Wednesday, 11 December 2013

राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा केलेला छळ

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


१६६८ पासून शिवाजीराजांनी रायगडावर राजधानी केली होती. रायगड हा अत्यंत कठीण व
सुरक्षित असा किल्ला आहे. कडे ताशीव व उंच आहेत. गडाची लांबी ४ कि. मी. व रुंद १ कि. मी.
आहे. गडाभोवती कठीण डोंगररांगा आहेत. कोणत्याही शत्रूला रायगड जिंकणे अशक्य आहे. असा
रायगड शिवरायांनी राजधानीसाठी निवडला. गडावरील बांधकाम शिवरायांनी स्वत: करुन घेतले.
स्वराज्यातील अनेक किल्ले शिवरायांनी स्वत: बांधले. शिवाजीराजे उत्तम स्थापत्यतज्ञ (इंजिनिअर)
होते. अशा रायगडावर राज्याभिषेक करण्याचा राजांनी निर्णय घेतला.

राज्याभिषेकदिन जसा जवळ येऊ लागला. तशी ब्राह्मणांची कटकारस्थाने सुरु झाली. पण राजमाता जिजाऊमाँसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. याप्रसंगी जिजाऊंचे वय ७६ वर्षाचे होते. या वयातही जिजाऊंचे धैर्य, करारीपणा तेजस्वी होता. राज्याभिषेकाला एकही पुरोहित मिळू द्यायचा नाही. असा चंग देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. याप्रसंगी कायस्थ प्रभू असणारे बाळाजी आवजी यांनी पुरोहिताचा शोध सुरु केला. ब्राह्मण-कायस्थांचे हाडवैर असल्यामुळे कायस्थ राजांच्या बाजुला होते. बाळाजी आवजीने महाराष्ट्रातील सर्व भटजींना पौरोहित्यासाठी विचारले, सर्वांनी शिवाजी शूद्र आहे. आम्ही येणार नाही असे
कळविले. तेंव्हा बाळाजी आवजीने गागाभट्टाला बोलाविण्यासाठी केशवभट, भालचंद्रभट आणि
सोमनाथ या तीन ब्राह्मणांना काशीला पाठविले. गागाभट्टाने या तिघांजवळ शिवाजी शूद्र असल्यामुळे
मी येणार नाही, असे स्पष्ट कळविले. (मित्रहो, ब्राह्मण आपल्या देशात येण्यापूर्वी कोणीही हलके नव्हते,
कोणीही सवर्ण नव्हते, सर्वजण समान होते. पण आपल्यावर राज्य करण्यासाठी ब्राह्मणांनी वर्ण, जाती
निर्माण केल्या व स्वत:कडे श्रेष्ठत्व घेतले. याचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मणांनी ग्रंथ लिहिले. त्यालाच
हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणतात. या ग्रंथांनीच शिवरायांना शूद्र ठरविले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे विदेशी
आर्यांचे वर्ण आहेत. मुळचे भारतीयांना आर्यांनी शूद्र घोषीत केले.)

केशवभट, भालचंद्रभट, सोमनाथभट आणि गागाभट या चार भटात गुप्त कट झाला
असल्यामुळे बाळाजी आवजीने आपल्या विश्वासातील कायस्थ असणा-या निळो येसाजीला पुन्हा
गागाभट्टाकडे पाठविले. याप्रसंगी शिवरायांचे मूळ घराणे उदयपूरचे असल्याची बनावट कागदपत्रे
बाळाजीने गागाभट्टाकडे पाठवली. शिवाजीराजांच्या भोसले घराण्याचा राजस्थानाशी कसलाही संबंध
नसून भोसले घराणे मुळचे महाराष्ट्रातील वेरुळचेच आहे. हे बाळाजीला आणि गागाभट्टाला चांगले
माहित होते. बाळाजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट सर्व ग्रंथ गुंडाळून रायगडाच्या
पायथ्याजवळील पाचाडात आला. ब्राह्मण हे ग्रंथांचे व देवांचे बाप (निर्माते) असल्यामुळे गागाभट्टाला
ग्रंथप्रामाण्यापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला.
गागाभट्ट पाचाडात आल्याबरोबर मोरोपंत पिंगळेने गागाभट्टाची भेट घेतली व
राज्याभिषेक झाला तर ब्राह्मणांचे वर्चस्व संपेल व शिवाजी श्रेष्ठ ठरेल, त्यामुळे राज्याभिषेक करु नये.
असा सल्ला गागाभट्टाला दिला. गागाभट्टाने लगेच सरड्यासारखा रंग बदलला. शिवरायांना
राज्यभिषेक करण्यास नकार दिला.

