Showing posts with label बाबासाहेब पुरंदरे. Show all posts
Showing posts with label बाबासाहेब पुरंदरे. Show all posts

Friday, 12 May 2017

शिवद्रोही पुरंदरेला विठ्ठलाने नाकारली भेट, महाद्वारातून जावे लागले परत

छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांची बदनामी करणार्या बाबा पुरंदरे याला ९ मे २०१७ रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे दर्शनाविनाच परतावे लागले. बाबा पुरंदरे विठुरायाच्या दर्शनासाठी ९ मे २०१७ रोजी दुपारी पंढरपूरला आला होता. मात्र मंदिर सुरक्षेला असलेल्या पोलिसांकडून त्यांना मंदिरात न सोडण्यात आल्याने पुरंदरेंला दर्शनाशिवाय परत फिरावे लागले. पोलिसांच्या रुपाने साक्षात विठ्ठलानेच पुरंदेला भेट नाकारली असल्याची प्रतिक्रिया पंढरपूरमध्ये उमटली आहे.

बाबा पुरंदरे येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्याच्यासोबत त्याला घ्यायला बाहेर आला. मात्र थेरड्या बाबाला वयोमानानुसार सारखीच धाप लागू लागल्याने त्याने जवळ असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी आणि पुरंदरे याच्या सोबत असलेल्या त्याच्या स्वीय सहाय्यकाने त्यापद्धतीने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र या दरवाजातून कोणालाही सोडता येणार नसल्याची ठाम भूमिका घेऊन पोलिसांनी पुरंदरेला दया दाखविण्यास नकार दिला. बाबा पुरंदरेला रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे अशक्य बनल्याने त्याने अखेर फार नखरे ना करता दर्शनाविनाच परत जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे बाबा पुरंदरे याने या प्रकरणी कोणाच्याही विरोधात तक्रार करण्याचे धाडसही दाखविले नाही. तो तोंड लपवीत आल्या पावली परत गेला. 

विठ्ठल मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांचे शिव प्रेमी नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे. पोलिसांच्या रुपाने साक्षात विठ्ठलानेच पुरंदेला भेट नाकारली असल्याची प्रतिक्रिया पंढरपूरमध्ये उमटली आहे.

Sunday, 25 November 2012

ब्राह्मणवादी इतिहासकारांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी बक्षिस लावले नाही!

जातीयवाद्यांनो बहुजन समाजाच्या सुसंस्कृतपणाला सलाम करा

बहुजन समाज अजूनही सुसंस्कृत आहे, म्हणून हा देश टिकलेला आहे. ज्या दिवशी बहुजन समाज सुसंस्कृतपणा सोडील त्या दिवशी हा देश कोलमडून पडेल. खासदार राम जेठमलानी यांनी रामाला ‘वाईट पतीङ्क म्हटल्यावर ब्राह्मणवादी गुरू आणि महंतांनी जो थयथयाट केला. त्याच्या बातम्या इंटरनेटवर वाचल्या तेव्हा माझ्या मनात बहुजन समाजाबद्दल अभिमान दाटून आला. जातीयदवादी ब्राह्मण दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून बहुजन समाजाची बदनामी करीत आहेत. पण असा थयथयाट बहुजन समाजातील कोणी अजून केला नाही.

सीतेचा कोणताही दोष नसताना रामाने सीतेचा त्याग केला. तिला सगळे आयुष्यच वनवासात काढावे लागले. आधी रामासोबतचा वनवास आणि नंतर रामानेच दिलेला वनवास. हा संदर्भ देऊन राम जेठमलानी यांनी रामाला वाईट पती म्हटले होते. आपल्या सिंधूताई सपकाळ यांनी सुद्धा रामाला देव मानण्यास नकार दिला आहे. अनेक भाषणांतून सिंधूताई आपली ही भावना व्यक्त करतात. जेठमलानी यांनी हीच भावना व्यक्त केली होती. पण ती ब्राह्मणवादी बाबांना पटली नाही. मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील एका आश्रमाचा महंत महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज याने जेठमलानी यांच्या तोंडावर  थुंकणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. त्या आधी एका ब्राह्मणवादी गटाने जेठमलानी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

