Showing posts with label लोकसत्तेचा खोडसाळपणा. Show all posts
Showing posts with label लोकसत्तेचा खोडसाळपणा. Show all posts

Tuesday, 23 July 2013

तुकोबांना 'तुक्या' म्हणणारा हा हलकट जोशी कोण?

लोकप्रभा-लोकसत्ताकडून मराठा समाजाचा पुन्हा अवमान

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

मराठा समाजातील आणि अन्य बहुजन समाजातील महापुरूषांचा अवमान करण्याचे सत्रच एक्सप्रेस समूहातील लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांनी सुरू केले आहे. या दोन्ही पत्रांचा ब्राह्मणी जातीयवाद या ब्लॉगवरून आम्ही वारंवार जगजाहीर केला आहे. लोकप्रभेने आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा घोर अवमान केला आहे.

तुकोबांचा उल्लेख तुक्या असा करणारा हाच तो लोकप्रभामधील लेख.
लोकप्रभाचा १९ जुलैचा अंक आषाढी यात्रा विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात सुहास जोशी यांचा संत तुकोबांवर एक लेख आहे. ‘सांगे तुक्याचा वारसा' असा या लेखाचा मथळा आहे. हा मथळा अत्यंत आक्षेपार्ह आहे. तुकाराम महाराजांचा उल्लेख ‘तुक्या' असा एकेरी आणि तुच्छतापूर्ण यात करण्यात आला आहे.  एखाद्या गल्लीतील पोराचा उल्लेख करावा त्याप्रमाणे तुकोबांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. या लेखाचे लेखक सुहास जोशी आहेत. या जोशीबुवांनी मुद्दामच तुकोबांचा अवमान केला आहे, हे सांगायला कोण्या कुडमुड्या जोश्याची गरज नाही. अनिता पाटील विचार मंचच्या वतीने आम्ही लोकप्रभाचे संपादक विनायक परब आणि या लेखाचे लेखक सुहास जोशी यांचा जाहीर निषेध करीत आहोत. 


संबधित लेख

तानाजी मालुसरे यांचा इतिहास नाकारणा-या रा. चिं. ढेरेला कोण धडा शिकविणार?

लोकसत्तेचे ब्राह्मणी कुटिरोद्योग सुरूच


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

रा. चिं.. ढेरे 
लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांचा अवमान केला आहे. र्कोढणा किल्ला सर करताना तानाजी धारातीर्थी पडले, म्हणून शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले, असा इतिहास आहे. ‘गड आला पण सिंह गेला', असे शिवरायांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. लोकसत्तेला मात्र हे मान्य नाही. रा. चिं.. ढेरे नावाच्या एका तोतया संशोधकाचा हवाला देऊन लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात अन्वयार्थ या सदरात एक संपादकीय लेख प्रसिद्ध केला आहे. कोंढाणा किल्ल्यावर नरसिंहाचे मंदिर होते, त्यावरून शिवरायांनी या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. तानाजीचा पराक्रम दुर्लक्षित करण्यासाठीच हा उपद्व्याप ढेरे आणि लोकसत्तेने केला हे उघड आहे.

नरसिंहाच्या मंदिरावरूनच कोंढाण्याचे  नाव सिंहगड असे ठेवले गेले, याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ढेरे बुवांकडे आहेत, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. अशी कागदपत्रे नेमकी ब्राह्मणांकडेच कशी चालत येतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सिंहगडाचे नाव ठेवण्यापूर्वी शिवरायांनी काही कागदपत्रे तयार करून, ही कागदपत्रे २१ व्या शतकात रा. चिं. ढेरे नावाच्या बुवाच्या हाती पडतील, अशी काही व्यवस्था करून ठेवली होती का? बोगस कागदपत्रे तयार करायची आणि त्यावरून बोगस इतिहास लिहायचा, असे उद्योग ब्राह्मणमंडळी गेली शेकडो वर्षे करीत आहेत. रा. चिं. ढेरे हे बुवाही याच मालिकेतील एक मणी आहेत. 

लोकसत्ता या दैनिकाकडून मराठा समाज तसेच अन्य बहुजन समाजातील महापुरूषांना अपमानित करण्याचा ब्राह्मणी कुटिरोद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला होता. त्यावर नंतर लोकसत्ताकारांना माफीही मागावी लागली होती. आता पुन्हा हाच खोडसाळपणा लोकसत्तेने केला आहे. आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख येथे वाचा


संबधित लेख

Saturday, 27 April 2013

लोकसत्तेचे यंटम संपादक

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.


