Saturday, 27 October 2012

वाघोबा वाघोबा किती वाजले ?

रक्त सांडायला बहुजन अन पदे भूषवायला ब्राह्मण !
 प्रा. रवींद्र तहकिक

 
त्यादिवशी अवघा महाराष्ट्र हळहळला.......प्रत्येक शिवसैनिक रडला....अगदी बाळासाहेबांनी ज्यांच्यावर कुठलेही विधिनिषेध न बाळगता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ( ठाकरी भाषा ) जहरी टीका केली, त्या विरोधकांच्या काळजातही बाळासाहेबांची असहायता पाहून चर्र sss झाले ..... बाळासाहेबांची साथ सोडून गेलेले भुजबळ -राणे -गणेश नाईक सारख्या एकेकाळच्या निष्ठावंत शिवसैनिकांनाही साहेबाची ती अवस्था पाहून रडू कोसळले असेल... जिथे निखील वागळे सारखा शिवसेना आणि बाळासाहेबांचा कट्टर द्वेषी ( मी विरोधी हा शब्द कटाक्षाने टाळलाय ) पत्रकार( ज्याला औरंगाबाद मध्ये १९९३ साली जिवंत जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता, त्याचे आदेश मातोश्री वरून निघाले होते असे म्हणतात ) तो देखील दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांची ध्वनीचित्र फीत आणि त्यातील त्यांचेअसहाय वक्तव्य ऐकून '' गलबलला तिथे इतरांची अवस्था मी म्हणतो तशी नक्कीच झाली असणार .

ज्याला खरे रूप कळले ते सोडून गेले
'वाघ कितीही म्हातारा झाला, गलितगात्र झाला तरी एकवेळ उपाशी मरेल परंतु गवत खाणार नाही ' ''शंभर वर्ष शेळी सारखे जगण्या पेक्षा एक दिवस वाघ सारखे जगा' असे स्वत; बाळासाहेबच म्हणत असत. मग आता असे काय झाले की हा स्वतःला ढाण्या वाघ समजणारा स्वयंघोषित '' हिंदुहृदय सम्राट '' एखाद्या मंदिरा समोरील भिकाऱ्या सारखा गयावया करीत याचना करू लागला ? कुणी म्हणेल बाळासाहेब शरीराने थकले ...मनाने खचले...आजारांनी खंगले म्हणून असे बोलले. परंतु हे साफ खोटे आहे . सत्य असे आहे कि बाळासाहेब ठाकरे यांना आता हे स्पष्ट कळून चुकले आहे कि आपल्या नंतर शिवसेना एकतर संपणार किंवा राज ठाकरे ती हायजैक करणार. कुठल्याही परीस्थित उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा वाहण्यास सक्षम नाही. बाळासाहेबांचे नेमके दु;ख्ख हेच आहे कि आंधळ्या पुत्र प्रेमापोटी आपण आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि केवळ आपल्या शब्दखातर तमाम शिवसैनिक उद्धवच्या मागे राहील असा गैरसमज करून घेतला . परंतु असे घडले नाही. अनेक जण बाळासाहेबांच्या भावनेचा विचार न करता सोडून गेले, जे शिल्लक आहेत ते केवळ बाळासाहेब जिवंत आहेत तोवर केवळ शरीराने शिवसेनेत आहेत .

गारदयांशी कसली गद्दारी ?
सत्य कटू असले तरी सांगावे लागेल, कट्टर शिवसैनिकांना ते पटणार नाही किंवा माझ्या म्हणण्याचा त्यांना राग देखील येयील, परंतु अगदी पहिल्या दिवसा पासून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे प्रा. ली. कंपनी होती. फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यांचा विचार करणारी. त्यातही पुन्ह्या खास ब्राम्हणी वृत्ति अशी कि शिवसेना वाढण्यासाठी बहुजनातील भोळ्या भाबड्या तरुणांना भावनिक आवाहने करायची ...त्यांची माथी भडकवायची त्यांच्या शक्तीचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या आधारे खंडण्या, मांडवल्या करीत सत्ता देखील मिळवायची. रक्त बहुजनांना सांडायला लावायचे .... मुगुट स्वतः मिरवायचे आणि संधी द्याचीच झाली तर ती ब्राम्हणाला द्यायची हे बाळासाहेबांचे धोरण होते आणि आहे . हे ज्यांना ज्यांना कळले ते शिवसेना सोडून गेले . बाळासाहेब त्यांना उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणत या बंडखोरीला गद्दार असे संबोधतात ...परंतु आमचे स्पष्ट म्हणणे आहे कि गारदयांशी कसली आली आली गद्दारी?

No comments:

Post a Comment