Showing posts with label A) संपादक मंडळाचे निवेदन. Show all posts
Showing posts with label A) संपादक मंडळाचे निवेदन. Show all posts

Friday, 6 December 2019

पुनश्च ‘भीमनिर्धार’! आम्ही परतलो आहोत!!

४ डिसेंबर २0१४ रोजी लेखणी पाच वर्षांसाठी म्यान करण्याचा निर्णय ‘अनिता पाटील विचार मंच’च्या संपादकांनी जाहीर केला होता. राज्य जातीयवाद्यांनी बळकावल्यामुळे व्यथित होऊन अत्यंत जड अंत:करणाने हा निर्णय आम्हाला तेव्हा घ्यावा लागला होता. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरील जातीयवाद्यांचे हे काळे ढग आता दूर झाले असून आम्ही पुन्हा लेखनी हातात घेत आहोत. आज बहुजनांचे कैवारी, विश्ववंद्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांच्या पवित्र आणि पावन स्मृतींना अभिवादन करून आम्ही लेखनाचा पुनश्च ‘भीमनिर्धार’ करीत आहोत.

वाचकांचे प्रेम आमच्यासोबत आहेच. मागील संपूर्ण पाच वर्षांत एकही नवा लेख ब्लॉगवर टाकला गेला नाही, तरीही वाचकांचा ओघ ब्लॉगवर कायम होता. आम्ही लेखनी बंद केली तेव्हा ब्लॉगने पाच लाख वाचनांचा टप्पा नुकताच (१६ सप्टेंबर २0१४ रोजी) पूर्ण केलेला होता. मागील पाच वर्षांत आणखी पाच लाख वाचनांची भर पडली आहे. ब्लॉग आता १0 लाख वाचने पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज ६ डिसेंबर २0१९ रोजी ब्लॉगची वाचन संख्या ९ लाख ९२ हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे.

असो. आपले प्रेम असेच मिळत राहील, या खात्रीसह आपल्या सेवेस पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सुरूवात करीत आहोत.

-संपादक मंडळ, अपाविमं.

Tuesday, 16 September 2014

अपाविमंने पूर्ण केली ५ लाख वाचने!

सप्टेंबर २०१४ च्या उदयाबरोबर 'अनिता पाटील विचार मंच'ने ५ लाख वाचनांचा टप्पा ओलांडला. ५ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग ठरला आहे. अवघ्या ३ वर्षांच्या अवधीत ५ लाख वाचने पूर्ण करणाराही हा मराठीतल एकमेव ब्लॉग आहे. वाचकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणे आम्हाला शक्य झाले. आम्ही सन्माननीय वाचकांचे ऋणी आहोत. हे प्रेम असेच टिकून राहील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. 

गेली दोन वर्षे संपादक मंडळ ब्लॉगचे काम पाहत असला तरी ब्लॉगच्या यशाच्या खऱ्या शिल्पकार ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील याच आहेत. महाराष्ट्राच्या मनात सलत असलेले प्रश्न अनिता ताई यांनी शोधून काढले. या प्रश्नांचा मूलगामी वेध घेऊन साध्या सोप्या शैलीत लेखन केले. ब्लॉगच्या तांत्रिक मांडणी आणि देखणेपणाकडेही तार्इंनी विशेष लक्ष दिले होते. अनिता ताई यांनी या ब्लॉगला दिलेल्या या आकारातच ब्लॉगचे यश सामावलेले आहे. 

अनिता ताई यांचा लेखनाचा झपाटाही मोठा. अवघ्या वर्षभराच्या काळात त्यांनी तब्बल १५० लेख ब्लॉगवर पोस्ट केले होते. हे सर्व लेखन तार्इंनी एकहाती केले होते. तसेच सर्व लेखांचे विषयही अत्यंत मूलभूत होते. तार्इंनी घालून दिलेल्या पायवाटेवरूनच संपादक मंडळ वाटचाल करीत आहे. ताई ब्लॉग लेखनापासून वेगळ्या झाल्या असल्या तरी, त्यांचे मार्गदर्शन संपादक मंडळाला नियमित लाभत आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक नवे विषय सूचविले, तसेच त्यांच्या मांडणीबाबतही मार्गदर्शन केले. संत जनाबाई यांच्या "घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिलापाशी ।।" या अभंग पंक्तीप्रमाणे त्यांचे बारीक लक्ष आहे, म्हणूनच संपादक मंडळ यशाच्या पायऱ्या चढू शकले. 

सन्याननीय वाचक आणि आदरणीय अनिता ताई पाटील यांचे ऋण व्यक्त करून हे निवेदन आम्ही येथेच संपवितो. 

-संपादक मंडळ, अनिता पाटील विचार मंच.

Tuesday, 18 September 2012

ब्लॉगचे लेखक व्हा

प्रबोधनाचे कार्य करीत असलेल्या अनिता पाटील विचार मंचावर आपणही लेखन करू शकता. समाजाला उपयुक्त ठरेल अशा कोणत्याही विषयावर लेख लिहून खालील कॉमेन्ट बॉक्सात टाका. योग्य लेखांना याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल. 

लेखन हे देवनागरी लिपीतच असले पाहिजे. रोमन (इंग्रजी) लिपीतील लेखनास प्रसिद्धी देणे शक्य होणार नाही. जी-मेल अकाउंटवर मराठी टायपिंग ची सोय आहे. 

- संपादक मंडळ, अपाविमं.