ब्राह्मणवाद्यांची वरील बक्षिसे वाचून माझी खूप करमणूक झाली. माझ्या मनात प्रश्न आला, ब्राह्मणवाद्यांप्रमाणे बहुजन समाजानेही आपल्या महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात अशीच बक्षिसे ठेवली तर काय होईल? मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी महाराष्ट्रात शे-दोनशे वर्षांपासून सुरू आहे. ही बदनामी करणारे झाडून सारे इतिहासकार ब्राह्मण आहेत. पण त्यांची जीभ कापण्यासाठी किंवा  त्यांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी असे बक्षिस अजून ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराजांचे बदनामी केली. अरुण शौरी यांनी ‘वर्शिपिंग फाल्स गॉड' या पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी केली. पण बहुजन समाजातील कोणाही पैसेवाल्या व्यकतीने पुरंदरे किंवा शौरी यांची जिभ कापण्यासाठी किंवा तोंडावर थुंकण्यासाठी पाच-दहा लाखांचे बक्षिस ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे हे तर आजही महाराष्ट्रात शिवरायांचा बदनामीकारक इतिहास घेऊन सुखाने फिरत आहेत. शिवचरित्राचा वापर करून कोटीने पैसे कमावित आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की, बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य इतिहासकारांच्या विरोधात बक्षिसे जाहीर करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांकडे पैसे नाहीत. पैसे आहेत. पण बहुजन समाजातील लोकांकडे  पैशाबरोबर सुसंस्कृतपणाही आहे. त्यामुळे तोंडावर थुंकण्यासाठी किंवा जीभ कापण्यासाठी कोणी बक्षिसे जाहीर करीत नाहीत. हा सुसंस्कृतपणा संस्कारातून आला आहे. तो असाच कायम राहील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

पण जाता जाता एकच सांगावेसे वाटते की, बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी आता ब्राह्मणवादी इतिहासकारांनी थांबवावी. कारण सुसंस्कृतपणा, सभ्यपणा आणि सोशिकता यालाही शेवटी अंत असतोच. ही बदनामी पाहून एखाद्या, बहुजनाच्या संयमाचा कडेलोट झालाच आणि त्यातून कोणी असे बक्षिस जाहीर केलेच तर त्याचा दोष बदनामीचा इतिहास लिहिणा-या पुरंदरेंसारख्या इतिहासकारांकडेच जाईल.

--अनिता पाटील 
..........................................................
जेठमलानी यांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाची बातमी वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा : राम जेठमलानी यांच्यावर थुंकण्यासाठी ५ लाखांचे बक्षिस

Friday, 14 September 2012

बाबासाहेब पुरंदरे : शाहीर नव्हे सोंगाड्या !







शिवशाहीर अशी बिरुदावली मिरवणारा आणि शिवइतिहासाच्या नावाखाली  ब्राम्हणी इतिहासाची बेमालूम "बतावणी" करणारा एक बेमुर्रवत सोंगाड्या या महाराष्ट्रात राहतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महान आणि जेष्ठ अभ्यासक म्हणून मिरवतो. इतिहास संशोधनाच्या नावाखाली वाटेल त्या थापा मारतो. आणि वरतून " मी म्हणेल तोच खरा शिवाजीचा इतिहास अशी उर्मट मिजाशी दाखवतो....तरीही महाराष्ट्रातील कुणाही शिवप्रेमींनी त्याचे मुस्काट फोडून त्याला ताळ्यावरआणण्याचे धाडस दाखवले नाही हें आपली मनगटे मोडल्याचे आणि मन -मेंदू बधीर झाल्याचेच लक्षण म्हणावे लागेल. 

