Sunday, 29 April 2012

संस्कृतपेक्षा प्राकृत भाषाच जास्त जुन्या

संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवरून साभार

संस्क्रुत भाषा नुसती पुरातन नव्हे तर ती इंडो-युरोपियन भाषा समुदायाची जननी आहे. भारतातील द्राविडियन भाषागट वगळता अन्य सर्वच भाषा संस्क्रुतोद्भव आहेत. संस्क्रुत ही साक्षात देववाणी असून ऋग्वेद म्हणजे परमेश्वराचे नि:श्वास आहेत...अशी आपली बराच काळ समजुत आहे हे खरे. परंतु तसे पुरावे आहेत काय? मुळात संस्क्रुत भाषा पुरातन आहे हा समज खरा आहे काय? ग्रीक व ल्यटीन भाषासुद्धा संस्क्रुतमधुनच निर्माण झाली असे म्याक्समुल्लरने प्रथम मत प्रस्रुत केले व त्यांची सर्वच भाषाविदांनी री ओढली. यामागे म्यक्समुल्लरचा "आर्य" हे मध्य अशिया किंवा उरल प्रांतातुन क्रमश: टोळ्यां-टोळ्यांनी निर्गमीत झाले आणि काही टोळ्या युरोपात तर काही इराणमार्गे भारतात प्रवेशल्या असा तर्क होता. भारतात तेंव्हा ज्या दास-दस्यु ई.रानटी जमाती रहात होत्या त्यांना जिंकुन त्यांनी त्यांना चवथ्या, म्हणजे शुद्र वर्णात स्थान दिले असाही तर्क होता. परंतु सिंधु संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यानंतर जोही काही वेदकाळ मानला जातो, त्याच्याही पुर्वी भारतात अत्यंत सम्रुद्ध व प्रगत संस्क्रुती अस्तित्वात होती हे प्रत्यक्ष भौतील अवशेषांमुळेच सिद्ध झाल्याने आर्य सिंद्धांताला बधा येवू लागली. तरीही प्रथम आर्यांनीच सिंधु संस्क्रुती नष्ट केली व त्यांन दास केले असे म्हणत तेही अंगलट यायला लगल्यावर सिंधु संस्क्रुती वैदिकांनीच निर्माण केली असे तर्क डा. मधुकर ढवळीकरांसारखे विद्वान प्रस्रुत करु लागले. आर्य नांवाचा कोणताही वंश अस्तित्वात नव्हता व ते बाहेरुन आले हेही खरे नाही हे आता असंख्य पुराव्यांवर सिद्ध झाले आहे. मग संस्क्रुतचे काय? मुळ ऋग्वेद नेमका कोणत्या भाषेत लिहिला गेला होता? या प्रश्नांची उत्तरे येथे थोडक्यात तपासायची आहेत. (या विषयीचा माझा संशोधनपर ग्रंथ या वर्षाअखेर प्रसिद्ध होत आहे.) 

१. मुळात संस्क्रुत म्हणजे संस्कारीत, बदलवलेली क्रुत्रीम भाषा तर प्राक्रुत म्हणजे मुळची, नैसर्गिक भाषा. आता हा अर्थ सरळ व स्पष्ट असल्याने प्राक्रुत भाषेवरच संस्कार करुन जी भाषा बनवली गेली तीच संस्क्रुत हे उघड आहे. म्हणजे प्राक्रुत भाषा याच मुळच्या ठरतात. 

२. प्रत्येक भाषा ही आपली प्रादेशीक ओळख देते. उदा. मागधी, अर्धमागधी, (मगध प्रांतातील भाषा) माहाराष्ट्री प्राक्रुत, शौरसेनी, तेलगु इ. एवढेच नव्हे तर ग्रीक, डोरियन, अक्काडियन, ल्यटिन (ल्यटियनन या प्रांतात बनली म्हणुन) पर्शियन...ई. परंतु संस्क्रुत भाषेला असे प्रादेशिक संदर्भ नाहीत जसे ते पाली या भाषेलाही नाहीत. पालीला नाहीत कारण ती भाषा ग्रांथिक उपयोगासाठी प्रयत्नपुर्वक बनवली गेलेली सर्वात पहिली क्रुत्रीम ग्रांथिक भाषा आहे. संस्क्रुतही तशीच क्रुत्रीम भाषा आहे. त्यामुळेच तिला्ही कसलेही प्रादेशिक संदर्भ नाहीत. 

