Thursday, 12 December 2013

शिवाजी-व्यंकोजी यांच्यामध्ये भांडणे लावणारा हनुमंते

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


रघुनाथपंत हनुमंते हा एक भ्रष्टाचारी व चहाडखोर अधिकारी तंजावरला व्यंकोजीराजांच्या पदरी
होता. त्याने प्रशासनात केलेल्या गंभीर चुकांमुळे व्यंकोजीराजांनी त्याला बडतर्फ केले होते. तो
तामिळनाडुतून थेट रायगडावर आला. आणि व्यंकोजी राजाबाबत अनेक चहाड्या सांगू लागला. पण
राजे दूरदृष्टीचे आणि चाणाक्ष होते. राजांनी हनुमंतेचा डाव ओळखला. हनुमंतेला वाटले
व्यंकोजीराजे राजांचे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे राजे व्यंकोजीच्या विरोधात भूमिका घेतील. पण
राजांनी या सर्व ब्राह्मणांचे सर्व कावे ओळखलेले होते. राजांनी दक्षिण मोहिम काढली. ती व्यंकोजीवर
हल्ला करण्यासाठी नव्हे, तर दक्षिणात्य राज्यकर्त्यांची युती करावी आणि दिल्लीचे सिंहासन  जिंकणे  या
विशाल दृष्टीकोनातून काढली होती. रघुनाथ हनुमंते यांनी राजांचे व्यंकोजीशी भांडण लावून पोळी
भाजण्याचा प्रयत्न केला होता. पण राजांच्या दूरदृष्टीमुळे हनुमंतेला त्यात यश आले नाही.


ब्राह्मणांननी संभाजीराजांचची बदनामी सुरु केली
शिवाजीराजे दक्षिणेत गेल्यानंतर शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण
करण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक कटकारस्थाने रचली. या प्रसंगी संभाजीराजे शृंगारपुर येथे सासरवाडीला
होते. शिवरायांच्या खूनानंतरच संभाजीराजे रायगडावर गेले. पण मोरोपंत, अण्णाजी दत्तो यांनी
शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये फुट पडावी, यासाठी संभाजीराजे रयतेला करात सवलत
देतात, संभाजीराजे व्यसनी आहेत, ते व्यभिचारी आहेत अशा अफवा उठवायला सुरुवात केली.
संभाजीराजांची बदनामी करण्यासाठी उमाजी पंडित प्रचारकासारखा संपुर्ण महाराष्ट्रात फिरला.
शिवरायांच्या कानावर हा वृतांत जावा अशी व्यवस्था राजांच्या ब्राह्मण मंत्र्यांनी केली. संभाजी-शिवाजी
यांचा बेबनाव झाला की, या संघर्षाचा फायदा घ्यावा हा ब्राह्मणांचा डाव होता. ब्राह्मण थेट कधीच
लढत नाहीत ने नेहमी बहुजनात जीवघेणी भांडणे लावतात. तसा प्रयत्न त्यांनी राजांच्या घरातच सुरु
केला पण राजांनी ब्राह्मणांचा डाव ओळखला होता. कारण राजांचा संभाजीराजांच्या चांगुलपणावर
विश्वास होता. संभाजीराजांनी संपुर्ण आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. त्यांना सुपारीचे सुद्धा व्यसन नव्हते.
त्यांनी बुद्धभुषण, सातसतक, नायिकाभेद, नखशिख हे चार ग्रंथ लिहिले. ते कर्तव्यदक्ष होते म्हणूनच ते
लोकप्रिय होते. त्यांनी एकाही ब्राह्मणाला कधीही मुजरा केला नाही. म्हणूनच ब्राह्मण त्यांच्यावर
चिडलेले होते. ते संस्कृत शिकले, त्यांनी ग्रंथ लिहिले हा प्रस्थापित ब्राह्मणांवर त्या काळात मोठा हल्ला
होता. म्हणूनच ब्राह्मणांनी संभाजीराजांसारख्या धवल चरित्राच्या राजपुत्राची बदनामी करण्यास सुरुवात
केली. सोयराबाईला हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. राजारामला गादीवर बसविण्याचे आमिष
सोयराबाईला दाखविले. तिचे सावत्र मातृत्व जागे केले. पण सोयराबाईचे संभाजीराजांवर
राजारामाप्रमाणेच प्रेम होते. सईबाईच्या अकाली निधनानंतर सोयराबाइंनी संभाजीराजांना जीवापाड
जपले. जिजाऊमाँसाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संपुर्ण कुटुंब स्वराज्यप्राप्तीसाठी ध्येयवेडे झाले होते.
ध्येयवादी कुटुंबात क्षणभंगुर सुखासाठी कधीही गृहकलह नसतो. त्यामुळे सोयराबाई या निष्कलंक व
स्वराज्यनिष्ठ होत्या. म्हणूनच त्या शेवटपर्यंत ब्राह्मणांच्या सत्तांतराच्या कटात सहभागी झाल्या नाहीत.
त्या कटात सहभागी झाल्या असत्या तर सोयराबाइंचे सख्खे भाऊ हंबीरराव मोहिते यांनी
सोयराबाईची बाजू घेतली असती. पण हंबीरराव मोहिते मरेपर्यंत संभाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे होते.

