Saturday, 21 April 2012

अखेर मराठी भाषा संस्कृताच्या गुलामगिरीतून मुक्त होणार



मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासकांची समिती नेमली आहे. प्रा.हरी नरके हे तिचे समन्वयक आहेत. या समितीने कठोर अभ्यास करून मराठीला संस्कृत भाषेच्या जोखडातून मुक्त केले आहे. मराठी ही संस्कृती भाषेपासून जन्मलेली भाषा असल्याचे संस्कृताभिमानी ब्राह्मणांनी आजवर प्रचलित ठेवले होते. मराठीचे सर्व व्याकरण संस्कृतवरच बेतलेले आहे. त्यामुळे ते मराठी भाषिक विद्याथ्र्यांनाच काय विद्वानांनाही कळत नाही. संस्कृतच्या जोखडामुळे शालेय अभ्यासक्रमांत इंग्रजी, पाठोपाठ मराठी भाषा अप्रिय विषय ठरली आहे. वस्तुत: वारकरी संतांनी मराठीला कधीही संस्कृतची कन्या मानले नाही. ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा आणि त्यांच्या सर्व भावंडांचा आतोनात छळ केला. संत एकनाथांनी तर संस्कृताभिमान्या स्पष्टच सांगितले होते की, संस्कृतवाणी देवे केली ।। मराठी काय चोरापासून आली ।।

सर्वच वारकरी संत आणि महानुभाव पंथाचे विद्वानांनी मराठीत ग्रंथ रचना केल्या. स्वातंत्र्यानंतर मात्र, सरकारच्या अडाणीपणामुळे हितसंबंधी ब्राह्मणांनी फायदा घेतला आणि मराठीला संस्कृतपासून जन्मलेली भाषा म्हणून गुलाम बनिवण्यात आले. ही गुलामी संपणार, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. 

अमृतातेही पैजा जिंकणायारया  मायमराठीला प्रतिष्ठेचा ‘अभिजात भारतीय भाषेचा'  दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मराठी संस्कृतोद्?भव भाषा नसून, किमान दोन हजार वर्षांपासून ती मराठी मुलखाची लोकभाषा आहे, असा अभिजात मराठी भाषा समितीच्या सदस्यांचा तर्क साहित्य अकादमीच्या उच्चाधिकायांनी तत्त्वतः मान्य केला. याबाबतचा अंतिम प्रस्ताव दिल्लीला पाठविण्याची सूचना अकादमीने शुक्रवार दि. २० एप्रिल २०१२ रोजी केली आहे. 

दिल्लीच्या पातळीवरील हालचाली पाहता मायमराठीला भारतातील केवळ पाचवी ‘अभिजातङ्क भाषा, हा गौरव मिळणे नजरेच्या टप्प्यात आले आहे. तो प्राप्त होण्यासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी ही माहिती अधिकृतरित्या जारी केली आहे. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास तमीळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत यापाठोपाठ अभिजात भाषेचा दर्जा मिळविणारी मराठी ही पाचवी भाषा ठरेल. अभिजात भाषांच्या विकासासाठी केंद्रातर्फे दर वर्षी ५०० कोटींचा निधी दिला जातो.  प्रा. हरी नरके म्हणाले, की मल्याळी भाषेचा प्रस्ताव सरकारने नुकताच फेटाळला. तो पूर्वानुभव लक्षात घेऊन मराठीचा प्रस्ताव काटेकोरपणे तयार होत आहे. प्रा. नरके आणि राज्याचे सांस्कृतिक सचिव विजय नहाटा यांनी साहित्य अकादमीचे सचिव अग्रहार कृष्णमूर्ती २० एप्रिल रोजी चर्चा केली. केंद्र सरकारला अंतिम शिफारस करण्याचे सर्वाधिकार फक्त साहित्य अकादमीला आहेत, ही बाब येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

अनिता पाटील

1 comment:

  1. मराठी ची जननी पर्शियन

    ReplyDelete