३. ग्रीक भाषेवर संस्क्रुतमधील काही मोजक्या शब्दांतील किरकोळ साधर्म्यामुळे तिचा प्रभाव होता व त्यातुनच ग्रीक भाषेचा जन्म झाला असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु भाषाविद येथे हे विसरतात कि ग्रीक भाषेतील पहिला वाचला गेलेला लेख (लिखित) इसपु १७०० मधील आहे. ल्यटीन भाषेतील पहिला शिलालेख हा इसपु ६०० मधील आहे. इराणी भाषेची जननी संस्क्रुत आहे असेही मानण्याचा प्रघात आहे, परंतु या भाषेतीलही पहिला शिलालेख बेहुस्तिन येथील इसपु ५२२ मधील राजा दारियसचा आहे. सिंधु लिपी अद्याप वाचता आली नसली तरी त्यांही काळी लिपी होती याबाबत दुमत नाही. भारतात जुन्यात जुना (वाचला गेलेला) शिलालेख हा इसपु १००० मधील असुन तो व्रज (शौरसेनी) भाषेतील आहे. इसपु ३२२ पासुन पाली, अर्धमागधी, मागधी, तमिळ भाषेतील शिलालेखांची मात्र रेलचेल आहे. जर सम्स्क्रुत भाष्या इंडो-युरोपियन समुदायातील असती तर तिचीच अपत्ये मानल्या गेलेल्या भाषांत मात्र पुरातन लेख आढळतात. पण सम्स्क्रुत मात्र अर्वाचीन ठरते हे असे का?

४. हे लेख लिहिले गेले कारण त्या भाषांना स्वत:ची लिपी होती हेही उघड आहे. आश्चर्याची गोष्ट अशी कि संस्क्रुत भाषेतील (तोही प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत...धेदगुजरी) शिलालेख गिरनारला सापडतो तो इसवी सनाच्या १५० चा. तोही ब्राह्मी लिपीतला, ज्यात तत्पुर्वीच इसपु १००० पासुन असंख्य प्राक्रुत शिलालेख कोरले गेलेले होते. सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात संस्क्रुतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती....भाषा पुरातन असती तर लिपी नक्कीच असती जशी ग्रीक, ल्यटीन, पर्शियन व भारतीय प्राक्रुत भाषांची होती. पैशाची भाषेत गुणाढ्याने कथासरिसागर लिहिले होते व त्यातील लाखभर पाने जाळली अशी कथा आहे...म्हणजे तो ग्रंथही मुळात लिखितच होता. 

५. प्रत्यक्ष पुराव्यांवरुन सातवाहन काळापर्यंत तरी संस्क्रुत ही कोणाचीही दरबारी भाषा नव्हती हा इतिहास आहे. सर्व राजकारभार प्राक्रुतातुन चालत असे. इसच्या १५० पर्यंत एकही शिलालेख वा नाण्यांवरील मजकुर संस्क्रुतात नाही. साहित्यही संस्क्रुत भाषेत नाही. 

६. चवथ्या शतकात साधलेल्या रामायणच्या संस्करणात सोडले तर खुद्द ऋग्वेद ते महाभारतात संस्क्रुत भाषेचे नांवही येत नाही. विपुल बौद्ध व जैन वाड्मयात कोठेही सम्स्क्रुत भाषेचे नांव येत नाही. पाणिनीला अभिजात सम्स्क्रुतचा श्रेश्ठ व्याकरणकार मानले जाते, परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात त्याने लिहिलेल्या अष्टाध्यायीतही संस्क्रुत हा शब्द येत नसुन तो ज्याचे व्याकरण लिहित होता त्याला "छंदस" व "भाषा" असे म्हनतो...संस्क्रुत नाही. सर्वात महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हणजे पाणिनी हा शैव होता. त्याच्या सुत्रांना महेश्वर सुत्रे अथवा शिव सुत्रे असेच म्हटले जाते. संस्क्रुतचा नंतरचा व्याकरणकार पतंजली हाही शैव होता. 