----------------------------------------------------
शाहीर कुणाला म्हणतात ?
----------------------------------------------------

शाहीर म्हणजे हातात डफ-तुणतुणे घेवून सळसळत्या उत्साहात जोशपूर्ण हालचाली करत आपल्या पहाडी आवाजात पोवाडे -कवने ( किंवा लावण्या ई .) गाणारा रचनाकार गीतकार,भाष्यकार ! निदान आम्हाला तरी "शाहीर "या शब्दाची हीच व्याख्या माहिती आहे . माननीय (?)बाबासाहेब पुरंदरे या व्याख्येत कुठेच बसत नाहीत .त्यांनी आजवर कुठलाही पोवाडा किंवा कवन रचलेले किंवा गायलेले नाही. त्यांना कुणीही हातात डफ तुणतुणे घेवून ते वाजवताना पाहिलेले नाही. होय , यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर काही पुस्तके जरूर लिहिली आहेत . जाणता राजा नावाचे एक सर्कसवजा यांत्रिक नाटक ठीकठिकाणी जाऊन सादर केले आहे. व शिवगान या नावाखाली व्याख्यानाचे प्रयोग केले आहेत. या आधारे त्यांना फारफारतर इतिहासकार ,व्याख्याता किंवा दयाबुद्धीने नाटककार म्हणता येयील. परंतु शाहीर आजीबात नाही, शिवशाहीर तर नाहीच नाही. कारण या भांडवलावर पुरंदरेना शिवशाहीर मानायचे झाल्यास नरहर कुरुंदकर, वि का राजवाडे , शिवाजीराव भोसले ,रणजीत देसाई ,वसंत कानेटकर यानाही शिवशाहीर म्हणावे लागेल. 
------------------------------------------------------------
इतिहासाची बेमालूम लपवा-छपवी 
--------------------------------------------------------------
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जी बेमालूम लपवा छपवी केली ती एखाद्या सोंगाड्याला देखील लाजविणारी आहे. स्वतःला इतिहासकार न म्हणता शाहीर म्हणवून घ्यायचे म्हणजे रम्यता-कल्पना आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली उलट -सुलट कशाही कोलांट उड्या मारायची मोकळीक मिळते. आणि हळूच जे लिहिले-सांगितले तो इतिहासच आहे अशी बतावणी ही करता येते. हें पुरावेच पहाना ; दादोजी कोंडो देव ( कुळकर्णी - आदिलशाहाचे ) हें शिवाजी महाराजांचे शस्रशिक्षण व राजव्यवहार शिकवणारे गुरु आणि रामदास हें शिवाजी महाराजांचे धर्म व नीती विषयक आध्यात्मिक गुरु होते ही या सोंगाड्याची सर्वात मोठी बतावणी ! ( पहा; " चित्रमय शिवइतिहास" लेखक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रकाशक ; राजहंस प्रकाशन प्रथम आवर्त्ती १९७२ / आता पर्यंत २२ आवृत्या प्रकाशित ) महाराष्ट्रातील किमान तीन -चार पिढ्यांच्या मनात आणि डोक्यात पुरंदरेनी हाच खोटा इतिहास जाणीवपूर्वक रुजवला. त्या साठी चौथीच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला. कारण त्या बालवयात एकदा शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी आणि रामदासांचे नाव बिंबवले गेले की ते शिलालेखासारखे कोरले जाणार. आणि आपोआपच शिवाजीला शूर - मुत्सद्दी - नीतिमान राजा म्हणून घडविण्याचे श्रेय दादोजी आणि रामदासला जाऊन शिवाजीचे स्वकर्तुत्व- आत्मप्रेरणा आणि जिजाऊचे ध्यासपर्व पडद्याआड राहणार ,,,त्याच साठी हा खटाटोप होता. परंतु सत्य कितीही दडपले तरी कधीनाकधी त्याला पाय फुटतातच. दादोजी आणि रामदासाच्या बाबतीत हेच झाले. गुरु म्हणून थाप पचल्या नंतर या सोंगाड्याने जेम्स लेन च्या माध्यमातून दादोजीला थेट शिवाजीमहाराजांचे बाप ठरवण्याची हरामखोरी केली. त्याचा कयास हा की ते इंग्रजी पुस्तक कोन मराठी मनुष्य वाचणार ? पुस्तक वाचले जाणार विदेशात आणि अभ्यासकात. त्यातून शिवाजी महाराजांच्या बदनामीचा कंडू शमविण्याचा तो डाव होता, परंतु डाव फसला. , या प्रकरणाला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची हालचाल सुरु झाली तेंव्हा कुठे पुरंदरे आणि त्यांच्या भांडारकर मधील चेल्या चपाट्यानी सार्वजनिक माफी मागितली. त्यातही गिरे तो भी टांग उप्पर म्हणतात तसे .