Tuesday, 17 September 2013

विकिपीडियावर टिळकांची पोलखोल

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य नसून भटमान्य होते, याची दखल विकिपीडियाने घेतली आहे. बाळ गंगाधर टिळक या नावाचे पान विकिपीडियावर असून त्यात टिळका चरित्रातील अनेक बहुतांश वादग्रस्त बाबींचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर टिळक चरित्रात घुसडविण्यात आलेल्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाशही या पानात दिसतो. 

विकिपीडियावरील पानाचा सारांश असा : 

लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि, नव्या संशोधना नुसार त्यांची हि उपाधी वादग्रस्त ठरली आहे. अनेक संशोधक त्यांना "भटमान्य" ही उपाधी लवतात. विशेषत: बहुजनवादी लोक भटमान्य ही उपाधी टिळकांना लावतात. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवित आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत.

2 comments:

  1. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    ReplyDelete