Tuesday, 22 November 2011

दादाहरी यांच्या पत्राला उत्तर

श्री. दादाहरी,

तुम्ही मेसेज केलेले पत्र मिळाले. वाचून आनंद झाला आणि दु:खही. आनंद यासाठी की, तुम्ही ब्लॉग वाचला. दु:ख यासाठी की, त्याकडे तुम्ही पूर्वग्रहाने पाहिले.  
मला काहीही साध्य करायचे नाही
इतिहास, पुराणातील कथा मराठा तरुणांना सांगून काय साध्य करणार असा प्रश्न आपण खूप दिवसांपासून करीत आहात. मला काहीही साध्य करायचे नाही. मी कोणाचे प्रबोधन करू शकत नाही. माझी तेवढी शक्ती नाही. मला थोड्याफार अभ्यासातून जे जाणवले ते मी निर्भिडपणे लिहिले, एवढेच. घटनेनेच मला लिहिण्याचा अधिकार दिला आहे. मी कोणाविरुद्धही लिहित नाही. तुम्ही म्हणता तसा मी कोणत्याही पुराणकथेचा नवा अर्थ लावलेला नाही. अर्थ जुनेच आहेत. या कथा संस्कृतात होत्या. बहुजनांना संस्कृत येत नाही. मी ते शिकले. काही पुस्तके वाचली. आणि जशाच्या तशा कथा लोकांसमोर ठेवल्या. त्यात एवढे बिघडले कुठे? सर्व ब्राह्मणेतर समाजाला शूद्र ठरवून या वाङ्मयापासून आजपर्यंत लपवून ठेवण्यात आले होते. कारण या वाङ्मयात बहुजनांविरोधातील कपट कारस्थाने ठासून भरलेली होती. या कथा समोर ठेवल्यामुळे ही कपट कारस्थाने समोर आली. त्यात माझा काय दोष? सत्य सांगणे हा काही दोष होऊ शकत नाही. 
ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास राग का यावा?
माझ्या लेखात ब्राह्मणांचे उल्लेख वारंवार येतात. ही गोष्ट खरी आहे. आता मूळ कथांत ब्राह्मण आहेत तर त्याला मी काय करणार. ब्राह्मणांच्या जागी दुसरया कोणाची नावे घालून मी या कथा लोकांना सांगाव्या असे तुमचे म्हणणे आहे का? यात मला एक गोष्ट अजिबात कळली नाही की, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास तुम्हाला राग का यावा. बरे मी ब्राह्मणांवर कुठेही टीका केलेली नाही. फक्त त्यांच्याशी संबंधित मजकूर मराठीत भाषांतरीत केला. त्यामुळे त्यांचा कावेबाजपणा आपोआप जगासमोर आला. यात माझ्या पदरचे काहीच नाही. जे आहे, ते ब्राह्मणांनीच लिहिलेल्या ग्रंथांतीलच आहे. यालाही तुम्ही आक्षेप घेता. ही म्हणजे फारच कमाल झाली.
ब्राह्मणी वाङ्मय विश्लेषणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी?
जातीय विद्वेष निर्माण करू नका, असा शहाजोग सल्ला तुम्ही मला देत आहात. हा सल्ला वाचूनच मला धक्का बसला. ब्राह्मणांच्या चुकांबद्दल लिहू नये, बोलू नये, असा एक काही कायदा या देशात आहे का? ब्राह्मणी वाङ्मय विश्लेषणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा हा अट्टाहास का? याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
आरएसएस, शिवसेना, बजरंग दल यांना सल्ला द्या
जातीय विद्वेष पसरवू नका, हा सल्ला तुम्ही खरे तर आरएसएस, शिवसेना, बजरंग दल वगैरे संघटनांना द्यायला हवा. गुजरातेत इशरत जहाँ नावाच्या निष्पाप तरुणीची अतिरेकी ठरवून हत्या झाल्याचा निर्णय कालच न्यायालयाने दिला आहे. त्याच्या बातम्या आजच्या सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आहे. या जातीयवादामागे ब्राह्मणी शक्ती आहेत, म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात का?
लेनची तळी उचलणारयांना सल्ला द्या
जेम्स लेनला मदत करून शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा अपमान करणाèया ब्राह्मणांना आणि त्यांची तळी उचलरया ब्राह्मणांनाही तुम्ही काही सल्ला द्याल का? 
मराठा संघटनांबद्दल द्वेष का?
मी कोणत्याही संघटनेची सदस्य नाही. मला कोणाबद्दल प्रेम नाही, आणि कोणाबद्दल द्वेषही नाही. परंतु तुम्ही मराठा संघटनांबद्दल जे शब्द वापरले त्यावरून या संघटनांबद्दल तुमच्या मनात खोल अढी असल्याचे जाणवते. लेखकाने कोणाबद्दल असा द्वेष बाळगावा का? असा प्रश्न मला पडल्यावाचून राहत नाही. ब्राह्मणांच्याही गुप्त संघटना आहेत. फेसबुकवरही आहेत. तेथील जातीयवादाबाबत तुम्हाला प्रेम का बरे वाटावे? हाही प्रश्न आहेच. 
मी कोणाला कोणती शिवी दिली?
आपण माझ्यावर चक्क खोटे आरोप करीत आहात. तुम्ही मला उद्देशून म्हणता शिव्या देऊन काही साध्य होणार नाही. शिव्या म्हणजे काय? मी माझ्या ब्लॉगमध्ये कोणाची आय-माय काढली आहे का? मी कोणत्या लेखात कोणाला कोणती आई-मायीवरून शिवी दिली, हे कृपया आपण मला सांगाल का? मी अत्यंत सभ्य आणि संयत भाषेत लिखाण करते. सामनातून ज्या भाषेचा वापर होतो त्याबद्दल तुम्ही काही लिहीत नाही. हा पक्षपातीपणा अजब आहे. 
दादाहरी   साहेब तुमचा गोंधळ उडालाय 
एकूणच तुमचा सगळा गोंधळ उडालेला दिसतोय. तुमचे हे वाक्य पाहा : + परंपरा आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून पोटे भरली असतील किवा आजही तुम्ही म्हणता तसा त्यांचा पोटभरू बामणी कावा चालू असेलही, पण तो हाणून पाडण्यासाठी पुराणआणि इतिहासाचे दाखले देवून आणि त्यांना शिव्या देवून आमची प्रगती कशी होणार ?+  ...ब्राह्मणांचा  कावेबाजपणा आजही  चालू आहे, असे तुम्ही एकीकडे म्हणता आणि त्याला विरोध करणाèया लेखनाला आक्षेप घेता.
दलितांबद्दलचे तुमचे अज्ञान घातक आहे
दलितांच्या बाबतीत तुम्ही जे काही लिहिले आहे, ते तुमच्या अज्ञानाचे प्र्रतिक आहे. आंबेडकरांनी धर्मांतर केले म्हणून आजचे प्रश्न निर्माण झाले, असा तुमचा रोख दिसतो. समजा आंबेडकरांनी धर्मांतर केले नसते, तर तुम्ही म्हणता तसे जे काही कोणते वाडे शहरांत तयार झाले नसते का? काही तरी बोलू नका, बोलताना थोडा विचार करा. तुम्ही जे शब्द यासंदर्भात वापरले ते शब्द वापरणे मी पाप समजते. म्हणून मी त्यातला जातीवाचक भाग काढून फक्त वाडे एवढाच उल्लेख ठेवला.

तुम्ही माझा ब्लॉग वाचलात. वाचून त्याचे विश्लेषण केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 
कळावे. लोभ असावा. 

आपली बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment