Showing posts with label संभाजी राजे. Show all posts
Showing posts with label संभाजी राजे. Show all posts

Saturday, 29 March 2014

संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करणारा महावीर गोविंद महार

शेखर पाटील, (शिव चरित्राचे अभ्यासक आणि वक्ते )


छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुक्रबखान इकलासखान यांनी पकडल्या नंतर बहादूर गडावर नेण्यात आले. त्यावेस औरंगजेबाचा खास मर्जीतला श्रीधर रायरीकर कुलकर्णी तुळापुरकर होता.  औरंगजेब ज्या वेळेस अजमेर वरून निघाला त्यावेळेस महाराष्ट्र लवकर जिंकायचा या उद्देशाने त्याने सोबत तिन लाख घोडदळ, दोन लाख पायदळ, एक लाख  सेवक, तेहतीस कोटीचा खजिना बत्तीस सरदार, तीन हजार आमीर-उमराव, दोन शहजादे, चाळीस नातू , सत्तर हजार उंट , चाळीस हात्ती येव्हढ अफाट सेना सागर घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण तेवीस वर्षाच्या संभाजी राजेने त्याला नऊ वर्ष एक इंच सुद्धा जमीन स्वराज्यातली घेऊ दिली नाही. आणि असा शिवशाहीचा पराक्रमी वारसा पाहायला औरंजेब त्रसाला होता. संभाजी राजे कैदेत पाहता औरंजेब अल्ला चे आभार मानाय गुडघे टेकून बसला. आणि त्या वेळेस त्याने प्रश्न विचारले, "बता, संभाजी कोण सरदार है जो हमारे हमसे बगावाद करते है. कहा है खजाना, कहा रखी है बुऱ्हाणपूर कि लुट. संभाजी अब तू हमारे गिरप्ते मे है. सारे गड किल्ले हमे दे. हम तुझे बक्ष देते है." 

तेव्हा औरंगजेबाला संभाजी महाराज म्हणतात, "मी काय देऊ तुला? माझ काय आहे? जे काही आहे ते स्वराज्याच आहे.  मी तुला काही देऊशकत नाही. माझा जीव गेला तरी बेहेत्तर पण स्वराज्याशी मी गद्दारीकरणार नाही." 

राजांचे शब्द ऐकून औरंगजेब अल्लाहला  भांडतो. "चार नालायक बेटोकी कि बजाय अगर संभाजी जैसा एक शेर हमारे पास होता तो इस उमरमे हमे दखन ना आना पडता. हम कबके सारे हिंदुस्तान के आलमगीर बादशहा बन चुके होते. क्या खिलाते है मराठे अपने बच्चो को? ना हर मानते है ना बिकनेको तयार है नंगे पाव घुमते है ये मराठे. क्यू पैदा ना हुवा आयसा एक भि शक्ष हमारे तयमुर के घराने मे?"

औरंगजेब संभाजी राजांचे उत्तर एकूण निराश झाला. त्याला वाटलं  आपण स्वताच्या बापाला कैदेत टाकलं. भावाला मारलं आणि आपला मुलगा शहजादा अक्कबर स्वता आपल्या पासून दूर गेला.  इतके दिवस झाले आपण महाराष्ट्रात आलो; पण आपल्याला काहीच जिंकता आल नाही. माझ्याशी टक्कर घेईल असा एकाच संभाजी आहे. संभाजी राजांची  स्वराज्य निष्ठा स्वराज्या वरचे प्रेम पाहून औरंगजेब हतबल झाला. त्याला काय कराव सुचेना. याच निराशेतून त्याने आदेश दिला, "संभाजी राज्यांना  सोडून द्या"
त्यावेळेस तेथे असलेले धर्माचे ठेकेदार ब्राह्मण औरंगजेबाच्या पायावर पडून रडू लागले. ते म्हणाले, "आलमगीर बादशहा, संभाजी राजेना पकडण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आताच संभाजी आमचा मुलाहिजा ठेवत नाही त्याला माहित पडल कि आम्ही त्याला पकडून दिल, तर तो आम्हालाच ठेवणार नाही. जरी संभाजी तुमचा गुन्हेगार नसला तरी तो आमच्या धर्माचा गुन्हेगार आहे. त्याला ठार मारा.… ठार मारा!"
  
…आणि त्यानंतर संभाजी महाराजांना मानुस्मुरती नुसार ठार मारण्यात आले. ४० दिवस संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार करण्यात आला. एवढे करून सुद्धा ब्राम्हण शांत बसले नाहीत. त्यांनी  संभाजी महाराजांच्या मृत शरीराची धिंड काढली. संभाजी महाराजांच्या मासाचे तुकडे इंद्रायणी, भामा आणि भिमा नदीत टाकण्यात आले. संभाजी महाराजांचा अंतविधी करू नये, अशी दहशत निर्माण केली. 

त्या वेळेस वढू (बुद्रुक) या गावी गोविंद महार राहत होता. अत्यंत शुर. धाडशी आणि जिगरबाज.   त्याला समजल कि महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आले. त्याने ठरवले कि,  "काहीही झाले तरी चालेल, पण मी माझ्या राजाच्या मृत देहावर अंत्यसंस्कार करणारच.  त्यासाठी हजार वेळा मारायला तयार आहे. औरंगजेबाच्या आणि ब्राम्हणाच्या दहशतीला मी घाबरणार नाही. होय, मी माझ्या राजा वर अंत्यसंस्कार करणारच. "

… आणि या गोविंद महाराने बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांच्या प्रेताचे तुकडे गोळा केले. शिर्के आडनावाच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे शिवले. हे लोक आजही शिवले या नावाने ओळखले जातात. संभाजी महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराने स्वतः ची जागा दिली. रात्रीलाच महारजांच्या प्रेतावर अंत्य संस्कार केले. पुढे गोविंद महाराला ठार मारण्यात आले. 

संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या महावीरास मनाचा मुजरा.  

-शेखर पाटील, ९०४९१४१४७४