Wednesday 24 July 2013

गुजरात महिमा: एका नापास विद्यार्थ्याची गोष्ट

- श्री. महावीर सांगलीकर, (अभ्यासक, विचारवंत)


मोदींच्या काळात गुजरातने प्रचंड प्रगती केली असा आभास तयार करण्यात आला आहे. पण आपण गुजरात विषयक कांही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही. गुजराती लोक सैन्यात भरती होत नाहीत. देशासाठी रक्त सांडायला हे लोक कधीच तयार होत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये गुजरातचे शहीद सैनिक दिसत नाहीत. आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार?

स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात भारताच्या प्रत्येक प्रदेशात अनेक क्रांतिकारक झाले, त्यांनी छातीवर गोळ्या खाल्ल्या, फासावर चढले, पण गुजरातमध्ये असे झाले नाही.

मुंबई मध्ये सुमारे तीस टक्के लोक गुजराती आहेत. मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेंव्हा जे लढले, त्यात गुजराती कुठे होते? मुंबई पोलिसांत अगदी पंजाबी, तमिळ लोक दिसतात, पण गुजराती पोलिस, पोलिस अधिकारी कधी दिसला आहे का? म्हणजे इतरांनी आमचे संरक्षण करावे, मरावे, आम्ही आपला पैसा कमावत रहाणार अशा विचारांचे हे लोक आहेत. दमडी जाये पर चमडी न जाये.

मोदी  हे कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत. पण आपण मनोरंजनासाठी असे मानले की मोदी पंतप्रधान झाले, तर हे नक्की आहे की ते युद्ध उकरून काढतील. या युद्धात देशभरचे अनेक सैनिक मरतील, अपंग होतील, पण यात मोदींच्या गुजरातचे काय जाणार आहे? या युद्धात एकही गुजराती मरणार नाही.

महाराष्ट्र, पंजाब आणि इतर अनेक प्रदेशातील लोकांसाठी सैन्याच्या अनेक रेजीमेंट्स आहेत. मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, बॉम्बे स्यापर्स, पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, राजपुताना रायफल्स, आसाम रायफल्स, जम्मू-काश्मीर रायफल्स वगैरे वगैरे. गुजरातचे काय?  1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

जी गोष्ट संरक्षण क्षेत्रात गुजरातच्या योगदानाची तीच गोष्ट खेळातील. भारताला ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदके मिळवून देण्याच्या वल्गना मोदी करतात, पण आज पर्यंत ऑलिम्पिक राहो, पण आशियाई खेळात देखील एकाही गुजराती खेळाडूने सुवर्ण तर जावो, कास्य पदकही मिळवले नाही.  ज्या लोकांसाठी पैसा हाच खेळ आहे, त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही. मुळात गुजराती खेळाडू असतातच कोठे?

कला, क्रीडा, साहित्य, साहस, विज्ञान अशा सगळ्याच विषयात गुजरात नापास आहे.

येथे सांगायचा उद्देश हाच आहे की मोदी लोकांना मूर्ख बनवत आहेत, आणि अनेक लोक समजून-सवरून मूर्ख बनत आहेत. गुजरातची अवस्था त्या विद्यार्थ्यांसारखी आहे की जे विद्यार्थी एखाद्या विषयात ब-यापैकी मार्क मिळवतात, पण बाकी सगळ्या विषयांमध्ये नापास होतात. मग तो नापास विद्यार्थी एका विषयाच्या जोरावर आपण कसे हुशार आहोत हे सांगत सुटतो. त्याचे ऐकून कमी समज असणारे लोक सगळ्या विषयांमध्ये चांगल्या मार्काने पास होणा-या विद्यार्थ्यांपेक्षा या नापास विद्यार्थ्याने अभ्यासात चांगलीच प्रगती केली आहे असे समजू लागतात.  

(महाविचार या ब्लॉग वरून साभार)


श्री. महावीर सांगलीकर यांचे आणखी काही लेख


1 comment:

  1. ACTUAL REALITY CAME IN FRONT OF US DUE TO THIS ARTICLE!!!!!!!!!!!!THANKS!!!!!!!!

    ReplyDelete