Thursday, 22 December 2011

आपल्याच पत्रावळीवर भात

भाग : १ 


पाहुणे लेखक : श्री. दादा हरी 
  
ब्राम्हण ही ऐक जात नसून वृत्ती आहे. भारतात आर्यांचे आगमन झाले आणि सप्त सिंधूच्या 
प्रदेशात त्यांनी वास्तव्य केले . युरोपातील बर्फाळ आणि नेसर्गिक दृष्ट्या सतत उलथापालथ 
होणाऱ्या नापीक प्रदेशाला सोडून हा भटका समूह उगवत्या सूर्याच्या दिशेने निघाला. वाटेत 
त्यांना तुर्कस्तान पासून आजच्या पाकिस्तान/ अफगानिस्तान पर्यंत एकही भूभाग वस्ती करण्या 
योग्य वाटला नाही. ते आणखीही पुढे उगवत्या सूर्याच्या दिशेने भटकत पुढे गेले असते मात्र 
भारतीय उपखंडात त्यांना वस्ती करण्या योग्य विस्तीर्ण भूभाग , सुपीक जमीन , अनुकूल निसर्ग चक्र , 
आणि तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालया मुळे आलेली नैसर्गिक सुरक्षितता महत्वाची 
वाटली ; आणि याहूनही सगळ्यात महत्वाचे वाटल्या त्या येथील अनार्य / द्रविड / नागा / राक्षस / शैव / शाक्त/ कृषक / मऱ्हाट /भिल्लम / मातंग / धीवर / पर्धिक /यल्लम/ वानर आदी जमाती ; या जमातीत एकोपा नव्हता; भाषिक /सांस्कृतिक 
सामाजिक समानता नव्हती; नेमका या परिस्थीचा फायदा घेत आर्यांनी येथे आपले बस्तान बसवले. या जमातींमध्ये आपसात भांडणे लावून त्यापैकी काही जमातींना आपल्यात सामील करून घेतले; आर्य येताना अर्थातच स्त्रीया घेवून 
आलेले नव्हते. शरीराची गरज आणि वंश वृध्दी साठी त्यांनी मग येथील मिळतील त्या स्त्रीयाशी संग केला. या आर्य पुरुष आणि स्थानिक स्त्रीयांच्या संकरातून ऐक नवाच संमिश्र समाज आकाराला आला. भारत भर पसरलेल्या या समाजात भाषा खानपान देवदेवता आहार विचार यातही सरमिसळ आणि भेसळ झाली . मुळ आर्यातील ऐक वर्णश्रेष्ठत्ववादी गट मात्र या वर्ण संकरातून अलिप्त राहिला. सर्व काही स्थिर स्थावर होईपर्यंत या गटाने आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला नाही .
आर्यांचे काहीगट स्थानिक लढाऊ जमातीशी संकरीत होऊन मोठमोठे भूभाग आपल्या आधिपत्या खाली आणत होते. 
काही गट स्थानिक कृषक समाजाशी संकरीत होऊन शेती योग्य जमिनी तयार करून शेती करू लागले; काही गट भटक्या 
जमातीशी संकरीत होऊन वस्ती केलेल्या आर्य-अनार्य संकरीत समाजाला त्यांचा प्रदेशात ना मिळणाऱ्या गरजेच्या 
वस्तूंचा पुरवठा करू लागले. तर काही आर्य-अनार्यांचे संकरीत गट मानवी वस्त्यांच्या प्रदेशात राहून अन्य आवश्यक सेवा 
करू लागले. या सगळ्या संकर प्रक्रीये पासून तटस्थ राहिलेला ऐक आर्यांचा गट मात्र उर्वरित सर्व आर्यांना तुम्ही आता शुद्ध राहिला नाहीत . संकरीत / अशुद्ध आणि अपवित्र झाला आहात ; आम्ही मात्र आजूनही शुद्ध आहोत; पवित्र आहोत; म्हणूनच तुमच्या साठी पूजनीय आहोत. आपल्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचा नियम मोडून तुम्ही पाप केले आहे. म्हणूनच तो ईश्वर आता इथून पुढे तुम्हाला बोलणार नाही . तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तो आमच्या मार्फत सांगेल; 
