा आनंद
वाटत असे, हें त्यांच्या पुढील जीवनात देखील अनेकदा दिसून आले.

 रात्रभर सोडवलेले गणित

    टिळकांनी लहान पनी एकदा वडिलांनी सुपार्या विकायला पाठवले असताना
    २ आण्याचा हिशोब लागत नव्हता म्हणून रात्र भर जागून जेव्हा २ आण्याची
 खोट सापडली तेव्हाच अंथूरनाला पाठ टेकवली असा एक किस्सा सांगितला जातो
 हाच किस्सा थोडेफार तपशिलाचे फेरफार करून तेनालीरामा/ सावरकर /आर्या चाणक्य
रामदास / एकनाथ इत्यादी बाबतीत सांगितला जातो. मी तर एका पुस्तकात असा
किस्सा गोळवलकर गुरुजी संदर्भात देखील वाचला आहे
मुळात असे लहानपणीचे म्हणून सांगितले जाणारे मोठ्या माणसांचे किस्से
सत्यातेच्या बाबतीत विश्वासाहार्य नसतात .

Friday, 5 October 2012

टिळकांची दलित विरोधी पत्रकारिता

 प्रा.रवींद्र  तहकिक

केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक....या माणसाला नेमकी काय उपमा द्यावी ? सावरकराना प्र के अत्रे यांनी एकदा " काचेच्या कपाटातील सिंह " असे म्हटले होते स्वतः हस्तिदंती मनोर्यात सुरक्षित राहून समजा मध्ये असंतोष निर्माण होयील विशेषतः तरुणाची डोकी भडकतील अशी विधाने करणे, लिखाण करणे आणि त्यांना
भरीस पाडून त्यांच्या हातून विध्वंसक घटना घडवून आणणे ही एक विशेष पद्धत असते. टिळक , सावरकर आणि त्या नंतर बाळ ठाकरे ही या अशा समाजात असंतोषाचे विष पसरवणाऱ्या प्रवृत्तीची ठळक उदाहरणे.  हें स्वतः पुढे होऊन कधीच काही करत नाहीत. यांचा जो काही दम असतो तो सगळा तोंडात. त्या जोरावर हें आपल्या मनातील विध्वंसक प्रवृत्तीला वाट देतात. आपल्या या समाजविघातक विचारला राष्ट्रवादाचे/ धर्माभिमानाचे/ संस्कृती रक्षणाचे गोंडस नाव देतात आणि यावर घाला होत आहे अशी ओरड करीत आपल्या अतिरंजित व भडकाऊ भाषणे आणि लिखाणातून तरुण पिढीची दिशाभूल करून त्यांच्या हातून हत्या / जाळपोळ /दंगली इत्यादी विध्वंसक कृत्य घडवून आणतात भारताच्या राजकीय इतिहासातील या प्रवृत्तीचा जनक कोण असेल तर ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक !

रँडची हत्यापुण्यात प्लेग ची साथ थेमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती.
प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा

प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ?
रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की
     ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी
    फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत
    आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर
    सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी  आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा
    संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे
   बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची
   छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ?
   इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?

उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी
रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला
     आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे
     धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात
     हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या
     विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे

वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ?
प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना
आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या एवजी टिळकांनी
आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला
यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून
घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात  टिळकांचा
हातखंडा होता

     

वाचा पुढील लेख :
१ )  भुईमुग शेंगाच्या आणि  रात्र भर जागून सोडवलेल्या गणिताच्या खोट्या गोष्टी 
२ ) शिवजयंती सुरुवात निव्वळ थाप
३ ) आगरकराना वापरले आणि कोपर्यात फेकले
४ ) शाहू महाराजांच्या सुधारणा कामात खोडा

Wednesday, 3 October 2012

टिळकांच्या आवाजाचे 'भाग भांडवल'!

पोथ्या पुराणे पुरेनात आता इतिहासाची तोतयेगिरी !!

- प्रा.रवींद्र तहकिक
संपादक, अनिता पाटील विचार मंच

जवळपास पंधरवडा उलटला असेल.  महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु होण्यास थोडा अवकाश होता अशा वातावरणात अचानक एके दिवशी एका दूरदर्शन चॅनलवर '' ऐका बाळ गंगाधर टिळकांचा अस्सल आवाज'' अशी जाहिरात सुरु झाली. आम्हीहि उस्तुकतेपोटी संबधित चॅनलने प्रसारित केलेला तो भाग पहिला. त्यात टिळकांचा म्हणून ऐकविण्यात आलेला तो आवाज , त्यातील टिळकांचे वक्तव्य आणि २२ सप्टेंबर १९१५ रोजी झालेल्या संगीत मैफिलीचा संदर्भ हे सर्वच संशयास्पद होते. दुसरया दिवशी काही वर्तमानपत्रातूनही या संबंधात बातम्या छापून आल्या. मायबोली नावाच्या एका वेबसाईटवरही यासंबंधी माहिती आणि पुरावे सादर करण्यात आले (या लेखाची लिन्क अशी आहे : http://www.maayboli.com/node/38013) हे सर्व पहिल्या वाचल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

१) टिळकांचे म्हणून जे ७२ सेकंदांचे वक्तव्य ऐकविण्यात आले तो आवाज टिळकांचाच आहे याला पुरावा  काय?

२) संबधित वक्तव्य एकल्या-वाचल्यानंतर हे स्पष्ट होते कि या वक्तव्याला कोणताही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाही .कुण्या एका गाण्याच्या मैफलीत श्रोते गडबड करतात आणि तेथील कुणी एक व्यक्ती या लोकांना शांत राहण्यासाठी समज देतो हि घटना अतिशय सामन्यातील सामान्य असताना काहीतरी मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागल्या प्रमाणे या किरकोळ ध्वनिफितीचा एवढा गवगवा कशासाठी ? 

३) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात हा आवाज टेप झाला, असा दावा ब्राह्मण करीत आहेत. ब्राह्मण यासाठी म्हणायचे की, हा दावा करणारे आणि त्याला प्रसिद्धी देऊन डमके वाजविणारे सगळे ब्राह्मणच आहेत. हा आवाज १९१५ खरोखरच असेल, तर त्याला ९७ वर्षे झाली आहेत, असे म्हणावे लागते. सोपा प्रश्न असा आहे की, या संपूर्ण ९७ वर्षांच्या काळात एकदाही कधी टिळकांच्या कथित आवाजाबाबत कोणीही काहीच बोलले नाही. मग आता अचानक हा आवाज टिळकांचा आहे, याचा साक्षात्कार कसा झाला? हा आवाज टिळकांचाच आहे, यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा?

४) २२ सप्टेंबर १९१५ रोजी गायकवाड वाड्यात भास्करबुवा बखले यांचे गायन झाले होते. त्यावेळी टिळकांचा हा आवाज कराचीहून आलेल्या एका माणसाने टेप केला असा दावा संबंधित लोक करीत आहेत. कराचीसारख्या इतक्या दूरवरून केवळ टिळकांचा आवाज टेप करण्यासाठी कोणी येईल हे म्हणणेच मुर्खपणाचे नाही का? बरे संबंधित टेपवर काहीही उल्लेख नाही. तरीही हा आवाज टिळकांचाच आहे, असे हे लोक म्हणतात. याला काय म्हणावे? 

५) राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक १७ जून १९१४ गायकवाड वाड्यात आले. शिक्षा झाली तेव्हा टिळक ५२ वर्षांचे होते. मंडालेला ते ६ वर्षे राहिले. मंडालेहून परत आल्यानंतर एक वर्षाने गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम झाला, असे हे लोक म्हणताहेत. म्हणजेच तेव्हा त्यांचे वय ५९ ते ६० वर्षांचे असणार. मंडालेमध्ये टिळकांची तब्येत ढासळली होती. त्यांची पत्नी वारली होती. ते आजारी होते. इंग्रज सरकारने अनके अटी घालून टिळकांची मुदतीआधी सुटका केलेली होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात जवळपास नव्हतेच. खरे म्हणजे त्यांच्यात तेवढे त्राणही नव्हते. मग त्यांनी हा कार्यक्रम कसा ठरविला?

६) सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ही ध्वनी फित २२ सप्टेंबर १९९५ चीच आहे, हे ठरवायचे कशाच्या आधारे. कशालाच काही आधार नसताना, हा टिळकांचा आवाज आहे, असे हे लोक खोटेच सांगत आहेत. हा आवाज टिळकांचा नसून एका तोतयाचा आहे. टिळकांच्या नावे फसवणूक करणा-यांवर खरे तर कारवाई करायला हवी, पण आपला मीडिया त्यांचा उदो उदो करीत आहे. 

