Tuesday, 1 November 2011

ब्राह्मणवादी शिंद्यास अखेरचे पत्र : श्यामच्या आईचे समर्थन हा दलितांचा अवमान



ब्राह्मणवादाने (ब्राह्मणवाद म्हणजेच हिंदुत्ववाद होय. हिंदुत्ववाद्यांचा खरा चेहरा ब्राह्मणवादाचा आहे, त्यामुळे मी हा शब्द वापरते, हे कृपया सूज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे.) झपाटलेल्या विनायक शिंदे नामक तरुणाने माझ्या +अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई आदर्श कशी?+ या लेखावर प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्याने पाठविलेल्या ढिगभर प्रतिक्रियांवर मी एक लेख या आधी लिहिला होता. तो विद्वान वाचकांच्या पसंतीसही उतरला. त्यानंतरही विनायकाचे आक्षेप हनुमाच्या शेपटीसारखे सुरूच आहेत. उतारेच्या उतारे तो लिहून पोस्ट करीत असतो. त्यात मुद्दे फार नाहीत. तेच तेच प्रश्न पुन्हा विचारलेले असतात. श्यामच्या आईवर मी लिहिलेल्या लेखाखाली या सर्व प्रतिक्रिया वाचकांना पाहायला मिळतील. 
प्रतिक्रिया की खंडकाव्य! 
विनायकाच्या या प्रतिक्रियांना एंटरटेन करू नका, असा सल्ला देणारे असंख्य मेसेज विद्वान वाचकांनी मला पाठविले आहेत. एका वाचकाने तर स्पष्टच लिहिले की, +ताई विनायक शिंदे उगाच फुटेज खात आहे. केवळ स्वत:ची प्रसिद्धी करण्यासाठी त्याचे हे उद्योग सुरू आहेत. त्याला महत्त्व देऊ नका.+ विद्वान वाचकांचा सल्ला मान्य करण्याचा मी निर्णय घेतला आहे. या पुढे विनायकाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाईल. परंतु, तत्पूर्वी त्याने उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. वास्तविक यातील काही प्रश्नांची उत्तरे मी आधीच दिलेली आहेत. तरीही मी त्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकते. विनायकाने श्यामच्या आईच्या लेखाखाली प्रतिक्रिया  नोंदविल्या असल्या तरी, त्याचा माझ्या एकण विचारसरणीला विरोध आहे. त्याविरुद्ध उतारेच्या उतारे लिहिले आहेत. हा बालिशपणाचा भाग आहे. असो. त्याच्या या सगळ्या खंडकाव्याचा धांडोळा घेतला तेव्हा साधारणत:  नऊ-दहा मुद्दे हाती लागले.  
विनायक काय म्हणतो :
१. श्यामच्या आईला आजच्या काळाची मोजमापे लावून तोलू नका.
२. श्यामच्या आईने तिच्या काळाला अनुसरून आपल्या मुलावर संस्कार करण्याचे प्रयत्न केले. तिच्याकडे एक व्यक्तिरेखा म्हणून पाहा.
३. कादंबरीवर आक्षेप घेऊ नका. फार तर तिचे धडे पाठ्यपुस्तकात नको, अशी मागणी तुम्ही करा.
४. औरंगाबादला संभाजीनगर म्हणा. संभाजीराजांची हत्या करणार्या औरंगजेबाच्या नावावर शहराचे नाव ठेवताना (की, घेताना) तुमची संवेदनशीलता कुठे जाते?
५. हिंदुत्ववादाला सरसकट बामणवाद ठरवून झिडकारू नका. हिंदु धर्माला बामणी धर्म म्हणू नका. 
६. माझे खूप ब्राह्मण मित्र आहेत. ते केवळ ब्राह्मण आहेत, म्हणून मी त्यांच्यासोबतची मैत्री कशी काय तोडू शकतो?
७. सरसकट सगळ्याच ब्राह्मणावर तुम्ही टीकास्त्र सोडता, हे योग्य नाही.
८. संभाजी राजांना व्हिलन म्हणून जगासमोर पेश करण्याचे पाप काही ब्राह्मण इतिहासकारांनी केले, हे खरे आहे. मात्र, संभाजी राजांना या प्रतिमेतून बाहेर काढण्यासाठीसुद्धा काही ब्राह्मण इतिहासकारांनी लेखण्या झिजवल्या आहेत. त्यांचे योगदान नाकारणार का?
९. ज्या संत तुकारामांचे वचन तुम्ही ब्लॉगचे ब्रिदवाक्य केले आहे, त्या तुकारामांनी दत्तगुरुवर अभंगर रचले. दत्तगुरुंनी दोन ब्राह्मणांना देहांताची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे हिंदुधर्माला बामनी धर्म म्हणू नका.
१०. या देशात लव्ह जिहादचे संकट उभे आहे. ४० हजार (की लाख) हिंदु  मुली बेपत्ता आहेत. मुस्लिम तरूण हिंदू तरुणींना बाटवित आहेत.


