Saturday, 28 April 2012

बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांचे अद्भूत लग्न



एका वैदिक विवाहाची गोष्ट

मी औरंगाबादला राहत होते तेव्हाची गोष्ट. आमचे घर गारखेडा परिसरात होते. आमच्या गल्लीत बहादूर घोरपडे (नाव बदलले आहे.) तो जातीने मराठा होता. प्रचंड बुद्धिमान आणि कष्टाळू. तो घरचा फार श्रीमंत नव्हता. परंतु खाऊन पिऊन सुखी होता. आमच्याच गल्लीत रामभाऊ जोशी (नाव बदलले आहे.) नावाचे एक आरएसएसवाले काका राहत. ते हिन्दुत्ववादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. आम्ही त्यांना गल्लीतले सरसंघचालक म्हणायचो. ते कॉलनीतल्या मैदानावर संघशाखाही घ्यायचे. जोशी काकांचे विचार अत्यंत उच्च होते. ‘‘सर्व हिन्दूंनी एक झाले पाहिजे. मुस्लिमांचा खातमा करायचा असेल, तर हिन्दूंनी जाती विसरायला हव्यात." असे ते संघशाखेत रोज सांगत. ‘‘वैदिक परंपरांवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल, तर वेदांकडे चला. वेदांची महान शिकवण अंगिकारा" , असा नाराही जोशी काका द्यायचे. आमचे जोशीकाका खरोखरच राष्ट्रवादी विचारांचे होते. संपूर्ण कॉलनीत त्यांना मान होता. मी तेव्हा दहावीला होते. मी त्यांच्याबद्दलचा कॉलनीतील आदर जवळून पाहिला. कॉलनीतल्या इतर मुलांमुलींप्रमाणेच मीसुद्धा तेव्हा संघशाखेत जात असे. दुर्गावाहिनीत मी स्वयंसेवक होते. जोशीकाकांची मुलगी नम्रता (नाव बदलले आहे.) हीसुद्धा आमच्यासोबत असायची. ती आमच्यापेक्षा मोठी होती. बहुधा तिने तेव्हा तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. ती विद्यापीठात प्रवेश घेण्याची तयारी करीत होती. 

बहादूर हासुद्धा संघाचाच कार्यकर्ता होता. तो नियमितपणे शाखेवर यायचा. तो जोशीकाकांच्या नम्रताच्या वयाचा होता. त्याला नम्रता आवडायची. त्याने शाखेत जाणा-या सर्व मुलामुलींना हे माहीत होते. नम्रतावर त्याचे मनापासून प्रेम होते. एक दिवस त्याने तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले. नम्रताच्या मनात त्याच्याविषयी अशा काही भावना नव्हत्या. त्यामुळे तिने अर्थातच त्याच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास नकार दिला. 

मला तुमच्या मुलीशी लग्न करायचेय!

नम्रताकडून नकार आल्यामुळे बहादूर प्रचंड नाराज झाला. परंतु त्याने आशा सोडली नाही. तो एक दिवस जोशीकाकांच्या घरी गेला. त्याने काकांना स्पष्टच सांगितले की-  ‘‘मला तुमची नम्रता आवडते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.ङ्कङ्क या प्रकारामुळे जोशी कांकांच्या घरी वादळच निर्माण झाले. जोशी काकू आजारी पडल्या. आम्ही त्यांना पहायला बसस्टँड रोडवर असलेल्या हेडगेवार रुग्णालयात जात असू. काकू महिनाभर हेडगेवारमध्ये होत्या. जोशीकाकांनी बहादूरची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला - ‘‘लग्न करीन; तर नम्रताशीच."

