Thursday, 22 November 2012

...तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

कोहिनूर मिलमध्ये उभारा ठाकरेंचे स्मारक

नव्या पिढीतील प्रसिद्ध विचारवंत, लेखक श्री. डॉ. बालाजी जाधव यांचा
हा लेख ‘अनिता पाटील विचार मंच'च्या वाचकांसाठी देत आहोत. 

जो जन्माला येतो तो मरतो हा निसर्ग नियमच आहे . परंतु बर्याच जणांना काही व्यक्तींपुरता तरी हा नियम अपवाद ठरावा असे मनोमन वाटत असते. बाळ ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा कित्येकांना असेच वाटले. बाळासाहेब आपल्याला सोडून गेले ही खबरच नव्हे तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे असे सांगणार्या वृत्त वाहिनीची ओ बी व्ह्यान फोडण्यापर्यंत बाल ठाकरेंच्या चाहत्यांची मजल गेली. मरण हे देवालाही चुकत नाही असे कितीही म्हटले तरी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी देवापेक्षाही मोठी वाटायला लागते तेव्हा मात्र त्या व्यक्तीने निसर्गाचे सारे नियम झुगारून केवळ आपल्यासाठी जगतच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा ठाकरेंची प्रकृती चिंताजनक म्हणण्या एवढी गंभीर झाली तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकूनही प्रत्येकाने बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालून ठेवले. पण म्हणतात ना की "वास्तव हे विस्तव पेक्षा जास्त तापदायक असते " या नियमाप्रमाणे बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. या वास्तवाची जाणीव ही निश्चितच विस्तवाच्या चटक्यांपेक्षा पेक्षाही जास्त चटका लावणारी आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनतेचा महासागर लोटला. वैचारिक मतभेद हे जिवंत माणसांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबात कितीही मतभेद झाले तरी आपण आपला संसार नेटाने शेवटास नेतो . बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्यांना जन्मताच सत्यशोधक विचारांचा वारसा लाभला आणि याच वारशाच्या जोरावर बाळासाहेबांनी  'शिवसेना' नावाची प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय संघटना उभा केली. असे असले तरीही बाळासाहेबांनी आज जे लाखो चाहते निर्माण केले त्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. 

 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या
अंत्ययात्रेशी तुलना होऊच  शकत नाही 
असो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो महापूर जमला या मुळे विरोधकांना सुधा बाळासाहेबांच्या नावाची ताकत लक्षात आली. परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीने बेभान झालेल्या दीड शहाण्या ब्राहमणी मेडिया ने जे अवास्तव कवित्व सुरु केले आहे ते पाहून दस्तूर खुद्द बाळ ठाकरेंनी सुधा या दीड शहान्यांना आपल्या 'मार्मिक' शब्दात फटकारले असते आणि या नालायक लोकांना सुधा निमुटपणे बाळासाहेबांच्या फटकार्यांचा "सामना" करावा लागला असता. काही वाहिन्यांनी दिवाळीचा दिपोस्ताव संपल्या संपल्या बाळ ठाकरेंच्या अंत्ययात्रेबद्दल आपल्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजळत या अंत्ययात्रेची तुलना 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अंत्ययात्रेशी करायला सुरुवात केली. मुळात कोनत्याही व्यक्तीची तुलना दुसर्या व्यक्तीशी करणे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात महामानवांची एक दुसर्याशी तुलना करणे तर अजिबात योग्य नाही. या पेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या तुलनेद्वारे आपण नकळत (की जाणीवपूर्वक ?) बाबासाहेबांना कमी लेखत आहोत हे या ब्राह्मणांच्या लक्षात येत नसेल काय ? बर प्रदीप इंगोले म्हणतात तसे -"अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या केवळ संख्येवरून त्या व्यक्तीचे मोठेपण ठरवले तर मग त्या व्यक्तीच्या विचार आणि कार्याचे काय? आणि जर संख्येवरूनच मोठेपना ठरवायचा असेल तर मग कार्ल मार्क्स ह्या महामानवाच्या अंत्ययात्रेला त्याला खांदा देणारे ४ जनच उपस्थित होते. मग कार्ल मार्क्सचे मोठेपण काय हवेत मिळाले का ? आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथे कार्ल मार्क्सचे विचार पोहोचले नाहीत." आणखी उदाहरणच द्यावयाचे झाल्यास अन्ना भाऊ साठेंचेही देता येईल. त्यांच्या अंत्ययात्रेला तर केवळ १७ जनच हजर होते. मग अन्नाभाऊंचे मोठेपण नाकारायचे काय? हेही जाऊद्या खुद्द शिवरायांच्या अंत्ययात्रेलाही मोजकीच मानसे हजर होती. मग उद्या बाल ठाकरेंना शिवरायांपेक्षा मोठे ठरवायचे काय? बाळासाहेबांना जरूर मोठे करा पण त्यासाठी आमच्या महामानवांचा अवमान कशासाठी ?