ब्राह्मणवाद्यांचे बिनपगारी शिपाई !
विनायकाचे सुरूवातीचे दोन-तीन मुद्दे श्यामच्या आईबद्दल आहेत, बाकी सर्व मुद्दे ''बी-ग्रेडी'' म्हणजे 'ब्राह्मणी ग्रेड'चे दर्जाहीन मुद्दे आहेत. त्याने तुकड्या तुकड्यात लिहिले असले तरी हा मुद्दा एकच आहे : हिंदुत्ववाद की    ब्राह्मणवाद? ब्राह्मणवाद्यांचे हे बी-ग्रेडी मुद्दे  गोडसेवादी लोकांनी सुरू केलेल्या सावरकरविषयक ग्रुपवर रोज चर्चिले जातात. फेसबुकवर हे गट कोणालाही पाहता येतील. हिंदुत्ववाद्यांचा आदर्श हिटलर असल्यामुळे त्यांनी हिटलरची गोबेल्स नीती उत्तम प्रकारे अंगिकारली आहे. त्याला विनायक सारखी बहुजनांची कोवळी मुले चटकन भुलतात.  भावनेच्या आहारी जातात आणि बळी पडतात. त्यातून ब्राह्मणवाद्यांना लढण्यासाठी बिनपगारी शिपाई मिळतात. 
श्यामच्या आईचा उदाउदो हा दलितांचा अपमान
विनायकाच्या तोंडून ब्राह्मणवाद्यांनी मांडलेले वरील मुद्दे कसे निरर्थक, दिशाभूल करणारे, खोडसाळ आणि बहुजन, दलित, आदिवासी, मुस्लिम यांचा अवमान करणारे  आहेत, ते आता आपण पाहू.
१. श्यामच्या आईला आजच्या काळाची मोजमापे लावून तोलू नका. 
उत्तर : बाबरकालीन इतिहासाला आताची मोजमापे लावून अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा हा युक्तिवाद ब्राह्मणवाद्यांना का सूचला नाही?
२. श्यामच्या आईने तिच्या काळाला अनुसरून आपल्या मुलावर संस्कार करण्याचे प्रयत्न केले. तिच्याकडे एक व्यक्तिरेखा म्हणून पाहा.
उत्तर : प्रत्येक आई आपल्या मुलावर संस्कार करण्याचा प्रयत्न करीत असते. कोणत्याही आईला आपला मुलगा चोर व्हावा असे वाटत नाही. मग श्यामच्या आईचे एवढे महात्म्य माजवण्याचा उपद्व्याप कशासाठी?
३. कादंबरीवर आक्षेप घेऊ नका. फार तर तिचे धडे पाठ्यपुस्तकात नको, अशी मागणी करा.
उत्तर : आक्षेप कादंबरीवर नाहीचंये. आक्षेप या बामणी आईला आदर्श मानण्याला आहे. अस्पृश्यता पाळणारी आई अजूनही ब्राह्मणवाद्यांना आदर्श वाटते, हा या देशातील २० कोटी दलित, आदिवासींचा अवमान आहे. दलितानां माणूसपण नाकारणारी प्रवृत्ती अजूनही या देशात आहे, हे सिद्ध करणारा हा धडधडीत पुरावाच आहे. इतकी वर्षे पाठ्यपुस्तकात हे धडे आहेत, याला पाठ्यपुस्तक मंडळांवरील ब्राह्मणी वर्चस्व जबाबदार आहे. हा धडा नुसताच काढून चालणार नाही. हा धडा इतकी दशके पाठ्यपुस्तकात घुसडण्याचे पाप करणाèयांवर कारवाई व्हायला हवी.
ठाकरे यांच्या सेनेकडून छत्रपतींची रोज हत्या
४. औरंगाबादला संभाजीनगर म्हणा. संभाजीराजांची हत्या करणाèया औरंगजेबाच्या नावावर शहराचे नाव घेताना तुमची संवेदनशीलता कुठे जाते?
उत्तर : अ) आम्ही संवेदनशील आहोत, म्हणून आम्ही या शहराला औरंगाबाद म्हणतो. ठाकèयांनी सांगितले म्हणून आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही. औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली, याचे दु:ख आम्हाला आहेच. पण औरंगजेबाने राजांची एकदाच हत्या केली. ठाकरे कुटुंबिय गेली ४५ वर्षे शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचाारांची हत्या करीत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन दंगली घडविणे, कधी उत्तर भारतीयांवर तर कधी दक्षिण भारतीयांवर हल्ले करणे, असले उद्योग ठाकरे करीत आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ठाकèयांनी बहुजनांच्या मुलांच्या हातात दगड दिले. संपूर्ण भारतात, शिवाजी महाराजांची एक विध्वंसक प्रतिमा त्यातून निर्माण झाली. ही महाराजांची हत्या नव्हे काय. महाराज असे होते का?