महिनाभरानंतर जोशीकाकूंना घरी आणले. साधारणत: चौथ्या-पाचव्या दिवशी बहादूर पुन्हा जोशींच्या घरी गेला. त्याने नम्रताला पुन्हा एकदा मागणी घातली. तो म्हणाला की, ‘‘मी तुम्हाला ५ लाख रुपये वधूमूल्य म्हणून देतो. तुम्ही मला नम्रताचा हात द्या".  या प्रकाराने जोशीकाका घाबरले. त्यांनी नम्रताला आपल्या नातेवाईकांकडे चौराहा भागात पाठवले. बहादूरने हे घर शोधून काढले. तो तेथे जाऊ लागला. त्यामुळे हादरलेल्या जोशीकाकांनी नम्रतासाठी स्थळे पाहायला सुरूवात केली. नम्रताला परभणी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पाठवून दिले. 

आता मात्र बहादूर चवताळला. तो पुन्हा एकदा जोशीकांकांच्या घरी गेला. बहादूर म्हणाला - ‘‘सर्व हिन्दूंनी जातपात विसरून एकत्र आले पाहिजे, असे तुम्हीच सांगता. तुमचाच विचार मी आमलात आणायचे ठरवले आहे. त्यासाठीच मला नम्रताशी लग्न करायचे आहे. तुम्ही आमचे लग्न का लावून देत नाही." जोशीकाका हतबल झाले. लोकांनी त्यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. परंतु, त्यांनी ते टाळले. 

त्यांनी तिचे अपहरण करून लग्न लावले!

शेवटी व्हायचे तेच झाले. बहादूरने जोशीकाकांचे परभणी जिल्ह्यातील गाव शोधून काढले. दोन जीप केल्या. आपले सुमारे वीसेक मित्र घेऊन त्याने परभणीतील ते गाव गाठले. नम्रताला त्यांनी जबरदस्तीने घरातून उचलले. तेथून ते जवळच्याच एका नामवंत मंदिरात गेले. तेथे सर्व मित्रांनी बहादूर आणि नम्रताचे जबरदस्ती लग्न लावले. दोन दिवस हे वèहाड परभणी जिल्ह्यातच फिरले. नवविवाहित दाम्पत्याचा हनिमूनही पार पडला. त्यानंतर तिसèया-चौथ्या दिवशी ही मंडळी थेट औरंगाबादला जोशीकाकांच्या घरी आली. त्यांना झालेला प्रकार सांगितला. आता मात्र जोशीकाका संतप्त झाले. ते पोलिस ठाण्यात जायला निघाले. तेव्हा बहादूर म्हणाला - ‘‘काका, पोलिसांत जाऊ नका. तुमच्या शिकवणीनुसारच मी वागलो आहे. वैदिक संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. हे मला तुम्हीच शिकवले. मला ते तंतोतंत पटले. नम्रताशी लग्न करून मी या महान संस्कृतीचेच पालन केले आहे."


काका, माझ्या वैदिक लग्नाला मान्यता द्या!

बहादूरचे बोलणे ऐकून जोशीकाका अचंबित झाले. ते प्रश्नार्थक चेहरा करून बहादूर आणि त्याच्या मित्रांकडे पाहू लागले. मग बहादूरच म्हणाला - ‘‘काका, वैदिक संस्कृतीने विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत. १)ब्रह्म विवाह २)दैव विवाह ३)आर्ष विवाह ४)प्रजापत्य विवाह ५)गंधर्व विवाह ६)असूर विवाह ७)राक्षस विवाह ८)पिशाच्य विवाह. नम्रताशी सर्वांत आदर्श समजल्या जाणा-या ब्रह्म विवाह पद्धतीने विवाह करावा, अशी माझी इच्छा होती. ब्रह्म विवाहात एकाच वर्णाचे विवाह योग्य युवक युवती आई वडिलांच्या संमतीने या पद्धतीने विवाह करतात. कलियुगामध्ये वर्णांचा लोप झाला आहे. सर्वच वर्ण शुद्र झाले आहेत, असे शास्त्र सांगते. त्यानुसार नम्रता आणि मी एकाच वर्णाचे आहोत. मी तिला रितसर मागणी घातली. परंतु तुम्ही लग्नाला नकार दिला. मग मी असूर विवाह पद्धतीचा अवलंब करायचे ठरवले. या पद्धतीनुसार, वधुपित्याला गडगंज संपत्ती देऊन प्रसन्न करून घेतले जाते. मी तुम्हाला ५ लाख रुपये देण्याचे कबूल केले. तरीही तुम्ही ऐकले नाही. त्यामुळे मला राक्षस आणि पिशाच्च विवाह पद्धतीचा आधार घेतल्यावाचून पर्यायच राहिला नाही. राक्षस विवाह पद्धतीनुसार, मुलीचे अपहरण केले जाते. तसे मी नम्रताचे केले. राक्षस विवाहात मुलीची लग्नला संमती आवश्यक असते. नम्रताने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. मग मला पिशाच्च विवाह पद्धतीचा अवलंब करावा लागला. पिशाच्च विवाह पद्धतीत मुलीला मद्या qकवा अन्य प्रकारची द्रव्ये पाजून शुद्धीच्या बाहेर केले जाते. ती शुद्धीत नसताना तिचा कौमार्यभंग केला जातो. आणि तिच्याशी विवाह केला जातो. हे सर्वच विवाह शास्त्रसंमत आहेत. आता आमचे हनिमूनही झाले आहे. वैदिक संस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी माझ्या विवाहला मान्यता द्या."

