Sunday, 15 December 2013

शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


विश्ववंद्य शिवरायांच्या खुनानंतर छ. संभाजीराजे, राजाराम, ताराबाई आणि शाहुराजांनी
भूमिपुत्रांच्या स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन केले. १७१३ साली शाहुराजांनी कान्होजी आंग्रे मोहिमेवर
बाळाजी विश्वनाथ भट याला जाण्यास सांगितले. पण त्याने मला सर्वाधिकार दिल्याशिवाय मी
मोहिमेवर जाणार नाही असे बाळाजी भट शाहूराजांना उर्मटपणे म्हणाला. शाहूराजांना अडचणीत पकडून
बाळाजी भटाने पेशवेपद घेतले. आणि अशा प्रकारे शिवाजीमहाराजांनी कष्टाने उभारलेले गरिबांचे
स्वराज्य रक्तपिपासू, अत्याचारी, जातीयवादी, देशद्रोही आणि शिवाजीद्रोही पेशव्यांच्या हातात गेले.
पेशव्यांच्या हातात सत्ता येताच पेशव्यांनी शिवरायांनी राज्याभिषेकापासून सुरु केलेला शिवशक बंद
केला. त्याऐवजी पेशव्यांनी मोगल बादशहाचा फसलीशक सुरु केल. इतकेच नव्हे तर पेशव्यांनी  शिवाजीराजांच्या सर्व पाऊलखुणा नष्ट करण्यास आरंभ केला. शिवाजीराजांचे संपूर्ण कार्य पुसण्याचा सपाटा पेशव्यांनी सुरु केला. वर्णभेद व जातीभेदाची पेशव्यांनी पुर्नस्थापना केली. टोकाचा धर्ममार्तंडपणा
सुरु झाला. शिवशिक बंद करुन मोगल बादशहाचा फसलीशक सुरु करण्यातून शिवाजीराजांबद्दल पेशव्यांना असणारी घृणा स्पष्ट जाणवते. भारतासह सर्व जगातील मुसलमानांना खुष करण्यासाठी पेशव्यांनी
स्वराज्यावर नांगर फिरवला. जिजाऊमाँसाहेबांनी बांधलेला भव्य-दिव्य लालमहाल पाडून त्या ठिकाणी
शनिवारवाडा बांधला.

शिवशक बंद करुन फसलीशक सुरु करण्यामागे पेशव्यांचा एक डाव होता. मुसलमानांचे राज्य संपुर्ण भारतात येईल, असे त्यांना वाटत होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा वरदहस्त आपणावर कायमचा रहावा यासाठी
पेशव्यांनी फसलीशक सुरु केला. परंतु इंग्रजांनी आघाडी मारली आणि संपूर्ण भारत इंग्रजांनी जिंकला. इंग्रजांनी पेशव्यांना देखील पराभूत केले. पेशव्यांचा फसलीशक सुरु करण्यामागचा डाव फसला.
त्यानंतर ब्राह्मणांनी इंग्रज वापरत असलेले ग्रिगेरियन कॅलेंडर (जानेवारी ते डिसेंबर) स्विकारले.  इंग्रजांची सत्ता भारतात आल्याबरोबर सर्व इंग्रजी भाषा, कॅलेंडर, शिक्षण, नोकरी व
इंग्रजांशी मैत्री ब्राह्मणांनी स्विकारली. म्हणजे धन, संपत्ती आणि सत्तेसाठी शिवाजीराजांच्या
स्वराज्याला पेशव्यांनी सुरुंग लावला. (समुद्र ओलांडणे पाप आहे, असे बिंबवणा-या ब्राह्मणांनीच
लंडन येथे जाऊन शिक्षण घेतले. बहुजनसमाजाला जगाचे ज्ञान होऊ नये यासाठीच ब्राह्मणांनीच सिंधूबंदी
सुरु केली होती. स्वेथासाठी ती त्यांनीच मोडली.

ब्राह्मणांचा इंग्रजांना खोटा विरॊध 
ब्राह्मण इंग्रजांना वरवर विरोध करीत होते. यापाठीमागे ब्राह्मणांचा स्वार्थ होता. सावरकरांचे शिक्षण लंडन येथे झाले. वासुदेव बळवंत फडके, मंगल पांडे हे देखील इंग्रजांकडे नोकरीला होते. ब्राह्मण स्वत:ची मुले इंग्रजी
शाळेत घालत; तरीही इंग्रजीला विरोध करत. बहुजनसमाज इंग्रजी भाषा शिकला तर त्यांची
मुले ब्राह्मण मुलांची स्पर्धक होतील म्हणून ब्राह्मण इंग्रजी भाषेला विरोध करत असत. आजही ते हेच करतात. ब्राह्मणांचे मराठी भाषेवरील प्रेमाचे फक्त ढोंग आहे. जगात स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकावी. कारण इंग्रजी जगातील सर्वात सोपी भाषा आहे. इंग्रजी ही ज्ञान, संपर्क, वैश्विक भाषा आहे.

पेशव्यांनी रायगडावरील दप्तरखाना जाळला, राणीवसा पाडला, राजदरबार तोडला, समाधी
उद्धस्त केली, राजांनी मुस्लिम सैनिकांसाठी बांधलेली मशिद पाडली, पण जगदिश्वराच्या मंदिराला हात
लावला नाही. म्हणूनच आज रायगडावरील मंदिर चांगले आहे पण राजदरबार नष्ट झालेला आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

2 comments:

  1. thank you for so much information

    ReplyDelete
  2. शिवाजी महाराज 1680 ला निवर्तले आणि 1689 पर्यंत संभाजी राजांनी स्वराज्य सांबाळले , हा 9 वर्षाचा काळ स्वराज्याला पडलेली काळरात्र होती , 1687 पर्यंत शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते होते तोपर्यंत राज्य कसे तरी सुरळीत होते , मात्र हंबीरराव पुरंदरच्या लढ्यात तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले अन त्यांनतर अवघ्या दीड वर्षात औरंगजेबाने स्वराज्याचा राजा पकडला किंवा धोक्याने गोड बोलून बंदी केला ,
    पण हा मोहरा जाताच मराठ्यांच्या असली रक्ताने एक 22 वर्षाच्या क्षत्रांनीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला माती चारली..

    छत्रपती महाराणी ताराबाईना मानाचा मुजरा

    ReplyDelete