७. दुस-या-तिस-या शतकापुर्वीचा एकही संस्क्रुत म्हणवणा-या भाषेतील एकही लेख, राजाद्न्या, ग्रंथ, काव्य वा महाकाव्य वा पुराण मिळत नाही. उलट जैन व बौद्ध साहित्याचे हस्तलिखित पुरावे हे किमान सनपुर्व चवथ्या शतकापासुन आढळतात. खुद्द ऋग्वेद इसवी सनाच्या सहाव्या शतकात तमिलनाडुमद्धे ग्रंथबद्ध केला गेला. वेद मौखिक परंपरेने जपले असे मान्य जरी करायचे म्हटले तरी अन्य कोनताही व्यवहार संस्क्रुतातुन का नोंदला गेला नाही? जर संस्क्रुत ही देशाची पुरातन भाषा होती व किमान ब्राह्मण-क्षत्रीय-वैश्य समाजाच्या नित्य बोलण्यातील व्यवहारातील भाषा होती...तर एकही तसा भौतीक पुरावा आजतागायत का मिळाला नाही? कारण ती भाषाच मुलात अस्तित्वात नव्हती. 

८. ऋग्वेदाची भाषा ही "वैदिक संस्क्रुत" आहे असे मानण्याचा प्रघात आहे, कारण ती पानीनिच्या व्याकरणशी फारसा मेळ घालत नाही. उलट तिचा मेळ प्राक्रुत व्याकरण व भाषेशी जास्त बसतो आणि त्याचे कारण स्वाभाविक आहे. ऋग्वेद रचना ही सनपुर्व २५०० ते सनपुर्व १७५० पर्यंत, म्हणजे किमान साडेसातशे वर्ष सुरु होती, असे मानण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रदिर्घ कालावधीत भाषेत आपसुक जे कालौघात बदल घडत असतात (जशी चक्रधरांची---द्न्यानेश्वरांची मराठी व आजची...) तसे काहीएक बदल ऋग्वेदात आढळत नाहीत. इंग्रजीतही आपण शेक्सपियरची इंग्रजी आणि आजची इंग्रजी हा भेद सहज पाहु शकतो. जगात असे कोनत्याही भाषेबाबत...अगदी ग्रीक वा ल्यटीनबाबतही घडलेले नाही. मग ऋग्वेदाची भाषा का बदलत नाही? याचे कारण असे कि मुळात वेद हे मुळात संस्क्रुतात रचलेच गेलेले नव्हते. असे असुनही सम्स्क्रुत पुरातन...देववाणी...असा भ्रम आपल्या डोक्यात बसला तो विल्ल्यम जोन्स व म्यक्समुल्लरमुळे. असा सिद्धांत मांडण्यात त्यांचे साम्स्क्रुतीक फायदे होते. पण येथील विद्वान मात्र फारच उत्तेजीत झाले. पण ते वरील प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाहीत हे उघड आहे. 

आता प्रश्न पडतो तो असा कि नेमकी संस्क्रुत भाषा कधीची? मुळात या भाषेचे कसलेही भौतीक पुरावे इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नसल्याने तिचा जन्म याच काळच्या आसपास झाला असे ठामपणे म्हनता येते. म्हणजे ही भाषा अगदी पालीपेक्षाही किमान ५०० वर्षांनी अर्वाचीन ठरते. पाली भाषा ही बौद्ध धर्मीयांनी मागधी-अर्धमागधी व शौरसेनीतील शब्द-व्याकरण यांचा मेळ घालत ग्रांथिक कारणांसाठी बनवली हे मी आधीच म्हटले आहे. मग बौद्ध धर्माचा प्रसार पालीमुळे देशभरच नव्हे तर विदेशातही होत आहे हे पाहुन वैदिक जनांनीही क्रुत्रीम भाषा बनवण्याचा निर्णय घेतला असावा. कारण मुळ वेद व ब्राह्मणे ज्या भाषेत लिहिली होती ती "व्रचदा" प्राक्रुत भाषेत. होय...याचे आता शेकडो पुरावे मला उपलब्ध झालेले आहेत. ही भाषा सिंध प्रांतातील लोक सोडले तर अन्यांना समजण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बौद्ध धर्माच्या तुलनेत आपला धर्मप्रसार अधिक करायचा तर सर्व प्राक्रुत (अगदी द्रविड भाषांतीलही) शब्द घेत नवी भाषा बनवण्याखेरीज गत्यंतर उरले नव्हते. त्यामुळे वैदिक मंडळीने पालीच्या पायावर पावूल ठेवत वैदिक संस्क्रुतची निर्मिती केली. त्यात वेद, ब्राह्मणे अनुवादित केली. 