जोशीकाका हतबल झाले होते. त्यांनी बहादूर आणि नम्रताच्या पिशाच्च्य विवाहाला मान्यता दिली. हा विवाह तेव्हा आमच्या कॉलनीत चर्चेचा विषय झाला होता. आता या विवाहाची आठवण आली की, हसू येते. आणि बहादूरच्या बहादुरीचा तसेच बुद्धिमत्तेचे कौतुकही वाटते.

अनिता पाटील

4 comments:

  1. अनिताजी
    मी आपल्या ब्लॉग वरील जवळपास सर्वच लेख वाचले. व जवळपास सर्वच लेख मला तंतोतंत पटले. परंतु हा लेख व त्यातून व्यक्त झालेली भावना मला अत्यंत संवेदनाहीन वाटते.
    या लेखाच्या अखेरीस आपण लिहिता :
    "आता या विवाहाची आठवण आली की, हसू येते. आणि बहादूरच्या बहादुरीचा तसेच बुद्धिमत्तेचे कौतुकही वाटते."
    एका असहाय स्त्री वर बलात्काराने विवाह लादण्याच्या
    बहादूर च्या बहादुरी चे आपल्याला खरोखरच कौतुक वाटते काय ?
    ह्या देशातील किंबहुना जगभरातील सर्वच धर्म परंपरांनी कायमच स्त्रियांचे शोषण केले आहे. केवळ एका संघवाल्या जोश्याची फजिती झाली म्हणून हि घटना एका विनोदी ढंगाने पेश करून वर अशा बलात्कारी पुरुषाचे कौतुक करणे आपल्या इतर सर्व शोषण विरोधी विचारांशी विसंगत वाटते.
    --राज सामंत

    ReplyDelete
    Replies
    1. राज यांना अनुमोदन
      आणि त्या मुलीचाही नकार होता ना? मग जबरदस्तीने पळवुन नेऊन लग्न केले तर त्याच्या बुध्दीमत्तेचे कौतुक? एक स्त्री असुनही ??? सरप्राईझिंग आहे हे

      Delete
  2. राज यांना अनुमोदन
    आणि त्या मुलीचाही नकार होता ना? मग जबरदस्तीने पळवुन नेऊन लग्न केले तर त्याच्या बुध्दीमत्तेचे कौतुक? एक स्त्री असुनही ??? सरप्राईझिंग आहे हे>>>+1

    ReplyDelete
  3. राज यांना अनुमोदन
    आणि त्या मुलीचाही नकार होता ना? मग जबरदस्तीने पळवुन नेऊन लग्न केले तर त्याच्या बुध्दीमत्तेचे कौतुक? एक स्त्री असुनही ??? सरप्राईझिंग आहे हे>>>+1

    ReplyDelete