Wednesday, 11 December 2013

दिलेरखानाच्या यशासाठी कोटीचंडी यज्ञ करणारे ४०० ब्राह्मण

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी जयसिंगासह दिलेरखान लाखो सैनिक घेऊन पुरंदरला
आला. दिलेरखानाला यश मिळावे यासाठी पुणे येथे ४०० ब्राह्मण दिलेरखानाला भटले व कोटीचंडीयज्ञ
करण्याचा सल्ला दिला. राजांचे स्वराज्य संपावे आणि दिलेरखानचा विजय व्हावा यासाठी ४००
ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. यावेळी दिलेरखानाकडून २ कोटी होन (सहा कोटी रु.) या
ब्राह्मणांनी घेतले. म्हणजे विजय कोणाचा का होईना आपल्याला पैसा मिळावा व शिवाजी-दिलेरखान
यांचे युद्ध व्हावे ही वृत्ती असणारे ब्राह्मण हेच राजांचे शत्रू होते. या यज्ञामुळेच दिलेरखानाला प्रेरणा
मिळाली व राजांचा दारुण पराभव झाला. (संदर्भ-सभासद लिखित श्री.शिवप्रभुंचे चरित्र)

या ठिकाणी शिवरायांची अत्यंत महत्वाची भूमिका प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे राजांनी
कोटीचंडीयज्ञ केला नाही. पुण्यातील ब्राह्मणांना दिलेरखानापेक्षा राजांच्या राजगडाचे अंतर जवळ होते,
पण दिलेरखानाची भेट त्यांनी का घेतली? याचा अर्थ राजांनी यज्ञ करावा असा प्रयत्न ब्राह्मणांनी केला
असावा. पण राजांनी यज्ञ करण्यास साफ नकार दिला. याचा अर्थ राजांचा या खुळचट विधीवर विश्वास
नव्हता, हे स्पष्ट होते. यज्ञ, अभिषेक, सत्यनारायण, पुजा-अर्चा, ग्रंथ पठणाने समस्या सुटणार नाहीत.
याची पूर्ण जाणीव राजांना झाली होती. त्यामुळे राजांकडून पैसा उकळण्याचा पुरोहितांचा डाव यशस्वी
झाला नाही. म्हणजे ब्राह्मणांचे लक्ष पैसा, सत्ता आणि संपत्तीवर असते. त्यासाठी ते कोणाचीही बाजू
घेतात आणि भांडण लावून स्वत:चे हित साधतात. म्हणूनच शिवाजीराजांना संपविण्यासाठी पुण्यातील
ब्राह्मणांनी दिलेरखानाची बाजू घेतली. कारण त्यांना वाटले असावे की, दिलेरखान-जयसिंग यांच्या
झंझावातापुढे राजांचा निभाव लागणार नाही. म्हणून यशस्वी मोगलांनाच सहकार्य करावे. पण राजांनी
तहान्वये विजय मिळवला. आणि पुढे जेव्हा राजांचा यशाचा आलेख वाढत गेला. तेव्हा ब्राह्मणांनी
राजांची बाजू घेतली. पण या सहकार्यामागे पूर्ण ढोंगीपणा होता. हे राज्यभिषेकाच्या प्रकर्षाने जाणवले.

औरंगजेबाच्या पदरी असणा-या जयसिंगाचा सचिव उदयराज
उदयराज नावाचा ब्राह्मण राजा जयसिंगाचा सचिव होता. त्याने जयसिंगाला विष देऊन मारले.
जयसिंगाचे महत्त्वाचे दप्तर त्याने पळवले. तो पुढे औरंगजेबाकडे गेला आणि मुसलमान झाला.
उदयराजचा तालियारखान झाला. याचाच मुलगा हिदायतखान पुढे मोगलांच्या पदरी होता. खोबरे
तिकडे चांगभले ही ब्राह्मणांची संस्कृती आहे.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

2 comments:

  1. Mirza Raja Jaysingh je ya Purandar mohimeche netrutva karat hote te pan kattar hindu rajput hote tyani ha yadn kelyachi shakyata nakarata yet nahi. Tasehi, maharajanchya virodhaat je marata sardar ladhat hote tyanchya padari pan bahujan lok hotech ki.

    ReplyDelete