पानिनी या शैव श्रेष्ठाने पहिल्या शतकात वैदिक संस्क्रुतला धुत्कारत नवे व्याकरण लिहुन आगम (म्हणजे वेदांआधीचे) शैव ग्रंथ अभिजात संस्क्रुतात अनुवादित करण्याचा मार्ग मोकळा केला. ऋग्वैदिकांनी मात्र पाणीनीय व्याकरण फार उशीरा..म्हणजे सहाव्या शतकात स्वीकारले. सम्स्क्रुतला स्वत:ची लिपी नव्हतीच. त्यामुळे तमीळ ब्राह्मी, ब्राह्मी वा क्वचित खरोष्टी या प्रचलित लिप्या वापरात आणल्या. या भाषेला पहिला राजाश्रय मिळालेला दिसतो तो शक क्षत्रप रुद्रदामनाच्या काळात, कारण पहिला संस्क्रुतातील शिलालेख त्याचाच आहे! तो आधीच म्हतल्याप्रमाणे धेडगुजरी...म्हणजे विकसीत होवु पाहणा-या सम्स्क्रुतातील आहे. 

मुळ ऋग्वेद व्रचदा प्राक्रुतातील आहे हे खुद्द ऋग्वेदातील शेष राहिलेल्या मुळ शब्दांवरुनच सिद्ध होते. उदा. सोम पवमान सुक्त. आजची सिंधी भाषा जरी कालौघात बदलली असली तरी पुरातन सिंधी रुपे त्या भाषेने जपलेली आहेत. मुळात ऋग्वेद रचना झाली तीच सिंधु नदीच्या खो-यातील सरस्वती नदीच्या काठी. त्यामुळे वैदिकांची मुळ भाषा (कारण ते बाहेर तर कोठुनही आलेले नाहीत हे तर पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे.) स्वाभाविकपणेच त्याच प्रदेशातील भाषा होती. धर्मकल्पना वेगळ्या होत्या एवढेच! एकाच भौगोलिक प्रदेशात एकाच वेळीस दोन भिन्न टोकाच्या भाषा असु शकत नाहीत हा भाषाविदांनी मान्य केलेला व सर्वांच्याच अनुभवातील सिद्धांत आहे. तसेच एखादी भाषा बोलनारे लोक सर्वस्वी नष्ट होत नाहीत तोवर कितीही आक्रमणे झाली तरी त्या रहिवाशांच्या मुळ भाषेचा गाभा कदापि बदलत नाही. व्रचदा सिंधीतील मुळ ऋग्वेद पहिल्या शतकाच्या आसपास वैदिक संस्क्रुतात अनुवादित करण्यात आला...मुळ मंडलांचा क्रम बदलवला...बहुतेक अनावश्यक भाग काढुन टाकण्यात आला. तरीही हे अनुवाद करतांना ज्या मुळ व्रचदा सिंधीचे अर्थ माहित नव्हते ते शब्द तसेच ठेवले गेले. त्यामुळे अगदी सायनाचार्य असो कि यास्क, त्यांनाही ऋग्वेदातील अनेक ऋचा/शब्दांचा अर्थ लावता आला नाही. तोवर पाणिनीचे व्याकरण तयार झाले. पण या सा-याचा देशभर प्रसार-प्रचार व्हायला अजुन दोन-तिनशे वर्ष लागली. पुढची तीन-चारशे वर्ष संस्क्रुतने राज्यव्यवहार ते साहित्यक्षेत्रात अधिराज्य गाजवले...इतके कि मुळ प्राक्रुत ग्रंथ संस्क्रुतात झपाट्याने अनुवादित झाले...यातुन कालिदास, भवभुतीसारखे मुळ प्राक्रुत नाटककारही सुटले नाहीत. पण मग पुन्हा ही भाषा हळु हळु लोप पावली ती पावलीच. 

