Saturday 3 November 2012

हम्मो... हम्मो... हम्मो.. हम्मो... हम्मो! एका भटाची फटफजिती!!

 -प्रा. रवींद्र तहकिक

चिपळूणला होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे निकाल लागले आणि मराठी साहित्यातील एक जाणकार लेखक-समीक्षक, त्या पेक्षाही मराठीचे एक उत्तम आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक श्री. नागनाथ कोत्तापल्ले हे चिपळूण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. याचा आम्हाला फक्त ह. मो .मराठे हरला आणि कोत्तापल्ले जिंकले म्हणूनच आनंद आहे असे नव्हे. प्रा. डॉ. कोत्तापल्ले यांचे साहित्य आणि मराठी भाषेला दिलेले योगदान ह. मो. मराठेच्या तुलनेत कितीतरी पटीने दर्जेदार, उल्लेखनीय, सकारात्मक, दिशादर्शक, उर्ध्वगमनशाली आणि सर्वव्यापी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षणाचे महत्व समजलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि शिकून "आम्हाला डोकं आहे ते केवळ फेटे गुंडाळण्या साठी नाही'' हे स्वतःला सरस्वतीचे पुत्र मानणाऱ्या ब्राम्हणांना दाखवून देणाऱ्या बहुजनाच्या पहिल्या पिढीतील तरुणाचे कोत्तापल्ले हे आघाडीचे शिलेदार आहेत. म्हणूनच त्यांचे संमेलनाध्यक्ष होणे आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायक घटना आहे .
     
आता थोडे ह. मो. बद्दल. मागे एका लेखात आम्ही हमोबद्दल लिहिताना हा जातीयवादी लुत भरलेला कुत्रा साहित्य संमेलनाचा अध्यक्षच काय तिथे लेखकांनी खाऊन टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्या चाटण्याच्या सुध्धा लायकीचा नाही, असे म्हटले होते. आमचे विचार योग्यच होते हे आता मतदारांनीही दाखवून दिले आहे. मुळात हा ' भिकम भट ' साहित्य संमेलनाच्या निवडणुकीला उभाच का राहिला याचे आम्हाला सखेद आश्चर्य आहे. कदाचित त्याला असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे की बरेच मराठी लेखक, पत्रकार आणि साहित्य वर्तुळाशी संबधित लोक ( जे मतदार आहेत ) जातीने ब्राम्हण आहेत. वरतून पुन्हा साहित्य संमेलन चिपळूणला म्हणजे निमंत्रक मतदारातही भरपूर ब्राम्हण असणार. म्हणजे या वेळी आपण हळूच जानव्यात अंगठा घालून जरा कॉलरच्या वर काढून दाखवले आणि पुन्हा बेमालूमपणे आत सारले तर....आपली ही लबाडी कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि ब्राम्हणाची एकगठ्ठा मते मिळून आपण चक्क साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ!! गम्मत म्हणजे या मूर्ख ब्राम्हणाने आपली हे ''टॉयलेट थॉट'' आमलातही आणले. त्याने चक्क ब्राम्हणांना आवाहन करणारे एक पत्रकच काढले. त्यात आपण कसे अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू घेऊन सातत्याने साहित्य सेवा करीत आहोत, ब्राम्हणांनी आता कसे एक होणे गरजेचे आहे, याचा पाढा वाचला. पण कसचे काय अन कसचे काय! ह.मो.चे पत्रक त्याच्या स्वतःचा पराभवाची स्वतःच गायलेली नांदी ठरले. पुढच्या तीन अंकातही त्याचे चांगलेच तीन तेरा वाजले. वर्तमानपत्रातून, साहित्य वर्तुळातून, इतकेच काय एरव्ही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वसामान्य वाचक आणि समाजातूनही ह.मो. ची चांगलीच हजामत झाली. सर्वच स्तरातून छी-थू व्हायला लागल्या नंतर ह. मो. ताळ्यावर आला. त्याने जाहीर माफी मागितली; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्याची घाणीने भरलेली ''खुरे'' सगळ्यांना दिसली होती. त्यामुळे त्यावर कितीही रेशमी झुली घातल्या तरी ती झाकणार नव्हतीच! अखेर व्हायचे ते झालेच. ह .मो .ला फक्त १६४ भटांनी थारा दिला आणि कोत्तापल्ले सर ५८४ इतक्या दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. जानव्याने दुसऱ्याचा गळा कापायला निघालेल्या या ''भिकम भटा''ला त्याच जानव्याची फाशी बसली.

No comments:

Post a Comment