प्रश्न : रामदास सोडून इतर सर्वच मराठी संतांचा त्या काळातील सनातनी ब्राम्हणांनी अतोनात छळ केला. संतांची बदनामी करणे, जातीतून बहिष्कृत करणे (वाळीत टाकणे), मानहानी, विटंबना , चोरी -व्यभिचार - धर्मद्रोहाचे आरोप ठेवणे, घातपात, देहदंड , खून असे सर्व पापी प्रकार ब्राह्मणांनी केले. कारण
पर्यायी उत्तरे
अ) मराठी संत देव आणि भक्त यातील पुरोहिताचे अंतर वगळून भक्तीचा थेट मार्ग सांगत होते त्या मुळे पुरोहितशाही नष्ट होऊन ब्राम्हणांच्या धार्मिक वर्चस्वाला आणि पोटापाण्याच्या उद्योगाला धोका निर्माण झाला होता.ब) मनुने जी चातुर्वण्र्य व्यवस्था सांगितली होती त्यात प्रत्येकाची कामे जाती आणि जन्माने निश्चित केली होती. मराठी संत त्यातील ब्राम्हणासाठी राखून ठेवलेले धार्मिक पौरोहित्य तसेच लेखन-वाचन-ज्ञानग्रहण- प्रतिपादन-अभ्यास -विवेचन हें काम सार्वजनिक व सर्वांसाठी खुले करण्याचा मार्ग सांगत होते.
क) मराठी संत सांगत असलेला, सामाजिक समता, बंधुता, सर्वभूती ईश्वराचे अस्तित्व, आणि कर्मकांड विरोध ही सनातनी ब्राम्हणाची खरी पोटदुखी होती.
ड) मराठी संत महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटून टाकू पाहत होते. कुणबी -शेतकर्यांना नांगर सोडून लेखणी हाती घेतली, कुंभाराने मडकी करायचे सोडून टाळ वाजवले, चांभाराने जोडे शिवायचे सोडून भजने म्हटली (म्हणजे सर्वांनी आपली कामे सोडून भक्ती सुरु केली ) तर समाज व्यवहार कसे चालणार? म्हणूनच समाज हिताच्या दृष्टीने ब्राम्हणांनी मराठी संतांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली.
सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा