Wednesday, 25 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट(बामणांसाठी राखीव)





भव्य पारितोषिक 
प्रश्नाची योग्य व खरी उत्तरे देणा-या ब्राम्हण उमेदवारास एक वेळेस खाईल तेवढे श्रीखंड-पुरीचे खास जेवण. सोबत : बटाट्याची सुकी भाजी, काकडीची कोशिंबीर, लिंबाचे लोणचे, घोसाळ्याची भाजी-पापड, वरण भात, साजूक तुपाची धार आणि जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी तांब्याभर मठ्ठा. 

स्पर्धेचे नियम व अटी

१)  श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्टमध्ये फक्त ब्राम्हणानाच भाग घेता येईल. 
२)  स्पर्धकांनी ब्राम्हण असल्याचा पुरावा म्हणून आपला एक उघड्या 
अंगाचा पासपोर्ट साईज फोटो (जानवे स्पष्ट दिसेल अश्या बेताने) पाठवावा लागेल.
३)  स्पर्धेत रोज एक प्रश्न विचारला जाईल. ही स्पर्धा २५ दिवस चालणार असून  अक्षय तृतीया ( परशुराम जयंतीच्या ) मुहार्तावर ती सुरु करण्यात आली आहे.
४)  प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरला २ गुण असे ऐकून २५२ = ५० गुण असतील. 
५)  सर्वाधिक गुण मिळवणा-या ब्राम्हण स्पर्धकास ‘विजेता ‘ पुरस्कार मिळेल.
६) कोणत्याही परिस्थितीत विजेत्या स्पर्धकाला ‘कोरडा शिधा‘ मिळणार नाही .
७)  बक्षिसाचे भोजन आयोजक सांगतील त्या ठिकाणी स्वतःची थाळी- तांब्या सोबत आणून खावे लागेल. आयोजकांकाढून थाळी-तांब्या अथवा पत्रावळी मिळणार नाही.

८) स्पर्धेच्या २५ दिवसांतील २५ प्रश्न हे  श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग-१, भाग-२, भाग-३ असे क्रमश: विचारले जातील. त्याची अचूक उत्तरे आपल्या नावासह या पोस्टच्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहावी. 
९) दोन किन्वा दोनपेक्षा जास्त स्पर्धक विजेते ठरल्यास विजेत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. प्रत्येक विजेत्या स्पर्धकास भोटपोस्तोवर जेवण देण्यास आयोजक तयार आहेत. 
१०) रोज एक भाग या प्रमाणे प्रश्नावली रोज प्रसिद्ध होइल. तथापि, जास्तीत जास्त बामनांना संधी मिळावी यासाठी सर्व प्रश्नांच्या एकत्रित लिन्क या पानावर खाली दिल्या जातील.
......................................................


2 comments:

  1. आज कंटाळलो होतो, पण तुमच्या ब्लॉग वरील "श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट(बामणांसाठी राखीव)" चे नियम व अटी वाचून खुपच हसू आले. छान वेळ गेला. श्रीखंड-पुरी न खाताच पोट भरले.

    धन्यवाद
    श्री मंदार बापट, आजरा, ९४२००९४१८०

    ReplyDelete
  2. दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.

    स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.

    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा…
    o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा, शेवटच्या तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
    o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे. कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किंवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे.
    o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल 1000 शब्दात परीक्षण पाठवावे. अथवा अन्य नियतकालिकात आपल्या दिवाळी अंकाबाबत परीक्षण अथवा लेख छापून आला असल्यास त्या लेखाचे कात्रण किवा झेरॉक्स प्रत पाठवावी.
    o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर)
    o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती. (पुरस्काराचे नाव, वर्ष, पुरस्कार देणा-या संस्थेचे नाव)
    o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी - □ दैनिक □ साप्ताहिक □ पाक्षिक □ मासिक □ द्वैमासिक □ त्रैमासिक □ अर्धवार्षिक □ वार्षिक □ अनियतकालिक
    o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
    o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेल्या अन्य सदस्यत्वाचा तपशील. (सदस्यत्वचा प्रकार, वर्ष, संस्थेचे नाव)
    o एखादी किंवा सर्व प्रवेशिका कोणत्याही कारणाशिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम - अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा / वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.

    ReplyDelete