एक डाव भटाचा 
मुळात टिळकांच्या तथाकथित आवाजाच्या ध्वनिफितीचे हे कारस्थान मुकेश नारंग ( ज्याने हि ध्वनिफीत मुद्रित केली असा दावा करण्यात आला आहे त्या तत्कालीन काराचीस्थित सेठ लाखिमचंद इसरदास नारंगचा नातू ) माधव गोरे ( पुण्यातील एक संगणकीय ध्वनिमुद्रण क्षेत्रातील सोफ्टवेअर तज्ञ ) मंदार वैद्य ( दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा विक्रेता/ व्हेंडर ) , शैला दातार ( भास्कर बुआ बखालेची नातसून ) या सर्वांनी मिळून केले आहे. 

उंदराला मांजर साक्ष 
या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे बजावत संबंधित बनावट ध्वनिमुद्रिका खरी असल्याचा आभास निर्माण केला आहे . यातील प्रत्येकाने 'उंदराला मांजर साक्ष' या न्यायाने कराचीचा व्यापारी नारंग ; त्याची श्रीमंती ; त्याचे संगीतप्रेम ; २२ सप्टेंबरची मैफिल ; टिळकांची हजेरी ; बाखालेबुआंचे गायन आणि टिळकांनी श्रोत्यांना दिलेली तंबी या सर्व गोष्टींचा बादरायण संबंध जोडत ध्वनिफितीचा खरेपणा पटविण्याचा प्रयत्न केला आहे.  ही  ध्वनिफित म्हणजे चार भटांच्या चांडाळ चोकाडीने गोपाळ विनायक भोंडे नावाच्या एका नकलाकार तोतयाच्या टिळकाच्या आवाजातील साधर्म्याचा फायदा घेत केलेली सायबर गुन्हेगारी आहे. अर्थात हा गुन्हा फक्त पायरसी किंवा सायबर गुन्हेगारी पुरताच मर्यादित नसून खोटे एतेहासिक दस्तऐवज तयार करणे, त्याला ते खरे असल्याचे भासवून प्रसिध्धी देणे आणि त्या पासून आर्थिक किंवा तत्सम लाभ मिळवणे अशी त्याची व्याप्ती आहे.  हा गुन्हा दखलपात्र आहे. 

हे सर्व कशा साठी ?
शेवटी या मंडळीनी हा सर्व उपद्व्याप का आणि कशासाठी केला, हा प्रश्न उरतोच! त्याचे सरळ उत्तर असे कि अलीकडे पुण्यात आणि अगदी देश-विदेशातही सर्वाना असे वाटू लागले आहे की,  पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली !!! नव्या पिढीतील लहान मुलांना तर गणेशोत्सवाचे उद्गाते टिळक होते हे सांगूनही आणि पुस्तकात वाचूनही खरे वाटेनासे झाले आहे. पूर्वी किमान पुण्यात का होयीना गणेश मंडळे टिळकांचे निदान नाव तरी घेत. आता कलमाडी हेच पुण्याचे टिळक असल्या सारखे वावरतात ( हा कलमाडी देखील पुण्यातल्या भटानीच मोठा केला ) हे असे चित्र पाहून पुण्यातल्या भटांची तंतरली आणि मग काहीतरी धमाकेदार करून टिळकांचे नाव आणि त्यांचा गणेशोत्सवाशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित करण्याच्या नादात या मंडळीनी हि आवाजाची तोतयेगिरी केली .

Sunday, 27 May 2012

लोकमान्य नव्हे भटमान्य!



बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य' ही पदवी कोणी दिली याला तसे महत्त्व नाही, कारण खरा मुद्दा असा आहे की, बाळ गंगाधर टिळक लोकमान्य या पदवीच्या कसोटीला उतरतात का? लोकमान्य नेता कोण, हे ठरविण्यासाठी साध्या ३ कसोट्या लावता येऊ शकतील.

१. सर्व जातींचे आणि धर्माचे लोक ज्याचे अनुयायी आहेत, असा नेता. 
२. लोकमान्य म्हणजे सर्व लोकांची मान्यता असलेला नेता.
३. सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांचा विचार करून आपला आचार ठरविणारा नेता. 

टिळकांचे अनुयायी कोण होते? 