लोकसत्तेचे संपादक यंटम झाले आहेत का? उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख वाचल्यानंतर आमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता. या अग्रलेखावरून ओरड झाल्यानंतर लोकसत्तेच्या वेबसाईटवर तो ब्लॉक करण्यात आला. हे ब्लॉकिन्ग प्रकरण पाहून आमच्या मनातील प्रश्न खात्रीत परावर्तीत झाला. लोकसत्तेचे संपादक खरोखरच यंटम झाले असावेत, असे दिसते. हा अग्रलेख ब्लॉक करून आपली चुकच लोकसत्तेने कबूल केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा चुका लोकसत्ताकार करीत आहेत. टीका करण्याचा अधिकार वृत्तपत्रांना आहे. मात्र, टीकेतून वैयक्तिक आकस दिसता कामा नये. तसेच आपले वैयक्तिक हितसंबंधही डोकावता कामा नये, अशी अपेक्षा असते. माने यांच्या प्रकरणात लोकसत्तेने नेमके याच्या विरुद्ध वर्तन केले आहे. माने यांच्यावरील आरोपांचे भांडवल करून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करणारा तसेच जातीयवादी ब्राह्मणवाद्यांची तळी उचलणारा अग्रलेख लोकसत्तेच्या संपादकांनी खरडला.

१ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या अग्रलेखाचा +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा!+ हा मथळा लोकसत्ताकारांचा ब्राह्मणी अजेंडा स्पष्ट करतो. म्हणूनच तो आक्षेपार्ह आहे. या अग्रलेखातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य बहुजन समाजावर विष ओकते आणि जातीय ब्राह्मणवाद्यांची तळी उचलते. लोकसत्ता हे दैनिक जातीयवादी ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे, हे अलिकडील लोकसत्तेमधील लिखाणातून वारंवार सिद्ध होत आहे. उपराकार लक्ष्मण माने यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाप्रकरणी लोकसत्तेने घेतलेल्या भूमिकेतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसत्तेच्या ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया फार पूर्वीच सुरू झाली होती. गिरीष कुबेर यांनी व्यवस्थापकीय संपादक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ती पूर्णत्वास गेली, असे म्हणावे लागते.


माने हे काही आमचे मामा नव्हेत. त्यांनी पाप केले असेल, तर त्यांना कायदा शिक्षा करील. पण मानेंच्या आडून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला बदनाम करण्याचे पाप लोकसत्तेने करू नये.  
लोकसत्तेच्या वेबसाईटवर +साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा+ हा अग्रलेख ब्लॉक केल्यामुळे उघडत नाही. उघडण्याचा प्रयत्न केल्यास असा संदेश संगणकावर उमटतो. या अग्रलेखाच्या वरचा आणि खालचा असे दोन्ही अग्रलेख मात्र उघडतात.
..................................................................................
बहुजन समाजातील नेत्यांची आणि महापुरुषांची बदनामी करायची. बहुजनांच्या श्रद्धास्थानांची विटंबणा करायची, असे उद्योग हे वृत्तपत्र गेली काही वर्षे करीत आहे. अनिता पाटील विचार मंचाविषयी विषारी प्रचार करणारा एक लेख +वाचावे नेटके+ या सदरातून लोकसत्तेने गेल्यावर्षी लिहिला होता. त्यानंतर महात्मा फुले यांची बदनामी करणारा एक लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला. अनिता पाटील विचार मंचाचे मुख्य संपादक प्रा. रविन्द्र तहकीक यांनी त्याचा परखड समाचार ब्लॉगवर घेतला होता. सगळीकडून बोंबाबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते.

Saturday, 13 April 2013

या लोकसत्ताच्या तर मायला ….

