Tuesday, 10 December 2013

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणी निर्माण केला?

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


१८६९साली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व 
शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे 
जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली.
शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात सुरु
झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या
समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.
शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्या पेशवाईचे समर्थन व ब्राह्मणांचे जेष्ठ
पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात
शिवजयंतीबाबद संभ्रम निर्माण करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण आहेत. पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती
निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल.
खèया शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त निर्माण होतील, हे रोखण्यासाठी
ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.

हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक,
ग.ह.खरे, द.वा. पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार, ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली. वादग्रस्त
बाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणे
शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली. ज्या
कामाला २ वर्ष लागतात तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता. या
समितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.

१९ फेब्रुवारी  ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत
साळगांवकर यांनी तिथिप्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात
जाहीराती दिल्या. या पाठीमागे साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका
होती. साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी पुरंदरे, बेडेकर, मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ
साळगांवकरांना पत्र दिली. शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात
घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून टिळक, साळगांवकर इ.ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी आहेत हे
सिद्ध होते. साळगांवकर, पुरंदरे, बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह
धरला. शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणेणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेलेलेला नसूनून पुरुरंददरे, बेडेडेकेकर आणि साळगांववकर यांननी निर्माण केलेला. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.
यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले. ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला
विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय?

तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण
देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात.
तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,
शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला
समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना
आहे. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन
समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा डाव आहे. इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे
ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर
जानेवारी ऐवजी चैत्र महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडर मध्ये तारखेचे आकडे मोठे व
तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज
शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात.

ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार
चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. तिथी प्रमाणे वाद
कायम राहतो. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत qकवा
प्राथमिक शाळा देखील चालत नाही. शिवाजीराजे तर विेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत
अडकविण्याइतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी
साळगांवकरांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला. तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की
भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी
भटजी तिथीचा आग्रह धरतात.

तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे
शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला. शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी
एक महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? तो समाज जागा असल्यामुळे
ब्राह्मण हे धाडस करत नाहीत. ब्राह्मणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह
धरावा, काय होते ते पाहा.

मित्रहो, एका ठिकाणी शिवचरित्राव व्याख्यानासाठी गेलो असताना तारीख-तिथीच्या वादावरुन
दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत  प्रचंड वादावादी चालू होती हा प्रसंग पाहून खूप वाईट वाटले. शिवचरित्रावर
विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते. यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा
आहे. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्तांना शिवजयंतीच्या तारीख तिथीच्या वादाचे मुळ जेव्हा समजले
तेंव्हा सर्व मतभेद विसरुन सर्वांनी १९ फेबु्रवारीला शिवजयंती जोरदार साजरी केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
 1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
 2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
 3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
 4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
 5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
 6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

4 comments:

 1. आपले लेख छान आणि प्रेरणादायी आहेत. ते बहूजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने वाचले पाहिजे.

  आपला
  आनंद मालेवार भंडारा

  ReplyDelete
 2. आपले लेख छान आणि प्रेरणादायी आहेत. ते बहूजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने वाचले पाहिजे.

  आपला आनंद मालेवार भंडारा

  ReplyDelete
 3. shivaji maharajanche he satya charitra tumhi lavkarat lavkar saglya samaja pudhe aanle pahije !

  ReplyDelete

 4. शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? hye Book Kuthe Milel....Plz Help me...

  ReplyDelete