जेम्स लेन ने वदंता म्हणून जे लिहिले ते खेदजनक आणि चूक असले तरी त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनातले दादोजी चे स्थान कमी होत नाही. पुढे मग याहीगोष्टीचा सोक्ष मोक्ष लागला. पुण्यात या विषयावर जाहीर परिसंवाद घेण्यात आला. पुरंदरे यांना तेथे त्यांची बाजू मांडण्या साठी निमंत्रितही करण्यात आले. परंतु पुरंदरे गेले नाहीत. पुढे लाल महालातील दादोजीचा पुतळा हटवण्या पूर्वी देखील पुरंदरेला सरकारने दादोजी गुरु असल्याचे पुरावे असतील तर दाखवा अशी संधी दिली होती. परंतु पुरंदरे पुरावे सादर करु शकले नाहीत ( ते त्यांच्या जवळ कधी नव्हतेच . या बाबत एका याचिका कर्त्याच्या केस मध्ये पुरंदरे नी न्यायालयात "दादोजी गुरु असावेत असे मी तर्काच्या आधारे लिहिले होते. त्याला एतेहासिक पुराव्याचा आधार नाही असे कबूलही केले ) 
------------------------------------------------------------------------
पुरंदरेची अशीही बनवा बनवी
------------------------------------------------------------------------
पुरंदरेची लेखणी काशी अफलातून बनवा बनवी करते याचे अनेक उदाहरणे देता येतील शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ( ज्यातील फक्त एक पद /सरसेनापती (सरनौबत ) मराठ्यांकडे आणि बाकीची सर्व पदे ब्राम्हण / प्रभू यांना असत ) पुरंदरे यांनी जेव्हा जेव्हा अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख केला तेंव्हा अष्टप्रधान मंडळातले ब्राम्हण कारभारी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ ...निष्ठा आणि कर्तुत्वाचे मूर्तिमंत पुतळे ! असाच केला. वास्तविक अष्टप्रधान मंडळातील आण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ ,मोरोपंत पिंगळे , बाळाजी आवजी व आवजी बाळाजी,सोनोपंत डबीर इत्यादी ब्राम्हण कारभारी शिवाजी महाराजांच्या काळात देखील प्रचंड भ्रष्टाचार आणि अपहार करीत असत. आण्णाजी दत्तो हा या भटगटाचा म्होरक्या होता. त्याच्याच स्वार्थी-लोभी आणि पाताळयांत्रि कारस्थाना मुळे शिवाजी -संभाजी पितापुत्रातील स्नेहाचे गैरसमजात रुपांतर झाले ,त्यानेच सोयराबाईच्या मनात सावत्र पानाचे विष कालवले.शिवाजी महाराजांवर , संभाजी महाराजावर विषप्रयोग करण्या पर्यंत , संभाजी महाराजांना अटक करून अकबराच्या ( औरंगजेबाचा पुत्र ) ताब्यात देण्या पर्यंत या आण्णाजी दत्तो आणि मंडळीची मजल गेली होती. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू ...ट्या नंतरचीगोपनीयता. संभाजी महाराजांना न कळवता गुपचूप अंत्यविधी उरकणे इत्यादी कटकारस्थाने देखील या मंडळी नी केली, अखेर संभाजी राजांनी या सर्वाना हत्तीच्या पायी ठेचून मारले. आण्णाजी दत्तो आणि कंपूच्या या राज्य बुडवेगिरीचा बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या अख्या हयातीत एकदाही उल्लेख केला नाही , उलट हा काळाकुट्ट सत्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला . 