 - प्रा. रवींद्र तहकिक


राहुल गांधीला ह भ प ही उपाधी लाऊन लोकसत्तातील संघोट्यानि महाराष्ट्रातील वारकरी
संप्रदायाचा अवमान केला आहे , मुळात राहुल गांधी हरीभक्त नाहीत, त्यात पारायण असण्याचाही
काही संबंध नाही, बरे त्यांनी काही बाष्कळ किंवा अर्थहीन बडबड केली असेल तर त्यावरून ते कोणत्या अर्थाने ह भ प ठरतात हे तरी लोकसत्तात बसलेल्या बेअक्कल अग्रलेखकांनी आम्हाला 
सांगावे, आम्हाला जी माहिती आहे त्या प्रमाणे महाराष्ट्रातील कोणीही ह भ प उपाधी असणारे
कीर्तनकार कोणतीही बाष्कळ व अर्थहिन बडबड करीत नाहीत, करतात ते बहुजनांच्या भाषेत
बहुजनांचे प्रबोधनच,     बाष्कळ अर्थहिन आणि फालतू बकबक करत असतील तर ते ब्राम्हणी पद्धतीने पोथ्या  पुराणांचे प्रवचन करणारे पोटभरू पुराणिक आणि स्वतःला पंडित म्हणवणारे शास्री, सात्यानारायानाच्या पोथ्या सांगताना नाकात चिंच खुपसल्या सारखा किन्नरा आवाज काढत
आणि ढुंगण हलवत पादत राव तूप साखर तेल डाळी चा किराणा भरणारे भट भिक्षुक आणि
सर्व सामान्य बहुजानाचे प्रबोधन करणाऱ्या ह भ प मध्ये काही फरक आहे याची लोकसत्तातल्या
संघोट्याना माहिती नाही असे नाही, हे सत्य त्यांना चांगले माहिती आहे. परंतु एखादी रंडी आपल्या
उठवळ वागण्याचे समर्थन करण्या साठी पतिव्रता तरी आमच्या पेक्षा वेगळे काय करतात ?
आम्ही फक्त पुरुष बदलतो असे म्हणू लागल्या तर त्यावर शहाण्याने काय बोलावे ?

         लोकसत्तातील संघोट्याचा कांगावा अगदी याच प्रकारातला आहे. पोटभरू किराणा भरू
गाव जोशी भट भिक्षुक आणि ह भ प यांच्यात काही फरक नाही हे दर्शवण्या साठी त्या महामूर्ख
संपादकाने राहुल गांधीना ह भ प असे मुद्दाम म्हटले आहे , आश्या अभक्त अभद्र बोलणार्या
ब्राम्हणाला नक्कीच एखाद्या रांडेने प्रसवले असले पाहिजे.     

हा अग्रलेख वाचून आम्हाला शाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली. दादा कोंडके यांनी हा अग्रलेख वाचला असता तर ते नक्कीच म्हणाले असते : या लोकसत्ताच्या तर मायला ….

Thursday, 11 April 2013

लोकसत्तेचा पुन्हा खोडसाळपणा : वारकरी उपाधीचा मुद्दाम केला अवमान!

ब्राह्मणवादी लोकसत्तेचा त्रिवार निषेध 

दैनिक "लोकसत्ता"कडून बहुजन समाजाच्या श्रद्धा स्थानांवर सातत्याने हल्ले होत अहेत. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा एक लेख लोकसत्तेत छाचापून आला होता. या लेखावर सर्वप्रथम याच ब्लॉगवरून आवाज उठविण्यात आला होता. सगळी कडून बोबबोंब झाल्यानंतर लोकसत्तेने माफी मागून हे प्रकरण मिटविले होते. आता लोकसत्तेने वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजीच्या अग्रलेखात लोकसत्तेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना "ह.भ.प." ही उपाधी लावली आहे. अग्रलेखाचा मथळाच "ह.भ.प. राहुलबाबा" असा आहे. राहुल गांधी यांचे भाषण हे निरर्थक प्रवचन आहे, अशी टीका करण्यासाठी लोकसत्तेने या उपाधीचा आधार घेतला आहे. 

वारकरी परंपरेवर ब्राह्मणांचा राग

"ह.भ.प." ही वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांना लावली जाणारी पवित्र उपाधी आहे. तसेच वारकरी कीर्तन-प्रवचनांत निरर्थक बडबड नसते. समतेची शिकवण कीर्तन-प्रवचनकार देत असतात. ब्राह्मणी व्यवस्थेला धक्के देण्याचे काम वारकरी परंपरेने केले आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा वारकरी परंपरेवर विशेष राग आहे. लोकसत्ता हे वृत्तपत्र अलीकडे ब्राह्मणांचे मुखपत्र बनले आहे. त्यातून बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर असे हिणकस हल्ले हे वृत्तपत्र करीत आहे. 

दिवाळखोर संपादक 

राहुल गांधी यांना ह.भ.प. संबोधण्यामागे लोकसत्तेची हीच ब्राह्मणी हिणकस वृत्ती दिसून येते. लोकसत्तेचे संपादक राहुल गांधींना "शास्त्रीबुवा" अशी पदवी का देअत नहित. "शास्त्रीबुवा" ही पदवी ब्राह्मण लवतात. मग तिचा अवमान लोकसत्तेचे ब्राह्मण कसे करतील? वारकरी शिकवण ज्यांना निरर्थक बडबड वाटते त्या संपादकाच्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे, असे म्हणावे लगते. 

