Sunday, 29 April 2012

गौरी किनगावकर हिची करुण कहाणी


बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांच्या वैदिक लग्नाची सत्यकथा माझ्या ब्लॉगवर काल प्रसिद्ध झाली. या कथेला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. ही गोष्ट काल्पनिक नाही. ही तिची जमेची बाजू. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून या गोष्टीवर प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी पत्रे लिहिली. त्यातलेच एक पत्र आहे गौरी किनगावकर हिचे. ब्राह्मणी दुतोंडीपणा, चहाटाळपणा आणि भेदभावाची आपबितीच गौरीने लिहिली आहे. गौरीच्या पत्राची सुरूवातच ‘अनिता आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू...ङ्क या वाक्याने होते. गौरी सांगते, तिचे वडील ब्राह्मण आहेत. तर आई सिन्धी. गौरीचे बोलते लिहिते ती मराठी-सिन्धी मिश्रीत भाषेत. गौरी म्हणते- +अनीता, ब्राह्मीन लोक तुझ्या ष्टोरीतील जोशी काका प्रमाने डुप्लीकेट असतात. बट (परंतु) त्यालाच ते डिप्लोमेट असे नाम देतात. मी हे स्वत:च्या एक्सपीरियन्सने बोलते...+ 

गौरीची मराठी भाषा मोडकी तोडकी आहे, पण तिच्या भावना सच्च्या आहेत. तिच्या कहाणीला ब्राह्मण बापाकडून मिळालेल्या दु:खाची आणि वेदनेची कडवट धार आहे. गौरीने स्वत: लिहिलेली तिची कहाणी खाली तिच्या शब्दांत देत आहे. वाचकांना ही कहाणी नीट समजावी यासाठी कंसात योग्य ती स्पष्टिकरणे लिहिली आहेत. तसेच काही प्रमाणात संपादन केले आहे. 

गौरी लिहिते - 

अनिता, आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू फॉर रायटिंग धीस रिअर फॅक्ट. अनिता, ब्राह्मीन लोक तुझ्या ष्टोरीतिल जोशी काका प्रमाने डुप्लीकेट असतात. बट (परंतु) त्यालाच ते डिप्लोमेट असे नाम देतात. मी हे स्वत:च्या एक्सपीरियन्सने बोलते...   

 ...माझे वडील ब्राह्मण आणि मदर qसधी आहे. माझ्या आजोबाचे (म्हणजेच आईच्या वडिलांचे) मुंबईत दादरला बेकरी अँड डेली नीड्सचे दुकान होते. माझे पापा (वडील) या दुकानात कामाला लागले. ते (गौरीचे वडील) बुलडाणा जिल्ह्यातील किनगावचे राहणारे होते. माझे आजोबांनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता. मग नंतर माझी मदर आणि पापाचे लव्ह मॅरेज होऊन गेले. (म्हणजेच, गौरीचे वडील एका qसधी व्यक्तीच्या बेकरीत नोकरीला लागले. आणि बेकरी मालकाचीच मुलगी पटवली! उपकाराची अशी परतफेड एक ब्राह्मणच करू शकतो!!) तेव्हा आजोबांनी काही म्हटले नाही. उलट इतकी इंम्पार्टंट जागा आणि स्टोअर त्यांनी आम्हाला देऊन टाकला. नंतर मी झाले, तेव्हा आजोबांनी नवा फ्लॅट पण घेऊन दिला. आता आजोबांचा बुढापा (म्हातारपण) झाला आहे. आणि माझे पापा आजोबांची पहचान (ओळख) विसरून गेले आहेत. मागे दीड वर्षाखाली आजोबांची बायपास सर्जरी झाली, तेव्हा पापांनी पैसा खर्च केला नाही. इतकेच नव्हे, तर ते आता बोलतात की, गौरी तुझे मॅरेज (लग्न) करीन तर ब्राह्मण मुलग्याशीच (मुलाशीच). आता माझे पापा स्वत:ला ब्राह्मण म्हणून प्रमोट करण्यासाठी खूप खटपटी लटपटी करतात.

...इकडे तर (एकीकडे) म्हणतात की, आता जमाना बदलला गेला आहे. पहिल्या सारख्या जाती-पाती काही राहिल्या नाहीत. अशाच प्रकारे काही बाही गोष्टी सांगून त्यांनी माझ्या मदरला पटवून शादी केली. आणि आता माझ्यासाठी मात्र जातीच्या अटी घालीत आहेत. बट (परंतु) मला आपली कहाणी (बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी हिची गोष्ट) वाचून कॉन्फिडन्स आला आहे. मी आता त्याला (बापाला) वैदिक शादीचा (बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांच्या लग्नाचा) रेफरन्स देऊ शकेन. आणि माझ्या ऑप्शनच्या मुलाशी शादी करू शकेन. बट (परंतु) अशी वैदिक शादी फक्त लडका लोग करू शकतो की लडकी लोग सुद्धा अशी शादी करू शकतो. मालूम नही. (मला माहीत नाही.) बट (पण), मला तर वाटते की, लडकीसुद्धा ऐसा करू शकते. 
........................समाप्त........................


एका चहाटाळ ब्राह्मणाने भोळ्या qसधी मुलीला कसे फसवले, याची करूण कहाणी गौरी सांगते. आपली आई फसली गेली. आजोबांची नुसतीच फसगत झाली नाही, तर आयुष्याची फरफटही झाली. याची तीव्र वेदना गौरीच्या कहाणीत आहे. अडनिड्या वयातील गौरीची समज उत्तम आहे. तिच्या हृदयात माणुसकीचे गोड शहाळे आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, चांगल्याला चांगले आणि वांगल्याला वांगले म्हणण्याची धमक तिच्यात आहे. आपला बाप चुकला म्हणून ती त्याला पाठीशी घालित नाही. गौरीला अनिता पाटीलकडून मानाचा मुजरा. गौरी, तुला लढण्यासाठी उदंड बळ मिळो. तुला तुझ्याच पसंतीचा नवरा मिळो. शिवचरणाशी हीच प्रार्थना. तुला काही मदत हवी असल्यास नक्की कळव. तुला हव्या त्या प्रकारची मदत दिली जाईल, याची खात्री बाळग.

अनिता पाटील

गौरी किनगावकर हिचे मूळ पत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


No comments:

Post a Comment