Friday, 13 December 2013

संभाजी राजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश


-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


शिवाजीराजे आणि संभाजीराजे या पिता पुत्रात भांडण लावण्याचा मोरोपंत, अण्णाजी दत्तो
यांनी कसोशीने प्रयत्न केला. यासाठी त्यांनी संभाजीराजांविरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या. ‘शिवरायांना
संभाजीबद्दल प्रेम नाही, ते राजारामाला वारसदार करणार आहेत' अशा प्रकारच्या अफवा पसरवून
संभाजीराजांना भडकविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ब्राह्मण मंत्र्यांना यश आले नाही. दोघा पिता पुत्रांनी
ब्राह्मणांना चांगलेच ओळखले होते. दिलेरखानाची आक्रमकता रोखण्यासाठी शिवरायांनी
संभाजीराजांना मोगलांकडे पाठविले होते. पुढे हे दिलेरखानाच्या लक्षात येताच शिवरायांनी संभाजीला
सोडवून आणले. आणि संभाजीराजांना पन्हाळ्याचे सुभेदार केले. कवि कुलेश या ब्राह्मणाने संभाजीशी
मैत्री संपादन केली. संभाजीराजे आणि सर्व मराठे सरदार यांच्यात भांडण लावण्याचा कुलेशाने प्रयत्न
केला. संपत्ती आणि पदाच्या लालसेने तो राजांच्या आश्रयाला आला. स्वकर्तृत्वाने मोठे झालेले
बहुजन नेते किंवा  राजाच्या जवळ ब्राह्मण येतात. गरीबांची ते कधीच हांजी-हांजी करत नाहीत. पण नेते
आणि राजे यांच्याजवळ ते पुर्ण स्वार्थ साधण्यासाठी राहतात. पण जास्त संपत्ती दुस-या बाजूकडून
मिळताच ते आपल्या नेत्याचाही घात करतात. अगदी असाच प्रसंग संभाजीराजांच्या जीवनात घडला.
उत्तर भारतातून आलेल्या कुलेशाला राजांनी छंदोगामात्य (मुख्य प्रधान) केले,  त्याच्यावर  संपुर्ण विश्वास  टाकला. त्यानेच राजांचा विश्वासघात केला.

रायगडावर हल्ला करण्याची औरंगजेबाची मोहीम होती. पण त्यासाठी औरंगजेबाला रायगड
माहित नसल्यामुळे गडाची प्रतिकृती (मॉडेल) हवी होती. ही प्रतिकृती तयार करण्याची जोखीम कुलेशाने
घेतली. त्या बदल्यात औरंगजेबाने कुलेशाला खूप पैसा दिला. कुलेशाने हे काम त्याच्या मुलाकडे
सोपविले. म्हणजे कुलेश संभाजीसोबत राहून औरंगजेबाला मदत करीत होता. राजांच्या निर्मळ आणि
प्रेमळ मनाचा कुलेशाने गैरफायदा घेतला. म्हणजे कवि कुलेश हा औरंगजेबाचा हितचिंतक होता आणि
राजांचा शत्रू होता. राजांना पकडून देण्याची जबाबदारी कवि कुलेशानेच स्विकारली. औरंगजेबाने कवि
कुलेशाला खूप पैसा दिला. राजे रायगडावर जाण्यासाठ निघाले, वाटेत संगमेशर येथे थांबले. तेव्हा राजे
कवि कुलेशाला म्हणाले, ‘आपण लवकर रायगडाकडे जाऊ. या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे.' तेव्हा कुलेश म्हणाला, ‘‘येथे कोणीही येणार नाही." कविकुलेश अनुष्ठानास बसला. तेव्हा राजांनी
कविकुलेशाला लवकर निघण्याचा आग्रह केला परंतू कविकुलेशानेच अनुष्ठानात जाणीवपुर्वक वाढ केली.
संभाजीराजांना कविकुलेशाने संगमेशर येथे रोखून धरल्याची खात्रीलायक बातमी औरंगजेबाला
समजली. आणि लगेच औरंगजेबाने मुकर्रबखान आणि इखलासखानाला कोल्हापुरावरुन संगमेशरला
पाठविले. त्यांनी तातडीने येऊन संभाजीराजे व कुलेशाला पकडले. पण या प्रसंगी राजे घोड्यावर निसटले
होते पण कुलेश ओरडला ‘महाराज मै गिर गया'! निसटलेले राजे कवि कुलेशाला वाचवण्यासाठी परत
फिरले आणि लगेच त्यांना पकडण्यात आले (संदर्भ- निकोलाओ मनुची लिखीत "असे होते मोगल" पृ.
२८८) जेव्हा राजांना पकडण्यात आले तेव्हा ते पुर्ण सावध होते. राजे कोणत्याही विधीत मग्न नव्हते.
या उलट राजे लवकर निघण्याचा आग्रह कुलेशाला करत होते. म्हणजे राजांना दुरदृष्टी होती. पण
कुलेशाने अनुष्ठानाचे निमित्त करुन राजांना औरंगजेबाचे सैन्य येईपर्यंत अडवून धरले होते.
संभाजीराजांसारख्या सरळ मनाच्या राजाचा अशा प्रकारे कविकुलेशाने काटा काढला व बदनाम केले 
राजांच्या गणोजी शिर्के व नागोजी शिर्के या मेहुण्यांना. कुलेशाला निर्दोश सोडण्यासाठी ब्राह्मणी
इतिहासकारांनी राजांना गणोजी आणि नागोजी शिर्के यांनी पकडून दिले असे धादांत खोटे लिहिले.
राजकारणात कितीही स्वार्थ असला तरीही आपल्या बहिणीचे कुंकू पुसावे असे कोणत्याही भावाला
वाटत नसते. गणोजी-नागोजी हे येसुबाईचे भाऊ होते. त्यांनीच राजांना पकडून दिले असा अपप्रचार
ब्राह्मणी लेखकांनी केला. म्हणजे कु्रर, स्वार्थी, लबाड कविकुलेशाला निर्दोष सोडण्यासाठी नागोजी-
गणोजीला बदनाम करुन बहिण-भावाचे पवित्र नात्याला देखील अनेक पक्षपाती लेखकांनी
कलंक लावला आहे. (कविकुलेश याच्या फितुरीमुळेच संभाजीराजांना औरंगेबाने पकडले असा स्पष्ट
उल्लेख ईश्वरदास नागर, रॉबर्ट आर्म, निकालाओ मनुची या परकीय लेखकांनी केलेला आहे. संदर्भ- छ.
संभाजी स्मारक ग्रंथ.  पृ. १७०, १९४, १९५, १७१)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
 1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
 2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
 3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
 4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
 5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
 6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

5 comments:

 1. I was astonished to hear about this Joker Purandare. He never sings Powada of Chhatrapati Shivaji Raje, then who gave this honor to such a liar? He his a big liar. His DNA must be checked. These Brahmins belongs to Eurosian origin who destroyed Sindhu Civilization and made the Mulnivasi their Slaves and called them as HINDU.(Ref Wikipedia on word Hindu and Sindhu Civilization) But these Brahmins tells Bahujan Samaj people to say proudly as Hindu? But they never call themselves as Hindu because their DNA is not Indian. A good example was exhibited by Justice (Retd) Dharmadhikari that his grand sons's blood did not match with his own relatives but a blood of his Sweeper was matched. Hence word hindu is sarcastic meaning and we Bahujan MUST NOT SAY that we are proud HINDUs.. We must not celebrate Hindu festivals like Ganapati Utsav, Gudi Padva, Dasara, Diwali,Dahi Handi of Krishna (Krisha had a lover called Radha who was wife of his maternal uncle and e was fond of waching naked girls while taking bath). I request ANITA PATIL VICHARMANCH must organize Committee meetings in every District to tell the true History of Chhatrapati Shivaji Raje and secret of Brahminical Magical Organizations.

  ReplyDelete
 2. THANK YOU VERY MUCH ANITA PATIL VICHAR MANCH for giving the true History of Chhatrapati Shivaji Raje to illiterate Bahujan samaj. BRAVO!!! We must bring out the "Brahmanachde Kasab"

  ReplyDelete
 3. या मधे कवी कुलेश यांच्या बाबतीत गैर समज झाले आहे एवढे नक्की कारण संभाजी राजे सरदेसाई यांच्या वाड्यावर असताना कवी कुलेश याने कोणताच घातकी पणा केलेला दिसत नाही
  उलट संभाजी राजे यांच्या स्वराज्यात त्यांचे कार्य ही मराठा सरदार यांच्या पेक्षा अधिक आहे
  इथे रामदास याच्या शिष्याला विसरता आहत खर तर संभाजी राजाना पकडून देण्यात त्यांचा हात आहे

  ReplyDelete
  Replies
  1. प्रकरण संशयास्पद वाटते. कवी कुलेशाने माफी मागून जीवदान मिळविले असते. कवीने राजेंसोबत बलीदान दिले, हे विसरता येणार नाही.

   Delete
 4. Mag Sambhaji Maharajanchya sobat Kavi Kulesh la ka marnyat aale ? to tar aaramat nisatu shakala asta na.

  ReplyDelete