--------------------------------------------------------------------------
अडचणीच्या संदर्भांची छाननी-गाळणी 
--------------------------------------------------------------------------
बाबासाहेब पुरंदरे स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणवतात तर त्यांनी सत्य इतिहासाचे कठोर विश्लेषण करायला हवे . परंतु त्यांचे लिखाण अडचणीचे (ब्राम्हणा साठी ) ठरणारे संदर्भ गाळून मांडलेली वजाबाकी असते . प्रतापगड प्रसंगातील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला होता त्यात महाराज जखमी देखील झाले होते आणि शिवाजी महाराजांनी तिथे अफजल खान प्रमाणे कृष्णाजी भास्कर ची सुध्धा खांडोळी केली होती. ही घटना पुरंदरे प्रतापगड प्रसंगातून बेमालूम पणे वगळतात.त्याने फक्त भेट ठरवण्याची बोलणी दूत म्हणून केली एवढाच संदर्भ पुरंदरे देतात. पुन्हा लिखाणात त्याचे आडनाव लपवून फक्त "कृष्णाजी भास्कर " एवढाच उल्लेख करतात .
------------------------------------------------------------------------------
पुरावे -दुवे नष्ट करण्याचे पातक 
--------------------------------------------------------------------
बाबसाहे पुरंदरे यांच्यावर एक आणखी गंभीर आरोप आहे तो म्हणजे महत्वाचे एतेहासिक कागदपत्रे -दस्तऐवज -पुरावे आणि दुवे नष्ट करण्याचा या संदर्भात त्यांच्यावर फलटण आणि सातारा संस्थानाने कोर्टात केसही दाखल केली होती. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून आभ्यास आणि संशोधनाच्या नावाखाली बरीच शिवकालीन कागदपत्रे ,वस्तू ,चोपड्या ,रुमाल वेळो वेळी जिथे मिळतील तेथून जमा केल्या. परंतु त्या संबधितांना कधीच परत केल्या नाहीत. अनेक कागदपत्रे -दस्तऐवज अतिशय दुष्ट पणे नष्ट केले आणि मागण्यास गेल्यास हरवले -गहाळ झाले. नाहीतरी ती काही कामाची नव्हती असे सांगून बोळवण केली. या " नष्टचर्यात" पुरंदरे यांनी बरीच एतेहासिक गुपिते लपवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही 
--------------------------------------------------------------------------------
जयंतीचा घोळ 
----------------------------------------------------------------------
शिवजयंती इंग्रजी तारखे नुसार ( ई स ) की तिथी नुसार साजरी करायची ? शिवजन्माची तारीख १९२७ की 1630, हा घोळ देखील पुरंदरे यांनीच मुद्दामहून घातला. त्या मुळेआजही या महापुरुषाच्या एका वर्षात दोनवेळा जयंत्या साजर्या होतात. आणि हा स्वतःला शिवभक्त संबोधणारा सोंगाड्या तरीही मुग गिळून बसतो. याला काय म्हणावे ? मुळात राज्य सरकार ने शिवजन्माचा हा पुरंदरे रचित घोळ मिटवण्य! साठी एक समिती नेमली होती. पुरंदरे यांनी या समितीचे सदस्य होणे मुद्दाम नाकारले. नंतर शासनाने १९ फेब्रुवारी तारीख जाहीर केल्यावर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुत जमवून आणि जयंत  साळगावकर प्रायोजक करून तिथीप्रमाणे चे शुक्लकाष्ठ काढले . या मागे मराठी कालगणनेचा आदर नव्हे तर कुत्सितपणा आहे हें कितीही लपवले तरी लपत नाही . 

-रवींद्र तहकिक 
संपादक, अनिता पाटील विचार मंच.