Sunday, 25 November 2012

ब्राह्मणवादी इतिहासकारांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी बक्षिस लावले नाही!

जातीयवाद्यांनो बहुजन समाजाच्या सुसंस्कृतपणाला सलाम करा

बहुजन समाज अजूनही सुसंस्कृत आहे, म्हणून हा देश टिकलेला आहे. ज्या दिवशी बहुजन समाज सुसंस्कृतपणा सोडील त्या दिवशी हा देश कोलमडून पडेल. खासदार राम जेठमलानी यांनी रामाला ‘वाईट पतीङ्क म्हटल्यावर ब्राह्मणवादी गुरू आणि महंतांनी जो थयथयाट केला. त्याच्या बातम्या इंटरनेटवर वाचल्या तेव्हा माझ्या मनात बहुजन समाजाबद्दल अभिमान दाटून आला. जातीयदवादी ब्राह्मण दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून बहुजन समाजाची बदनामी करीत आहेत. पण असा थयथयाट बहुजन समाजातील कोणी अजून केला नाही.

सीतेचा कोणताही दोष नसताना रामाने सीतेचा त्याग केला. तिला सगळे आयुष्यच वनवासात काढावे लागले. आधी रामासोबतचा वनवास आणि नंतर रामानेच दिलेला वनवास. हा संदर्भ देऊन राम जेठमलानी यांनी रामाला वाईट पती म्हटले होते. आपल्या सिंधूताई सपकाळ यांनी सुद्धा रामाला देव मानण्यास नकार दिला आहे. अनेक भाषणांतून सिंधूताई आपली ही भावना व्यक्त करतात. जेठमलानी यांनी हीच भावना व्यक्त केली होती. पण ती ब्राह्मणवादी बाबांना पटली नाही. मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील एका आश्रमाचा महंत महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज याने जेठमलानी यांच्या तोंडावर  थुंकणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. त्या आधी एका ब्राह्मणवादी गटाने जेठमलानी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. विशेष म्हणजे या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

ब्राह्मणवाद्यांची वरील बक्षिसे वाचून माझी खूप करमणूक झाली. माझ्या मनात प्रश्न आला, ब्राह्मणवाद्यांप्रमाणे बहुजन समाजानेही आपल्या महापुरुषांच्या बदनामीच्या विरोधात अशीच बक्षिसे ठेवली तर काय होईल? मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी महाराष्ट्रात शे-दोनशे वर्षांपासून सुरू आहे. ही बदनामी करणारे झाडून सारे इतिहासकार ब्राह्मण आहेत. पण त्यांची जीभ कापण्यासाठी किंवा  त्यांच्या तोंडावर थुंकण्यासाठी कोणी असे बक्षिस अजून ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराजांचे बदनामी केली. अरुण शौरी यांनी ‘वर्शिपिंग फाल्स गॉड' या पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी केली. पण बहुजन समाजातील कोणाही पैसेवाल्या व्यकतीने पुरंदरे किंवा शौरी यांची जिभ कापण्यासाठी किंवा तोंडावर थुंकण्यासाठी पाच-दहा लाखांचे बक्षिस ठेवले नाही. बाबासाहेब पुरंदरे हे तर आजही महाराष्ट्रात शिवरायांचा बदनामीकारक इतिहास घेऊन सुखाने फिरत आहेत. शिवचरित्राचा वापर करून कोटीने पैसे कमावित आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की, बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य इतिहासकारांच्या विरोधात बक्षिसे जाहीर करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांकडे पैसे नाहीत. पैसे आहेत. पण बहुजन समाजातील लोकांकडे  पैशाबरोबर सुसंस्कृतपणाही आहे. त्यामुळे तोंडावर थुंकण्यासाठी किंवा जीभ कापण्यासाठी कोणी बक्षिसे जाहीर करीत नाहीत. हा सुसंस्कृतपणा संस्कारातून आला आहे. तो असाच कायम राहील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

पण जाता जाता एकच सांगावेसे वाटते की, बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी आता ब्राह्मणवादी इतिहासकारांनी थांबवावी. कारण सुसंस्कृतपणा, सभ्यपणा आणि सोशिकता यालाही शेवटी अंत असतोच. ही बदनामी पाहून एखाद्या, बहुजनाच्या संयमाचा कडेलोट झालाच आणि त्यातून कोणी असे बक्षिस जाहीर केलेच तर त्याचा दोष बदनामीचा इतिहास लिहिणा-या पुरंदरेंसारख्या इतिहासकारांकडेच जाईल.

--अनिता पाटील 
..........................................................
जेठमलानी यांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाची बातमी वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा : राम जेठमलानी यांच्यावर थुंकण्यासाठी ५ लाखांचे बक्षिस

No comments:

Post a Comment