Thursday, 12 December 2013

शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांना खूप त्रास दिला. गागाभट्टाला फितवले व राज्याभिषेकासाठी
अनेक अडचणी निर्माण केल्या. म्हणूनच मोरोपंतांचा उल्लेख अनेक ठिकाणी मयुरादी कुमंत्री करण्यात
आलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यात किल्ले बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा मोरोपंत आणि
निळोपंताने किल्ले बांधण्यास विरोध केला. राजे खूप पैसा खर्च करतात, असा अपप्रचार मोरोपंताने सुरु
केला. हे जेव्हा राजांना समजले तेव्हा राजांनी मोरोपंतांची चांगलीच खरडपट्टी काढली. राजे म्हणाले,
मला माहित आहे तुम्ही किती शहाणे आहात ते? मी किल्ले का बांधतो? जसा शेतकरी शेतात माळा
बांधून शेतीचे रक्षण करतो. नावाडी जसे खिळे मारुन नाव मजबूत करतो. त्याप्रमाणे किल्ले बांधून
भूमिपुत्रांचे स्वराज्य भक्कम करावयाचे आहे. आणि तुम्ही मला शहाणपणा शिकविता? असे राजे
मोरोपंताला म्हणताच मोरोपंत तोंड झाकून घरात निघून गेला. कारण त्याचा अपमान आजपर्यंत कोणीही
केला नव्हता. (संदर्भ- वा.सी. बेंद्रे लिखित छत्रपती संभाजी महाराज- पृष्ठ-८४)

शिवाजीराजांना राज्यभिषेकाच्या निमित्ताने ब्राह्मणांचा कू्रपणा प्रकर्षाने जाणवला. कितीही
प्रेमाने वागविले, जवळ केले, मदत केली तरी ब्राह्मण किती दगेखोर असतात. याचा प्रत्यक्ष अनुभव
राजांना आला. तेव्हा राजे ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, ‘‘ एवढी हरामखोरी तुम्ही कराल. ब्राह्मण म्हणून
कोणेण मुलुलाहिजा करु पाहतो? जे गनिमांचे, गनिम ते तसाच नतिजा पावणार!"  शिवरायांसारख्या
विश्ववंद्य राजाने देखील शेवटी ब्राह्मणांना हरामखोर म्हटले व ब्राह्मण म्हणून तुमची गय केली जाणार
नाही. असा इशारा दिला याचा अर्थ राजांना किती त्रास दिला असेल? राज्याभिषेकानंतर
शिवाजीराजांचे नेतृत्व निर्विवाद झाले. सर्वाना समान न्याय, हक्क प्रस्थापित झाले. ब्राह्मणांचे वर्चस्व
संपले. ग्रंथांचे राज्य संपले. कर्तबगार कुळवाडीभूषण शिवाजीराजांचे राज्य आले. त्यामुळे ब्राह्मणांचे
पित्त खवळले. राजांना ठार मारण्याचे प्रयत्न ब्राह्मणांनी सुरु केले. म्हणून ब्राह्मणांनी राजांच्या घरात
भांडणे लावण्यास सुरुवात केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

1 comment:

  1. दादाजी लोहकरे आणि दादाजी कोंडदेव याबद्दल सांगा

    ReplyDelete