Thursday, 19 December 2013

प्रस्तावना

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे, आणि कर्तुत्वाचे राजे आहेत. भूमिपुत्रांच्या
सहकार्याने राजांनी स्वराज्य निर्माण केले. पण राजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाही हे कटूसत्य आहे.
कल्पितकथा, रंजकता हे शिवचरित्रातील अडथळे आहेत. शिवचरित्र हे पुस्तकात न मावणारे जीवनकार्य
आहे. शिवचरित्रावर अनेक अंगानी लिहिणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे केवळ डोक्यावर घेऊन
मिरवण्याचा विषय नाही, तर डोक्यात घालण्याचा विषय आहे. शिवचरित्रावर मालिका, नाटके, चित्रपट,
महानाट्य निर्माण करणे आणि व्याख्याने देणे हा अनेकांनी धंदा केला आहे. अशा काळात कटुतेचा
विचार न करता श्रीमंत कोकाटे यांनी अत्यंत संशोधनपूर्ण असे ‘‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?" हे
राजांच्या जीवनातील अपरिचित बाबींवर प्रकाश टाकणारे पुस्तक लिहिले आहे. राजांना जातीय-
धार्मिक चौकटीत अडकवणे, रायरेशराच्या मंदिरात शपथ घेतली की नाही, महाराणी पुतळाबाईचे सती
जाणे, भवानी तलवार, बहुजनप्रतिपालक म्हणण्याऐवजी गा ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे यापाठीमागचे
षडयंत्र, जिजाऊमॉसाहेबांचे निधन कसे झाले? राजांचा खून कशा प्रकारे करण्यात आला? मनुवादी
शिवजयंतीच्या तारखेला विरोध का करतात? याबाबत श्रीमंतचे संशोधन नाविन्यपुर्ण आहे. यासाठी
श्रीमंत कोकाटे यांनी बरेच श्रम घेतले आहेत.

राजांनी सर्व जातीधर्माच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यामध्ये बाजी
पासलकर, कान्होजी जेधे, शिवाजी काशिद, जिवा महाला, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, नुरखाण बेग,
काझी हैदर, लाय पाटील, येसाजी कंक, फिरंगोजी, प्रतापराव, कोंडाजी फर्जंद, सुर्यराव काकडे, नेताजी
पालकर, सिद्धि हिलाल, सिद्धि इब्राहिम, फकिराचा खापर पणजोबा, मुरारजी व बाजीप्रभू, हे प्रभू इ.
सर्व जाती धर्माचे सहकारी राजांसाठी प्राणपणाने लढले.
या प्रसंगी दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रामदास, मोरोपंत इ. अनेक भटजी आडवे
आले. आडवे आलेल्यांना राजांनी पराभूत केले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांवर वार करणा-या
कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला राजांनी  ठार मारले. राजांना आजन्म त्रास देणा-या शत्रूची माहिती तर
श्रीमंतने प्रस्तुत पुस्तकात दिलीच, पण आजच्या तारखेपर्यंत शिवचरित्र, शिवसूत्र आणि शिवनीतीला
जाणीवपूर्वक बदनाम करणा-या टिळक, सावरकर, पुरंदरे, बेडेकर आणि य.दि. फडकेंचा देखील पर्दाफाश
केला आहे.

महाराजांना जिवंतपणी त्रास देणारे जसे शत्रू आहेत, तसेच त्यांचा बदनामीकारक इतिहास
लिहिणारे फडके, माटे, इ. कंटक देखील शत्रू आहेत. त्यांनी राजांचा व मराठा स्त्रियांचा
बदनामीकारक इतिहास पहिल्या खंडात लिहिला. श्रीमंतने या बाबतीत लिहिले आहे. पण प्रतिक्रिया
देण्यात शक्ती खर्च करण्योक्षा नवनिर्मितीची गरज आहे. भावनिक पातळीवर लेखन कालबाह्य ठरते.
यासाठी शत्रूंचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्यापेक्षा शिवाजीराजांच्या मित्रांवर देखील लिहावे.
शिवचरित्रातील अनेक बाबी अनभिज्ञच आहेत. त्यांचा शोध घ्यावा.

श्रीमंत हा सृजनशिल अभ्यासू आणि परखड विचारांचा प्रभावी वक्ता आहे. त्यामुळे विनंतीवजा
सूचना आहे की, संभाजीराजांवर देखील लिहावे.

पुरुषोत्तम खेडेकर
(राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

1 comment:

  1. पूर्वी मराठे आणि महादेव कोळी संबंध चांगले होते पण ब्राम्हणांनी ते बिघडवले

    ReplyDelete