मग संस्क्रुत ही सर्व भाषांची जननी हा सिद्धांत का आला? याला खरे तर राजकीय कारणे आहेत. म्यक्समुल्लर हा जर्मन पंडित या सिद्धांताचा जनक ठरला. युरोपियन (ग्रीस आणि रोम वगळता) कोणाचाही इतिहास पाचव्या शतकापार जात नव्हता. त्यांनाही त्यांची सांस्क्रुतीक पाळेमुळे भक्कम करायची होती. आर्यभाषागट सिद्धांतामुळे मात्र त्यांचाही इतिहास पुरातन ठरु शकत होता. कारण आर्य भाषा बोलणारे कधीतरी एकत्र होते आणि ते क्रमश: युरोप ते भारतात पसरले व स्थानिकांना सुसंस्क्रुत केले. हे सिद्ध केले कि आर्यन वंशवादाचा राजकीय लाभ जसा जर्मनांना होनार होता तसाच इंग्रजांनाही. भारतातील ब्राह्मण हे आपसुक त्यांचे पुरातन "आर्यरक्ताचे बांधव" ठरणार होते...म्हणजेच एतद्देशियांवर सत्ता गाजवणारे पहिले आक्रमक. विष्णुशास्त्री चिपळुनकर तर जाहीरपणे इंग्रजांना पुरातन रक्तबांधव म्हणु लागले ते यामुळेच. लो. टिळकांनीही तोच कित्ता गिरवला व "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहुन मोकळेही झाले. (नंतर डा. नी. र. वर्हाडपांडे यांनी टिळकांच्या सिद्धांताला ऋग्वेदाचाच आश्रय घेत फेटाळुन लावला) पण यामुळे जसा युरोपियनांचा राजकीय/सांस्क्रुतीक फायदा झाला तसाच येथील वर्चस्ववादी ब्राह्मणांचाही झाला व त्यांनी संस्क्रुतचा व आर्यवादाचा उद्घोष करायला सुरुवात केली. खरे तर या विदेशी प्राच्यविद्या संशोधकांनी सर्वात आधी प्राक्रुत भाषांकडेच लक्ष पुरवले असते तर संस्क्रुतचा फोलपणा व प्राचिनत्वावर तेंव्हाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, व आजचा हा साम्स्क्रुतीक गोंधळ मुळात निर्मानच झाला नसता. ट्रम्प सारख्या व्याकरणकाराच्या मात्र ही बाब लक्षात आली होती. त्याने प्राक्रुत भाषा याच पुरातन असुन सम्स्क्रुतचा जन्म अत्यंत अर्वाचीन आहे हे सिंधी भाषेचे पहिले व्याकरण लिहितांना १९व्या शतकात मांडले होते. ग. वि. केतकरांनीही माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच संस्क्रुतचा जन्म झाला हे त्यांच्या द्न्यानकोशात मांडले होते. पण लक्षात कोण घेतो? 

लिप्यांकित भाषा व अलिप्यांकित भाषा यातील भेद लक्षात घेतला असता तर ग्रीक, ल्यटीन भाषांवरील प्रभाव हा प्राक्रुतामुळे आहे व ते सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेल्या व्यापारामुळे व सांस्क्रुतीक देवानघेवाणीमुळे आहे हे त्यांच्या सहज लक्षात आले असते. असो. 

प्राक्रुत भाषा याच पुरातन असून संस्क्रुतचा इतिहास इसवी सनाच्या दुस-या शतकापार जात नाही हे मात्र सर्वच उपलब्ध पुराव्यांवरुन ठामपणे सिद्ध होते. थोडक्यात संस्क्रुत ही अत्यंत अर्वाचीन भाषा असुन तिला अभिजाततेचा दर्जा देणेही चुक आहे. या भाषेतील ऋग्वेदासहित सर्व वाड्मय हे मुळ कोणत्या ना कोणत्या प्राक्रुतातुन अनुवादित केलेले आहे. मग प्रत्यक्ष पुरावे असलेले कथासरित्सागर घ्या, सिंहासन बत्तीशी घ्या कि रामायण महाभारत घ्या. 

संजय सोनवणी

No comments:

Post a Comment