Sunday, 15 December 2013

शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला

 -श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


राष्ट्रपिता जोतिराव फुले उपाख्य तात्या यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून  फुले १८६९ साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा
तपास केला, पण त्यांना समाधी सापडेना. तीन दिवस जोतीराव फुले  यांनी वेली
तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला. तात्यारावांनी समाधी धुवून स्वच्छ केली. राजांच्या
समाधीस तात्यारावांनी भक्तीभावाने अभिवादन केले आणि समाधीवर फुले वाहिली. तात्यारावांनी
शिवरायांच्या समाधीची पुजा केल्याचे ग्रामजोशास समजले तेव्हा जोशाच्या तळपायाची आग
मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला,  समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली आणि
तात्यांना म्हणाला ‘अरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय?'

राष्ट्रपिता फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तात्यांना खूप दु:ख
झाले. त्यानंतर तात्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला. तात्यांनी शिवजयंतीला सुरुवात
केली. १८७० साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली.  
पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण रा.फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात  फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव!
गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशवे कैवारी
बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव
केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी १८९३ साली गणोत्सव सुरु केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
 1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
 2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
 3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
 4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
 5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
 6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

4 comments:

 1. टिळक हा खोटा माणूस होता, त्याला सरकारी आणि इतर ठिकाणी महापुरुषाची जागा देऊ नये

  ReplyDelete
 2. व्यक्तीगत स्वातंत्र्याची मागणी केली तेव्हा टिळक म्हणतो 'स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही'। दुसर्‍याच्या देशावर थुंकणारा माणूस स्वैराचाराच्या वार्ता करतोय. पौराणिक कथेत पृथ्वीला माता म्हटले आहे. म्हणजे स्वातंत्र्यासाठी हा मातेच्याच अंगावर थुंकतो आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटलेय, हे विश्वची माझे घरं।(All World is My Home). पण घरातच थुंकतोय।

  ReplyDelete
 3. टिळकांनी शाहू महाराज, मा. फुले,मुसलमानांना त्रास दिला. एकीकडे ते बहुजनांचा व मुलमानांचा द्वेष करता तर हिंदू-मुस्लीमांना अपसात लढवित.
  हिच त्याची देशभक्ती होती.

  ReplyDelete
 4. Real History Exlant year Jay shivraj

  ReplyDelete