एका अर्थाने इथून पुढे आम्ही देवाचे दूत आहोत ; तुमचे संदेश देवा पर्यंत पोहचवण्याचे आणि देवाचे संदेश तुमच्या पर्यंत 
पोहचवण्याचे काम आता आम्हाला करावे लागणार आहे, एका अर्थाने आम्हीच तुमच्या साठी देव समान आहोत.
संकरीत होऊन स्वतःला अपराधी मानणाऱ्या संकरीत आर्य -अनार्यांना या स्वतःला शुद्ध पवित्र म्हनाविणाऱ्या कावेबाज धूर्त
आणि लबाड आर्य गटाचे म्हणणे खरे वाटले आणि त्यांनी या गटाला देवाचे दूत मानायला सुरुवात केली . 
मग हा गट काबाड कष्ट न करता, रक्त न सांडता , अन्नाच्या शोधात न भटकता केवळ देवाचे दूत म्हणून इतर संकरीत 
समाजा कडून आवश्यक सर्व गरजा सेवा सुविधा कुठलाही मोबदला न देता केवळ देवाच्या कोपाची भीती दाखवून 
पुरवून घेवू लागला . आता या गटाला वंश वाढवण्याची आवश्यकता वाटू लागली ; परंतु स्थानिक संकरीत स्त्रीयांशी संग करून संतती वाढवावी तर पुन्हा आपले वर्ण श्रेष्ठत्वाचे ढोंग उघडे पडेल याची भीती होती ; म्हणूनच या जमातीने थोडे पश्चिमे कडे घुसून ( आजच्या इराण - इराक इत्यादी मुस्लीम प्रदेशातून ) स्त्रीया आणल्या . या स्त्रीया शिकारी जमातीतील 
म्हणजेच मांसाहारी होत्या. आणि आर्यांचा हा गट ऐतखाऊ ( म्हणजेच शाकाहारी ) होता. यातून जि संतती जल्माला आली 
ती अर्थातच शिकारी नव्हती पण मांसाहारी मात्र होती. पुन्हा त्यांना हातात शस्र/ नांगर धरायचा न्हवता .मांस तर खायचे ,शिकारीलाही जंगलात जायचे नाही . पुन्हा स्वतःला देवाचे दूत ही म्हणवून घ्यायचे . यातून मग गरीब आणि उपद्रवी नसणाऱ्या सहज पणे कापून खाता येऊ शकणाऱ्या गायी वर संक्रांत आली ( पुढे ३००० हजार वर्षानंतर या आर्य गटाने स्वतः ला ब्राम्हण ही संज्ञा स्वतःच दिली ; महावीर आणि गोतम बुध्धानी हिंसेवर आक्षेप घेत हिंदू धर्माचा त्याग केल्यावर मांसाहार बंद केला पण गाय खाणे मुस्लीम जमातींना आजूनही सर्वात जास्त प्रिय आहे याचा संदर्भ थेट मुळ वर्ण संकारशी आहे हें लक्षात घ्यावे ) ब्राम्हण गोमांस का खात होते ? नंतर त्यांनी ते का सोडले ? इतर भारतीय समाजावर देवाचे दूत अशी मोहिनी त्यांनी कशी घातली ? आणि कुठलेही कष्ट / शेती / काम धंदा न करता रक्त न सांडता 
त्यांचे समाजातील श्रेष्ठ स्थान कसे निर्माण झाले याचा सारांश रूपाने आढावा आपण या प्रस्तावनेत घेतला आहे . 
ही ऐतखाऊ जमात पुढे धर्माधिकारी कशी झाली ? स्वतःच्या मतलबासाठी त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी आकाराला आणली हें पाहू पुढील लेखात .




पाहुणे लेखक : दादा हरी 


No comments:

Post a Comment