ब) ब्राह्मणवाद्यांना औरंगाबादचे नाव बदलायचेच नाही. त्यांना फक्त बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकवायची आहेत. नाही तर केंद्रात आणि राज्यात ६-७ वर्षे सत्ता असताना त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर का नाही केले? हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. स्थगिती उठविण्यासाठी सरकारने काहीही केले नाही. ब्राह्मणवाद्यांना संभाजी महाराजांबद्दल इतके प्रेमच होते, तर त्यांनी संसदेत विशेष कायदा करून, शहराचे नाव बदलायला हवे होते. 
क) उठसूठ रस्त्यावर उतरून दगडफेक करणारी जाळपोळ करणारी ठाकèयांची शिवसेना जेम्स लेन प्रकरणात गप्प होती. भांडारकरवर हल्ला करणारे मर्द मावळे दुसèयाच संघटनांचे होते. शिवरायांची बदनामी होत असताना, शिवसेना बदनामीचा आनंद लुटत होती. शिवसेना गप्प राहिली कारण महाराज आणि जिजाऊंची बदनामी करणारे ब्राह्मण होते. लेनच्या पुस्तकावरील बंदी उठविण्यासाठी कोर्टात जाणाराही ब्राह्मणवादीच होता. त्यांना शिवसेनेने संरक्षण दिले. हीच गोष्ट संघ परीवाराची आहे. परीवारही या बदनामीच्या काळात गप्त होता. याचाच अर्थ शिवसेना आणि संघ परीवार  हिंदुत्ववादी नसून ब्राह्मणवादी आहे, हे सिद्ध होते. 
५. हिंदुत्ववादाला सरसकट बामणवाद ठरवून झिडकारू नका. 
उत्तर : याचे उत्तर वर आलेच आहे.
६. माझे खूप ब्राह्मण मित्र आहेत. ते केवळ ब्राह्मण आहेत, म्हणून मी त्यांच्यासोबतची मैत्री कशी काय तोडू शकतो.
उत्तर : मी विनायक शिंदे यांच्या ब्राह्मण मित्रांविषयी एकही लेख लिहिलेला नाही. त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधिल नाही. कोणाशी मैत्री ठेवायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. 
७. सरसकट सगळ्याच ब्राह्मणावर तुम्ही टीकास्त्र सोडता, हे योग्य नाही.
उत्तर : हा आरोप चूक आहे. मी ब्राह्मणांवर टीका करीत नाही. फक्त जातीयवाद्यांवर टीका करते. त्यात ब्राह्मण जास्त सापडतात, त्याला मी काय करणार.
ब्राह्मण इतिहासकारांनी उपकार केले नाहीत
८. संभाजी राजांना व्हिलन म्हणून जगासमोर पेश करण्याचे पाप काही ब्राह्मण इतिहासकारांनी केले, हे खरे आहे. मात्र, संभाजी राजांना या प्रतिमेतून बाहेर काढण्यासाठीसुद्धा काही इतिहासकारांनी लेखण्या झिजवल्या आहेत. त्यांचे योगदान नाकारणार का?
उत्तर : अ) सत्य लिहून ब्राह्मणांनी उपकार केलेले नाहीत. इतिहासकारांनी सत्य लिहावे, हे गृहीतच आहे. त्यामुळे सत्य लिहिले म्हणून हे ब्राह्मण मोठ्या किताबाचे मानकरी ठरत नाहीत. त्यामुळे संभाजी महाराजांसाठी लेखण्या झिजविणाèया ब्राह्मणांचे कौतुक आम्हाला सांगू नका. सत्य इतिहास लिहिणे हे त्यांचे कर्तव्यच होते. 
ब) काही ब्राह्मण इतिहासकारांनी महाराजांविषयी चांगले लिहिले म्हणून खोटे लिहिणारया ब्राह्मणांचे पाप धुतले जात नाही. त्यांना या पापाची शिक्षा झालीच पाहिजे.
क) बाबा पुरंदरेसारख्या काही लोकांनी महाराजांच्या इतिहासाचा धंदा केला. कोट्यवधींची प्रापर्टी उभी केली. त्याचा हिशेब कोण करणार?
