Thursday, 19 December 2013

लेखकाचे मनोगत


शिवाजीराजे हे विश्ववंद्य राजे आहेत. राजांचे कर्तृत्व हे सुवर्णाक्षरांनी घराघरात कोरुन ठेवावे
असे आहे. राजांनी फक्त ५० वर्षाच्या आयुष्यात अशक्य कार्य शक्य करुन दाखविले. समाजव्यवस्थेत
आमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी राजांनी निर्भिडपणे झुंज दिली. यासाठी राजांना हातात शस्त्र धरावे
लागले. पण राजांनी शस्त्राचे युद्ध कमीतकमी केले. चातुर्याचा वापर करुन राजांनी परचक्र निर्दाळले.
याप्रसंगी त्यांना खुप विरोध झाला. ज्यांना विरोध होत नाही ते परिवर्तन करु शकत नसतात. प्रसंगी
राजांवर प्राणघातक हल्ले झाले, नाउमेद करण्याचा प्रयत्न झाला. पण राजांनी या सर्व संकटावर मात
केली. अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्धीजौहर, दिलेरखान, औरंगजेब या शत्रूंना शिवरायांनी पराभूत
केले. कारण ते उघड शत्रू होते.  उघड शत्रूविरुद्ध लढणे फार सोपे असते. त्यांच्याविरुद्ध डावपेच आखता
येतात. पण गुप्तशत्रूविरुद्ध डावपेच आखता येत नाहीत. त्यामुळे उघड शत्रूपेक्षा गुप्त शत्रू फार
खतरनाक असतो. औरंगजेब ते अफजलखान हे राजांचे उघड शत्रू होते. ते राजांचे कट्टर विरोधक होते.
याबाबत दुमत नाही. पण राजांच्या आश्रयाला राहणारे मित्रत्वाचे सोंग करणारे आणि संकटसमयी
शिवरायांना ठार मारण्यासाठी उघड शत्रुंच्या कळपात सहभागी होणारे राजांचे खरे शत्रू आहेत. पण
पक्षपाती इतिहास लेखकांनी या शत्रूचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळलेला आहे. समकालीन कागदपत्र,
वस्तुनिष्ठ पुरावे असतानादेखील राजांच्या शत्रूंचे उदात्तीकरण करण्याचे पातक काही शिवशाहिरांनी आणि
कादंबरीकारांनी केलेली आहे. परंतू इतिहासात कविकल्पना, रंजकता, व्यक्तिगतमत, लालित्य, व्देष,
पुर्वग्रहदूषितवृत्ती या बाबींना अजिबात स्थान नसते.

शिवाजी राजांच्या इतिहासाचे तटस्थपणे आणि पारदर्शक वृत्तीने लेखन केले तर शिवाजी
राजांचे खरे शत्रू दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रायबाघीण देशमुख, मुरगुडनांदगांव येथील जोशी,
मोरोपंत पिंगळे, आण्णाजी दत्तो, उमाजी पंडित, राहुजी सोमनाथ, गागाभट्ट, हणूमंते, रामदास इ. आहेत.
वरील सर्वांनी राजांना कसा व किती त्रास दिला. स्वराज्यनिर्मितीच्या कामात कसे अडथळे आणले.
प्रसंगी राजांच्या अंगावर वार केले. अखेर शिवरायांचा खून देखील राहुजी सोमनाथाने कसा केला. हे
आपणाला प्रस्तुत पुस्तकात वाचण्यास मिळेलच परंतु आपणाला काही बाबी अप्रिय वाटतील आणि
खटकतीलसुद्धा. पण मित्रहो एक खोटे हजारो वेळा सांगितलं की खरे वाटत असते, आणि एक खरे
सुरुवातीला सांगितले की खटकत असते. पण हे खरे सांगण्याचे धाडस आणि आणि ऐकून, वाचून,
समजून घेण्याचे धाडस आत्ता आपण करावे, ही नम्र विनंती करतो. काही बाबी खटकल्या तर विचार
नावाची खूप मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. किमान आपण विचार तरी करावा. प्रस्तुत पुस्तकातील
एकही शब्द निराधार लिहिलेला नाही, प्रत्येक ठिकाणी संदंर्भ दिलेला आहेच. तसेच पाठीमागे संदर्भ
सूची देखील दिलेली आहे. घडलेल्या घटनेमागे तार्किक, मानसशास्त्रीय, तात्विक आधार आहे.
राजांचे शत्रू त्यांच्या खुनाबरोबर संपले नाहीत, त्यांची संख्या पुढे झपाट्याने वाढली.

भुमिपूत्रांचे स्वराज्य गिळंकृत करणा-या पेशव्यांनी राजांनी स्वकर्तृत्वावर सुरु केलेला शिवशक बंद केला.
टिळकांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. अत्रे, सावरकर, पुरंदरे, बेडेकर,
फडके यांनी शिवरायांना बदनाम केले. या उलट  विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
शिवाजीराजांचे चिकित्सक लेखन केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली. कर्मवीर
भाऊराव पाटील यांनी आजन्म महाराजांचा जयजयकार करत भूमिपुत्रांना शिक्षण दिले. साहित्यरत्न थोर
समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच शिवाजीमहाराज रशियाला समजले. डॉ.पंजाबराव
देशमुख, प्रबोधनकार केशव ठाकरे, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग
हे शिवाजी राजांचे निस्सीम भक्त होते.  यासाठी अनेक वस्तुनिष्ठ संदर्भ प्रस्तुत पुस्तकात आहेत. या
लेखनामागे जातीयव्देष किंवा व्यक्तीदोष नसून फक्त सत्यसंशोधन आहे. सत्यलेखन, सत्यभाषा म्हणजे लेखन होय. लेखन, म्हणजे शिव्या नव्हेत.

भारतीय समाजावर हजारो वर्षापासून कथा, कादंबरी, चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे
ख-या इतिहासापासून समाज वंचित राहिला.
वास्तव इतिहास संशोधनास व लेखनात आलिकडे महाराष्ट्रात मोठी क्रांती झालेली आहे.
इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख हे ख-या इतिहासाचे जनक आहेत. गतवर्षी "विश्ववंद्य राजा शिवाजी"
या माझ्या पुस्तक प्रकाशनाने मला अधिक लेखनासाठी महाराष्ट्रातील वाचकांनी प्रेरित केले. महाराष्ट्रातून
प्रतिक्रियात्मक हजारो पत्रे मला मिळाली. त्या पुस्तकानंतर "शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
पुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. माझे मित्र प्रवीण गायकवाड व शांताराम कुंजीर
यांच्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या हाती देता आले. प्रस्तुत पुस्तक हे अभिरुचिपेक्षा देशाच्या
आवश्यकतेसेसेसाठी आहे. कारण खरा इतिहास समजल्याशिवाय खरा इतिहास घडत नसतो. देशातील
दंगली, जातीयता, अंधश्रद्धा संपावी यासाठीच हे पुस्तक आपल्या हाती देत आहे. या पुस्तकाचे आपण
एकाग्रतेने वाचन करावे व इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावे ही विनंती. आपल्या अभिप्रायाची प्रतिक्षा!


श्रीमंत कोकाटे

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 

भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment