Sunday, 1 September 2013

अंधारात विवस्‍त्र होते आसाराम बापू

पीडित मुलीने FIR मध्‍ये सांगितली आपबिती

लैंगिक शोषणाचा आरोपात अडकलेले आसाराम बापू निर्दोष असल्‍याचा दावा करत आहेत. मॅडम आणि त्‍यांच्‍या पुत्राचे यामागे षडयंत्र असल्‍याचाही आरोप त्‍यांनी केला. परंतु, पीडित मुलीने आसाराम बापुंवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. तिने दाखल केलेली तक्रार आणि एफआयआरमध्‍ये त्‍या दिवशी घडलेला वृत्तांत नोंदविण्‍यात आला आहे. हा प्रकार अतिशय विकृत आहे.

अल्‍पवयीन मुलीने आसाराम बापुंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीत तिने आपबिती सांगितली. 'त्‍यांनी (आसाराम) खोलीतील दिवे बंद केले आणि मला मागे बोलावले. त्‍यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत चाळे करण्‍यास सुरुवात केली. मी ओरडले तेव्‍हा माझ्या आईवडीलांना ठार मारण्‍याची धमकी देऊन माझे तोंड बंद केले. त्‍यांनी माझे चुंबन घेतले आणि आक्षेपार्ह पद्धतीने मला स्‍पर्श करु लागले. अंधारात ते संपूर्ण नग्‍नावस्‍थेत होते. त्‍यांनी माझे कपडे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा मी रडू लागले. माझे तोंड त्‍यांनी पुन्‍हा बंद केले. हा प्रकार जवळपास तासभर सुरु होता. मी खोलीतून बाहेर जाऊ लालगे तेव्‍हा पुन्‍हा गप्‍प राहायला सांगून धमकी दिली.'

आसाराम बापुंनी दिलेल्‍या धमकीबद्दल पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की मी एक शक्तीशाली पुरुष आहे. स्‍वतःची तुलना त्‍यांनी इश्‍वरासोबत केली. खोलीत घडलेली कोणतीही गोष्‍ट बाहेर सांगितल्‍यास संपूर्ण कुटुंबाला उद्ध्‍वस्‍त करु टाकेन, अशी धमकी त्‍यांनी दिली होती.

त्‍यावेळी अतिशय घाबरल्‍याचे पीडितेने सांगितले. त्‍यावेळी कोणालाच काहीही सांगितले नाही. परंतु, आईवडीलांसोबत घरी परतल्‍यानंतर तिने सर्वप्रकार सांगितला. त्‍यानंतर दिल्‍लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली.

पीडित मुलीने पोलिसांकडे नोंदविलेल्‍या जबाबात म्‍हटले आहे, की ती मुळची उत्तर प्रदेशच्‍या शाहजहापूर येथील रहिवासी आहे. मध्‍य प्रदेशच्‍या छिंदवाडा येथील आसाराम बापुंच्‍याच गुरुकुलमध्‍ये इयत्ता बारावीत शिकते. तिथेच वसतीगृहात राहते. एका दिवशी अचानक तिची प्रकृती खालावली. वॉर्डनने तिच्‍या आईवडीलांना उत्तर प्रदेश येथून बोलावून घेतले. मुलीला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. तिथे तिचे सीटी स्‍कॅन करण्‍यात आले. तिच्‍या प्रेतबाधा झाल्‍याचेही वॉर्डनने त्‍यांना सांगितले.

आईवडील जेव्‍हा आश्रमात पोहोचले तेव्‍हा तिची प्रकृती उत्तम होती. आसाराम बापुंनी एक मंत्र पाठविला होता, त्‍यामुळेच ती शुद्धीवर आल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले. वॉर्डनने त्‍यांना जोधपूर येथे आसाराम बापुंच्‍या आश्रमात नेण्‍यास सांगितले. स्‍वतः आसाराम बापू तिच्‍यावर धार्मिक विधीद्वारे उपचार करतील. तिला तत्‍काळ जोधपूरला न्‍यावे, असेही वॉर्डनने त्‍यांना सांगितले होते.

पीडितेला घेऊन तिचे आईवडील 14 ऑगस्‍टला जोधपूरला पोहोचले. तिथे त्‍यांना एक खोली राहण्‍यासाठी देण्‍यात आली. 15 ऑगस्‍टला सायंकाळी आसाराम बापुंना आश्रमात भेटल्‍याचे मुलीने सांगितले. त्‍यांनी तिला खोलीत बोलावले आणि कुटुंबियांना बाहेर प्रतिक्षा करण्‍यास सांगितले. आसाराम बापुंनी तिची विचारपूस केली. शिक्षणाबद्दल विचारले. ती संस्‍थेची प्रवक्ता बनू शकते, असेही तिला सांगितले. त्‍यानंतर तिच्‍या आईवडीला जाण्‍याची सूचना केली. धार्मिक विधीला वेळ लागेल, अशी बतावणी केली.

पीडित मुलीला कोणताही आजार नसल्‍याचे पोलिसांच्‍या तपासात निष्‍पन्‍न झाले आहे. तिला आसाराम बापुंसमोर समर्पण करण्‍यास बाध्‍य करण्‍याचा संपूर्ण कट होता.

1 comment:

  1. "झाड तेथे छाया अन बुवा तेथे बाया" हि म्हण आसारामने सार्थ ठरविली. अशा लिंगपिसाटाचा धिक्कार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

    ReplyDelete