ठाकरे यांना शिवरायांच्या जागेवर बसवणार का?
बाळासाहेबांच्या पित्याने शिवरायांचे नाव घेऊन समाजप्रबोधन केले तर बाळ ठाकरेंनी शिवरायांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. गर्दीचा महापूर पाहून बेभान झालेले काही उपटसुंभ तर बाळ ठाकरेंची तुलना छ. शिवाजी महाराजांशी करत आहेत.याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास बाळासाहेबांना स्वरांजली अर्पण करताना फेणाणी या गायिकेने रामदासाने लाळघोटेपणे शिवरायान्बद्दल जो "निश्चयाचा महामेरू..." हा श्लोक लिहिला तोच श्लोक बाळ ठाकरे बद्दल वापरला.एका न्यूज च्यानेल ने तर बाळ ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख करत याच वाक्याच्या खाली "शिवाजीच्या पुतळ्या शेजारीच स्मारक (बाळासाहेबांचे ) व्हावे " असे वाक्य टाकून शिवरायांना अरे- तुरे करून शिवरायांची बदनामी केली. पण बाळासाहेबांच्या जाण्याने सक्ख्खा बाप गमावल्याप्रमाणे आकंठ दुखत बुडालेल्या शिवसैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे दिसत नाहीये. स्वत बाळ ठाकरेही शिवरायांचे विरोधकच होते.आता काही जणांना ही बाळासाहेबंवरील अनाहूत टीका वाटेल परंतु वास्तव काय सांगते? काही वर्ष झाले शिवसेनेच्या ब्याणर वरून शिवराय हद्दपार झाले आहेत आणि तेही बाल ठाकरे जिवंत असताना हे घडले आहे. मग शिवप्रेमी बाळासाहेबांनी आपल्या पदाधिकार्यांना या गैर प्रकार बद्दल कानपिचक्या का बरे दिल्या नाहीत? शिवसेनेत तर बाळासाहेबांच्या आदेशा शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. मग याचा अर्थ शिवरायांना ब्याणर वरून हटविण्याचे आदेशाही बाळ ठाकरेंनीच दिले असल्याचे सिद्ध होते. बर जेव्हा शिवरायांच्या पितृत्व विषयी घाणेरडा विनोद बनवून जीजाऊच्या मातृत्वालाही कलंकीत केले गेले तेव्हा बाळ ठाकरेंनी या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. उलट उपलब्ध पुराव्यानुसार बाळासाहेबांनी या गैर प्रकाराचे समर्थनच केले होते.(अधिक माहितीसाठी वाचा डॉ बालाजी जाधव लिखित जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस हा ग्रंथ.) 

शिवस्मारकास विरोध करणारे ठाकरे
परवा परवा राज्यातील सत्ता रूढ पक्षाने शिवरायांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा त्यालाही बाळ ठाकरेंनी विरोधच केला. असे असताना बाळ ठाकरेंची तुलना शिवरायांशी करण्याची खाज का? ज्या भावनेतून बाळ ठाकरेंनी शिवरायांच्या अरबी समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध केला त्याच भावनेचा आदर करत महागाईने त्रस्त असणार्या राज्यातील जनतेने आणि शिवसैनिकांनी सुधा शिवाजी पार्क वरील बाळ ठाकरेंच्या पुतळ्याला विरोध केला पाहिजे आणि तोही प्राणपणाने.