शिवाजीराजे शुद्र असल्यामुळे त्यांच्या ऐवजी बाळाजी आवजीला राज्याभिषेक करण्याचा
गागाभट्टाने निर्णय घेतला. म्हणजे राज्य निर्माण केले शिवरायांनी व निर्णय घेतो भटजी. कायस्थांची
राजांवर नितांत श्रद्धा असल्यामुळे शिवाजीराजे आणि कायस्थात फूट पाडण्यासाठी गागाभट्टाने हा डाव
टाकला. बहुजनांतील कर्तृत्त्वान नेतृत्त्व संपविण्यासाठी निष्क्रिय माणसाला नेते पद देणे व सूत्र हातात घेणे.
हा एक ब्राह्मणांचा नेहमीच डाव असतो. यासाठी गागाभट्टाने बाळाजी आवजीचे नांव पुढे केले. पण
मोरोपंत पिंगळेसह सर्व ब्राह्मणांचे आणि कायस्थ बाळाजी आवजीने हाडवैर असल्यामुळे बाळाजी
आवजीचेही नांव मागे पडले. राज्याभिषेकासाठी बाळाजीआवजीपेक्षा शिवाजीराजांकडूनच अधिक पैसा
मिळेल व बाळाजी आवजीला राज्याभिषेक केला तर शिवाजीराजे व सर्व प्रजा ब्राह्मणाला
कापल्याशिवाय राहणार नाहीत या भितीमुळे व पैशाच्या अभिलाषेने शिवरायांना राज्याभिषेक करण्याचे
निश्चित झाले. प्रथम बाळाजी आवजीला क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेणा-या
गागाभट्टाने कायस्थ कसे हलके आहेत हे सांगण्यासाठी गागाभट्टीय नांवाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे
मोरोपंत पिंगळेच्या तालावर नाचणारा गागाभट्ट पदोपदी पगडी फिरवून सरड्यासारखा रंग बदलत होता.
शिवरायांनी रक्ताचे पाणी करुन स्वराज्य निर्माण केले. पण राजे श्रेष्ठ का कनिष्ठ आहेत. हे
ठरविण्याचे काम ब्राह्मण करत होते. राज्याभिषेकाचा आनंददायी सोहळा पण ब्राह्मणांनी वाद उपस्थित
केल्यामुळे गडावर व स्वराज्यात अत्यंत चिंतेचे व तणावाचे वातावरण होते. ज्यांना आपण आपले
म्हणतो अशा भटांनी शिवरायांना प्रथमापासूनच विरोध केला होता. आता तर ते राजांच्या
राज्याभिषेकाच्या विरोधात एकजात सर्वजण उभे राहिले.

बाळाजी आवजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट राज्याभिषेक करण्यास तयार झाला.
आपल्याबरोबर अनेक भटांचा फायदा होईल अशी व्यवस्था गागाभट्टाने केली. राज्याभिषेकाचा दिवस
निश्चित झाला. शिवरायांचे सर्व बहुजन सहकारी राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. हिरोजी फर्जंद,
मदारी मेहत्तर, हंबिरराव मोहिते, नागोजी जेधे, येसाजी कंक इत्यादी सहकारी आलेल्या पाहुण्यांची
व्यवस्था करणे, साहित्य आणणे इ. कामे करु लागले. जिजाऊ स्वत:जातीने लक्ष देत होत्या.
शिवरायांनी जिजाऊंचे दर्शन घेतले. राज्याभिषेकासाठी सर्व ब्राह्मणांनी घातलेला घोळ व केलेला विरोध
यामुळे जिजाऊमाँसाहेब प्रचंड चिडलेला होत्या. धर्म- संस्कृतीच्या नांवाखाली भटांनी शिवरायांचा सुरु
केलेला छळ यामुळे बहुजन समाज अस्वस्थ झाला होता. स्वत:ची स्वतंत्र धर्मसंहिता नसल्यामुळे
वैदिकांच्या उर्फ ब्राह्मणांच्या म्हणजेच हिंदूच्या धर्मग्रंथावर राजांना अवलंबून रहावे लागले (म्हणूनच
आज शिवरायांच्या प्रेरणेतून शिवधर्मांची स्थापना झालेली आहे. १७व्या शतकात शिवधर्म असता तर
भटांचा विरोध करण्याचे कारणच नव्हते. (हिंदू) धर्म हा भटांचा असल्यामुळे राज्याभिषेक प्रसंगी
राजांचा छळ केला व अमाप पैसा लुटला.)

