Showing posts with label A)अनिता पाटील यांचे निवेदन. Show all posts
Showing posts with label A)अनिता पाटील यांचे निवेदन. Show all posts

Monday, 10 September 2012

ब्लॉग संपादकांकडे सुपूर्द

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,

या ब्लॉगची संपूर्ण जबाबदारी प्रा. रqवद्र तहकिक यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. ते ब्लॉगचे संपादक म्हणून काम पाहतील.

ब्लॉग सुरू करून उणेपुरे वर्ष झाले आहे. यातील सुमारे ६ महिन्यांचा काळ बिना लेखनाचा गेला. जेमतेम ६ महिने लेखन मी करू शकले. तथापि, एवढ्या अल्पकाळातही ब्लॉगला वाचकांनी उत्तम प्रतिसाद मिळाला. ब्लॉगच्या वाचकांची संख्या आता झपाट्याने दीड लाखाकडे झेपावत आहे. आपल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले.

श्री. रqवद्र तहकीक हे ब्लॉगची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळतील, तसेच आपले ब्लॉगवरील प्रेम असेच कायम राहील, असा विश्वास वाटतो.

धन्यवाद.

आपली बहीण
अनिता पाटील

Sunday, 29 July 2012

अलविदा!

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,

गेले 10 महिने मी हा ब्लॉग चालवित आहे. आज निरोप घेण्याची वेळ आली आहे. 15 ऑगस्ट साजरा करून 16 ऑगस्ट रोजी मी अमेरिकेला जात आहे. पुढील 15 दिवस तयारीसाठी लागतील. ऑक्टोबर 2013 पर्यंत मी अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास येथे माझे वास्तव्य राहणार आहे. टेक्सास हे अमेरिकेचे दुस-या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तसेच डलास हे टेक्सासमधील तिस-या क्रमांकाचे तर संपूर्ण अमेरिकेतील नवव्या क्रमांकाचे शहर आहे. डलासमध्ये मी एका अमेरिकी कंपनीसाठी काम करणार आहे. आमचा 14 महिन्यांचा करार आहे. डलासला माझी मावशीही राहते. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात ब्लॉग लिहून होईल, असे वाटत नाही. याचाच अर्थ पुढील 14 महिन्यांच्या काळात मी नवा लेख ब्लॉगवर टाकू शकणार नाही. 

आज घडीला ब्लॉगवर 150  लेख आहेत. मी एवढे लिखाण करू शकेल, असे मलाही वाटले नव्हते. वाचकांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले. ब्लॉगची वाचकसंख्या सव्वा लाखाला स्पर्श करीत आहे. वाचक संख्येचा लाखाचा आकडा पार करणारे फारच थोडे ब्लॉग मराठीत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या नऊ-दहा महिन्यांत सव्वा लाख हिट मिळविणारा एकही वैचारिक ब्लॉग मराठीत नाही. आज ब्लॉगच्या पाठिराख्यांची संख्या 300 ला स्पर्श करीत आहे. एवढी सदस्यसंख्या असलेला ब्लॉगही मराठीत नाही. या ब्लॉगला एवढी लोकप्रियता मिळेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. ब्लॉगबद्दल आपण जो जिव्हाळा दाखविला, त्याबद्दल मी खरोखरच भारावून गेले आहे. निरोप घेताना उर भरून आला आहे. 

या ब्लॉगची दखल विकिपीडियानेसुद्धा घेतली. देवनागरीत अनिता पाटील असा सर्च दिल्यास विकीपीडियावरचे माझे पान दिसायला लागते. मी विकीपीडियाची आभारी आहे. 

नजीकच्या भविष्यात ब्लॉगवर नवीन लेख पडणार नसला तरी १50 लेख आपल्या सोबत आहेतच. त्यांना वाचकांचा प्रतिसाद मिळतच राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून आपणा सर्वांचा निरोप घेते. 14 महिन्यांनी काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, परत आल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉग लेखन करायला मला नक्कीच आवडेल. 

जय जिजाऊ, जय शिवराय.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील.

Wednesday, 9 May 2012

अनिता पाटील यांचे विचार आता पुस्तकरूपात


भावांनो आणि बहिणींनो,

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी हा ब्लॉग सुरू केला. गेल्या आठ महिन्यांच्या काळात १३० लेख ब्लॉगवर टाकण्यात आले आहेत. जवळपास ८० हजार वेळा हा ब्लॉग वाचला गेला आहे. दीड हजार प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आहेत. हा ब्लॉग सुरू करण्यामागे ‘बुडताहे जन न पाहवे डोळाङ्क ही संत तुकारामांच्या अभंगपंक्तीची प्रेरणा होती तसेच बहुजन समाजाला आपले हीत कशात आहे, हे समजावे हा उद्देश होता. आपले विचार लोकांना पचतील का, असे प्रारंभी वाटले होते. तथापि, ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद पाहता, या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे, हेच सिद्ध होते. या लेखांतील विचार पुस्तक रूपाने यावेत, अशी मागणी अनेक भावा-बहिणींकडून होत होती. काही जाणकार मंडळीही यासाठी आग्रही होती. मी ब्लॉगच्या कामातच एवढी व्यस्त होते की, पुस्तकाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. तथापि, आता चळवळीतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन अनिता पाटील संघ (एपीएस) नावाने स्वतंत्र संस्थाच काढली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या ब्लॉगवरील लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत पहिला खंड वाचकांना उपलब्ध होऊ शकेल, या हिशेबाने एपीएसने नियोजन चालविले आहे. एपीएसचे काम ना नफा ना तोटा या तत्वावर चालणार आहे. त्यामुळे ही पुस्तके अगदीच नाममात्र किमतींत वाचकांना उपलब्ध होतील.

या नव्या उपक्रमाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील