Tuesday, 10 December 2013

सिद्धीला मदत करणारे मुरगुड नांदगांव येथील जोशी

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


शिवरायांच्या जीवनातील सर्वात मोठे शल्य म्हणजे राजांना जंजिरा किल्ला कधीच जिंकता
आला नाही. राजांनी अनेक वेळा प्रयत्न केला. पण राजांना यश आले नाही. तरीही राजे नाउमेद झाले
नाहीत. जंजिरा किल्ला राजांना का जिंकता आला नाही? त्यामागे काय कटकारस्थान शिजले होते? याचा
थोडा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मुरगुड नांदगांव येथील जोशी हा सिद्धिच्या पाठीशी होता.
म्हणूनच राजांना जंजिरा जिंकता आला नाही. त्या जोशीने सिद्धीला किल्ला बांधण्याचा सल्ला दिला
होता व त्याला पायाभरणीचा मुहूर्त सांगितला. त्याप्रमाणे सिद्धीने (हबशीने) केले. जोशीने हबशीला
सांगितले, की ‘तू किल्ला मुहुर्ताववर बांधला आता जंजिरा ३०० वर्षे  तुझ्याकडेच राहील. कोणेणालाही तो जिंकता येणार नाही!' म्हणजे दक्षिणेच्या रुपाने अमाप पैसा मिळविणाऱ्या जोशीला राजांपेक्षा सिद्धीची
जास्त काळजी होती. कारण त्या जोशीने दिलेल्या वरदानामुळेच जंजि-याचा सिद्धी निर्ढावला होता.
त्याने संभाजीराजांना देखील खूप त्रास दिला. जोशीच्या वरदानामुळेच सिद्धीचा आत्मविश्वास वाढला.
तर स्वराज्यात भिती निर्माण झाली. कारण त्या काळात राजे विज्ञाननिष्ठ होते, पण सामान्य जनतेवर
देवा-धर्माचा पगडा होता. म्हणूनच जंजिरा जिंकता मावळ्यांच्या (सैनिकांच्या) मनात भीतीचे
वातावरण होते. भिती असणारे सैनिक जास्त संख्येने आणि शस्त्रसज्ज असले तरीही विजय मिळवू
शकत नसतात. राजांना जोशीची कटकारस्थाने माहिती होती तरी देखील राजांना या थोतांडाकडे दुर्लक्ष
केले. आणि जंजि-यावर हल्ला केला. पण राजांना जंजिरा जिंकता आला नाही. जंजि-यापेक्षा कितीतरी
कठीण किल्ले राजांनी जिंकले होते. पन्हाला तर कोंडाजी फर्जंदनी फक्त ५० माणसे घेऊन जिंकला होता,
पण जंजिरा जिंकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, हजारो सैनिक धारातीर्थी पडले, पण किल्ला
सिद्धीकडेच राहिला, या अपयशाचे कारण आहे मूरगुड नांदगांवचा जोशी! सिद्धीला यश मिळण्यासाठी
प्रयत्न करणारा व समाजमनावर भीतीचे वातावरण निर्माण करुन न्यूनगंड निर्माण करणारा जोशी हाच
स्वराज्याचा व शिवाजीराजांचा खरा शत्रू होता.

मुरगुड नांदगांव येथील जोशींचे जसे राजांवर प्रेम नव्हते, तसेच सिद्धीवर देखील नव्हते.
तरीदेखील सिद्धीला जंजिरा बांधण्यासाठी जोशने मुहूर्त-पंचांगाव्दारे मदत केली. या माध्यमातून
जोशीला खूप धनसंपत्ती मिळाली, म्हणूनच त्याने सिद्धीला मदत केली. म्हणजे ब्राह्मण फक्त अर्थसत्ता
मजबूत करणे हा उद्देश असतो. त्यासाठी जोशीने पंचांगाव्दारे ब्राह्मणी व्यवस्था घटट् करण्याचा प्रयत्न
केल. ५०० वर्षे किल्ला अqजक्य राहील असे वरदान देणाèया जोशीने एका अर्थाने भविष्यशास्त्राचे
महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. भविष्यशास्त्र हे ब्राह्मणांना जगण्याचे व बहुजन समाजाला कायमचे
गुलाम बनविण्याचे शास्त्र आहे. म्हणजे जोशीने सिद्धीकडून अमाप संपत्ती तर उकळीच, पण बहुजन
समाजाला ५०० वर्षांची भिती जोशीने दाखविली. शिवाजीराजांनाच काय पण त्यांच्या कोणत्याही
पिढीला जंजिरा qजकता येणार नाही हा विषारी ब्राह्मणी विचार बहुजनांच्या मानगुटीवर जोशीने कायमचा
बसविला.

पण या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे किल्ला जिंकण्यासाठी शिवाजीराजांनी प्रयत्न
केले. त्यानंतर संभाजीराजांनीदेखील जंजि-याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. पण
अचानक औरंगजेबाचे महाराष्ट्रावर आक्रमण झाल्यामुळे संभाजीराजांना ही मोहीम अध्र्यावर सोडावी
लागली. अथवा संभाजीराजांनी या कु्रर ब्राह्मणी व्यवस्थविरुद्ध लढा उभारला असता.