राज्याभिषेकप्रसंगी व्रात्यास्तोम करण्यासाठी गागाभट्टाने ७००० (सात हजार) होन घेतले. तर
इतर ब्राह्मण पुरोहितांसाठी १७००० होन घेतले. राजांच्या ५ जूनच्या स्नानाच्या वेळी उपस्थित
असणा-या प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन देण्यात आले. राज्याभिषेकाला ५०,००० (पन्नास हजार)
ब्राह्मण उपस्थित होते. असे सभासद लिहितो. म्हणजे फुकट अन्न व होन मिळणार म्हणून कोणतीही
प्रवासांची आधुनिक साधने नसताना देशातून पन्नास हजार ब्राह्मण रायगडासारख्या कठिण ठिकाणी
आले होते. शिवरायांची सुवर्णतुला करण्यात आली. राजांचे वजन १६० पौंड म्हणजे १७००० होन
झाले. ते होन, तूप, लोणी, साखर, फळे, सुपारी, रुपे, तांबे, लोखंड ब्राह्मणांनी घेतले. यासाठी अंदाजे
५०००० होन गेले.

७ जून राज्याभिषेकाच्या दुसèया दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला २ होन व ब्राह्मणस्त्री व ब्राह्मण
मुले यांना प्रत्येकी १ होन घेतला. (एक होन म्हणजे ३ रुपये) म्हणजे ज्यांनी शिवरायांच्या
राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांनीच स्वराज्याची लूट केली. राज्याभिषेकास एकूण ४ कोटी २६ लाख
रुपये खर्च झाला. शिवरायांच्या संपुर्ण आयुष्यात स्वराज्यनिर्माण करण्यासाठी जेवढा पैसा खर्च झाला
नाही. त्यापेक्षा अधिक पैसा ब्राह्मणांनी लुटला. शिवरायांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करुन कमावलेले
होन मनुवादी कावळ्यांनी धर्माच्या नावाखाली राजरोसपणे पळविले.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी डच, फे्रंच, पोर्तुगाल, इंग्रज, मोगल,
आदीलशहा, कुतूबशहा यांचे प्रतिनिधी मौल्यवान भेटवस्तू व नजराणे घेऊन आले होते. ज्या इंग्रजांच्या
साम्राज्यावरचा सुर्य कधीही मावळत नाही असे म्हटले जाते अशा इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑqक्झडेन
राज्याभिषेकाला शुभेच्छा देण्यासाठी उंचीवस्त्रे व अमुल्य भेटवस्तू घेऊन राजांपुढे नतमस्तक होऊन
आला. भेटवस्तू दिल्या व राजांना मुजरा करुन मागल्या पावलाने दरबारातून बाहेर पडला. राजांकडे
त्याने पाठ केली नाही. पण आपले म्हणून आपल्या कळपात घुसलेल्या ब्राह्मणांनी शिवरायांचा छळ
केला. शिवरायांनी हा विरोध मोडून राज्याभिषेक पार पडला. आपल्या आईला, सर्व महाराण्यांना,
गोर-गरीबांना राजांनी दरबाराता सन्मानाने बसविले. स्वराज्यात राज्याभिषेक सर्वांना पहाता यावा
यासाठी राजांनी संकल्पित वेळेला सर्व गडावर तोफांचा आवाज केला. हा आवाज रयतेच्या
कर्णपटलावर-मनपटलावर व नंतर नेत्रपटलावर उमटवला. कू्रर विरोधातून देखील राजांनी राजांनी
राज्याभिषेक केला व हातात न्यायदंड व राजदंड घेतला. प्रजेला खूप आनंद झाला. ब्राह्मणांचे धाबे
दणाणले.