‘मॅन नोन बाय द कंपनी ही कीपस्' अशी एक म्हण इंग्रजीत आहे. या म्हणीचा अर्थ असा की, माणूस हा त्याच्या आजूबाजूला कोण वावरते, यावरून ओळखला जातो. बाळ गंगाधर टिळक यांच्या आजूबाजूला कोण होते? टिळक नेते म्हणून वावरत असताना दुसèया फळीतील नेतेमंडळी कोण होती? ही पाहा त्यांची नावे : नरसिंह  चिंतामन केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, दाजीसाहेब खरे,  गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, बापूजी अणे. टिळकांच्या दुसऱ्या फळीतील ही सारी नेतेमंडळी ब्राह्मण होती. इतकेच नव्हे, तर यातील बहुतांश मंडळी ही टिळकांच्या चित्पावन या पोटजातीतील होती. भा. द. खेर  यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या ३०० पानांच्या पुस्तकात या लोकांव्यतिरिक्त एकही नाव येत नाही. यापैकी केळकर आणि खाडीलकर ही मंडळी टिळकांच्या दृष्टीने घरचीच होती. केळकर हे ‘मराठा' दैनिकाचे संपादक होते. तर खाडिलकर केसरीचे सहसंपादक होते. गंगाधर देशपांडे हे कर्नाटकातील होते. त्यांना कर्नाटक सिंह  अशी उपाधी लावली जात असे. दादासाहेब खापर्डे अमरावतीचे, डॉ. मुंजे नागपूरचे, तर बापूजी अणे यवतमाळचे होते. आळेकर हेही विदर्भातलेच होते.१

टिळकांना बहुजन समाजाची मान्यता होती का?

‘तेल्या तांबोळ्याचे पुढारी' असे संबोधन वापरून टिळकांना बहुजन समाजाचे मोठे पाठबळ होते, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य दिसत नाही. आपण चित्पावन ब्राह्मण आहोत, या वास्तवाची तसेच त्यातून आलेल्या मर्यादांची जाणीव खुद्द टिळकांनाही होती. हे त्यांच्या अनेक भाषणांवरून दिसून येते. टिळकांनी स्वदेशीचे आंदोलन पुकारले आणि प्रमुख शहरांत दौरे काढले. मुंबई दौरयावर असताना १५ डिसेंबर १९०७ रोजी चिंचपोकळी येथे मजुरांसमोर टिळकांचे भाषण झाले. त्यात टिळक म्हणाले, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. स्वदेशी हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ  माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही.''२

हे भाषण मजूरांसमोरचे आहे, म्हणून महत्वाचे आहे. टिळकांच्या आंदोलनाबाबत सर्वसामान्य समाजात ‘भटांचे ढोंग' अशी त्याकाळी भावना होती, हे खुद्द टिळकांच्या वक्तव्यातूनच दिसते. तरीही त्यांना ‘तेल्या तांबोळ्या'चे पुढारी ठरविण्याचा अट्टाहास केला जातो. 

टिळकांच्या राजकीय कारकीर्दीत स्वदेशी आंदोलन सर्वाधिक महत्वाचे होते. त्याचा लोकांवर किती परिणाम झाला, हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल. या आंदोलनाच्या देशव्यापी परिणामाचे फारसे पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात, ते दुर्दैवाने ब्राह्मण समाजाशीच संबंधित आहेत. भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या पुस्तकातील एक उल्लेख पाहा : फाळणी : १९०६ मध्ये टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशी आणि बहिष्कार या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी व्याख्यान दौरे केले. टिळकांची वर्षभर अविश्रांत परीश्रम घेतले. ‘परदेशी साखर खाणे पाप आहे असे टिळकांनी पटवून दिल्याने बहुसंख्य ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले. इतकेच नव्हे तर हे पापकर्म करण्यापासून इतरांना वाचविले.

टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतरांनी सोडले होते का? हा खरा प्रश्न आहे. तसे काही दिसून येत नाही.

टिळकांचे वैयक्तिक आचार-विचार

आता सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. बाळ गंगाधर टिळक यांचे वैयक्ति-आचार विचार लोकनेत्याला साजेशे होते का? या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने नकारार्थीच येते. २३ जुलै १९०८ रोजी रात्री १० वा. न्या. दावर यांनी टिळकांना ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. टिळकांची रवानी मंडालेला करण्यात आली. तुरुंगात ब्राह्मणेतरांनी बनविलेला स्वयंपाक खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत असावी, असे दिसते. आपण ब्राह्मण असल्यामुळे तुरुंगवासाच्या काळात आपल्याला ब्राह्मण आचारी मिळावा, अशी मागणी टिळकांनी इंग्रज सरकारकडे केली. ती सरकारने मान्य केली. पहिली काही वर्षे टिळकांना गुजरातेतील एक ब्राह्मण कैदी आचारी म्हणून देण्यात आला. त्याची शिक्षा संपल्यानंतर पुण्यातला व्ही. आर. कुलकर्णी नावाचा दुसरा ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून मिळाला. त्याची शिक्षा संपल्यानंतर उत्तर भारतातील एक ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून देण्यात आला. हे तिन्ही आचारी टिळकांसोबत त्यांच्याच कोठडीत राहत होते. 