मथुरेतील ब्राह्मणांना शिवाजीराजांनी 
‘दम'  दिल्यामुळेच संभाजीराजे सुरुरक्षित राहिले 
शिवाजीराजे आग्रा कैदेत अडकल्यानंतर महाराष्टड्ढात थांबलेले व दिलेरखान यांना ब्राह्मणांनी खूप
मदत केली. तरी देखील अशा कठिण प्रसंगी जिजामातांनी खंबीरपणे स्वराज्याचे रक्षण केले. एकही
किल्ला जयसिंगाला जिंकता आला नाही. इंचभर भूमिदेखील मोगल-आदीलशहा यांना जिंकून
देणा-या जिजाऊ मॉसाहेबांसारख्या निर्भीड माता राजांच्या पाठीशी होत्या म्हणून राजे आग्रा येथून
वेषांतर करुन निसटले. (राजे पेटा-यातून नव्हे, तर वेषांतर करुन निसटले.) याप्रसंगी राजांच्या मनावर
किती दडपण असेल? दूरचे अंतर, प्रवासाची साधने नाहीत, पावलोपावली शत्रू आहेत, सोबत
नऊ वर्षाच्या सुपूत्र संभाजी आहे. अशा प्रसंगी संभाजीला ठेवायचे कोठे? हा प्रश्न राजांपुढे होता.
त्यावेळेस मोरोपंत पिंगळेचे नातेवाईक मथुरेत होते. तेथे संभाजीला ठेवण्याचा निर्णय राजांनी घेतला.
पण राजांना भिती होती की पैशाच्या अभिलाषेने हे ब्राह्मण कदाचित संभाजीला शत्रूच्या स्वाधीन
करतील. कारण राजे ब्राह्मणांना चांगलेच ओळखून होते. कितीही जिवलग मैत्री असली तरी स्वार्थासाठी
ब्राह्मण कसा गळा घोटतात हा त्यांचा प्राचीन काळापासूनचा इतिहास राजांना चांगलाच माहित होता.
राजांनी संभाजीला त्रिकमलच्या स्वाधीन केले. त्या प्रसंगी राजांना त्रिमल बंधूंना ‘संभाजीच्या जीवास
धोकेका झाल्यास तुमुमचा प्राण घेईन' असा इशारा राजांनी त्यांना दिला. त्याचप्रमाणे संभाजीला देखील
एकांतात बरेच मार्गदर्शन केले आणि राजे परत आले. अफजलखान, शाईस्तेखान, जयसिंग आणि
औरंगजेबाची फजिती करणारे शिवाजीराजे आपला वंशही शिल्लक ठेवणार नाहीत याची भिती त्रिमल
बंधूंना वाटत होती. म्हणूनच संभाजीराजांशी त्यांनी दगा फडका केला नाही. म्हणजे त्रिमलांनी
संभाजीराजांना प्रेमामुळे नाही तर भितीमुळे सांभाळले होते. (संदर्भ-छ.संभाजी स्मारक ग्रंथ, पृ.१७८-
डॉ. जयसिंग पवार)

राजारामाच्या जन्मावेळी शिवरायांना भीती दाखविरे धमर्मार्तंड
शिवरायांना सोयराबाईच्यापोटी २४/२/१६७० राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म
पालथा झाला होता. त्याप्रसंगी एका पंडिताने राजांना भीती घातली की, पालथे जन्मणे अशुभ आहे.
राजांना भीती घालून यज्ञ, अभिषेक, सत्यनारायण, पूजा-अर्चा, अनुष्ठान करावयास लावायचे व
राजांकडून पैसा, सोने उकळायचे हा डाव त्या पंडिताचा होता. पण राजे हे खरेच जाणते (जाणणारे) राजे
होते. त्यांनी त्या पंडिताचा गुपित कावा ओळखला. राजे त्या पंडिताला म्हणाले, ज्याअर्थी माझा
मुलुलुलगा पालथा जन्मला त्याअर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. असे
राजे म्हटल्यावर तो पंडित थंडच पडला. कारण राजे आपल्याला वश होत नाहीत याची त्याला खात्री
पटली. पण राजांना पावलोपावली भीती घालण्याचा व नाउमेद करण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केला आहे.
औरंगजेब, आदीलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, डच, अफजलखान, दिलेरखान, शाईस्तेखान हे राजांचे उघड
शत्रू होते, ते राजकीय शत्रू होते (धार्मिक नव्हे). त्यांच्या विरुद्ध राजे डावपेच आखत होते. त्यांना
राजांनी अनेकवेळा पराभूत केले. पण मित्राचे सोंग घेऊन बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवरायांचा काटा
काढणारे ब्राह्मण हेच राजांचे खरे शत्रू आहेत. कारण त्यांच्याविरुद्ध राजांना डावपेच आखता येत नव्हते.
म्हणूनच त्यांनी राजांचा अवसानघात केला. म्हणूनच राजांना पुरंदरचा तह करावा लागला व आग्रा येथे
जावे लागले. आणि कैदेत अडकावे लागले.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

1 comment:

  1. असल्या फालतु पंचांग, मुहूर्त गोष्टिवर विश्वास ठेवायचा आणि तोंडानं पुरोगामीच्या बोंबा मारायच्या

    ReplyDelete