Sunday, 4 December 2011

ब्रह्मदेवाची फटफजिती



महाभारत काळात वैदिकांचा पराभव 
वेदांचे शेवटचे परंतु मुख्य अंग समजल्या जाणाèया उपनिषदांमध्ये ब्रह्म हीच मुख्य देवता म्हणून समोर येते. आद्य शंकराचार्यांनी प्रमुख १० उपनिषदांवर भाष्ये लिहिली. या सर्व भाष्यांचे सार त्यांनी एका ओळीत सांगितले आहे. +ब्रह्म सत्य जगन्मिथ्या+. म्हणजे ब्रह्म हेच सत्य असून जग हे मिथ्या आहे.
वेदांचाच भाग असलेल्या ब्राह्मण ग्रंथांत सृष्टीचा रचयिता म्हणून ब्रह्मदेवाचे वर्णन येते. पुरुष सुक्तात ब्रह्मदेवाने मानवजातीची निर्माण केल्याचे वर्णन आहे. असा हा ब्रह्मदेवही महाभारतकाळात दुय्यम अवस्थेत गेलेला दिसतो. ब्रह्मदेवाला श्रीविष्णूने आपल्या नाभिकमळापासून निर्माण केल्याचे वर्णन पुराणांत येते. जे बलशाली असतात, त्यांच्याच देवता समाजमान्य होतात, हा अत्यंत साधा सिद्धांत आहे. याचाच अर्थ महाभारतकाळापर्यंत वैदिकांचा पूर्ण पराभव झाला होता. त्यामुळे वैदिक देवता हळूहळू दुय्यम स्थानी जात नाहिशा झाल्या. श्रीकृष्ण चरित्रात इंद्राच्या फजितीचे जसे वर्णन येते तसेच ब्रम्हदेवाच्या फजितीचेही वर्णन येते. 
गोपाल-गोहरण  
श्रीकृष्ण गोकुळात असताना इतर गोपाळांबरोबर गायी घेऊन रानात जात. एक दिवस ब्रह्मदेवाने सर्व गायी आणि गोपाळांचे हरण केले. त्यांनतर श्रीकृष्णाने स्वत:च गायी आणि गोपाळाचे रूप धारण केले. भागवतातील यासंबंधीचा श्लोक असा :
स्वयमात्माऽऽत्मगोवत्सान् प्रतिवार्यात्मवत्सपै: ।
क्रीडन्नात्मविहारैश्च सर्वात्मा प्राविशद् व्रजम ।।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : २०)
अशा प्रकारे वर्षभर श्रीकृष्ण गायी-गोपाळांच्या रूपात वावरला. शेवटी ब्रह्मदेव वृंदावनात आला तेव्हा ही सर्व लीला पाहून भ्रमित झाला. श्रीकृष्णाच्या पायी लोटांगण घेत राहिला. भागवतात म्हटलेय की :
उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयो: पतन्।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ६३)
अर्थ : श्रीकृष्णाला शरण आलेला ब्रह्मदेव श्रीकृष्णाच्या पायावर पडायचा, उठायचा आणि पुन्हा पायावर पडायचा.
ब्रह्मदेवाने श्रीकृष्णावर माया चालविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो फसला. याचे वर्णन करताना ब्रह्मदेव क्षुद्र ठरविला गेला आहे. हा पाहा तो श्लोक :
तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि ।
महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युंजत: 
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ४५)
अर्थ : ज्या प्रमाणे रात्रीच्या घोर अंध:कारात वनातील दèयाखोèयांतील अंध:कार दिसत नाही, ज्या प्रमाणे दिवसाच्या प्रकाशात काजव्यांचा प्रकाश दिसत नाही, त्याप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांच्या मायाजालाचा महापुरुषांवर कोणताही परीणाम होत नाही. उलट हे क्षुद्र पुरुष आपल्या मायाजालाचा प्रभावच हरवून बसतात.
ब्रह्माच्या शोधासाठी वैदिक ऋषि आपली बुद्धि काही हजार वर्षे पणाला लावत होते. पण त्यांना ब्रह्मघोटाळा काही सुटला नाही. ब्रह्मदेवाला एक क्षुद्र पुरूष बनवून हा ब्रह्मघोटाळा कायमचा सोडवून टाकला.  

अनिता पाटील, औरंगाबाद. 
.........................................................................

2 comments:

  1. ह्या असल्या कथां मधून

    तुम्हाला समाधान मिळत असेल तर मिळो बापड़े

    आमच्या रोजच्या समस्यांच् काय ते बोला

    कोणता ब्रम्हदेव तो काळा का गोरा आम्ही अजुन पाहिला नाही
    आता 2015 साल चालु आहे

    आता काय करायच ते सांगा
    रोजगार पाहिजे देणार आहे का तुमचा कोणताही देव असेल तो

    ReplyDelete
  2. म्हणजे ब्राह्मण सुद्धा शुद्रच आहेच.

    ReplyDelete