मनोहर जोशींनी ठाकरेंच्या स्मारकाला जागा द्यावी
जे बाळासाहेब स्वताचे आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही असे छाती ठोकपने जाहीर सभातून सांगायचे त्याच बाळासाहेबांचे पुतळे उभे करणे बाळासाहेबांना सुधा खचितच आवडले नसते. असे असतानाही बाळासाहेबांच्या मुळ विचारांना छेद देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? वरून काही लोक खवचटपने इंदू मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायला मरेपर्यंत विरोध केला त्यांचेच स्मारक इंदू मिलच्या जागेत करा असे म्हणणे समस्त भिमसैनिकांच्या आणि बाबासाहेबप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. उलट बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क आणि इंदू मिलपेक्षाही योग्य जागा "कोहिनूर मिल" आहे. जे जोशी वारावर शिकत होते त्यांना चक्क मुख्यमंत्री पदापर्यंत बाळ ठाकरेंनी पोचवले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोशी काकांनीच बाळासाहेबांच्या जागेचा वाद मिटवत कोहिनूर मिल येथे साहेबांचे भव्य स्मारक बांधून घ्यावे अशी राज्यातील समस्त शिव सैनिकांची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांच्या या भावनेचा मान राखावा. 

या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ?
सरतेशेवटी थोडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल बोलूया. बाल ठाकरेंच्या मृत्यू नंतर मुंबईतच नव्हे तर राज्यभर बंद पाळला गेला. हा बंद काही ठिकाणी उत्स्फूर्त पने पाळला गेला तर काही ठिकाणी शिवसैनिकांनीआपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन करत बंद पाळण्यास भाग पाडले.या बंदमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे 'शाहीन धाडा ' या युवतीने फेसबुकवर बंदच्या निषेधार्थ काही मजकूर लिहिला आणि रेणू श्रीनिवासन हिने त्याला लायिक केले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी त्या तरुणीच्या काकांच, श्रीयुत अब्दुल धाडा यांचे रुग्णालय फोडून टाकले.माथेफिरू शिवसैनिकांच्या भावना समजून घेता येऊ शकतात परंतु याप्रकारामुळे पोलिसांनी त्या दोन तरुणींना तत्काळ अटक केली आणि ''चोर सोडून संन्यासाला फाशी" या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खरे तर अशा प्रकारची जलद कारवाई दरोडा, खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यात होत असते. काहीवेळा आरोपी बेपत्ता होण्याची शक्यता गृहीत धरून किंवा वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांनाही अश्या प्रकारे अटक केल्या जाऊ शकते. परंतु सदर तरुणींनी असा किंवा अशाप्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना अटक झालीच कशी? कुठे गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे स्वातंत्र्यवीर? की या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या अटकेमुळे पोलिसांनी घटनेचे कलम १९ चे उल्लंघन केले.

पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? 
बाळ ठाकरेंच्या मृत्यू मुळे पाळण्यात आलेल्या बंदचा निषेध करणाऱ्या तरुण्णींना जर एवढ्या लवकर अटक होत असेल तर मग जीजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? फेसबुक चेच उदाहरण द्यायचे झाल्यास शेकडो ब्राह्मण खोट्या नावाने राजरोसपणे बहुजन महामानवांची निंदा नालस्ती करत असतात त्यांचे काय करायचे? की शाहीन धाडा ही मुस्लीम होती म्हणून आधी शिवसेनेच्या गुंडांनी आणि नंतर पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली? अरे बाळ ठाकरे जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दोन डॉक्टर हे मुस्लीम समाजातील होते. मग हा मुस्लीम द्वेष कशासाठी? हे सगळे जर असेच चालत राहिले आणि बाळ ठाकरेंच्या विचारांविरोधात जाऊन त्यांचे देशात एकही स्मारक उभारले तर नक्कीच बाळ ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

बाल ठाकरेंचे स्मारक होईल तेव्हा होओ. आता सर्व मराठ्यांनी अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या संदर्भात आंदोलन केले पाहिजे.

(डॉ. बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशन या ब्लॉगवरून साभार)

1 comment:

  1. गैरवापर केला भगव्याचा,
    शेवटी अंत झाला भडव्याचा.

    ReplyDelete