Thursday, 22 December 2011

सावरकरांचा आत्मा अशांत का?


प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का?  
प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?
सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.
द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे
झाली देशाची फाळणी
आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल.  पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.

महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 
सावरकरांच्या डोक्यावर 
कोट्यवधी लोकांचे तळतळाट
फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा  मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे. 
प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. 
अनिता पाटील, औरंगाबाद


2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete