Showing posts with label फ्यांड्री. Show all posts
Showing posts with label फ्यांड्री. Show all posts

Sunday, 29 May 2016

नागराज मंजुळे यु टू?

नागराज तुझा सैराट पहिला . अन धक्का बसला . तुला नेमकं काय सांगायचंय ? कलाकृती म्हणून सिनेमा झिंगाट झालाय . ७० कोटीची कमाई केलीस . चांगली गोष्ट आहे . पुण्या मुंबईतल्या निर्माता दिद्दर्शकांच्या गांडी खाली इस्तू ठेवलास याचा आनंद आहे आणि आभिमान सुद्धा . पण एक गोष्ट खटकली लंका.

तू नाय म्हणशील . आसलं काय डोक्यात नवत म्हणशील . पण मेसेज काय जाऊ लागला ते पन म्हतवाचं आस्तय लंका . तू चळवळीतला माणूस हायेस . तुला हे सांगायची गरज नाय . पन लंका गडबड झालीय बरका . आसं त नाय ना का तू मुद्दामच गडबड केली ?

आढेवेढे कशाला सरळच विचारतो , त्या नरेंद्र जाधवा वानी तू बी भाजपा आन चड्डी वाल्यांच्या नादी त नाही लागला न बापा ? आता कसा ? सांगतो. मला सांग नागराज डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांनी , महात्मा फुलेंनी , राजर्षी शाहु महाराजांनी दलित-बहुजनाच्या शोषणाला कोण जबाबदार असल्याचे सांगितले ?  ब्राम्हण. बरोबर ना? म्हणजे ब्राम्हणांनी रचलेला मनुवादी सनातनी चातुर्वर्ण्य धर्म . श्रेष्ठ कोण ? तर फक्त ब्राम्हण . बाकी सगळे शुद्र . मराठे सुद्धा! घामाचा एक थेंब न गाळता उच्च दर्जाचे जीवनमान जगण्याचा आणि रक्ताचा एक थेंब न सांडता सुरक्षेचा अधिकार ब्राम्हणांनी मिळवला तो सर्व ब्राम्हणेतराना देवाची धर्माची पाप पुण्याची भीती दाखउन. ब्राम्हण म्हणील ती पूर्व दिशा . त्याचा शब्द म्हणजे ब्रम्ह वाक्य . म्हणून आम्हीही डोळे झाकून, अक्कल गहाण ठेवून अवमान अपमान अन्याय सहन केले. फक्त दलित किंवा बाराबलुतेदार आणि अन्य भटक्या जातीनाच नव्हे तर जांच्या जोरावर ब्राम्हणाचे हे वर्ण वर्चस्व पोसले जात होते त्या क्षत्रिय मराठा जातीना देखील ब्राम्हण शूद्रच मानत होते. हे खरे आहे की ब्राम्हणी वर्चस्व आबाधित ठेवण्या साठी ब्राम्हणांनी मराठयांचा वापर केला . म्हणजे सांगणारे सुचवणारे ब्राम्हण आणि अंमलबजावणी करणारे मराठे. पण येथे हे लक्षात घ्यावे लागेल कि मराठे हे सगळे ब्राम्हणांनी घातलेल्या देव धर्म आणि पाप पुण्याच्या भीतीने करत होते . एका अर्थाने मराठे देखील पिडीतच होते.

१६०० व्या शतका पासून १८००व्या शतका पर्यंत मराठा जातीला महाराष्ट्रा पुरते राजकर्ते पण मिळाले. कुनब्यांचे पाटील झाले देशमुख झाले . राजे ,सरदार, इनामदार , वतनदार , जहागीरदार झाले . मध्यंतरी इंग्रज काळात हा हि रुबाब गेला . स्वातंत्र्या नंतर पुन्हा मराठ्यांना राजकर्ते पण मिळाले . हरितक्रांती , सहकार , सिंचन , राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधील सत्ता या मुळे मराठ्यांना बरे दिवस आले . पण मला सांग नागराज एवढी अमर्याद सत्ता असूनही तुरळक अपवाद वगळता मराठ्यांनी समाजावर अन्याय अत्याचार केले का ? कोणावर सूड उगवला का ? सहज म्हणून कल्पना कर ब्राम्हणाच्या हाती अशी सत्ता मिळाली असती तर त्यांनी काय केले असते ? ब्राम्हणाच्या सोड , दलितांच्या हाती सत्ता आली तर ते सुद्धा सुडाने वागतील . मराठ्यांनी मात्र कधीच आपली दानत ,नियत आणि उदारमतवाद सोडला नाही . महाराष्ट्रा पुरता विचार केला तरी मराठे ब्राम्हणा सहित सर्व दलित ,बहुजन बाराबलुतेदार आणि भटक्या जाती जमातींचे पोशिंदे आणि रक्षणकर्ते राहिलेले आहेत आंबेडकराना याची जाणीव होती . म्हणून त्यांनी कधीच शोषणा साठी मराठ्यांना जबाबदार धरले नाही

नागराज तू मात्र मोदी ,भाजपा . आणि चड्डीवाल्यांची सुपारी घेतल्या सारखा सर्व बहुजनाचा ब्राम्हणावरचा राग डायव्होट्र करून मराठ्यांना टार्गेट करतो आहेस. फ्यांड्रीत तुझा हेतू कळून आला नाही. पण सैराट मध्ये तू प्यानटीच्या आतून हाप चड्डी घातलेली स्पष्ट दिसत आहे. उगाच नाही तुज्या सिनेमाला प्रदर्शनाच्या आधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . फडणवीसने वर्षावर बोलावून तुझा सत्कार केला. मातोश्रीवरही जाऊन आलास . नागपूरची रेशीमबाग तेवढी राहिली. दुबईत गेलास तिथे कोण आहेत तुझ्या सोबत ? संघोटेच ना . आता हे संघोटे तुला घेवून जगभर फिरतील. तिथे स्थाईक झालेल्या भारतीयांना मराठे किती वाईट आहेत हे सांगण्या साठी . नागराज तुज्या सारख्या चळवळीतल्या माणसा कडून हि अपेक्षा नव्हती . स्वतःला आसा विकू नकोस.
-रविन्द्र तहकीक, संपादक, अनिता पाटील विचार मंच.