Tuesday, 23 July 2013

तुकोबांना 'तुक्या' म्हणणारा हा हलकट जोशी कोण?

लोकप्रभा-लोकसत्ताकडून मराठा समाजाचा पुन्हा अवमान

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

मराठा समाजातील आणि अन्य बहुजन समाजातील महापुरूषांचा अवमान करण्याचे सत्रच एक्सप्रेस समूहातील लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांनी सुरू केले आहे. या दोन्ही पत्रांचा ब्राह्मणी जातीयवाद या ब्लॉगवरून आम्ही वारंवार जगजाहीर केला आहे. लोकप्रभेने आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा घोर अवमान केला आहे.

तुकोबांचा उल्लेख तुक्या असा करणारा हाच तो लोकप्रभामधील लेख.
लोकप्रभाचा १९ जुलैचा अंक आषाढी यात्रा विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात सुहास जोशी यांचा संत तुकोबांवर एक लेख आहे. ‘सांगे तुक्याचा वारसा' असा या लेखाचा मथळा आहे. हा मथळा अत्यंत आक्षेपार्ह आहे. तुकाराम महाराजांचा उल्लेख ‘तुक्या' असा एकेरी आणि तुच्छतापूर्ण यात करण्यात आला आहे.  एखाद्या गल्लीतील पोराचा उल्लेख करावा त्याप्रमाणे तुकोबांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. या लेखाचे लेखक सुहास जोशी आहेत. या जोशीबुवांनी मुद्दामच तुकोबांचा अवमान केला आहे, हे सांगायला कोण्या कुडमुड्या जोश्याची गरज नाही. अनिता पाटील विचार मंचच्या वतीने आम्ही लोकप्रभाचे संपादक विनायक परब आणि या लेखाचे लेखक सुहास जोशी यांचा जाहीर निषेध करीत आहोत. 


संबधित लेख

No comments:

Post a Comment