शिवशक पुढे पेशव्यांनी बंद केला 
राज्याभिषेकापासून शिवरायांनी नवा शिवशक सुरु केला. सर्व कारभार शिवशकाप्रमाणे सुरु
झाला. (हा शिवशक पुढे पेशव्यांनी बंद केला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. शिवाजीपेक्षा
पेशव्यांचे मुस्लिमसंस्कृतीवर जास्त प्रेम होते. म्हणजे मुस्लिमांचा अनुनय व त्यांच्या दाढ्या
कुरवाळण्याचे काम ब्राह्मणांनी (पेशव्यांनी) केले. अशा पेशव्यांचा शनिवारवाडा महोत्सव साजरा करणे
म्हणजे देशद्रोह आहे कारण शनिवारवाडा हा भारतीयांच्या पराभवाचे व पेशव्यांच्या व्यभिचाराचे
प्रतिक आहे.)

गागाभट्टाचा शौचकूपात पडून मृत्यू 
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर गागाभट्टाचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत एका शौचकूपात
(संडासात) सापडले. तेंव्हा देशातील सर्व ब्राह्मणांनी प्रचर सुरु केला की, शिवाजीराजे शूद्र असतांना
देखील गागाभट्टाने राज्याभिषेक केला म्हणूनच गागाभट्टाचा शौचकूपात पडून मृत्यू झाला. शिवरायांकडून
मिळालेल्या पैशामुळे गागाभट्ट मातला व त्याने खाणे व दारु पिणे सुरु केले. नशेत तो मेला. तरी
देखील शिवरायांना कमी लेखण्यासाठी ब्राह्मणांनी वरील प्रचार सुरु केला.


शिवरायांचे मूळ : राजस्थान की महाराष्ट्र 
शिवाजी महाराजांचे पुर्वज राजस्थान मधील सिसोदिया वंशातील होते. असा गैरसमज
अनेक लोकांचा आहे. ज्यावेळेस राजांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी शूद्र म्हणून विरोध केला. तेव्हा
बाळाजी आवजी यांनी नकार देणा-या गागाभट्टाला निमंत्रित करण्यासाठी चातुर्य वापरले व खोटी
वंशावळ दिली. तेव्हा गागाभट्ट पैशाच्या अभिलाषेने राज्याभिषेकासाठी आला. म्हणजे
राज्याभिषेकाच्या पुर्ततेसाठी बाळाजी आवजी यांनी दिलेली विसंगत वंशावळ याला प्रमाणभूत मानून
शिवरायांना सिसोदिया वंशातील ठरविले. हे अनैतिहासिक आहे.
शिवाजीराजांचे पूर्वज महाराष्ट्रातीलच मूल निवासी आहेत. त्यांचा उदेपूरच्या घराण्याशी
कसलाही संबंध नाही. अशी वस्तुस्थिती असताना राजांना राजस्थानमधील ठरवायचे व महाराष्ट्रातच
त्यांना उपरे ठरवायचे हे ब्राह्मणी षडयंत्र आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

2 comments:

  1. मला वाटते आपण स्वतःला शुद्र अति शुद्र मानत असावे वरील इतिहास जरी खरा असला तरी आपण हिंदू धर्माचे कट्टर विरोधी दिसतात त्यात ब्राह्मणाचे विशेषता वर आपण हिंदू धर्माने शिवरायांचा केलेला छळ असे म्हणण्या पेक्षा ब्राह्मणाणे शिवरायांचा केलेला छळ केला असेही लिहू शकले असते पण तसे झाले नाही असे वक्तव्य हिंदू नसलेला व्यक्तीच करू शकतो

    ReplyDelete
  2. आपल्या लोकांनी पूर्वीपासून ब्रम्हणांवर जास्त विश्वास ठेवल्यामुळे ब्राम्हण पैसे लुटत होते त्यांचे मन आणि कट जाणण्याचा प्रयत्न कुणीदेखील केला नाही म्हणून इतिहासात त्यांनी वेळोवेळी धोखा दिला असे वाचण्यास मिळते आजही ते जनतेला लुटूनच राहिले

    ReplyDelete