ड) ज्यांनी सत्य इतिहास लिहिला त्यांना इतिहासकार म्हणून मिरविता आले. महाराजांनी पराक्रम गाजविला म्हणून हे लोक इतिहासकार झाले. नाही तर त्यांना कोणी हिंग लावून तरी विचारले असते का?
फ) शेवटी माझा एक सिद्धांत : सर्वच ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला नाही. परंतु, खोटा इतिहास लिहिणारा प्रत्येक जण ब्राह्मणच आहे.
तुकाराम स्वत:ला हिंदू नव्हे कुणबी म्हणतात
९. ज्या संत तुकारामांचे वचन तुम्ही ब्लॉगचे ब्रिदवाक्य केले आहे, त्या तुकारामांनी दत्तगुरुवर अभंगर रचले. दत्तगुरुंनी दोन ब्राह्मणांना देहांताची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे qहदूधर्माला बामनी धर्म म्हणू नका.
उत्तर : अ) पाप करणाèयाला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो ब्राह्मण असो की, आणखी कोणी. त्यामुळे पापी ब्राह्मणाला शिक्षा केली म्हणजे फार मोठी कामगिरी केली असे होत नाही. गुरुचरित्रातील या कथेचे कौतुक ब्राह्मणवाद्यांना असले तरी आम्हाला नाही.
ब) तुकाराम महाराजांनी स्वत: कुठेही हिंदु म्हणवून घेतलेले नाही. तुकारामांनी स्वत:ला कुणबी म्हणून घेतले आहे. या विषयावर मी +मराठा-कुणबी+ या लेखमालेत विस्ताराने लिहिले आहे. जिज्ञासूंनी अवश्य पाहावे. 
लव्ह जिहादची खोटी आरोळी
१०. या देशात लव्ह जिहादचे संकट उभे आहे. ४० हजार (की लाख) हिंदू मुली बेपत्ता आहेत. मुस्लिम तरूण हिंदु  तरुणींना बाटवित आहेत. 
उत्तर : गोबल्स नीतीचे उत्तम उदाहरण. बेपत्ता हिंदू मुलींचा हा आकडा कुठून आणला. समजा उद्या एखाद्या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेने असा आरोप केला की, या देशात ५० हजारांपेक्षाही जास्त मुस्लिम मुली बेपत्ता आहेत, तर तुम्ही काय उत्तर देणार?
मुस्लिमांशी लग्न करणारया या पाहा ब्राह्मण कन्या 
बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमीरखान आदी अनेक मुस्लिम कलावंतांच्या बायका ब्राह्मण आहेत. जुन्या पिढीतील पटकथाकार तथा सलमान खानचे वडील सलीम खान यांची पत्नी महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहे. ती शुद्ध मराठी बोलते. सलमान रश्दीची एकेकाळची मैत्रीण लक्ष्मीपार्वती ही ब्राह्मण आहे. अशी असंख्य उदाहरणे देशात उपलब्ध आहेत. आमच्या औरंगाबादेतही असे एक जोडपे आहे. या प्रोफेसर बाई पूर्वाश्रमीच्या आपटे आहेत. त्यांनी एका विद्वान मुस्लिम तरुणाशी विवाह केला. ब्राह्मण मुलींनी मुस्लिमांशी विवाह केलेला ब्राह्मणवाद्यांना चालतो, असे काही आहे का? की आपल्या मुलींना आवरण्यासाठी ते बहुजन समाजातील तरुणांना चिथावणी देत आहेत? 
प्रेमाला प्रेमच राहू द्या
प्रेम हे प्रेम असते. त्याला जातीची qकवा धर्माची बंधने घालणे अयोग्य आहे. एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. 

अनिता पाटील, औरंगाबाद. 

1 comment:

  1. इतिहास आणि विचार ह्या दोघाना आजच्या मापात नाही मोजता येत

    विचार जुने असू शकातात आणि ते चुकीचे पण असू पण असू शकतात
    पण आता विचार बदलू शकतो ना आपण

    राहिला शाम च्या आईचा प्रश्न तर
    पाटिल तुमच्या घरात काय मागास जातींच्या पांगती उठायाच्या का..???

    आज पण गावात जाऊन पहा दलितांच्या वर जास्त अत्याचार कुठे होतात आणि कोण करत

    ब्राम्हण काय आणि मराठा काय दोघेही सारखिच वागणूक देतात दलिताना

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.