ही माहिती ऐकिव नाही. स्वत: टिळकांनीच ती सांगितली आहे. मंडालेतील शिक्षा भोगून टिळक १६ जून १९१४ च्या मध्यरात्री पुण्यातील आपल्या घरी गायकवाडवाड्यात परतले. त्यानंतर लगेचच २३  जून १९१४ रोजी त्यांनी ‘केसरीङ्कला एक मुलाखत दिली. या मुलाखतीतील टिळकांनी पुढील माहिती दिली : 

...माझ्या करिता स्वयंपाक करण्यासाठी एका गुजराथी ब्राह्मण कैद्याची योजना केली होती.४

...माझ्याबरोबर गेलेल्या गुजराथी ब्राह्मण कैद्याची शिक्षेची मुदत संपल्यामुळे एक महिन्याने तो परत गेला आणि त्याच्या जागी येरवड्याच्या तुरुंगातून कुलकर्णी नावाचा ब्राह्मण कैदी आला. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु त्याला दोन वर्षांची माफी मिळाली व माझ्या सुटकेपूर्वी त्याची घरी रवानगी करण्यात आली. नंतर उत्तर हिंदुस्थानातून एक ब्राह्मण कैदी आला व माझ्या मुदतीत तो माझ्याजवळ राहिला.५ 

आपण उभयता ब्राह्मण आहोत!

बाळ गंगाधर टिळक यांचा आचारी व्ही. आर. कुलकर्णी याने मंडालेच्या तुरुंगातील काही आठवणीची टिपणे लिहिली आहेत. त्यात एके ठिकाणी कुलकर्णी म्हणतो : ‘एके दिवशी टिळक मला म्हणाले, येथे मला पुष्कळ वेळ मिळतो. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नसे. मी एक गोष्ट सांगतो. आपण उभयता ब्राह्मण आहोत. गायत्रीचा जप केल्यावाचून आणि सूर्याला अर्घ्य दिल्यावाचून आपण जेवता कामा नये. तेव्हापासून आम्ही हा नियम सतत पाळला.'६

अशा प्रकारे बाळ गंगाधर टिळक हे शेवटी ब्राह्मणच उरतात. लोकांच्या दृष्टीने तर ते ब्राह्मण होतेच. परंतु स्वत:लाही त्यांना आपले ब्राह्मण असणेच महत्त्वाचे वाटत असते. 

ब्रिटिशांना टिळकांबद्दल काय वाटत होते?

जाता जाता टिळकांबद्दलचे इंग्रजांचे काय मत होते, याकडेही एक नजर टाकूया. टिळकांनी आपल्या माथेफिरू अनुयायांच्या मदतीने काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात हाणामा-या घडवून आणल्या. या प्रकाराबाबत लंडन टाईम्सने पुढील टिप्पणी केली होती : ‘टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत. राजकीय तत्त्वज्ञान असे त्यांच्याजवळ मुळीच नाही. परंतु त्यांचे हेतू केवळ विध्वंसक स्वरूपाचे आहेत. जर काँग्रेसचा कब्जा आपणास मिळणार नसेल, तर ती मोडून टाकण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. आणि तात्पुर्ता का होईना त्यांचा तो हेतू तडीस गेला आहे.'७ 

लंडन टाईम्सला टिळकांचे ब्राह्मण असणे अधोरेखित करणे महत्त्वाचे वाटते. तसेच टिळकांकडे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही, हेही लंडन टाईम्स नमूद करतो.  परकीयांचे वृत्तपत्र म्हणून लंडन टाईम्सच्या या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्यात वस्तुस्थितीचे दर्शन घडते.

उपसंहार

वरील विवेचनातून पुढील ठोस सत्य हाती येते.

