छत्रपती शिवाजी महाराज यांना +हिन्दवी स्वराज्य संस्थापक+ अशी पदवी आपल्या इतिहासाच्या पुस्तकात लावली गेली आहे. हिन्दवी स्वराज्य म्हणजे काय आणि हा शब्द आला कोठून हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. +हिन्दवी स्वराज्य+ हा शब्द आपल्या पुस्तकात इतका रुळला आहे की, तो आपल्याला मराठीच वाटतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. +हिन्दवी+ हा शब्द फारशी आहे. फारशी ही भाषा अरबी भाषेपासून आली आहे. मोगलांच्या दरबारातील लिखाणाची ती भाषा होती.
+हिन्दवी+ हा शब्द +हिन्दू+ या शब्दापासून बनला आहे. हिन्दू या शब्दाला +वी+ हा प्रत्यय लागून हिन्दवी हा शब्द बनला. त्याचा अर्थ आहे हिन्दूंचा, हिन्दूंचे. फारशी आणि अरबी भाषांत +वी+ हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. मराठीत +चा, ची, चे+ हे षष्ठीचे प्रत्यय आहेत. त्यावरून घर-घराचा, गाव-गावाचा अशी शब्दरूपे बनतात. फारशी आणि अरबीत +वी+ हा प्रत्यय जोडून अशी शब्दरूपे होतात. उदा. लखनवी, गझनवी. मराठीत लखनवीचा अर्थ होतो लखनौचा तसेच गझनवीचा अर्थ होतो गझनीचा. मोहंमद गझनवी याला आपण गझनीचा मोहंमद असे म्हणतो.
या विवेचनावरून असे लक्षात येते की, +हिन्दवी स्वराज्य+ या शब्दाचा अर्थ आहे +हिन्दूंचे स्वराज्य+ येथे प्रश्न असा निर्माण होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरेच हिन्दूंचे स्वराज्य स्थापन केले होते का? अजिबात नाही. छत्रपती शिवराय धर्मवादी नव्हते. महाराज सर्वच धर्मांचा समान पातळीवर सन्मान करीत असत. महाराजांनी स्वत:ला कधीही केवळ हिन्दूंचा राजा असे म्हणवून घेतले नाही. आपल्या राज्याला +हिन्दूंचे राज्य+ असेही त्यांनी कधी म्हणवून घेतले नाही. त्यांनी फक्त +राज्य+ हाच शब्द वापरला आहे. +हिन्दवी स्वराज्य+ ही बिरुदावलीच बोगस आहे. ती महाराजांनी वा त्यांच्या समकालीन इतिहासकारांनी कधीही वापरलेली नाही.
+हिन्दवी स्वराज्य+ ही संकल्पना आणि +हिन्दवी स्वराज्य संस्थापकङ्क ही बिरुदावली महाराष्ट्राबाहेरील कोणताही इतिहासकार वापरीत नाही. केवळ महाराष्ट्रातील पुरंदरीछाप जातीयवादी इतिहासकारच महाराजांना ही उपाधी लावतात. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळात बहुतांश पुरंदरीछाप जातीयवाद्यांचा भरणा होता. त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात महाराजांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी +हिन्दवी स्वराज्य+ ही बोगस संकल्पना निर्माण केली. महाराजांनी बदनामी करणे, हाही एक अंतस्थ हेतू या उपद्व्यापामागे दिसतो.
बहुजनांनी या जातीय इतिहासातून आपण लवकर बाहेर पडले पाहिजे.
thanks for information
ReplyDelete