वारकरी उपाधीचा अवमान केल्याबद्दल आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तेचा मूळ अग्रलेख असा :

ह.भ.प. राहुलबाबा

मुंबई
Published: Friday, April 5, 2013

माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे आहे..
एखाद्या विषयात आपण कच्चे आहोत याचे प्रांजळ भान आले म्हणजे त्या विषयात प्रगती होते असे नाही. राहुल गांधी यांच्या उद्योग महासंघाच्या मेळाव्यात गुरुवारी केलेल्या भाषणाकडे या नजरेने पाहावयास हवे. राहुल गांधी पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या उद्योजकांच्या मेळाव्यास सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. केवळ चांगले 

भाषण इतक्याच अर्थाने पाहिल्यास त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे म्हणावयास हवे. परंतु ज्याच्या हाती सत्तेची दोरी आहे त्याचे मूल्यमापन केवळ चांगल्या भाषणावर करून चालत नाही. त्या भाषणातील विचारास साजेशी त्याची कृती आहे का, हेही पाहावे लागते. तो विचार केल्यास राहुल गांधी यांचे मूल्यमापन भाषणाच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी सत्ता हे विष आहे असे चमकदार विधान करू न सर्वानाच धक्का दिला होता. पुढे जाऊन त्या विषाचे सेवन आपण वा आपला पक्ष करणार की नाही, याबाबत त्यांनी अर्थातच मौन पाळले. खेरीज, या विषापासून वाचण्यासाठी काय करायला हवे याचेही मार्गदर्शन त्यांनी स्वपक्षीयांना केले नाही. ज्या घराण्याने स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सत्ता दोनतृतीयांशपेक्षा अधिक वर्षे भोगली आहे त्या घराण्याच्या वारशाने सत्तेस विष ठरवल्यास त्यातून बातमीसाठी चांगला मथळा मिळतो. अधिक काही होत नाही. राहुल गांधी यांच्या कालच्या उद्योगपतींसमोरच्या भाषणाबाबतही अशीच प्रतिक्रिया निर्माण झाल्यास नवल म्हणता येणार नाही. 

देशातील राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे आणि ती सामान्यांची दखल घेत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते खरेच आहे. पण या वास्तवाच्या कबुलीमुळे एक प्रश्न निर्माण होतो. तो असा की जे कुटुंब राजकीय सत्ताधिकाराच्या केंद्रस्थानी आहे त्या घराण्याने ही तुंबलेली राजकीय व्यवस्था साफ करण्यासाठी काय केले? सध्या हे घराणे थेट सत्तास्थानी नसेल. पण सत्तेच्या दोऱ्या आणि चाव्या याच घराण्याच्या हाती आहेत. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून वा ज्या राज्यात आपली सरकारे आहेत तेथील मुख्यमंत्र्यांना सांगून हा सत्तेचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल यासाठी राहुल गांधी यांनी कोणते उपाय योजले. ही व्यवस्था सुधारण्याची मागणी राहुल गांधी यांनी पहिल्यांदा केली, त्यालाही बराच काळ लोटला. भावी पक्षनेतृत्वाच्या मताची दखल घेऊन याबाबत काँग्रेसने काही केले असेही झालेले नाही. आणि दुसरे असे की राजकीय व्यवस्था तुंबलेली आहे, हे सत्य जनसामान्यांना माहीत नव्हते असेही नाही. तेव्हा यात बदल करण्याचा कोणताही मार्ग न दाखवता वा उपाय न सुचवता पुन्हा तोच मुद्दा मांडण्यात काय हशील? कोणताही राजकीय निरीक्षक असो वा कार्यकर्ता वा सामान्य नागरिक. त्याचेही हेच मत आहे. तेव्हा ते मांडण्यासाठी राहुल गांधी असण्याची गरजच काय?
सत्ता व्यक्तिकेंद्रित राहून काही होणार नाही, देशभरातील नागरिकांना सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे हे टाळ्याखाऊ वाक्य राहुल गांधी यांनी गुरुवारीही उच्चारले. परंतु म्हणजे काय करायचे? प्रत्येक प्रश्नावर, प्रशासकीय निर्णयावर तो निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने जनमत घ्यावयाचे काय? हाच जर समजा मार्ग असेल तर तो भारताचा आकार लक्षात घेता एकदम केंद्रीय पातळीवर राबवणे शक्य नाही, हे समजण्यासारखे आहे. परंतु मग राहुल गांधी यांनी ज्या राज्यांत आपली सत्ता आहे त्या राज्यात अशा प्रकारची सुरुवात करून उदाहरण का नाही घालून दिले? त्यासाठी त्यांना कोणी मनाई केली होती काय? याबाबतही ढळढळीत विरोधाभास असा की जी मते राहुल गांधी मांडतात त्याच्या बरोबर उलट सरकारचे वागणे आहे. तेव्हा जनतेने काय समजावयाचे? सामान्यांस सक्षम केले पाहिजे असे राहुल गांधी सांगतात. परंतु सरकार मात्र वेगवेगळय़ा अनुदान योजना आखून जनतेस खिरापत वाटण्यात धन्यता मानते, हे कसे? काल जे उपदेशामृत राहुल गांधी यांनी उद्योग जगताला पाजले ते आपल्याच पक्षाच्या सरकारला पाजणे अधिक सोपे असे त्यांना वाटत नाही काय? याच उद्योग जगतासमोर बुधवारी बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धोरणलकव्याने त्रस्त झालेल्या उद्योजकांना सल्ला दिला, माझ्यावर विश्वास ठेवा. गुरुवारी राहुल गांधी यांनी बरोबर त्याच्या उलट विधान केले. मनमोहन सिंग यांच्या एकटय़ाकडे अधिकार देऊनही ते काही करू शकणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी काल ठणकावून सांगितले. त्यामुळे तर अर्थविश्वाची अधिकच गोची झाली असणार. माझ्यावर विश्वास ठेवा, या पंतप्रधानांच्या विधानावर हायसे मानावे तर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी जाहीर करतात त्यांच्याकडून काही होणार नाही. हे वास्तव अधिकच गोंधळात टाकणारे. असे सांगताना नरेंद्र मोदी यांचा पुळका असलेल्या उद्योग क्षेत्रालाही त्यांनी सुनावले. घोडय़ावरून येणारा कोणी एखादा आपल्या सर्व समस्या सोडवेल असा तुमचा ग्रह असेल तर तसे होणारे नाही, असे या ज्यु. गांधी यांना वाटते. मत म्हणून त्याचा आदर करण्यास कोणाचाच प्रत्यवाय असणार नाही. परंतु मुद्दा असा की काय केल्याने काय होणार नाही याचे पुरेसे भान आता अनेकांना आलेले आहे. प्रश्न आहे तो काय केल्याने काय होईल आणि ते कसे करता येईल हे उपाय सांगण्याचा. तो उपाय मात्र काही त्यांनी या वेळी सांगितला नाही. विकास सर्वसमावेशक, सर्वाना बरोबर घेऊन जाणारा हवा असाही सल्ला राहुल गांधी यांनी उपस्थितांना दिला. हे कसे करायचे याचेही दोनचार पर्याय त्यांनी सुचवले असते तर अधिक चांगले झाले असते. कारण आकाशातील दूरसंचार लहरी असो वा पाताळातील कोळसा. कोणत्याच क्षेत्राबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने विकासाचा गाडा आपल्याकडे बराच काळ अडलेला आहे. अशा वेळी सर्वसमावेशक विकास कसा करायचा याच्या मार्गदर्शनाचीही नितांत गरज होती. वेगवेगळय़ा समस्यांवरील उपायांसाठी सर्वाशी चर्चा करायला हवी, असेही मत त्यांनी मांडले. योग्यच आहे ते. परंतु सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षाने या संदर्भात विरोधकांना किती वेळा आणि कोणत्या प्रश्नावर चर्चेचे निमंत्रण दिले हेही कळावयास हवे. आर्थिक क्षेत्राबाबत भारत हा हत्ती नाही तर मधमाश्यांचे पोळे आहे, असा दृष्टान्त राहुल गांधी यांनी दिला. ते मान्य केले तर हे मधाचे पोळे कशाला चिकटलेले आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी काय आहे हे समजून घेण्याचीही आवश्यकता आहे. आणि पुन्हा या पोळय़ाची राणीमाशी कोण, हा प्रश्नदेखील उरतोच. तो अर्थातच राहुल गांधी यांनी आपल्यावर सोडला आहे. 
वास्तविक उद्योग जगत असो वा देश. आज गरज आहे ती समस्या काय आहेत येथपर्यंतच मर्यादित न राहता त्यावर मार्ग काय हे सांगणाऱ्यांची. राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या याबाबत. परंतु आतापर्यंत सातत्याने राहुल गांधी त्याबाबत कमी पडताना दिसतात. देशाला पुढे न्यायची त्यांची खरोखरच इच्छा असेल तर त्यांनी स्वत: अथवा पक्षाकडून ठोस काही कृती करून दाखवावी. अन्यथा हे ह.भ.प. राहुलबाबा यांचे आणखी एक प्रवचन ठरेल.


लोकसत्तेच्या बहुजन विरोधी कारवाया येथे वाचा :

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान
वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे...