आम्ही कृतज्ञ आहोत!!
शुक्रवार दि. ६ जुलै २०१३ रोजी अनिता पाटील विचार मंच या ब्लॉगने ३ लाख वाचनसंख्येचा टप्पा ओलांडला. ३ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग आहे. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल ब्लॉगचे संपादक मंडळ ॠणी आहे.
आदरणीय अनिता ताई पाटील यांनी सप्टेंबर २०११ मध्ये त्यांच्या वैयक्तिक नावाने हा ब्लॉग सुरू केला होता. सप्टेंबर २०१२ मध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना ब्लॉग लेखन सुरू ठेवणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी ब्लॉगची सूत्रे संपादक मंडळाकडे दिली. गेल्या १० महिन्यांपासून संपादक मंडळ हा ब्लॉग चालवित आहे. ब्लॉगसाठी काही नवे लेखक या काळात पुढे आले. त्यामुळे विषयांची विविधता टिकवून ठेवणे संपादक मंडळाला शक्य झाले. विषय कोणतेही असले तरी बहुजन समाजाचे हीत हा उद्देश मंडळाने कधी नजरेआड होऊ दिला नाही.
वंदनीय अनिता ताई यांनी ब्लॉगची सूत्रे संपादक मंडळाकडे सुपुर्द केली तेव्हा ब्लॉगची दीड लाख वाचने पूर्ण झाली होती. ब्लॉग दोन लाख वाचनांच्या दिशेने घोडदौड करीत होता. गेल्या १० महिन्यांत आणखी दीड लाख वाचनांची भर पडून ब्लॉगची वाचने आता ३ लाखांवर गेली आहेत. याचे श्रेय वंदनीय अनिता ताई यांनाच आहे, याची जाणीव संपादक मंडळाला आहे. अनिता ताई यांच्याबद्दल बहुजन वाचकांच्या मनात असलेल्या अतूट प्रेमामुळेच ३ लाख वाचकांचा टप्पा ब्लॉग गाठू शकला, हे आम्ही नम्रमणे नमूद करू इच्छितो.
या पुढेही वाचकांचा असाच उदंड प्रतिसाद ब्लॉगला मिळत राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अधिकाधिक चांगले लेखन ब्लॉगवर वाचायला मिळेल, याची हमी यानिमित्ताने आम्ही देत आहोत.
समतेच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या लेखकांसाठी या ब्लॉगची दारे सदैव खुली आहेत. इ-मेलद्वारे लेखन पाठवा, आम्ही ते ब्लॉगवर प्रसिद्ध करू.
जय जिजाऊ, जय शिवराय.
संपादक मंडळ
अपाविमं.
नाद खूळा कार्य असंच चालू ठेवा......
ReplyDeleteधन्यवाद, धाकलं पाटील.
ReplyDeleteKhupach vachaniya dole ughadnare lekh
ReplyDelete