Sunday, 25 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-३ 


काश्मीर प्रश्न सोडविण्याची
संधी दोन वेळा गमावली
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची संधी भारताकडे चालून आली होती. या दोन्ही संधी वाजपेयी यांनी गमावल्या. पाकिस्तानने कारगिलवर चाल केली, तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून काश्मीरचा भूभाग (१९८४ साली पाकने बळकावलेला) परत मिळविण्याची संधी आली होती. मात्र, नियंत्रण रेषा ओलांडण्याची हिम्मत वाजपेयी सरकारला झाली नाही. ५०० जवानांचा बळी देऊन हे युद्ध थांबविण्यात आले. दुसèयांदा अशी संधी आली ती संसद हल्ल्याच्या वेळी. संसदेवर हल्ला होताच वाजपेयी सरकारने पाकिस्तानात सेना घुसवायला हवी होती. मात्र, यावेळीही वाजपेयी सरकारने शेपूट घातले. वाजपेयी सरकारचा ढिसाळपणाही याला कारणीभूत झाल्याचे उघडकीस आले आहे. तात्काळ हल्ला करण्याची योजनाच सरकारला बनविता आली नाही. लढावू तुकड्या सीमेवर आणण्यास सरकारला एक महिना लागला. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय सजग झाला होता. तापलेले वातावरणही बरेचसे निवळले होते. इतके हलगर्जी सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नाही. कदाचित पुढेही होणार नाही. महिनाभरानंतर प्रमुख लढावू तुकड्या पंजाब, राजस्थान, गुजरात आणि काश्मीर सीमेवर आणण्यात आल्या. ५ लाखांपेक्षाही जास्त भारतीय जवान सीमेवर तैनात करण्यात आले. पुढे वाजपेयी सरकार घरी जाईपर्यंत यापैकी बरेचसे सैन्य सीमेवरच होते. ५ लाख सैन्य सीमेवर गोळा करूनही पाकच्या हद्दीत साधे एक पाऊल टाकण्याची हिम्मत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली नाही. आयते हाती आलेले अणुबॉम्ब पोखरणमध्ये फटाक्यांससारखे फोडणे वेगळे आणि प्रत्यक्ष युद्ध करणे वेगळे हे वाजपेयींना कारगिल युद्धाने दाखवून दिले. वाजपेयींनी हिम्मत दाखवली असती, तर कदाचित १९८४ साली गमावलेला काश्मीरचा भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात येऊ शकला असता. पण वाजपेयी कचरले.
ऐतिहासिक अपयश
१३ दिवस, १३ महिने आणि ५ वर्षे असा सरासरी ६ वर्षे आणि २ महिन्यांचा काळ अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदावर होते. या संपूर्ण कालावधीत इतिहासात देदिप्यमान ठरेल, असे कोणतेही काम वाजपेयींनी केले नाही. अपयशी ठरण्याचा सर्वांत मोठा जागतिक विक्रम मात्र त्यांनी केला. यापैकी अनेक इतिहास वाजपेयी सरकारने प्रथमच निर्माण केले आहेत. उदा. बहुमत नसताना पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचे धाडस जगात कोणत्याही राजकीय नेत्याने केले नव्हते. ते वाजपेयींनी केले, तसेच बहुमताच्या ठरावाला सामोरे जात असतानाच राजीनामा देण्याचा इतिहासही निर्माण केला. अतिरेक्यांना विमानात बसवून सुरक्षितरित्या सोडून देण्याचे काम जगात कोणत्याही सरकारच्या संरक्षणमंत्र्यांने केले नाही. ते काम वाजपेयी सरकारने केले. कोणत्याही देशाच्या संसदेवर हल्ला करण्याचे धाडस अतिरेक्यांनी जगात कोठेही दाखविलेले नव्हते. वाजपेयी सरकारच्या काळात ही कामगिरीही अतिरेक्यांनी यशस्वी करून दाखविली.  जगात कोणत्याही दोन देशांच्या शिखर परीषदेमधून नेता उठून गेल्याचा इतिहास सापडत नाही. आग्रा समीटच्या निमित्ताने वाजपेयी सरकारने हा इतिहास निर्माण केला. शहिद जवानांच्या शवपेट्यांत जगात कुठेही पेसे खाल्ले गेल्याचे उदाहरण नव्हते, ते वाजपेयी सरकारने निर्माण केले.
अटलबिहारी वाजपेयींच्या अपयशांवर लिहायचे ठरविले तर अनेक खंडांचे एखादे पुस्तक तयार होईल. तूर्त येथेच थांबते. वाढदिवसाची एवढी भेट त्यांना पुरेशी ठरावी.
जय हिंद. जय भारत.

अनिता पाटील, औरंगाबाद.

1 comment:

  1. बहुतेक

    वाजपेयी ब्राम्हण असावेत अशी मला शंका येते आहे

    म्हणून त्याना काही जमल नाही

    लिहिताना आपण ज्यांच्या वर टिका करतो आहोत त्यांच्या कामाचा तरी विचार करा

    ReplyDelete