  •  टिळकांचे सर्व लेफ्टनंट ब्राह्मण विशेत: चित्पावन ब्राह्मण होते.
  • बाळ गंगाधर टिळक यांच्या आंदोलनाकडे बहुजन समाज ‘भटांचे ढोंग' म्हणून पाहत होता. स्वत: टिळकच हे नमूद करतात.
  • टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतर समाजावर त्याचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. 
  • तुरुंगात असतानाही बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण आचारी मिळावा म्हणून हट्ट धरतात. आणि तो पूर्णही करून घेतात. ब्राह्मणेतर समाजाच्या हातचे खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत होती. 
  • आपण उभयता ब्राह्मण आहोत आणि म्हणून आपण गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय जेऊ नये, असा उपदेश टिळक आपल्या आचा-याला करतात. आणि आमलात आणतात. 
  • टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत, असे विश्लेषण लंडन टाईम्स करतो. टिळक हे भारतातील सर्व समाजाचे नेते आहेत, असे लंडन टाईम्स म्हणत नाही. 


निष्कर्ष

केवळ ब्राह्मणांसाठीच आपली ध्येय धोरणे राबविणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वत: टिळकांनाही आपण ब्राह्मण आहोत, हेच अधिक महत्त्वाचे वाटते. अतएव, बाळ गंगाधर टिळक यांना ब्राह्मणमान्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. स्वत: टिळकांनाही तेच अपेक्षित होते. 

अनिता पाटील 

...............................................................................................................................
संदर्भ : 

१. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. 
या पुस्तकातील काही उल्लेख पुढील प्रमाणे :

अ) २० जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय लॉर्ड कर्झनने घोषित केला. त्याविरुद्ध टिळकांनी केसरीत लेखमाला लिहून रान माजविण्याचा प्रयत्न केला. बंगालची फाळणी रद्द करावी, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकावा आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची स्थापना करून स्वदेशी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी त्रिसूत्री टिळकांनी जाहीर केली. (पान ८५)
ब) टिळकांना एकेक समर्थ अनुयायी मिळत होते. ‘मराठा'चे संपादक तात्यासाहेब केळकर, ‘केसरी'चे सहसंपादक कृष्णाजीपंत प्रभाकर खाडिलकर, कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे, टिळकांचे परममित्र अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे, यवतमाळचे बापूजी अणे या अनुयायांनी आपल्या नेत्याचा संदेश देशाच्या कानाकोप-यांत पोहोचविला. (पान ८७)
क ) टिळकांनी परिस्थितीचा सांगोपांग विचार करून १९०७ सालचा आपला कार्यक्रम आखला. न. चि. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे आदि कार्यकर्ते टिळकांचा संदेश देशाच्या कानाकोपèयात पोहोचविण्यास सिद्ध होतेच. (पान १०४).

२.  भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ११६).
३. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ९९)
४. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १६९)
५. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७०)
६. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७४).
७. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.)

लवकरच वाचा ‘टिळक-रहस्य'!


अनिता पाटील घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाची चिकित्सा करणारी लेखमाला.



1. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य होते की ब्राह्मणमान्य?
2. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांसाठी स्वयंपाक कोण करीत असे? त्यांना पुण्याहून तूप कोण पाठवित असे? मंडालेहून सुटल्यावर टिळकांनी इंग्रज सरकारच्या अटी मान्य करून शरणागती का पत्करली?
3. मंडालेच्या कारागृहात टिळकांनी हालअपेष्टा भोगल्या की त्यांना विशेष वागणूक देण्यात आली?
4. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा अग्रलेख टिळकांनी का लिहिला?
5. वेगवेगळ्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी टिळकांनी किती अर्ज विनंत्या केल्या?
6. बाळ गंगाधर टिळक हे खरेच भारतीय असंतोषाचे जनक होते का?
7. ताई महाराज यांची संपत्ती बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून टिळकांना शिक्षा का झाली?
8. ना. गोखले आणि फिरोज शहा मेथा यांच्या विरुद्ध टिळकांनी कशी कटकारस्थाने केली? काँग्रेस नेत्यांशी पटत नसतानाही  स्वतंत्र पक्ष काढण्याऐवजी टिळक लोचटांसारखे काँग्रेस नेत्यांसोबतच का राहिले?
9. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी ब्राह्मणांचे प्रतिनिधी असल्यासारखी भूमिका का घेतली?

या आणि अशा असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत वाचायला मिळतील. लेखमालेवर लक्ष ठेवा...