स्फटिकासारख्या निर्मळ मनाची माता
सोयराबाइंचे संभाजीवर सुपूत्रांप्रमाणेच नितांत प्रेम होते. तर संभाजीराजांनी देखील
राजारामला सख्या भावाप्रमाणे व सोयराबाईला आईप्रमाणे सांभाळले होते. राजारामाचे तीन विवाह
संभाजीराजांनी करुन दिले. संभाजीराजे सोयराबाइंना "स्फटिकासारख्या निर्मळ मनाची माता" असे म्हणत.
याचा अर्थ संभाजीराजे आणि सोयराबाई यांचा कसलाही अंगर्तत कलह नव्हता. याउलट सोयराबाई,
राजाराम, शिवाजीराजे यांना त्रास देणा-या ब्राह्मणांनाच राजांनी ठार मारले. राजे निष्कलंक आणि
स्वराज्यनिष्ठ असतानादेखील राजांची सातत्याने बदनामी का करण्यात आली? कारण राजे व्यवस्थेच्या
बंधनात राहणारे नव्हते. ते स्वतंत्र विचारसरणीचे होते. परंपरेने गुलामगिरी सारखे सिंहासनावर आरुढ
होण्याची स्वार्थी वृत्ती राजांची नव्हती. त्यामुळे संभाजीराजांची उमेद नष्ट करण्यासाठी त्यांची बदनामी
करुन त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. ते चारित्र्यसंपन्न आणि स्वराज्यनिष्ट होते याबाबत दुमत
नाही. तरीदेखील संभाजीराजांची मोरोपंत, अण्णाजी दत्तो, प्रल्हादपंत, उमाजी पंडित इ. ब्राह्मणांनी
बदनामी का केली? कारण संभाजीराजांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला होता. त्यांनी
संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले होते, ४ ग्रंथ  लिहिले होते. म्हणजे संभाजीराजांनी साहित्य क्षेत्रातील
मक्तेदारीवर प्रहार केला. ब्राह्मण मंत्र्यांचे संभाजीराजांनी कधीही वर्चस्व स्विकारले नव्हते. गोर-गरीब
बहुजन जनतेला अनेक सवलती दिल्या. त्यांनी. ब्राह्मणांची अरेरावी नष्ट केली. त्यामुळेच
शिवाजीराजांच्या आश्रयाला असणा-या सर्व ब्राह्मणांनी संभाजीराजांची बदनामीला सुरुवात केली.
कर्तृत्वसंपन्न धाडसी, पराक्रमी, विव्दान बहुजनांना संपविण्यासाठी त्यांनी सर्व बाजूंनी बदनामी
करणे हे ब्राह्मणांचे विषारी हत्यार आहे. एखाद्या निष्कलंक विव्दान बहुजनांची बदनामी सुरु केली तर तो
वैफल्यग्रस्त होते. चिंताग्रस्त होतो. आपण चांगले असताना आपली बदनामी कशी? या विचाराने कर्ता
पुरुष वैफल्यग्रस्त होतो व त्याची हळूहळू उमेद संपते. राजांना नाउमेद करण्यासाठीच सर्व मंत्र्यांनी
त्यांची बदनामी सुरु केली होती. संभाजीराजांनी सोयराबाईला आदराने वागविले. तरीदेखील अशी
अफवा उठविली की, रायगडावर संभाजी आल्यावर त्यांनी सोयराबाईला चिणून मारले. पण सोयराबाई
त्यावेळेस जिवंत होत्या. त्यानंतर सव्वा वर्षाने म्हणजे २७ ऑक्टो.१६८१ला सोयराबार्इंचे निधन
रायगडावर झाले. त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते.

गोदावरी, कमळा, या स्त्रिया तर इतिहासात झाल्याच नाहीत
संभाजीराजांची ज्या स्त्रियांशी नावे जोडली जातात, त्या गोदावरी, कमळा, या स्त्रिया तर इतिहासात झाल्याच नाहीत. बखर, नाटक व कादंबरीकारांनी या स्त्रियांना जन्म दिला. राजांची अशाप्रकारे बदनामी करणारे हे शत्रू मोगलांपेक्षा कू्र आहेत.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment