Tuesday 23 July 2013

तानाजी मालुसरे यांचा इतिहास नाकारणा-या रा. चिं. ढेरेला कोण धडा शिकविणार?

लोकसत्तेचे ब्राह्मणी कुटिरोद्योग सुरूच


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

रा. चिं.. ढेरे 
लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांचा अवमान केला आहे. र्कोढणा किल्ला सर करताना तानाजी धारातीर्थी पडले, म्हणून शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले, असा इतिहास आहे. ‘गड आला पण सिंह गेला', असे शिवरायांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. लोकसत्तेला मात्र हे मान्य नाही. रा. चिं.. ढेरे नावाच्या एका तोतया संशोधकाचा हवाला देऊन लोकसत्तेने २१ जुलैच्या अंकात अन्वयार्थ या सदरात एक संपादकीय लेख प्रसिद्ध केला आहे. कोंढाणा किल्ल्यावर नरसिंहाचे मंदिर होते, त्यावरून शिवरायांनी या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. तानाजीचा पराक्रम दुर्लक्षित करण्यासाठीच हा उपद्व्याप ढेरे आणि लोकसत्तेने केला हे उघड आहे.

नरसिंहाच्या मंदिरावरूनच कोंढाण्याचे  नाव सिंहगड असे ठेवले गेले, याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ढेरे बुवांकडे आहेत, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. अशी कागदपत्रे नेमकी ब्राह्मणांकडेच कशी चालत येतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सिंहगडाचे नाव ठेवण्यापूर्वी शिवरायांनी काही कागदपत्रे तयार करून, ही कागदपत्रे २१ व्या शतकात रा. चिं. ढेरे नावाच्या बुवाच्या हाती पडतील, अशी काही व्यवस्था करून ठेवली होती का? बोगस कागदपत्रे तयार करायची आणि त्यावरून बोगस इतिहास लिहायचा, असे उद्योग ब्राह्मणमंडळी गेली शेकडो वर्षे करीत आहेत. रा. चिं. ढेरे हे बुवाही याच मालिकेतील एक मणी आहेत. 

लोकसत्ता या दैनिकाकडून मराठा समाज तसेच अन्य बहुजन समाजातील महापुरूषांना अपमानित करण्याचा ब्राह्मणी कुटिरोद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मागे महात्मा फुले यांचा अवमान करणारा लेख लोकसत्तेने प्रसिद्ध केला होता. त्यावर नंतर लोकसत्ताकारांना माफीही मागावी लागली होती. आता पुन्हा हाच खोडसाळपणा लोकसत्तेने केला आहे. आम्ही लोकसत्तेचा जाहीर निषेध करीत आहोत.

लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख येथे वाचा


संबधित लेख

1 comment:

  1. आपण कोणत्या विचारानी प्रेरित आहात समजत नाही

    त्यांच्या कड़े काही पुरावे असतील तर ते तपासून पहाता येतील आणि ते खोटे कसे आहेत हे तुम्हाला सिद्ध पण करता येईल

    त्यांच्या कड़े पुरावे येतात कारण ते लोक मेहनत करुण पुरावे आणि कागदपत्र शोधतात आणि त्याचा आभ्यास करतात

    कोंढाणा किल्ल्याचा उल्लेख सिंहगड असा तानाजी मालुसरें च्या मृत्यु पूर्वी पण आला आहे हे माझ्या सारख्या सामान्य वाचकाला पण माहीत आहे

    असे खोटे पुरावे तैयार करता येतात का.??
    कागदपत्र किती जुनि आहेत हे न तपासता कोणीही मान्य करणार आहे का..??
    आणि जर असे पुरावे तैयार करता येत असतील तर मग तुम्ही पण तैयार करा
    आणि संपूर्ण इतिहासच तुम्हाला पाहिजे तसा लिहा

    काही पण क्षुल्लक गोष्टी वरुण वातावरण पेटवून आणि बामनाना शिव्या देऊन काय साध्य करता तुम्ही मला काही समजत नाही
    त्यापेक्षा आपल्या समाजाच्या लोकांना शिक्षण उपलब्ध करुण दया
    त्याना नोकरया दया
    हे होईल समाजकार्य

    तुम्ही आपल्याच लोकांची माथी भडकवता म्हणजे त्यानी काही गुन्हा केला तर त्याला जबाबदार कोण..??

    ReplyDelete